Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 13/08/2021 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy… एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो. मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते. अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्‍यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही. असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.

वाचने 52086
प्रतिक्रिया 196

प्रतिक्रिया

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला हे सगळं टाइप करण्याइतका वेळ कसा मिळतो>>>> हे चांगलंय. मुळावर घाव घातला कुणी की विषय डायवर्ट करायचा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अजिबात नाही. विषय डायव्हर्ट करण्यासाठी तो आधी वाचावा लागतो. मी त्यांचे प्रतिसादच वाचत नाही. तेवढा वेळच नसतो. एकदा त्यांचे लिहिणे सुरू झाले की फक्त अंगठा खालून वर करत राहायचं असं निदान मी तरी करतो. डायव्हर्ट वगैरे करत बसण्यापेक्षा मला इतर बरीच कामे असतात.

In reply to by Rajesh188

अजून एक जेन्युईन प्रश्न-- बाकी सगळे मराठीत लिहिलेले असताना राबवायची हा एकच शब्द rabvaychi असा लिहायचे काय कारण असू शकेल?

अफगाणिस्तानातून पलायन केलेल्या मुस्लिम शरणार्थींना जगातल्या अन्य मुस्लिम देशांपैकी कोणत्या देशाने रेस्क्यू केले म्हणे?

Save Gaza साठी गळे काढनारे अफगाण बाबत गप्प कसे ? तालिबान फायटर्सना(?) करायचंय लग्न, मागवली 15 वर्षांखालील तरुणींची यादी– News18 Lokmat - इकडून तिकडे भरतीचा ओघ लागणार काय ?

अफगाणिस्तान काही भारताचा शेजारी नाही .आणि अती उच्च लष्करी takat असलेला देश पण नाही. लोकसंख्या अतिशय किरकोळ. भारताला तो विषय गंभीर पण घेण्याची काही गरज नाही चीन जसे तालिबान चे समर्थन केले तसे समर्थन न करता भारता नी तटस्थ राहिले तरी चालेल उगाच त्या मध्ये उडी घेण्याचे कारण नाही. आणि तालिबान,मुस्लिम,अतिरेकी ह्यांचा बागुलबुवा उभा करून हिंदू ना भीती दाखवून २०२४ ची निवडणूक जिंकू असे कोणी मनात पण आणू नये. लोक सजक आहेत.

In reply to by Rajesh188

+१ पुलवामा ने २०१९ ला तारले. आता अफगान तारेल अशी स्वप्ने पडत असावीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अच्छा म्हणजे कॉग्रेसच्या पराजयाचे कारण आधीच ठरवुन ठेवलेत. गुड .....कॉन्फीडन्स चांगलाच आहे. भाजप जिकला तर "अफगाणिस्तान" चे कारण दाखवुन जिंकला. बादवे....भाजपा काय फंडा वापरेल अफगाणिस्तान चे नाव वापरुन जिंकायला???? काय भिती, स्ट्रॅटेजी वगैरे (ही कारणं पण तयार असतीलच म्हणा) भाजपाच्या विजयाविषयीच्या शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद.

In reply to by इरसाल

आय टी सेल चे ढकलपात्र येत आहेत की. पण आता २०१४ राहीला नसल्याने लोक पडताळणी करताहेत. त्यामुळे खोटं पण रेटून बोला हा फोर्म्युला आता यशस्वी होणार नाही.

In reply to by Rajesh188

"सजग" म्हणायचं आहे का? सजग लोकांनी ३०३ खासदार निवडून दिलेत, तरी (किंवा म्हणूनच) तुमची मूळव्याध ठसठसतेय, त्यावर जरा उपचार करायचं बघा.

In reply to by Rajesh188

भारताला तो विषय गंभीर पण घेण्याची काही गरज नाही हो ना आणि इम्रान खान मियांनी म्हणल्याप्रमाणे भारताने पण अफगाणिस्तान गुलामगिरीतुन मुक्त असे काही तरी जाहीर करावे .. काय म्हणता ? मुस्लिम अतिरेक्यांची ही धर्मशाळा होईल आणि त्याचे परिणाम भारतावर होणार नाहीत असे असे तुमचे म्हणणे असेल तर धन्य आहे १८८ तुम्ही आपले पेट्रोल भा ववाढ / पत्रकारितेची गळचेपी हा विषय धरून मोदींना कसे पाडायचे त्याकडे लक्ष द्या ..

ह्या घडीला अफगाणिस्तान मध्ये जवळजवळ १८००० अफगाणी जे अमेरिका तसेच नाटो फौजांसाठी दुभाष्याचे काम करायचे, अमेरिकी/नाटो तळावर वेगवेगळी कॉन्ट्रॅक्टची कामे करायचे ते आता कात्रीत सापडले आहेत. अमेरिका त्यांना वेळेत अफगाणिस्तानमधून सुखरूप बाहेर काढू शकली नाही त्यामुळे ते आयतेच तालिबानच्या हाती लागणार व त्यांचे हाल आता कुत्राही खाणार नाही. ह्या सर्व मंडळींकडे एक गद्दार म्हणून पहिले जाईल व त्यांचे भवितव्य आणि भविष्य पूर्णपणे अंधारमय आहे.

In reply to by सौन्दर्य

+१ आजच निनाद कुलकर्णी ह्यांची जर्मन आख्यान ही लेखमाला संपवली त्यात एका दूभाष्याचा तालीबानीनी मान चिरून हत्या केल्याचा ऊल्लेख होता. गळ्या एवजी मान का चिरली तर गळाचिरल्यावर माणूस लवकर मरतो. मान चिरल्यावर तडफड..... अमेरीका तालीबान ला संपवू शकली नाही हे खरे नाही वाटत. काहीतरी डील झाली असावी तालीबान नी अमेरीकेत. नाहीतर ईतकं सहज काबूल पडेल??

