ईशनिंदाच्या खोट्या आरोपामुळे सौदी अरेबियामध्ये २० महिने तुरुंगात घालवलेले हरीश बंगेरा भारतात परतले आहेत. उडुपी पोलिसांनी केलेल्या तपास असे उघडकीला आले की बनावट प्रोफाइलच्या मागे कर्नाटकातील मुदाबिद्री येथील अब्दुल हुयेझ आणि अब्दुल थुएझ या दोन मुस्लिम व्यक्ती आहेत. त्यांनी काही वर्षांपुर्वी त्यांच्या नावाखाली एक फेसबुक प्रोफाईल तयार केले होते. आणि छायाचित्र ज्यावर मक्का येथे काबाच्या छायाचित्रासह एक पोस्ट प्रकाशित करण्यात आली. यामुळे हरीश बंगेरा यांना सौदी मध्ये ताब्यात घेण्यात आले व अटकेत टाकले गेले.
उडुपीच्या खासदार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या प्रयत्नाने बंगेरा परत आले आहेत. अब्दुल हुयेझ आणि अब्दुल थुएझ यांना अटक झाली असली तरी कोर्टाने त्यांना २ दिवसात जामिनावर सोडून दिले आहे. हरीश बंगेरा जोपर्यंत त्याच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत तो विश्रांती घेणार नाही असे म्हणाले आहेत.
भाजपाच्या नाशिक कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक. मुंबईही दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. सत्तेत आली तरी शिवसेनेची गुंडगिरी कमी झाली नाही. राणेंनीही मुख्यमंत्र्याविषयी बोलताना जपून बोलायला पाहिजे होते, शेवटी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आवडो न आवडो त्या पदाचा मान ठेवायलाच पाहिजे. पोलिसांसमोर लोक दगडफेक करत आहेत, आणि पोलीस मात्र शांतपणे बघत आहेत. स्वतः च्या पक्षाची सत्ता असताना तरी कायद्यनुसार कारवाई करायला पाहिजे होती.
राणेंचे वक्तव्य पूर्णपणे अनावश्यक होते. अमक्याला कानफाडीत मारायची, तमक्याला मारझोड करायची हीच शिवसेनेची मुळची संस्कृती आहे. राणे कुठेही असले तरी ३९ वर्षे शिवसेनेत असताना ते झालेले संस्कार कसे विसरणार?
तरीही या निमित्ताने उध्दव ठाकरेंना हे प्रकरण अधिक संयमितपणे आणि अधिक प्रगल्भपणे हाताळायची संधी आयती राणेंनी आणून दिली होती ती त्यांनी व्यर्थ दवडली असे दिसते. मोदी आणि ठाकरे यांच्यात कसली तुलना करायची असेल तर मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी एका राज्याचे मुख्यमंत्री होते तर उध्दव दुसर्या राज्याचे मुख्यमंत्री सध्या आहेत ही केवळ पदाची तुलना करता येऊ शकेल. मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर किती घाणेरड्या शब्दात टीका झाली होती. गंदी नालीका किडा वगैरे त्यांना म्हटले गेले होते. मराठी साहित्यात मोठे योगदान असलेल्या एका विचारवंतांनी 'माझ्याकडे बंदूक असती तर मी पहिली गोळी नरेंद्र मोदींना मारली असती' असली मुक्ताफळे उधळली होती. तत्कालीन सुपर पंतप्रधान मोदींना 'मौत का सौदागर' म्हणाल्या होत्या. अशी अनेक उदाहरणे आहेत. तरीही या सगळ्या घाणेरड्या टीकेकडे मोदींनी पूर्ण दुर्लक्ष केले होते. असल्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिस कारवाई सोडाच कधी एफ.आय.आर दाखल झाल्याचेही ऐकिवात नाही. कसे गुजरातमध्ये पाऊल ठेवता तेच बघतो असली भाषाही कधी असल्या लोकांविरोधात कधी मोदीच नाही तर त्यांच्या सहकार्यांनीही वापरलेली नव्हती. तर असल्या टीकेला मोदींनी भीकच घातली नाही.
