आदिशक्ती महादेवी
नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं.
सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून.
लज्जागौरी
लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले. परकिय आक्रमकांबरोबरच स्वकीयांनीही ह्यांना नष्ट केले.
१. ही पेडगावच्या भैरवनाथ मंदिरातील लज्जागौरीची प्रतिमा. इ.स. साधारण १३ वे शतक. यादव राजवट.
हिच्या योनीतून दोन सर्प बाहेर आले असून ते पुरुष शक्तीचे प्रतिक आहेत.
२. ही वेरूळमधली रामेश्वर लेण्यातील (लेणी. क्र. २१ ) येथील नंदीपीठाच्या मागील बाजूस कोरलेली आहे. इ.स. ७ / ८ शतक.
सप्तमातृका
ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा।
वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमातरः॥
सप्तमातृका मूळाच्या अनार्य देवता. कोकणात ह्यांनाच साती आसरा अथवा जलदेवता म्हणत असावेत. सृजनशक्तीची ही प्रतिकं. यातल्या ब्राह्मी, कौमारी, ऐन्द्राणी आणि वैष्णवी ह्या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, वाराही, चामुंडा ह्या मूळच्या अवैदिक अर्थात अनार्य अंशाच्या. काही वेळा सात मातृकांबरोबरच आठवी नारसिंहीही दिसते.
सप्तमातृका ह्या नेहमी पट ह्या स्वरूपात दिसतात. म्हणजे सुरुवातीला वीरभद्र आणि शेवटी गणेश आणि मध्ये सात मातृका त्यांच्या बाळांसह. मातृका ओळखणे तसे फार सोपे. मातृकांखालीच प्रत्येकीची वाहने कोरलेली असतात.
ब्राह्मणी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरूड
वाराही - वराह किंवा महिष. ही काही वेळा वराहमुखी पण दाखवली जाते.
ऐन्द्राणी - हत्ती
चामुंडा - प्रेत, शृगाल, कुत्रा किंवा घुबड
यातली चामुंडा सर्वात सुप्रसिद्ध. कदाचित चालुक्यांची ती कुलदेवता असल्याने तीला मानाचे स्थान मिळालेय. कंकालस्वरूप शरीर, लोंबलेले स्तन, पोटात असलेला विंचू (हे तिच्या सतत जागृत असलेल्या भुकेचे प्रतिक) आणि पायांतळी प्रेत ही तिची सर्वसाधारण लक्षणे. सप्तमातृकापटांसह ही एकच मातृका स्वतंत्ररीत्या कोरलेलीही बर्याच वेळा आढळते.
वेरूळच्या 'रावण की खाई' (लेणी क्र. १५) मधील सप्तमातृका पट
३. ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी अनुक्रमे हंस, बैल, मोर आणि गरूड ह्या वाहनांसह
४. वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा अनुक्रमे वराह, हत्ती आणि घुबड ह्या वाहनांसह
वेरूळ येथील कैलास एकाश्ममंदिरातील यज्ञशाळेतील सप्तमातृका
५. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (हंस) आणि माहेश्वरी (बैल)
६. कौमारी आणि वैष्णवी अनुक्रमे मोर आणि गरुडासह
७. वाराही (महिष), ऐन्द्राणी (हत्ती) आणि चामुंडा (शृगाल अथवा कुत्रा)
८. सप्तमातृकापट कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
९. पूर्णपणे उभ्या स्थितीतील सप्तमातृकापट, वेरूळ
१०. चामुंडा, सोमेश्वर मंदिर, पिंपरी दुमाला (१३ वे शतक)
११. चामुंडा, भुलेश्वर मंदिर, यवत (१२ -१३ वे शतक)
१२. चामुंडा, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर (११-१२ वे शतक)
१३. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातीलच अजून एक देखणी चामुंडा
सप्तमातृकांसोबतच नंतरच्या काळात गणेशाचे स्त्रीरूपसुद्धा तंत्र पंथात समाविष्ट झाले. विनायकी अथवा गणेशिनी ह्या नावाने हे रूप ओळखले जाते.