"... तेव्हा तुम्ही कुठे होतात ?" हा प्रश्न अनेक विचारवंताना विचारण्यात येतो. सध्याच्या काळात तर तो हमखास विचारला जातोच. कवी जावेद अख्तर ह्यानी अफगाणिस्तनातातील परिस्थितीवर भाष्य केले हे बरे झाले- "अमेरिका जर तालिबान नावाच्या या रानटी लोकांचा नायनाट करू शकत नसेल तर ते कोणत्या प्रकारची महाशक्ती आहेत? तसेच हे जग कोणत्या प्रकारचं आहे ज्यांनी अफगाण स्त्रियांना दया नसलेल्या धर्मांधांच्या भरवशावर सोडलंय. मानवाधिकारांचे रक्षणकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या सर्व पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे.” असं जावेद अख्तर यांनी म्हटलंय https://www.loksatta.com/desh-videsh-news/javed-akhtar-and-taslima-nasr…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

खुद्द एका भारतीय मुस्लिमाने हे म्हटले आहे , ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आता तरी निदान तथाकथित भारतीय 'विचारवंत, पुरोगामी इत्यादी' काही धीट वक्तव्ये करतील का ते पाहूंयात. 'अशी आशा करतो' असे लिहीणार होतो, इतक्यात जाणवले, उगाच फोल आशा करू नये, आपल्यालाच त्रास होतो. भारतीय मीडिया मात्र काही 'आशादायी' बातम्या देण्यात मग्न आहे. उदा. इंडियन एक्स्प्रेसने, अफगाणिस्तानातील सीख व हिंदूंना, तालिबानने 'शांती व सुरक्षा' देत असल्याचे जाहीर केले आहे, अशी मोठ्या मथळ्याची बातमी दिली आहे. ती वाचून हसावे की रडावे, हे कळेना. हे आश्वासन म्हणे तालिबान्यांनी, सीखांच्या भेटीत दिले. (त्यांत हिंदू नक्की कुठून आले, हे मला समजले नाही. बातमीत फक्त तेथील एका मोठ्या गुरूद्वारांत हिंदूंनीही आश्रय घेतला आहे' इतके नमूद केले होते). पुढे पाहूंयात काय होते आहे ते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

जावेद अख्तर ह्यानी अफगाणिस्तनातातील परिस्थितीवर भाष्य केले जग कोणत्या प्रकारचं आहे ज्यांनी अफगाण स्त्रियांना दया नसलेल्या धर्मांधांच्या भरवशावर सोडलंय. हे महाशय दोन्ही कडून बोलणार .. सोयीनुसार मुळात "अमेरिका अफगाणिस्तनात गेली का " अशी डमरू वाजवायचा आणि आता सोडून का गेलात म्हणून आरडाओरडा करायाचा असो त्यापेक्षा हि अफगाणिस्तानातील युवती काय म्हणते ते पहा https://www.youtube.com/watch?v=LxsiDCigOqQ

In reply to by चौकस२१२

हे अख्तर महाशय कोणत्या अधिकाराने पाश्च्यात्त देशांना बोल लावतात. आतापर्यंत त्यांनीच तर वाचवल नां. त्या नवबालविवाहोत्स्युक धर्मांधानाच का नाही समजवुन सांगत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अश्या विदारक परिस्थितीमधे अफगाण जनतेच्या न्याय्य मागण्या "स्वयंघोषित नवीन सरकार तालिबान " समक्ष मांडण्यासाठी मी खालील व्यक्तींचे (अति) शिष्टमंडळ काबुलला पाठवावे असा विचार करतोय. तुम्हाला वाटत असेल तर अजुन काही लोकांना अ‍ॅडवु शकता. १. माजी उपराष्ट्रपती सुश्री. हमीद अंसारी, २. नसिरुद्दीन शहा ३. जावेद अख्तर ४. माजी पंतप्रधान सुश्री. मनमोहन सिंग

In reply to by mayu4u

विरोधी मत म्हणजे केंद्र सरकार चा दुश्र्वास नाही. Bjp असेल किंवा कोणताही भारतीय राजकीय पक्ष परका थोडी आहे. पण जन हितविरोधी निर्णय होत असतील तर १००% भारतीय लोक त्या वर हक्कानी ,अधिकार नी टीका करू शकतात . मूळव्याध झालंय ,मोदी विरोधाची कावीळ आहे असेल नीच्य दर्जा ची मत व्यक्त करू नयेत. सरकार विरोध म्हणजे भारत विरोध नक्कीच नाही . राज्य सरकार वर फालतू comment करता तेव्हा तुम्ही मराठी असून महाराष्ट्र चा द्वेष करता तुम्हाला महाराष्ट्र हित झाले की मूळव्याध उठतो असे म्हणले तर चालेल का? सत्य असले तरी तुमच्या मत व्यक्त करण्याचा अधिकार आम्ही मान्य करतो. वरती एका सभासद नी मोदी ची तुलना तालिबानी वृत्ती शी केली . ते मात्र आक्षेप घेण्यासारखे कोणाला वाटले नाही. मला आक्षेप घेवा लागला