अगदी तसे करायची नामी संधी राणेंनी उध्ववना न मागता दिली होती. पण अगदी प्रत्येक गोष्टीवर रिअॅक्ट केलेच पाहिजे, सगळे महाराष्ट्राचा अपमान करायला टपले आहेत असल्या भ्रमात राहिलेले लोक असा विचार करू शकतील ही शक्यता अगदीच थोडी. कंगनासारखी फुटकळ अभिनेत्री काहीतरी बोलल्यानंतर लगेच महाराष्ट्राचा अपमान म्हणून चवताळून अंगावर जाणारे हे लोक आहेत. त्यांच्याकडून प्रगल्भतेची अपेक्षा कशी करायची?
सेना आणी भाजपात हाच तर फरक आहे. सेना स्वाभिमानी आहे , कूणी काहीही बोललेलं सेना सहण करत नाही. पण भाजपचं तसं नाही स्वाभिमान वगैरेंशी भाजपला काहीही घेणंदेणं नाही. सत्ता मिळत असेल तर भाजपला अपमान झालेलाही चालतो आणी सत्तेसाठी ते स्वाभिमान गहाण टाकायला ही तयार असतात. संघाला दहशतवादी म्हणणारे कृपाशंकर भाजपला चालले तसेच सावरकरांचा अपमान करनारे नितेश राणे ही, काश्मिरात महबूबा चालल्या.
फूकट लस?? ख्या ख्या ख्या. पुर्ण बाराशे रूपयाला घेतलीय. हे काही काॅंग्रेस सरकार नाही फुकट लस द्यायला. पेट्रोल पंपावर बॅनर लावले म्हणजे लस फुकट होत नाही. पक्क व्यापारी सरकार आहे भाजपचं. बक्कळ कमावलेत लस विकून . फुकट लसीचे लिमीटेड स्लाॅट लगेच गायब होतात. पण विकत लस कितीही घ्या संपतच नाही.
आणी तसंही कोरोना निधीतून लस दिली असं कुठे लिहीलंय??? कोरोना निधीचा हिशेब कुठेय?? किती खर्च केले लसीसाठी?? सगळा कोरोना निधी गेला कुठे?? हिशेब का लपवला जातोय??
थोडक्यात, तुम्ही पेपर वाचत नाही. फुकट मिळणाऱ्या लसीचे तुम्ही 1200 रुपये का दिले आणि ते कुणाच्या खिशात गेले काय माहिती! केंद्र सरकारने तर राज्य सरकारला लशी मोफत पुरवलेल्या आहेत हे खरं. बाकी तुम्हाला लस मोफर हवी आहे असं असेल तर राज्य सरकारने त्या लशी का गडप केल्यात आणि हॉस्पिटल्स ना त्या का पुरवलेत ते विचारायला हवं. Health is, after all, a state subject.
रस्त्यावर पडलेली घाण घरात आणून एखाद्या स्वच्छ भांड्यात ठेवली तरी सुवास न येता घरात दुर्गंधी पसरणारच. भाजपने महाराष्ट्रात इतर पक्षातील घाण भरण्याचा सपाटा लावला आहे. त्याचे परीणाम भाजपला भोगावे लागणारच. राणे कुटुंबियांची बेताल बरळ हा त्याचाच परीणाम आहे.
जो बेताल माणूस राजकारणात पूर्णपणे संपलेला होता त्याचा कोणताही उपयोग नसताना आधी भाजपने पक्षात आणले, नंतर त्याला खासदार केले, नंतर त्याच्या मुलाला आमदार केले आणि आता राणेला केंद्रीय मंत्री केले. या सर्वाचा भाजपला काही उपयोग आहे का? जो स्वतः निवडून येऊ शकत नाही तो काय डोंबल शिवसेनेला संपविणार?
