घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं
उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं?
पंचम लावून कोकिळ गातो सुरेल मंजुळ वसंतगाणी
कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी
मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं
दिवसरात्र या खुळ्या मनाची भिरभिर वा-यावरची वरात
कधी, कुठं ते हरवुन जाईल, धडधड अन् काहूर उरात
भीती कसली? वा-यालाही क्षितिजकडांचं बंधन असतं
जगण्यासाठी आधाराची काठी असते वेडी आशा
जे होतं ते भल्याचसाठी, सांगत असते अबोल भाषा
मर्म जाणलं ज्यानं, त्याचं जीवन ही अभिनंदन असतं
तप्त उन्हातहि माथ्यावरती अविरत त्याची शीतल छाया
आयुष्याची स्फूर्ती, शक्ती, निर्गुण ती घनगंभिर माया
भासही त्याचे अमोल ठेवा, दर्शन सौख्य चिरंतन असतं
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3051
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
अतिशय सुंदर
अप्रतिम क्रान्तिजी...
खूप छान कविता
असेच म्हणतो
In reply to खूप छान कविता by बेसनलाडू
वा-यालाही क्षितिजकडांचं बंधन असतं
क्रान्ति ताई
फारच तरल!
क्रान्ति.....
खुपच छान
खुप छान.
वा !
अभिनंदन