१० सप्टेंबर २०२१.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४३.
अर्थात गणेश चतुर्थी.
आणि मिपाचा वर्धापनदिनदेखील!
दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस श्रीगणेश लेखमालेचे आयोजन करतो. यंदाही आपण श्रीगणेश लेखमाला आयोजित केलेली आहे. आणि अर्थात, ती शक्य होणार आहे आपल्या सर्वांच्या सहभागाने.
नियम वा अटी अशा काही विशेष नाहीत, गणेशोत्सव हा आनंद आणि चैतन्याचा सोहळा असल्याने लेख सुखद असावेत, त्यात हिंसा, क्रौर्य, वातावरण अन् मन कलुषित करणारे लेखन नसावे, एवढीच अपेक्षा.
आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- ३१ ऑगस्ट २०२१!
कविता, पाककृती, बाप्पासाठी नैवेद्य, कथा, भटकंती, फोटोग्राफी, चित्रकला .... जरूर पाठवा. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा.
टीप : श्रीगणेश लेखमालेत लेखांच्या संख्येवर आपोआप थोडी मर्यादा येते, त्यामुळे काही उत्तम लेखन या उत्सवात प्रकाशित नाही करता आले तरी आपण ते मिपा दिवाळी अंक - २०२१ साठी राखून ठेवणार आहोत. ते लेखन दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात येईल.
वर्गीकरण
वाचने
8891
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला लागा कामाला
गणपती बाप्पा मोरया...
विडंबनांस पैजारमाऊलींचा कळफलक
In reply to गणपती बाप्पा मोरया... by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to गणपती बाप्पा मोरया... by ज्ञानोबाचे पैजार
गलेमाच्या मेजवानीच्या
तुमचाही लेख येऊ द्यात हो.
In reply to गलेमाच्या मेजवानीच्या by सस्नेह
प्रयत्न करत आहे :)
In reply to तुमचाही लेख येऊ द्यात हो. by प्रचेतस
उत्तमोत्तम लेखांच्या
बाडिस...
In reply to उत्तमोत्तम लेखांच्या by प्रचेतस
व्वा !
उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!
सहभागी होणार.
एक प्रश्न:
एकाच दिवशी नाही
In reply to एक प्रश्न: by श्रीगणेशा
अरे वाह !
शुभेच्च्छा, आतुरतेने ......
गणेश लेख मालेसाठी सर्व