२०१२ मध्ये नितेश राणेने मराठा संघटनांना उचकवून पुण्यातील गडकरींचा पुतळा तोडायला लावला कारण ते ब्राह्मण होते. पुतळा तोडणाऱ्यांना नितेशने ५ लाख रूपयांचे बक्षीस दिले होते. बहुसंख्य ब्राह्मण ज्या पक्षाला मत देतात त्या पक्षाने ब्राह्मणद्वेष्ट्याला पक्षात आणून मानाचे पाध देऊन काय साध्य केले? राणे भाजपला मते मिळवून देऊ शकणार नाही पण राणेमुळे काही ब्राह्मणांची मते भाजपविरोधात जातील.
राणे कुटुंबीय भाजपला डोकेदुखी होणार हे नक्की. परंतु ही नसती डोकेदुखी भाजपने स्वत:च ओढवून घेतली आहे. आता भोगा आपल्या कर्माची फळे.
+१ शंबर टक्के सहमत श्रीगुरूजी.
एका बाजुला खडसे, तावडे, बावनकुळे, मुंडे अश्या हाडाच्या भाजप नेत्याना बाजूला फेकले नी बाहेरून आलेल्या राणेंना मंत्रीपद दिले. निष्टेला भाजपात हे फळ. मी २०१७ पर्यंत भाजप समर्थक होतो. पण भाजपचं हे लोकाना गृहीत धरणं पाहून आज दुर गेलोय. नितेश राणेंने सावरकरांचा आदर्श पुढील पिढीला देणार का वगैरे ट्विट केले होते. सावरकरांची माफी न मागता ही त्याना भाजपात प्रवेश मिळाला. काल कृपाशंकर सिंह ला घेतलं भाजपात. राज्यात भाजपचं नेतृत्व लवकर बदललं नाही तर भाजप पुन्हा पन्नास च्या खाली जायला जास्त वेळ लागनार नाही.
कारण ते ब्राह्मण होते..
निखालस चुकीची माहिती. गडकरी मराठा नव्हते हे सत्य आहे. परंतू ते ब्राह्मणही नव्हते. दे फनच्या प्रभावामुळे किंवा प्रसिद्धीमुळे अनेक आडनावे ब्रह्मणांत ढकलण्याची/ओढण्याची चुकीची रीत सध्या बोकाळली आहे. बाजी प्रभू देशपांडेही ब्राह्मण होते अशी चुकीची माहितीही आताशा पद्धतशीरपणे पसरवली जात आहे.
> राणेंनीही मुख्यमंत्र्याविषयी बोलताना जपून बोलायला पाहिजे होते,
लोकप्रतिनिधी बद्दल बोलताना आदरानेच व्यक्तव्य केले पाहिजे हे आवश्यक नाही. मुख्यमंत्री काही भो पंचम जॉर्ज नाहीत. जास्त मनाला लावून घेत असतील तर राजकारण सोडून घरी बसावे. राणे ह्यांना तुरुंगांत वगैरे टाकणे हे बिहार लेव्हल चे राजकारण आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे ह्यांनी काही इतके गंभीर व्यक्तव्य केले नव्हते. उलट ह्यापेक्षा अत्यंत घाणेरडी भाषा इतर महाराष्ट्रीय राजकारणी वापरत आले आहेत. किंबहुना अशी भाषा "नारोबा" शिळ्या सेनेत शिकले असावेत.
> राणेंनीही मुख्यमंत्र्याविषयी बोलताना जपून बोलायला पाहिजे होते,
लोकप्रतिनिधी बद्दल बोलताना आदरानेच व्यक्तव्य केले पाहिजे हे आवश्यक नाही. मुख्यमंत्री काही भो पंचम जॉर्ज नाहीत. जास्त मनाला लावून घेत असतील तर राजकारण सोडून घरी बसावे. राणे ह्यांना तुरुंगांत वगैरे टाकणे हे बिहार लेव्हल चे राजकारण आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे ह्यांनी काही इतके गंभीर व्यक्तव्य केले नव्हते. उलट ह्यापेक्षा अत्यंत घाणेरडी भाषा इतर महाराष्ट्रीय राजकारणी वापरत आले आहेत. किंबहुना अशी भाषा "नारोबा" शिळ्या सेनेत शिकले असावेत.
