Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२१

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 20/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
१० सप्टेंबर २०२१. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४३. अर्थात गणेश चतुर्थी. आणि मिपाचा वर्धापनदिनदेखील! 2 दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस श्रीगणेश लेखमालेचे आयोजन करतो. यंदाही आपण श्रीगणेश लेखमाला आयोजित केलेली आहे. आणि अर्थात, ती शक्य होणार आहे आपल्या सर्वांच्या सहभागाने. नियम वा अटी अशा काही विशेष नाहीत, गणेशोत्सव हा आनंद आणि चैतन्याचा सोहळा असल्याने लेख सुखद असावेत, त्यात हिंसा, क्रौर्य, वातावरण अन् मन कलुषित करणारे लेखन नसावे, एवढीच अपेक्षा. आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- ३१ ऑगस्ट २०२१! कविता, पाककृती, बाप्पासाठी नैवेद्य, कथा, भटकंती, फोटोग्राफी, चित्रकला .... जरूर पाठवा. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा. टीप : श्रीगणेश लेखमालेत लेखांच्या संख्येवर आपोआप थोडी मर्यादा येते, त्यामुळे काही उत्तम लेखन या उत्सवात प्रकाशित नाही करता आले तरी आपण ते मिपा दिवाळी अंक - २०२१ साठी राखून ठेवणार आहोत. ते लेखन दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात येईल.

वाचने 8891
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

नक्की भाग घेण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल आभारी आहे. धन्यवाद.

गलेमा मस्त होतील यात काहीच शंका नाही. अनेकोत्तम लेख, कथा, कविता, पाकृ आणि विडंबने या लेखमालेत वाचायला मिळो ही गणराया चरणी प्रार्थना पैजारबुवा

वाचन मेजवानीसाठी सरसावून बसलो आहोत.

एक प्रश्न: श्रीगणेश लेखमालेसाठी निवडलेले लेखन गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रकाशित केले जाते का?

आले लगेच गणपती. गलेमासाठी शुभेच्छा आहेतच. उत्तम उपक्रम. -दिलीप बिरुटे

गणेश लेख मालेसाठी सर्व मिपाकरांना , लेखकांना अन संपादकांना खूप शुभेच्छा !