In reply to by Rajesh188

वरती एका सभासद नी मोदी ची तुलना तालिबानी वृत्ती शी केली .
मीच तो सदस्य बरं का.
ते मात्र आक्षेप घेण्यासारखे कोणाला वाटले नाही. मला आक्षेप घेवा लागला
याचं कारण ते उपरोधिक लिहिले होते हे इतर सगळ्यांना कळले म्हणून इतर कोणीही आक्षेप घेतला नाही. नेमके तुम्हालाच ते कळले नसेल तर त्याला इतरांचा नाईलाज आहे. आणि त्या प्रतिसादातून मोदींवर टीका नाही की तालिबानींवरही टीका नाही तर त्या प्रतिसादाचा रोख भलतीकडेच आहे हे पण तुम्हाला कळले नसेलच. बाकी तुमचे प्रतिसाद अनेकदा निखळ मनोरंजन करत असतात त्यामुळे त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

क्लिंटन हे त्या भुजबळांना सुद्धा सांगा त्यांना सुद्धा उपरोध कळत नाही

In reply to by Rajesh188

>> राज्य सरकार वर फालतू comment करता तेव्हा तुम्ही मराठी असून महाराष्ट्र चा द्वेष करता तुम्हाला महाराष्ट्र हित झाले की मूळव्याध उठतो असे म्हणले तर चालेल का? महाराष्ट्र हित होत असतं तर टीका का केली असती बरे? असो, जास्त लोड घेऊ नका. करमुक्त करमणूक चालू ठेवा!

तालिबान ला सत्तेमधून हाकलून देण्यासाठी भारत काय करू शकतो. अफगाणिस्तान मध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन करण्यासाठी भारत काय करू शकतो. १)सैन्य कारवाई करू शकतो. २) संयुक्त राष्ट्र समिती चा वापर करून अफगाणिस्तान सैन्य कारवाई करण्यासाठी पुढाकार घेवू शकतो ३) आर्थिक दबाव टाकू शकतो. ४) राजकीय दबाव टाकू शकतो तेथील अन्याय ग्रस्त स्त्रिया ,मुल,!नागरिक ह्यांना भारतात शरण देवू शकतो. माझ्या मता नुसार ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही असेच आहे

राजेश १८८ ह्याना खरंच मानावं लागेल. भाजपभक्त येणकेन प्रकारे त्याना वयक्तिक बोल सावून त्यांचं माणसीक खच्चीकरण करन्याचा प्रयत्न करातहेत पण तरी ते जराही संतूलन ढळू देत नाहीयेत आणी संयमी प्रतिक्रीया देताहेत. मिपा व्यवस्थापनाने भक्ताना सक्त ताकीद द्यावी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यांना मानावेच लागेल म्हणुन तर कोणितरी त्याना मानाचा मान मनापासुन देत आले आहे, भक्त बसलेत १८८वर फैरी झाडत अन त्यांच्या आकांच्या मांडिला मांडि लावुन महान रसग्रहणे चघळत :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मिपा व्यवस्थापनाने भक्ताना सक्त ताकीद द्यावी. हा हा हा हि हि हि हू हू हू

In reply to by अमरेंद्र बाहुबली

व्यवस्थापन मर्जीतल्या आयडींना काहीच करत नाही (त्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या कमेंट्स उडवण्या व्यतिरिक्त... माझी बॅट म्हणून मी क्याप्टन!) अन्यथा व्यवस्थापनाने कायप्पा ग्रुप प्रमाणे काही लोकांना केव्हाच लाथ मारून हाकलून दिलं असतं!

In reply to by mayu4u

तेच तर. हा कायप्पा गृप नाही. नाहीतर कायप्पा गृप प्रमाणे भक्तानी मिपा सुध्दा भाजप प्रचारासाठी ताब्यात घेतला असता. आणी चर्चाच झाली नसती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोडगेपणाची आणि मूर्खपणाची! साहित्य, चित्रपट, गप्पाटप्पा अशा सगळ्या समूहांमधून हाकललं गेल्यावर पण भाजप विरोधाचा कांगावा करायचा... व्वा!

In reply to by mayu4u

चित्रपट गप्पाटप्पा??? बरं. मुर्खपणा ईथे तरी सोडा. नानाच्या मिमीवरून हकलल्यावर ही कोडगेपणा जात नाही आपला. बाकी कारण माहीत नसताना काहीही लिहीणे हे मुर्खपणाते लक्शन आहे. सुधारणा होईल ही अपेक्शा नाही तुमच्या कडून.

In reply to by सुबोध खरे

Bjp समर्थक असणे वाईट नाही BJP सरकार केंद्रात बहुमताने आले वाईट नाही. Bjp ही हिंदुत्व वादी पक्ष आहे ह्याचे आंधळे समर्थन करणे मूर्खपणाचे आहे.मोदी सरकार हे धनदांडग्या लोकांचे सरकार आहे हे कटू सत्य समर्थक समजत नाहीत Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते. किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते. जेणे करून हिंदू आर्थिक बाबतीत समर्थ होतील. हिंदू ना खास वागणूक सरळ किंवा वाकड्या मार्गाने bjp ni दिली नाही उलट गरीब हिंदू,मध्यम वर्गीय हिंदू कमजोर होत गेला. शेतकरी हे जास्त हिंदू च आहेत काँग्रेस वीजे पासून पाण्या पर्यंत सर्व फ्री दिले होते. खूप गोष्टी आहेत. लालू rail मत्री hote तेव्हा सर्व यादव रेल्वे मध्ये होते. सर्व भरती नियम बाजूला सारून. Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात. सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. मग कसले हिंदुत्व वादी. राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही.