शेवटी ते शिवसेनाप्रमुख आहेत आणी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देखील. त्यांचा मान आणी पद मोठंय. त्यांचा आदर करून त्यांच्या बद्दल जपूनच बोललं पाहिजे नाहीतर मग असे ऑफिस फुटतात नि पळता भुई थोडी होते.
नारायण राणेंच्या वक्तव्यावरून शिवसेनेने साळसुदाचा आव आणून धुडगुस घातला. मुळात उद्धव ठाकरे, बाळ ठाकरे, राऊत वगैरे यापेक्षाही अर्वाच्य अनेकदा बोलले आहेत. राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर बाळ ठाकरेंनी सामनामधून राणेंबद्दल जितके असभ्य व अर्वाच्य लिहिले होते तितकी खालची पातळी आजवर कोणीही गाठलेली नाही. नाऱ्या, दीडफुट्या या शब्दांनी सामनात व जाहीर सभेत राणेंचा उद्धार केला होता. यापेक्षाही जास्त असभ्य व अर्वाच्य शब्द सामनातील अग्रलेखात वापरले होते. मी याला मोठा केला पण हा चड्डीत चिरकला असे लिहिल्याचे मी वाचले होते. काही शब्द इतके असभ्य होते की ते मी येथे सांगू शकत नाही. सोनिया गांधी, शरद पवार यांच्याबद्दलही सामनातून वारंवार अर्वाच्य शब्द वापरले होते.
आज राणेंच्या शब्दांवर टीकेचा भडीमार होतोय. परंतु यापेक्षाही कितीतरी वाईट शब्द सामनातून व जाहीर सभेत वापरले गेले, तेव्हा मात्र ठाकरी भाषा असे कौतुक होत होते. मग आता आक्षेप का?
काल एका मराठी वाहिनीवर याच विषयावर ३ मराठी पत्रकारांची चर्चा सुरू होती. राणेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकारणाची पातळी खूप खाली गेली आहे, असे तीनही पत्रकार व आयोजकांनी सांगितले. यापेक्षाही खालच्या भाषेत वरीष्ठ ठाकरे, कनिष्ठ ठाकरे, राऊत मागील अनेक दशके अनेक नेत्यांचा उद्धार करीत होते, तेव्हा ही पातळी वर होती का? तेव्हा यांनी कधी आक्षेप घेतला होता का? तेव्हा यांनी त्या अर्वाच्च असभ्य भाषेचे ठाकरी भाषा, शिवसेनेची स्टाईल अशा शब्दात कौतुक केले होते.
जे पेरले तेच उगवले आहे.
शेकडो एफ आय आर राज ठाकरेंविरूध्द युपी नी बिहार मध्ये दाखल आहेत. पण राज ठाकरे कधी तीकडे गेले नाहीत.एफ आय आर राजकीय हेतूने दाखल होतात आणी नंतर पळवाटा काढून बंद हेतात किंवा मागे घेतल्या जातात. कारण जास्त प्रकरण ताणलं तर त्याचा कायदा सुव्यवस्थएवर परिणाम होऊ शकतो.
मुळात केंद्रीय मंत्र्याने आपला कारभार सांभाळून आपल्या मंत्रालयाचा जनतेच्या विकासासाठी वापर करावा. पण केंद्रीय मंत्री ईथे भाजपचा प्रचार करायला वापरला जातोय. भाजपचाच प्रचार करायचा तर ईथे फडणवीस, दरेकर असे सध्या कुठलीही जबाबदारी नसलेले लोक आहेत ना?? केंद्रीय मंत्री जर गल्लोगल्ली आशिर्वाद मागत फिरेल तर जनतेची कामे कशी होनार??
केन्द्रिय मन्त्राने लोकान्मध्ये मिसळू नये अस तरी कुठे लिहिलय.. यात्रा काढल्या कि नकळत लोकान्च्या मध्ये मिसळून लोकान्ची काम होतात.. केन्द्रिय मन्त्राने फक्त प्रशासनिक काम करावीत, मन्त्रीमन्डळ बैठकीला हजर रहाव, अधिवेशनात खासदारान्च्या प्रश्नाना उत्तर द्यावीत एवढच नाही..