१४. पाटेश्वर येथील विनायकी, साधारण १४ वे शतक
१५. भुलेश्वर येथील विनायकी
सरिता देवता
भारतात नद्यांनासुद्धा देवता मानले जाते. गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तीन प्रमुख सरिता देवता. ह्या आपल्याला वेरूळ येथे कोरलेल्या दिसतात. गंगेचे वाहन मकर, यमुनेचे कूर्म तर सरस्वतीचे कमळ
१६. मकरारूढ गंगा
१७. कूर्मारूढ यमुना
१८. कमलारूढ सरस्वती
१९. वेरूळ येथील रामेश्वर लेणीतील (क्र. २१) गंगेचे अप्रतिम शिल्प
२०. यमुना, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ
पार्वती
बहुतेक वेळा पार्वतीची मूर्ती ही उमा-माहेश्वर अशा स्वरूपात आढळते. स्वतंत्रपणे कोरलेल्या तीच्या अगदी मोजक्या मूर्ती आढळतात. पार्वतीचे वाहन गोधा अर्थात घोरपड, पार्वतीच्या भोवती पाच अग्नी दाखवतात. ४ यज्ञकुंडातले अग्नी आणि पाचवा सूर्य. शंकर हा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीने पंचाग्नीसाधन करून कठोर तप केले अशी पौराणिक कथा.
२१. वेरूळ येथील लंकेश्वर लेणीतील पार्वती. लक्षपूर्वक पाहिल्यास पार्वतीच्या एका हाती गणेश तर दुसर्या हाती शिवपिंडी दिसेल. भोवती अग्नी धगधगत असलेले दिसतील, वाहन गोधा
२२. पार्वती, धुमार लेणे (लेणी क्र. २९), वेरूळ
अन्नपूर्णा
हे ही देवीचेच एक स्वरूप. पार्वतीचा अवतार. आपल्या घरी अन्नपूर्णा सौख्य आणि समृद्धी घेऊन येते अशी समजूत. तिची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे एका हातात पळी तर दुसर्या हाती कणीस, तर कधी कमंडलू. खिद्रापूरच्या मंदिरात अंतराळाच्या भिंतीत अन्नपूर्णेची पळी हातात घेतलेली एक सुरेख मूर्ती आहे. दुर्दैवाने माझ्याकडील ते छायाचित्र खराब झाले.
२३. वेरूळच्या कैलास एकाश्ममंदिरातील प्रदक्षिणापथाच्या भिंतीत कोरलेली अन्नपूर्णा
लक्ष्मी
लक्ष्मी म्हणजे धनाची देवता. हिंदू धर्मात ती कोठून आली हे विवाद्य आहे. काही जण ती जैन तर काही जण ती बौद्ध धर्मातून आली असे मानतात तर बरेच जण ती मूळची हिंदू धर्मातीलच असे मानतात. माझ्यापुरते मी ती सप्तमातृकांतील वैष्णवीतून उत्क्रांत झाली असावी असे मानतो.
लक्ष्मीचे सर्वपरिचीत स्वरूप हणजे गजान्तलक्ष्मी.
सरोवरातील कमळपुष्पावर आरूढ लक्ष्मीला दोन गजांकडून जलाभिषेक होत आहे हे तिचे स्वरूप.
२४. गजान्तलक्ष्मीचे सर्वात सुंदर रूप वेरूळ येथे शिल्पांकित केलेले आहे.