In reply to by सुबोध खरे

Bjp समर्थक असणे वाईट नाही BJP सरकार केंद्रात बहुमताने आले वाईट नाही. Bjp ही हिंदुत्व वादी पक्ष आहे ह्याचे आंधळे समर्थन करणे मूर्खपणाचे आहे.मोदी सरकार हे धनदांडग्या लोकांचे सरकार आहे हे कटू सत्य समर्थक समजत नाहीत Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते. किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते. जेणे करून हिंदू आर्थिक बाबतीत समर्थ होतील. हिंदू ना खास वागणूक सरळ किंवा वाकड्या मार्गाने bjp ni दिली नाही उलट गरीब हिंदू,मध्यम वर्गीय हिंदू कमजोर होत गेला. शेतकरी हे जास्त हिंदू च आहेत काँग्रेस वीजे पासून पाण्या पर्यंत सर्व फ्री दिले होते. खूप गोष्टी आहेत. लालू rail मत्री hote तेव्हा सर्व यादव रेल्वे मध्ये होते. सर्व भरती नियम बाजूला सारून. Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात. सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. मग कसले हिंदुत्व वादी. राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही. मुस्लिम किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माचे बहु मत असणारे सरकार फक्त दोन वर्ष जरी आले तरी सर्व राज्य घटना बदलून फक्त त्यांच्या धर्माच्या हिताचेच नियम ते करून दाखवतील. मुस्लिम तर शरीयत कायदा पण लागू करून दाखवतील.

In reply to by Rajesh188

सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. सहमत आहे. त्यातही लोकसभा आणि राज्यसभेत जवळपास पुर्ण ताकद असतांना सरळ हिंदुराष्ट्र घोषित करायचे सोडून हे पाणचट भुमिका घेत बसतात. राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. असे कोणते कायदे आहेत या विषयी कुतुहल आहे... अधिक माहिती?

In reply to by Rajesh188

१८८ साहेबांचे बाकीचे बेअरिंग जाऊ द्या, पण -
Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते. किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते.
आणि
Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात. सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. मग कसले हिंदुत्व वादी. राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही. मुस्लिम किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माचे बहु मत असणारे सरकार फक्त दोन वर्ष जरी आले तरी सर्व राज्य घटना बदलून फक्त त्यांच्या धर्माच्या हिताचेच नियम ते करून दाखवतील. मुस्लिम तर शरीयत कायदा पण लागू करून दाखवतील.
हे त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे शांतीप्रिय लोक, त्यांचे समर्थक, सहाय्यकर्ते इ. मध्ये जशी विजिगिषु वृत्ती (killing instinct?) असते तशी हिंदू लोक, नेते, त्यांचे समर्थक इ मध्ये नसते, किमान आजपर्यंत दिसलेली नाही आणि बहुतेक पुढेही दिसणार नाही.

In reply to by वामन देशमुख

मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे शांतीप्रिय लोक, त्यांचे समर्थक, सहाय्यकर्ते इ. मध्ये जशी विजिगिषु वृत्ती (killing instinct?) असते तशी हिंदू लोक, नेते, त्यांचे समर्थक इ मध्ये नसते, किमान आजपर्यंत दिसलेली नाही आणि बहुतेक पुढेही दिसणार नाही.
कारणं सो कॉलड हिंदूच हिंदुत्व आपल्यावर लादले गेले आहे या मनस्थितीत असतात, व्यक्तिगत पातळीवर त्यांना फक्त उपासना व उपासना स्वातंत्र्याचा उपयोग करून आत्म कल्याण साधणे यातच रस असतो आणि मी आधीही एकदा नमूद केल्याप्रमाणे जगातील याच्चवत सध्य स्थितीतील धर्म ही एक निव्वळ राजकीय बाब उरली आहे याची जो पर्यंत जागृती होत नाही हिंदू हिंदु हितासाठी एक होउ शकणार नाही. :(

In reply to by गॉडजिला

जगातील याच्चवत सध्य स्थितीतील धर्म ही एक निव्वळ राजकीय बाब उरली आहे याची जो पर्यंत जागृती होत नाही हिंदू हिंदु हितासाठी एक होउ शकणार नाही
शतशः सहमत

In reply to by Rajesh188

भाजप हिंदूत्ववादी आहे हा निव्वळ गैरसमज आहे. मोदी जिंकले ते सिवतच्या प्रतिमेमुळे नाहूतर भाजपला सर्व सामान्य हिंदू हिंदूत्ववादी पक्श माणत नाही. अहो जे बंगालात कार्यकर्त्याना वाचवू शकले नाही ते हिंदू आणी देशाचे काय रक्शन करनार??

तालीबान आता (म्हणजे आत्ता .. पुढे काय ते माहीत नाही) जरा कमी धर्मांध वाटते आहे. म्हणजे आता तरी ते बदला घेउ वगेरे भाषा करत नाहीत. बहुदा आंतर राष्ट्रीय समुदायकडुन मान्यता घ्यायची / नवीन सरकार ला बनवताना थोडे तरी आंतर राष्ट्रीय कायदे पाळण्याची तयारी दिसते आहे. काल सीएनेन वर एक तालेबानी लीडर ची मुलाखत पाहीली ... ते लोक आता कुराण च्या चोकटीत बसुन महिलांना अधिकार देउ असे बोलत आहेत. बहुदा सौदी अरेबिया प्रमाणे शरिया कायदा लावण्याचा विचार असावा .. बाकी तालीबान बोलते एक आणी करते एक असा आजवरचा अनुभव आहे .. पुढे काय होते ते रोचक असेल. अमेरीकेने यातुन अंग काढुन घेतले आहे. आता तिथे जे काय होइल ते आमची जबाब्दारी नाही असे बायदेन स्पष्ट बोलला आहे. त्यामुळे रशिया / चीन तिथला ताबा घ्यायला सरसावले आहेत. तालीबान शी जुळवुन घ्यायची रणनीती हा त्याचाच भाग आहे ...