मोदी सरकार ने infrastructure asset monetisation plan सादर केला आहे. सदर plan नुसार 2025 पर्यंत 6 ला करोड चा निधी उभारण्याचा केंद्र सरकार चा प्रयत्न असणार आहे. रेल्वे, विमानतळ आणि कोळसा उतख्तनं या पासून जास्तीत जास्त निधी मिळणार आहे.
शेखर गुप्तांनी cut the clutter मध्ये बऱ्यापैकी व्यवस्तीत समजावून सांगितला आहे.
https://youtu.be/2L2CnIS3XME
नाही. ह्यापुढे भाजपच्या लोकात जरब बसेल, येईल ते तोंडाला बोलण्याआधी चार वेळा विचार करतील. अटक केली ते बरेच केले. केंद्रीय मंत्र्याला अटक करून राज्याने केंद्राला आपली ताकद दाखवून दिलीय. मनात येईल त्याच्या मागे ईडीची चौकशी लावून त्रास द्यायचा केंद्राने सपाटा लावला होता. आपल्या हातात ताकद आहे हे दाखवण्याचा केंद्राचा प्रयत्न होता, राज्याकडेही ताकद असते आणी ते वापरू शकतात हे आता केंद्राला दिसेल. एकाच दगडात अनेक पक्षी मारल्या गेलेत.
भाजप मतदार आणि कार्यकर्ते यांना राणे नकोच आहे.
त्यांना राणे अणि त्याची दोन मुले हे त्रासदायक वाटत आहेत. ताळतंत्र सोडून जी बोल बच्चन देत होते तो भोवला आहे.
त्यामुळे भाजप नेते अंतर ठेउन आहेत.
याउलट सेना मतदार आणि कार्यकर्ते खुष आहेत.
राणे ला एकदा तरि धडा शिकवला याबाबत ते कहि महिने खुष राहतील.
जे भाजपाला अपेक्षित होत तेच झाल. :)
मुख्यमंत्री यांच्या भाषणातील घोळ :-
राणे यांनी केलेले वक्तव्य ज्यामुळे आत्ता जे नाट्य घडतयं :-
जाता जाता :- पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान असलेल्या व्यक्तीचा अमृत महोत्सव आणि हीरक महोत्सव यात १५ ऑगस्ट रोजीच गोंधळ उडावा हे या राज्याचे दुर्दैव !
मदनबाण.....आजची स्वाक्षरी : - Kadhalikum Pennin... :- Kadhalan
भाषणातील चुकासाठी एका केंद्रीय मंत्र्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायची भाषा करावी का ? 15 ऑगस्ट हा वर्धापनदिन आहे असे राणेंचे व्हिडीओ दाखवू का ? उगा चुकीच्या माणसाची पाठराखण करू नका. राणे आणि पिल्लांच्या शेकडो क्लिप्स आहेत.
उगा चुकीच्या माणसाची पाठराखण करू नका.
मुनी मी माझ्या प्रतिसादात राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केलेले नाही, मी फक्त दोन्ही व्यक्ती काय बोलले त्याचे व्हिडियो दिले आहेत.
हा दुटप्पीपणा सोडला पाहिजे!
२०१८ मधील पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी विरारला आले होते तेव्हा त्यांनी सभेत शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालताना चप्पल काढली नव्हती असा दावा शिवसेनेने केला होता. आणि त्याच चप्पलेने योगींना बडवावे असे वाटले असे सामनात छापून आले होते. त्यावेळेस सामनाचे मुख्य संपादक कोण होते? कार्यकारी संपादकांनी काहीही लिहिले तरी मुख्य संपादक त्या जबाबदारीतून मुक्त होतात का?
https://www.newindianexpress.com/nation/2018/may/26/felt-like-hitting-y…
तेव्हा योगींनी असे काही झाले होते याचेच खंडन केले. मुख्य संपादकांविरोधात एफ.आय.आर दाखल केला नाही की त्यांना ताब्यात घेतले नव्हते.
https://zeenews.india.com/maharashtra/dont-need-to-learn-from-them-yogi…
खरोखरच भाजपवाल्यांनी सत्ता कशी राबवावी हे ठाकरे, ममता बॅनर्जी वगैरेंपासून शिकावे. फार मवाळपणा दाखवतात.
