मसुर पुलाव
साहित्य (चार जणांसाठी) :-
दोन वाट्या बासमती तांदुळ
अर्धी वाटी अख्खा मसुर
एक मोठ्या आकाराचा कांदा
एक मोठ्या आकाराचा बटाटा
एक मध्यम आकाराचा टोमॅटो
अर्धी वाटी फ्लॅावर
अर्धी वाटी गाजर
चार हिरव्या मिरच्या
दोन टेबलस्पुन साजुक तुप
दोन तमालपत्राची पाने
तीन दालचीनीचे तुकडे
एक मोठी (मसाल्याची) वेलची
एक चक्रीफुल
आठ-दहा लवंगा
एक टिस्पुन गरम मसाला
एक टिस्पुन धने व बडीशोप पुड
एक टिस्पुन आले लसुण पेस्ट
एक टिस्पुन हिरव्या मिरचीचा ठेचा
आठ-दहा कडीपत्त्याची पाने
दहा-बारा काजु
चवीपुरते मीठ
नॅानस्टीक कुकर अथवा पॅन मधे मध्यम आचेवर साजुक तुप तापवून त्यात अर्ध्या रिंग्जच्या आकारात कापलेला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतल्यावर त्यात लवंगा, वेलची, तमालपत्र, दालचीनी, कडीपत्ता, उभी चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या आणि काजु घालुन चार-पाच मिनीटे परतावे.
कांद्याचा रंग गोल्डन ब्राउन झाल्यावर त्यात आधी रिंग्जच्या आकारात कापून पुन्हा चार भागात कापलेला टोमॅटो, आले लसुण पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि तीन ते चार तास भिजवून ठेवलेला अख्खा मसुर घालुन दोनेक मिनीटे सतत ढवळावे.
त्यानंतर थोड्या मोठ्या फोडी कापलेला बटाटा, फ्लॅावर, गाजर, गरम मसाला आणि धने-बडीशोप पुड घालुन दोन-तीन मिनीटे परतल्यावर त्यात चार वाट्या पाणी आणि आवडीनुसार मीठ घालावे.
मिश्रणाला चांगली उकळी फुटल्यावर त्यात धुतलेला बासमती तांदुळ घालुन गॅसची आच मोठी करून मिनीटभर ढवळावे.
पाच मिनीटे मोठ्या आचेवर (न ढवळतां) शिजवल्यावर पुन्हा गॅसची आच मध्यम करावी. दम लावण्यासाठी चांगल्या जाड ताटाच्या सपाट बाजुला वर्तमान पत्राचा कागद पाणी लाऊन व्यवस्थीत चीकटवुन झाकण म्हणुन कुकर/पॅनवर ठेउन त्यावर लोखंडी खलबत्ता, वरवंटा पैकी काही नसल्यास सरळ दोन-तीन दगड वजन म्हणुन ठेवावे. (आमच्याकडे बिना शिट्टीचा नॅानस्टीक कुकर असल्याने कागद आणि वजन वापरावे लागले नाही)
बारा ते पंधरा मिनीटांनी गॅस बंद करून पुढे पाच-सात मिनीटे वाफ मुरू द्यावी.
तयार झालेला स्वादिष्ट मसुर पुलाव भाजलेले उडदाचे पापड आणि स्लाईस्ड कांदा टोमॅटो बरोबर सर्व्ह करावा. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरचीची दह्यातली कोशिंबीर पापडांच्या जोडीला असल्यास सोने पे सुहागा!
शेजारी भोचक असतील तर पुलाव तयार होत असताना पसरलेल्या सुगंधामुळे तुमच्या घरात काय शिजतय याची विचारणा करायला नक्की येणार ह्याची खात्री बाळगा.
वाचने
16387
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुगंध दरवळला आहे पुलावाचा!
धन्यवाद :)
आहाहा काय तो खमंग वास...
:)
In reply to आहाहा काय तो खमंग वास... by गॉडजिला
मस्त
अरे वाह!
In reply to मस्त by सरिता बांदेकर
दणदणीत.
एका गुजराती मित्राच्या (बुऱ्हाणपूरला माहेर
In reply to दणदणीत. by कंजूस
पुलावाची शीते मोकळी आहेत आणि
मसुराची हटके चव नक्कीच येणार.
In reply to पुलावाची शीते मोकळी आहेत आणि by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कहर दिसतोय पुलाव. मसूर आवडत
हो, मलाही मसुराची उसळ घातलेली मिसळ
In reply to कहर दिसतोय पुलाव. मसूर आवडत by प्रचेतस
मसूर पुलाव भारीच !!
@ चामुंडराय
In reply to मसूर पुलाव भारीच !! by चामुंडराय
सध्याच्या तंत्रज्ञानामुळे फक्त चक्षुसौख्याचा लाभ घेता येतो
In reply to @ चामुंडराय by टर्मीनेटर
करेक्टो!
In reply to सध्याच्या तंत्रज्ञानामुळे फक्त चक्षुसौख्याचा लाभ घेता येतो by चामुंडराय
आहाहा... लयं भारी ! च्यामारी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Frontउपवासात असताना असं काही पाहणं
In reply to आहाहा... लयं भारी ! च्यामारी by मदनबाण
नाही, म्हणजे कांदा लसुण खाणे
In reply to उपवासात असताना असं काही पाहणं by टर्मीनेटर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communismतोंपासु रेशिपी
मस्तच
मस्तच!!
@ पैजार बुवा, जागु & king_of_net