In reply to by सुक्या

त्यामुळे रशिया / चीन तिथला ताबा घ्यायला सरसावले आहेत. तालीबान शी जुळवुन घ्यायची रणनीती हा त्याचाच भाग आहे ...
या दोनच देशांच्या अफगाणिस्तान मधिल वकिलाती बंद झालेल्या नाहीत... माझ्या नजरेत तालिबान आता जामच सुधारलयं, राजकिय द्रुश्ट्या त्यांचे टारगेट आता उघड उघड पाकिस्तान आहे. आणि गंम्मत म्हणजे पाकिस्तानला त्यांच्या खेळात त्यांचाच भस्मासुर शह देतो आहे. पाकिस्तानने पध्दतशीर महासत्तांचा वापर वैयक्तीक स्वार्थ साधायला केला व हे करताना दहशतवाद पुरेपुर अस्तित्वात राहिल याची काळजी घेतली. तालिबानचेही आता हेच धोरण आहे प्रथम इतरांशी गोड बोलुन जुळवुन घेउन त्यांचे कडुन पैसा उभा करायचा त्याचा वापर करुन देशावर आपली पोलादी पकड मजबुत करायची व पाकिस्तानात तालिबानी राजवट उभी करायची. त्यासाठी दहशतवाद चालुच ठेवायचा. याकडे अर्थातच जोपर्यंत मोठा हल्ला होत नाही इतर देश दुर्लक्ष करत राहणार... तालिबानचे जवळचे टारगेट एकमेव आहे पाकिस्तान. मुळात लादेन गेल्या नंतर अमेरिका अफगाणिस्तानात का राहिली ? तर विकासासाठि न्हवे तर अमेरिकन कंपन्यांचे युध्दाच्या नावाखाली खिसे भरण्यासाठी. त्यांमुळे तेथिल जनता व लश्कर आमेरिकेबाबत कधीच आश्वासक बनले नाहीत. अमेरिकेचे वैयक्तिक मनसुबे पुर्ण झाले की आपण परत वार्‍यावर ही भावना तिथे आधिपासुनच असावी म्हणुनच जेंव्हा अमेरिका, भारत, चिन वगैरेनी तालीबानसोबत बोलणी केली करजाइ व लश्कर यांच्यात आपल्याला वार्‍यावर सोडले गेल्याची भावना निर्माण झाली व त्यांनी तालिबान विरोधात लढाच उभारला नाही

In reply to by गॉडजिला

काही मुद्दे आणि भाकिते:
  1. हे चीन प्रणित आहे असे वातते. जो बिदेन चा डेमो पक्ष हा प्रामुख्याने साम्यवादी बनला आहे आणि त्यांच्या पैश्यांवर चालतो हे आता गुपित नाही. त्यानुसारच चीन ला मोकळीक देण्यासाठी येथील सैन्य काढून घेतले आहे.
  2. चीनी अधिकारी आणि तालिबानी भेट झाली आणि काही निवडक(च) मिडियामध्ये ही भेट छापून आली होती. इतरत्र बातमी दाबली आहे
  3. अफगाणिस्तानातील रिसोर्सेस वर छुपे (किंवा उघडही) चीनी नियंत्रण आणले जाईल.
  4. न्युयॉर्क टाईम्स आणि एकुण लिबरल प्रपोगंडा पाहता आता तालिबान ची खलनायकी भुमिका पुसण्याचे प्रयत्न चालले आहेत.
  5. या नंतर तालिबान आणि एकुण शांतीदूत कसे चांगले या विषयी प्रपोगंडा केल जाईल.
  6. याच वेळी एक शांतीदूत विंगचे एजंट्स यथील लोकांना फक्त लोकशाही देशात मानवतावादी तत्त्वांवर शरण द्यावे म्हणून दबाव आणतील. (शरण देण्यामध्ये कोणतेही साम्यवादी आणि मुस्लिम देश नसतील हे भाकीत आधीच करतो.)
  7. तालिबानातील काही कडवट लोकांची टोळी वेगळी होईल आणि चीन चे न ऐकता त्यांना जे करायचे आहे तेच करतील. यातून एक चेन विरुद्ध फळी उभारण्याचे प्रयत्न केले जातील.
साम्यवादी लोक मुस्लिम कट्टरता त्यांचे हत्यार म्हणून वापरतात. म्हणून हे साटेलोटे चालते. जेव्हा कट्टरता कमी होते तेव्हा साम्यवादी त्यात येनकेन प्रकारे तेल ओततात आणि आग भडकवतात. त्यातून ते त्यांचे हेतू साध्य करून घेतात. जसे की जगाचे लक्ष इतर कुठे वळवणे वगैरे. जेव्हा अशी एखादी घटना माध्यमात फार मोठी होते तेव्हा काय दाखवले गेले नाही याचा शोध घेतला पहिजे. खरी बातमी तेथेच असते.