प्रतिक्रिया
अब्दुलने हरिषना अडकवले सौदी मध्ये
हरीश बंगेरा जोपर्यंत
भाजपाच्या नाशिक कार्यालयावर
म्हणजे भाजपचे नेते काहीही
In reply to भाजपाच्या नाशिक कार्यालयावर by रात्रीचे चांदणे
संधी
In reply to भाजपाच्या नाशिक कार्यालयावर by रात्रीचे चांदणे
सेना आणी भाजपात हाच तर फरक
In reply to संधी by चंद्रसूर्यकुमार
हाहा...
In reply to सेना आणी भाजपात हाच तर फरक by अमरेंद्र बाहुबली
ऊद्या जेव्हा सत्तेसाठी भाजप
In reply to हाहा... by सॅगी
जसं काही
In reply to ऊद्या जेव्हा सत्तेसाठी भाजप by अमरेंद्र बाहुबली
जसं काही कर्नाटकात आणी मध्य
In reply to जसं काही by सॅगी
महाराष्ट्राचं बोला हो..
In reply to जसं काही कर्नाटकात आणी मध्य by अमरेंद्र बाहुबली
काश्मीर मध्ये बघितले
In reply to महाराष्ट्राचं बोला हो.. by सॅगी
आणि ती युती तोडून बाहेर पडले तेव्हाही स्वाभीमान बघितला
In reply to काश्मीर मध्ये बघितले by Rajesh188
काश्मीर मध्ये बघितले
In reply to महाराष्ट्राचं बोला हो.. by सॅगी
राज्यात ही सत्तेसाठी
In reply to काश्मीर मध्ये बघितले by Rajesh188
आता कसे बरोबर बोललात
In reply to राज्यात ही सत्तेसाठी by अमरेंद्र बाहुबली
पहाटे पहाटे, चोरून लपून ;)
In reply to आता कसे बरोबर बोललात by सॅगी
चोरी ती चोरीच...
In reply to पहाटे पहाटे, चोरून लपून ;) by अमरेंद्र बाहुबली
सेना पूर्णपणे जाळ्यात अडकली..
In reply to सेना आणी भाजपात हाच तर फरक by अमरेंद्र बाहुबली
अजून अनेक मंत्री आहेत भाजपकडे
In reply to सेना पूर्णपणे जाळ्यात अडकली.. by रामदास२९
हो.. सगळे मन्त्री लोकान्ची
In reply to अजून अनेक मंत्री आहेत भाजपकडे by अमरेंद्र बाहुबली
ख्या ख्या ख्या. कोरोनानिधी
In reply to हो.. सगळे मन्त्री लोकान्ची by रामदास२९
फुकटची लस टोचून घेतलीत ना? ती
In reply to ख्या ख्या ख्या. कोरोनानिधी by अमरेंद्र बाहुबली
फूकट लस?? ख्या ख्या ख्या.
In reply to फुकटची लस टोचून घेतलीत ना? ती by रावसाहेब चिंगभूतकर
ऑ???
In reply to फूकट लस?? ख्या ख्या ख्या. by अमरेंद्र बाहुबली
थोडक्यात, तुम्ही पेपर वाचत
In reply to फूकट लस?? ख्या ख्या ख्या. by अमरेंद्र बाहुबली
उद्धव आणि राणे एकाच माळेचे
In reply to संधी by चंद्रसूर्यकुमार
+१ योग्य प्रतिसाद ..
In reply to संधी by चंद्रसूर्यकुमार
रस्त्यावर पडलेली घाण घरात
In reply to भाजपाच्या नाशिक कार्यालयावर by रात्रीचे चांदणे
+१ शंबर टक्के सहमत श्रीगुरूजी
In reply to रस्त्यावर पडलेली घाण घरात by श्रीगुरुजी
याबाबतीत सहमत ..