२५. गजान्तलक्ष्मी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
२६. गजलक्ष्मी, रावण की खाई (लेणी क्र. १५)
२७. लक्ष्मी, यज्ञशाळा, कैलास लेणे, वेरूळ
दुर्गा
हे शक्तीचे सर्वात सुप्रसिद्ध स्वरूप. हिचे वाहन सिंह. आदिशक्तीने निरनिराळी रूपे घेऊन राक्षसांचा संहार केला. पैकी महिषासुराचा वध करणारी ती दुर्गा अथवा महिषासुरमर्दिनी. हिला ८, १०, १६ किंवा १८ हात दाखवतात. हिची आयुधे म्हणजे ढाल, तलवार, त्रिशूळ, धनुष्य, अंकुश, बाण, मुंड, अक्षमाळा, दंड, शंख, पद्म, चक्र, परशु. पैकी चक्र हे विष्णूकडून तर त्रिशूळ हे शंकराकडून तिला मिळाले असे मानतात. दुर्गेची रूपे केवल दुर्गा व महिषासुरमर्दिनी अशा दोन्ही स्वरूपात दिसतात. केवल दुर्गा म्हणजे सिंहारूढ असणारी दुर्गा तर महिषासुरमर्दिनी ह्या रूपात ती महिषाचा संहार करताना दाखवली जाते.
आता दुर्गा व महिषासुरमर्दिनीची विविध रूपे पाहूयात.
२८. दुर्गा, यज्ञशाळा, वेरूळ
२९. दुर्गा, रावण की खाई (लेणी क्र. १५) वेरूळ
३०. दुर्गा, सिद्धेश्वर मंदिर, कायगाव टोके (१८ वे शतक)
३१. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे वेरूळ, येथे महिष राक्षस स्वरूपात दाखवलाय तर त्याचे महिष असणे हे डोक्यावरील दोन शिंगांद्वारे सूचित केलेय.
३२. महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे, वेरूळ
३३. महिषासुरमर्दिनी, रामेश्वर लेणे, लेणी क्र. २१, वेरूळ
३४. महिषासुरमर्दिनी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
३५. महिषासुरमर्दिनी, भुलेश्वर मंदिर, यवत
३६. महिषासुरमर्दिनी, चांगावटेश्वर मंदिर, सासवड, १३ वे शतक
आतापर्यंत ढोबळमानाने आपण काही रूपे अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहिली. भैरवी, सरस्वती, हरिती, ज्येष्ठा गौरी, अंबिका अशी अजूनही काही रूपे आहेत त्यावर परत कधीतरी.
११. चामुंडा, भुलेश्वर मंदिर, यवत (१२ -१३ वे शतक)
१५. भुलेश्वर येथील विनायकी
वाचने
37527
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
कहर आहे
घर बसल्या
मी पयला (सगळे फोटो छानच आहेत)
ग्रेट
वाह!! इतर ठिकाणांच्या
In reply to वाह!! इतर ठिकाणांच्या by किसन शिंदे
अगदि...
In reply to अगदि... by प्रशांत
भुलेश्वरच्याच दर्पणसुंदरीच
गौरीपूजनांच्या निमीत्ताने माहिती हवी
In reply to गौरीपूजनांच्या निमीत्ताने माहिती हवी by माहितगार
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर
In reply to यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर by प्रचेतस
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर
In reply to यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर by धन्या
सहमत.
लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम !
In reply to लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! by डॉ सुहास म्हात्रे
ह्येच बोलतो... तुझे लेख
In reply to ह्येच बोलतो... तुझे लेख by सुहास झेले
(No subject)
In reply to लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! by डॉ सुहास म्हात्रे
+१
वल्लीश्री,
In reply to वल्लीश्री, by संजय क्षीरसागर
+१...असेच म्हणतो.
वा... मस्तं!
नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.साध्या
सध्या नवरात्र असल्याने, चालू
"भैरवी, सरस्वती, हरिती, ज्येष्ठा गौरी, अंबिका अशी....
सर्व माहीती आणि फोटो जबरदस्त
'परत कधीतरी'
अप्रतीम !!
In reply to अप्रतीम !! by अर्धवटराव
क्या वैशिष्ट्य... आपलं क्या बात!