In reply to by सुक्या

तालीबान आता (म्हणजे आत्ता .. पुढे काय ते माहीत नाही) जरा कमी धर्मांध वाटते आहे.
तालीबान्यांना विचारवंतांची खरी नस बरोबर माहित आहे असे दिसते. अशा लोकांबरोबर वागायचा एकच उपाय म्हणजे त्यांना दयामाया न दाखवता ठोकून काढणे. त्यांच्याशी कायद्याच्या भाषेत बोलायला गेलात तर ते साखळदंड आपण आपल्याच पायात अडकवून घेत असतो. जगातील मानवाधिकार संघटना, मोठमोठ्या विद्यापीठातील पोलिटिकल सायन्सचे, मोठी मोठी पुस्तके लिहिणारे ढुढ्ढाचार्य प्रोफेसर हे 'अशा लोकांना पण मानवाधिकार कसे आहेत' यावर लेक्चरबाजी करायला पुढे येतात. असल्या दहशतवाद्यांचे पडद्याआड समर्थन करणार्‍या थर्डरेट लोकांचे ऐकणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे असते. २००१ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुशनी पकडलेल्या तालिबान्यांचे गितमोमध्ये वॉटरबोर्डिंग करायचा आदेश दिला होता तेव्हा असल्याच लोकांनी त्याविरूध्द आकाशपाताळ एक केले होते. आणि मग मानवाधिकाराचा पान्हा फुटलेल्या ओबामाने गितमोच बंद करून टाकला. तेव्हा आता असले काहीतरी वरकरणी पोलिटिकली करेक्ट बोलून असल्या वर्गामध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करायचा तालिबान्यांचा डाव आहे. ते कधीनाकधी आपले खरे रंग दाखवायला सुरवात करतीलच. त्यावेळी हेच सगळे ढुढ्ढाचार्य विचारवंत लोक 'आता हे तालिबान २.० कसे आहे, जुन्या तालिबानशी त्याचा कसा संबंध नाही' याची लेक्चरबाजी करायला लागून कोणत्याही कडक कारवाई जगातील कोणत्याही सरकारने करू नये यासाठी दबाव वाढवतील. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्युमन राईट्स वॉच वगैरे संघटना, मोठेमोठे प्रोफेसर लोक हे तालिबान्यांचे छुपे समर्थक आहेत. वेळ पडल्यास ही मंडळी जास्तीतजास्त आवाज त्यांच्याबाजूने करतील यासाठी ही सगळी मोर्चेबांधणी चालू आहे असे मला तरी वाटते. त्याला अजिबात भुलायची गरज नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पुर्णतः सहमत आहे. हे दुटप्पी दोन स्तर असलेले व्यवस्थापन आहे. आणि ताबा आणि त्यांचे व्हाईट कॉलर समर्थक असे चालवले जाते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तालीबान्यांना विचारवंतांची खरी नस बरोबर माहित आहे असे दिसते. त्यांना नस वगैरे माहित नसावी पण त्यांच्या मागच्या सुत्रधारांना कोणती मोहरी प्यादी कधी हलवायची याचा फार चांगला अभ्यास आहे. तालीबान्यांना यात तलवारीची किंमत आहे. तलवार वार करते पण तिला तीची अक्कल नसते. कुठे आणि कसा वार करायचा हे डोके चालवणारे लोक निराळेच आहेत. आणि वार करण्या आधी तयारी करण्यासाठी मानवाधिकार संघटना, मोठमोठ्या विद्यापीठातील पोलिटिकल सायन्सचे, मोठी मोठी पुस्तके लिहिणारे ढुढ्ढाचार्य प्रोफेसर यांचा वापर केला जातो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मला आठवते, पूर्वी मी न्यू यॉर्क टाईम्स अगदी कौतुकाने दररोज वाचत असे, कारण माझ्या हपिसाजवळील कॉफीशॉपमधे तो ठेवलेला असे, तेव्हा जेवण आटोपल्यावर कॉफी + न्यू यॉर्क टाईम्स असा माझा रोजचा कार्यक्रम असे. तेव्हा २०१२ च्या सुमारास त्यांच्या ऑप-एड पानावर, कुण्या एका अमेरिकेतील प्राध्यापकाने लिहीलेला एक प्रदीर्घ लेख तेव्हा माझ्या वाचनांत आला. (दुर्दैवाने माझ्याकडे आता दुवा नाही, व एरव्हीही न्यू यॉर्क टाईम्स 'पेवॉल' च्या मागे आहे). त्यावेळी ह्या, सर्वसाधारणपणे दहशतवादी, मूलतत्ववादी संस्थेविषयी काहीबाही ऐकू येत होते, वाचनात येत होते. तर सदर प्राध्यापकाने ती संस्था कशी निरूपद्रवी आहे, व त्यांचे उद्देश कसे त्यांच्या मुस्लिम समाजाच्या हिताचे आहेत, अशा अर्थाचे त्या निरूपण लेखात केलेले होते. नंतर, २०१४ च्या मध्यावर बोको हरामने शाळकरी मुलींना पळवून नेऊन पुढे त्यांचे जे काही केले, त्यावेळी मला ह्या लेखाची तीव्रतेने आठवण आली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आय.बी.एन चॅनेलवरील पल्लवी घोषने अफगाणिस्तानात तालिबान राजवटीत स्त्रियांना अधिकार असतील पण शरीया कायद्याखाली अशा अर्थाचे पुढील ट्विट केले आहे. आता शरीया कायद्याखाली नक्की कोणते अधिकार स्त्रियांना असतील, पूर्वीच्या तालिबान राजवटीतही शरीया कायद्याचीच अंमलबजावणी होत असेल तर मग तेव्हा तिकडच्या स्त्रियांची स्थिती इतकी वाईट का होती वगैरे प्रश्न पल्लवीला पडले असतील अशी अपेक्षा करू. बाकी त्या टिवटिवाटावरील प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे मनोरंजक आहेत.