In reply to रस्त्यावर पडलेली घाण घरात by श्रीगुरुजी
कारण ते ब्राह्मण होते....
In reply to रस्त्यावर पडलेली घाण घरात by श्रीगुरुजी
> राणेंनीही
In reply to भाजपाच्या नाशिक कार्यालयावर by रात्रीचे चांदणे
> राणेंनीही
In reply to भाजपाच्या नाशिक कार्यालयावर by रात्रीचे चांदणे
शेवटी ते शिवसेनाप्रमुख आहेत
In reply to > राणेंनीही by साहना
उद्दाम ठाकरेनी
In reply to शेवटी ते शिवसेनाप्रमुख आहेत by अमरेंद्र बाहुबली
नारायण राणेंच्या वक्तव्यावरून
In reply to उद्दाम ठाकरेनी by जॅक द रिपर
उद्धव ठाकरेंविरोधात FIR UP
In reply to नारायण राणेंच्या वक्तव्यावरून by श्रीगुरुजी
शेकडो एफ आय आर राज
In reply to उद्धव ठाकरेंविरोधात FIR UP by रावसाहेब चिंगभूतकर
मोठी बातमी: शिवसैनिकांनी
केंद्रीय मंत्री
+१
In reply to केंद्रीय मंत्री by Rajesh188
भाजपाचा नाही ..लोकान्च्या
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
राणे आणि ठाकरे यान्नी
In reply to केंद्रीय मंत्री by Rajesh188
मुळात केंद्रीय मंत्र्याने
In reply to राणे आणि ठाकरे यान्नी by रामदास२९
केन्द्रिय मन्त्राने
In reply to मुळात केंद्रीय मंत्र्याने by अमरेंद्र बाहुबली
यात्रा काढल्या कि नकळत
In reply to केन्द्रिय मन्त्राने by रामदास२९
प्रणामाचा स्वीकार केला..
In reply to यात्रा काढल्या कि नकळत by अमरेंद्र बाहुबली
मोदी सरकार ने infrastructure
6 ला करोड
In reply to मोदी सरकार ने infrastructure by रात्रीचे चांदणे
कार्यालयांचे रक्षण करा. -
अटक
प्रतीकात्मक अटक असते ही
नाही. ह्यापुढे भाजपच्या लोकात
In reply to प्रतीकात्मक अटक असते ही by Rajesh188
हहपुवा.. उद्याचा सामना ,
In reply to नाही. ह्यापुढे भाजपच्या लोकात by अमरेंद्र बाहुबली
बरोबर ..
In reply to प्रतीकात्मक अटक असते ही by Rajesh188
बरोबर आहे..
In reply to प्रतीकात्मक अटक असते ही by Rajesh188
भाजप
जे भाजपाला अपेक्षित होत तेच
डोनाल्ड ला डोलांड आणी
In reply to जे भाजपाला अपेक्षित होत तेच by मदनबाण
आता ते राष्ट्रहीतासाठी बोलले
In reply to डोनाल्ड ला डोलांड आणी by अमरेंद्र बाहुबली
भाषणातल्या चुका.. आणि सन्दर्भ
In reply to डोनाल्ड ला डोलांड आणी by अमरेंद्र बाहुबली
कोणत्याही घटनात्मक पदावर
In reply to डोनाल्ड ला डोलांड आणी by अमरेंद्र बाहुबली
भाषणातील चुका?
In reply to जे भाजपाला अपेक्षित होत तेच by मदनबाण
+१
In reply to भाषणातील चुका? by कपिलमुनी
उगा चुकीच्या माणसाची पाठराखण
In reply to भाषणातील चुका? by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kadhalikum Pennin... :- Kadhalanहे बरोबर आहे..
In reply to भाषणातील चुका? by कपिलमुनी
कपिलमुनी - बरोबर .. दोघान्ची
In reply to भाषणातील चुका? by कपिलमुनी
एक जुनी आठवण
खर आहे.. बाकिच्या पक्षान्कडून
In reply to एक जुनी आठवण by चंद्रसूर्यकुमार