मस्त नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण
In reply to मस्त नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण by ज्ञानोबाचे पैजार
+१
वल्ल्यानं हे त्याचं
In reply to वल्ल्यानं हे त्याचं by प्यारे१
@वल्ल्यानं हे त्याचं
अप्रतिम, देखणे कलेक्शन
अर्थातच अपेक्षित प्रश्न असणार तरीही विचारतो
In reply to अर्थातच अपेक्षित प्रश्न असणार तरीही विचारतो by काउबॉय
लज्जागौरी प्रतिमेतीलच असे
In reply to लज्जागौरी प्रतिमेतीलच असे by प्रचेतस
आपला कयास पटतो आह पण
In reply to आपला कयास पटतो आह पण by काउबॉय
अजून विदा काहीच नाही. मूळात
In reply to अजून विदा काहीच नाही. मूळात by प्रचेतस
बापरे मग असेच दोन दोन साप दाखवले असावेत ?
In reply to बापरे मग असेच दोन दोन साप दाखवले असावेत ? by काउबॉय
शिल्पकलेत बर्याच गूढ गोष्टी
In reply to शिल्पकलेत बर्याच गूढ गोष्टी by प्रचेतस
ज्याकालीन ती देवता आहे(मूर्ति न्हवेे )असे आपण म्हणता
निराश होइल असं कधी लिहुच
In reply to निराश होइल असं कधी लिहुच by झकासराव
सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा.
In reply to सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा. by प्रचेतस
ओक्के जी.
वा वल्लीशेठ. मान गये. प्रचंड
कोण म्हणतो रे तो की संपादक
अप्रतिम !!!
In reply to अप्रतिम !!! by धन्या
लैच
In reply to लैच by प्रचेतस
+1
In reply to अप्रतिम !!! by धन्या
यातल्या बर्याच
In reply to अप्रतिम !!! by धन्या
पुरातत्व खात्यात का नोकरी
पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?"हे मात्र एकदम पटलं. जेव्हा छंद व्यवसायही असतो तेव्हा दुधात साखर पडते. नेटवर्किंगने एक पुरातत्ववेडा हिरावून नेलेला आहे हे मात्र खरे ! :)In reply to अप्रतिम !!! by धन्या
बरं झालं ...
In reply to अप्रतिम !!! by धन्या
कशाला रे नेटवर्किंगमध्ये
छान!
मी पयला शेवटी.
पयलाशेवटी. भारतात लिंग आणि योनी पुजा पूर्वी अनार्य कालापासून आहे. इथे निसर्गाच्या सृजन शक्तीचे सतत अप्रुप वाटत राहिले आहे. शिव आणि शक्ति ही वेगवेगळ्या पूर्णरूपांत समोर येतात. आर्य कालात विष्णू,महालक्ष्मिसारखी सौज्वळ दैवते सुबत्ता असणाऱ्यांसाठी आली.अधयात्म उगाच आपले.त्यांना '{सधनता}आहे तैसेची राहो' याचाच विचार होता. [माया संस्कृतीत पुनजन्म आणि इजिप्तमध्ये मृत्यू या कल्पना सतावत राहिल्या. ] इतिहासाच्या पुस्तकांसाठी माती दगडाच्या अनादि पानांशिवाय आणखी कोणताही चांगला पर्याय नाही.वल्ली तुमचा अभ्यास फारच मंदगतीने चालला आहे कधी वाचणार ही सर्व पुस्तके या पृथ्वीतलावरची? {गंमतीने}. या वल्लीला आणखी सतुती न करता डिवचले पाहिजे.आणखी कोणते स्पेशलाइझेशन वाढवणार आहेत बरं ते कळू द्या. हा लेख फारच आवडला.वल्लीसाहेब सॅल्युट तुम्हाला.
देशोदेशीच्या मातृका
काही माहिती
In reply to काही माहिती by पैसा
रोचक प्रतिसाद
In reply to काही माहिती by पैसा
__/\__!!
आवडल.
सुरेख धागा वल्ली. खूप आवडला.
लेख अप्रतिम!
धन्य आहेस रे बाबा!!
हुश्श!!
जराशा अनुषंगिक शंका (अनुषंगिक अवांतर)
In reply to जराशा अनुषंगिक शंका (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
अशी काही शिल्पे आहेत का की
छान माहिती!
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रचेतस
प्रचेतस माहितीसाठी खुप खुप
धन्य