In reply to by सुक्या

ताबा २.० हे, आता सत्ताग्रहण केल्यावर, अतिशय काळजीपूर्वक जनसंपर्क करीत आहेत. पैसे भरपूर ओतले की पाश्चिमात्य देशांतील जनसंपर्क सेवा पुरवणार्‍या कंपन्या खूपच मिळतात, तेव्हा हे असे काही केले असावे. तेव्हा ह्यावेळी ते व्यवस्थित माध्यमांना मुलाखती देत आहेत-- अगदी इंग्लिशमधूनही काही मुलाखती दिल्या जात आहेत. एक मुलाखत तर अगदी इस्रायलच्या माध्यामाला दिलेली नजरेत आली. अर्थात, भारताकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष पुरवले आहेच. हे काम ह्यावेळी बरेच सोपे व कमी खर्चाचे झाले आहे, कारण त्यांच्यासाठी प्रचार करणारी माध्यम- टोळी इथे अगोदरच मोदीविरोध व हिंदू- साप- धोपटणे ह्या मुद्द्यांवर कार्यरत होतीच. आता हीच टोळी त्यांचे भारतांतील जनसंपर्काचे काम करतांना दिसते. एन्डीटीव्ही हे त्याचे एक उदाहरण. शेखर गुप्ता अतिशय चलाख इसम आहे. त्याचा अजेंडा तो उघड होऊ न देता, आपण नि:पक्ष आहोत असे दाखवत, हळूच पुढे रेटण्याचे काम करत रहातो. त्याची फारशी विश्वासार्हता ठेवता येणे कठीण वाटते.

In reply to by प्रदीप

अक्षरशः शब्दा-शब्दाशी सहमत आहे तुमच्या! शेखर गुप्ता अतिशय चलाख इसम आहे. त्याचा अजेंडा तो उघड होऊ न देता, आपण नि:पक्ष आहोत असे दाखवत, हळूच पुढे रेटण्याचे काम करत रहातो. भामटा आहे तो.

राजकिय द्रुश्ट्या त्यांचे टारगेट आता उघड उघड पाकिस्तान आहे. असे वाटत नाही... कारण धर्मावर आधारित तालिबान आणि पाकसितां ची विचार दाहरण एकच आहे .. फरक एवढाच कि पाकिस्तानी कोल्हयांसारखे आहेत आणि घासून पौसून चकचकीत अफगाणी अजून गुहेत राहणारे ! हा इस्लामाबाद / लाहोर च्या पंजाबी पाकिस्तानींनवर त्यांचा राग असेल पण पशतुन पाकिस्तान्यांसाच्यात आणि यांच्यात एकी आहेच कि असे म्हणतां कि त्या भागात तर आंतरराष्ट्रीय सीमारेषा पण अस्तित्वात नाही

In reply to by चौकस२१२

असे वाटत नाही...
ही घोडचुक आहे. काहीही असले तरी अजुनही इस्लामी देश असुनही पाकिस्तानमधे शरीया पुर्णपणे लागु नाही. तालिबान ते करु पहात आहे. अफगाणिस्तानला जगाच्या राजकीय पटलावर आता पाकिस्तानची जागा घ्यायची महत्वाकांक्शा आहे म्हणुनच ते पाकमधे हल्ले करत आहेत. ते हल्ले म्हणजे पाकच्या नजरेत बॅड तालिबान अन ते हल्ल्ले अफगाणमधे झाले की गुड तलीबान अशी आता पर्यंत दुटप्पि भुमीका पाकने घेतली होती, आता पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट टारगेट आहे व तालिबान सर्वप्रथम पाक गिळंक्रुत करेल. आणी अफगाण प्रमाणे जर पाक मधेही सैन्याने नांगी टाकली तर लवकरच मोठा हाहाकार उडु शक्तो... अथवा या यादवीच्या बिमोडासाठी पाक परत इतर देशांकडे कटोरा घेउन फिरायला सुरुवात करु शकतो व स्वताचे महत्व परत प्रस्थापीत करु शकतो पण रस कुणाला आहे ?

In reply to by गॉडजिला

पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट टारगेट आहे व तालिबान सर्वप्रथम पाक गिळंक्रुत करेल पाकिस्तानी लष्कर काही अफगाणिस्तानसारखे बाजार बुणग्यांनी भरलेले नाही. व्यवस्थित शिस्त असलेले आहे आणि तालिबानने तसा प्रयत्न केला तर ते त्यांना फार महाग पडू शकते. याशिवाय जागतिक सत्ताना पाकिस्तान सारखा अण्वस्त्र सज्ज देश आणि अण्वस्त्रे तालिबानच्या हाती लागू देणे अजिबात परवडणार नाही. कारण अण्वस्त्रांच्या धमकीवर ते जगाला तेलासाठी प्रचंड किंमत मोजायला लावतील. आपले मत अजिबातच वस्तुस्थितीला धरून नाही.

In reply to by सुबोध खरे

मी वस्तुस्थतीपेक्षा थोडी रंजकता पकडुन शक्यता पडताळत असेन, आयमीन ही १८८ नंबरची पद्धत वापरणारा मी ईथे पहिला नाहीं. तुमचे म्हणणे मला तरी योग्य वाटते पण मुळात तालिबान उघड लढाई का करेल ? किंव्हा उद्या सत्ता ताब्यात घेउन लष्करानेच फ्रिहॅण्ड दिला तर ? अथवा तालिबानचा बाऊ करून पाकिस्तानने अण्वस्त्र सुरक्षा वगेरे वगैरे मुद्दे रेटून पुन्हा जगातून सहानुभूती व पैसा अशा दोन्हीं गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी का असेना पण तालिबान v पाकिस्तान खडाजंगी होणार असे मला वाटते... माझे विचार चुकीचे असतीलही पण मी फक्त शक्यता पडताळणे इतकचं कल्पना करून बघत आहे. कारण तालिबान संपूर्ण अफगाण महिन्याच्या आत ताब्यात घेईल असे कोणच म्हणत न्हवते पण ते घडले

In reply to by सुबोध खरे

बरेचदा पाकिस्तानी लष्कर याविषयी अनेक अफवा प्रचलित असतात /आहेत. या पार्श्वभूमीवर सुबोध खरे यांनी
  • पाकिस्तानी लष्कराची सद्य स्थिती,
  • त्यांची ताकद,
  • त्यांची कुवत,
  • काम करण्याची पद्धती,
  • त्यांची सपोर्ट सिस्टिम आणी मजबूत दुवे
  • अधिक अजून जे योग्य असेल ते
याचे तपशील देणारा एक लेख लिहावा
अशी विनंती करतो.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर सगळे मुद्दे पटले... सध्या तरी तालिबान, पाकिस्तान कडे एक डोकेदुखी म्हणूनच पाहिलं असे वाटते, त्यांना आधी जगातून मान्यता आपली २. अवतारासाठी मिळवय्याची आहे .. त्यामुळे पाकिस्तान हे लक्ष असू शकेल असे वाटत नाही याशिवाय जर तालिबान २. खरंच हुशार असेल तर ते पाकिस्तान ची मदत घेईल गुपचूप तशी ती पख्तुनी वंश मुले मिळतच आहे , पाकिस्तान मात्र परत याचा फायदा कसा घेता येईल... हे बघेल ... ऐकून काय भारताची डोकेदुखी वाढली ,

In reply to by चौकस२१२

ऐकून काय भारताची डोकेदुखी वाढली ,
थोडे फार तथ्य आहे. अमेरिका व रशिया यांची घोड चुक वनाईलाज म्हणजे अफगाण भूमीवर प्रत्यक्ष उतरवलेले सैन्य होय. चीनने यातून धडा घेउन तालिबानला पैसा पुरवला आणि त्यांचे वितरण अफगाणिस्तानात होइल हे पाहिले त्यातून पुढील बाबी साध्य केल्या १) तालिबान सोबत संबंध बळकट केले २) तालिबानच्या विरोधकांना पैसे वाटून विरोध सपशेल निकामी केला ३) मोठा रक्तपात टाळला ४) चीनचे हीतसंबंध पक्के केले उद्या तालिबानचा पूर्ण शक्तीने चीन विरोध करणार नाही, त्यांचे बेल्ट अन रोड इनिशियटिव सारखे प्रोजेक्ट अफगाणिस्तानात व्यवस्थित पसरतील व चीनचा फार मोठा व्यापारी नफा सुरु होइल ५) यातील मोठा भाग तालिबानला अप्रत्यक्ष मिळत राहील तालिबान मजबूत व सशस्त्र होत जाईल व एक मोठी शक्ती व पाकिस्तानला पर्याय म्हणुन नावारूपाला यायचा प्रयत्न करत राहील ६) चीन मर्यादित प्रमाणात तालिबानचा उपयोग भारताची डोकेदुखी वाढवायला हमखास करेल ७) चीन व तालिबानकधीच मित्र होणार नाहीत पण आपापली सत्तास्थाने मजबुत करायला एकमेकांचा मुक्त वापर करतील ६)

In reply to by गॉडजिला

आता युद्ध तलवारीने न्हवे पैशाने लढले जाते. जय पराजय, यशापयश लोक कीती मेले मारले यापेक्षा आपला देश किती सुरक्षीत व आर्थिकदृष्ट्या श्रीमंत केला यावर ठरते. चक्क तालिबानने रक्तपात टाळला यातच सर्वकाही आले यावेळेस तालिबानच शहाणे बनून नेटवर मुंडकी छाटायच्या व्हिडिओचा भडिमार न करता बिबिसी सारख्या वृत्तवाहिन्या मार्फत आपली इमेज सुधारायचा खरा खोटा प्रयत्न करत आहे यातच सर्व परिमाणे सिध्द होतात

पश्चिम बंगालमधील मध्ये कोलकाता येथील बनियातोला हे प्राचीन भूतनाथ शिवमंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी हिंदु भक्तगण आले असता त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मध्ये एक साधू ही दिसून येतो आहे. बंगाल मध्ये हिंदुंवर अधिकाधिक अत्याचार होत आहेत असे दिसून येते आहे. निवडणूकी नंतर झालेल्या हिंसाचारात बंगाल येथील हिंदूंना येथून निर्वासित करण्यात आल्याच्या घटना ताज्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर स्टेट मशिनरी म्हणजे पोलिसांकडूनही असे अत्याचार होत आहेत असे दिसून येते आहे.

वेस्ट पॉईंट येथील यूएस मिलिटरी अकॅडमीच्या कॉम्बेटिंग टेररिझम सेंटरने एक अहवाल प्रकाशित केला होता. देवबंदी इस्लाम हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला विभक्त करणाऱ्या ड्यूरँड लाईनच्या दोन्ही बाजूंच्या पश्तून पट्ट्यातील लोकांना सर्वात लोकप्रिय आहे. शिवाय, प्रमुख अफगाण आणि पाकिस्तानी तालिबान नेत्यांनी देवबंदी मध्येच कट्टरतेचे शिक्षण घेतले आहे. तालिबान चळवळीसाठी देवबंदी हा धार्मिक आधार बनला आहे. अनेक तालिबान नेते आणि सेनानी देवबंदी पद्धतीमध्ये शिकलेले आहेत तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर हा देवबंदी पद्धतीने शिकलेला होता. हे पाहता तालिबान ची पाळेमुळे भारतीय कट्टर धार्मिक शिक्षणात आहेत असे दिसते.