सिलींडर ५
आडगाव फाटा आणि बैलगाडी ब-याच अंतरावर . गाडीवाल्याला ओरडून ओरडून ओरडून आवाज दिले.पण तो बहुतेक झोपलेला.सिलीडर तिथपर्यंत कसे न्यायचे? खरेतर मामानी सिलिंडर गाडीपर्यंत न्यायला मदत केली असती.ते तयार ही होते.आपणच लग्न जमले असे सांगून पायावर कुर्हाड मारून घेतली.आता पश्चाताप करून काय उपयोग? बराच विचार केल्यावर युक्ती सुचली.सिलिंडर आडवे केले,व लहान मुले गाडी गाडी खेळतात तसे ढकलत नेऊ लागलो. संध्याकाळचे वेळी,निर्मनुष्य,शांत सडकेवर सिलिंडर घरंगळल्याचे आवाजाने वेगळेच वातावरण तयार झाले.त्या आवाजाने गाडीवाल्याने झोप मोडली.लगबग केल्याचे दाखवत जवळ आला.तो पर्यंत मी सिलिंडर ढकलत,गाडीचे जवळ आणले होते.'आत्ताच डोळा लागला'.ओशाळून हसत तो म्हणाला. मी बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतो.खूणेनेच सिलिंडर गाडीत ठेवायला सांगितले.
' फाट्यावर सकाळीच आलो होतो, लई उशीर झाला काय झालं?त्याने विचारले. मी न बोलता सिलिंडर उचलायची खूण केली.दोघांनी उचलून सिलिंडर गाडीत ठेवले.दोरीने बांधले.गाडीला बैल जुंपले.गाडी सुरु झाली,आणि त्याची टकळी ही.'मी सकाळीच येणार म्हणून पहाटेच बैलगाडी घेऊन फाट्यावर आला होता. फकस्त न्याहारी आणली होती.बैलांची वैरण बी थोडीच आणली .दुपारची भाकर पण खाल्ली नाही.
हाटलीत च्या अन भजी फकस्त घेतली.किती यष्ट्या,गेल्या.हॉटेल बंद करून हाटेलवाला निघून गेला,शेवटी वाट पाहून पाहून झोपला, झाकड पडल्यावर निघूनजाणार होता',वगैरे वगैरे.निमुटपणे ऐकत होतो.आपली कहानी संपल्यावर,मला उशीर का झाला हे पुन्हा विचारले. खरंतर सांगायसारखे खूप होते.थकून गेलो होतो,त्यामुळे प्रवासाचा थोडक्यात गोषवारा सांगून ,सविस्तर हालहवाल घरी व मित्रांना कथन करण्यासाठी राखून ठेवला.त्याचे समाधान झाले नव्हते,त्यामुळे चौकशा सुरूच होत्या.मी जुजबी ऊत्तरे देत होतो.पाऊण तास गाडीत वाटेवरचे धक्के खात खात एकदाचा गावी पोहचलो.अंधार झाला होता.रस्त्यावर मिनमिनते दिवे लागले होते.आमच्या घरी सिलिंडर येणार ही बातमी गल्लीत आधीच पसरलेली होती.गाडीचा आवाज येताच घरचेच नाही तर गल्लीतील बहुतेक दारे ऊघडली.चेहरे बाहेर डोकावले.अनेकजण गाडीजवळ येऊन,'कसे असते सिलींडर बघू तरी,' म्हणून जवळ येऊन निरीक्षणकरू लागले.चौकशा सुरू झाल्या.सिलिंडर उचलून घरात न्यायला पाचसहाजण एकदम पुढे झाले.त्या ओढाताणीत सिलिंडर पडते की काय वाटले.त्यांना कसेतरी आवरून सिलिंडर घरात नेले.अनेकजण आताच गॅसवरच्या चहाची चव घ्यायला तयार होते.सकाळी बघू असे सांगून सगळ्यांची पाठवणी केली.घरच्यांनाही गॅस सुरू करायची घाई होती.आणि यायला एवढा वेळ का लागला ते जाणून घ्यायचीही.पण माझा थकलेला चेहरा पाहून माझी दया आली.त्यामुळे गॅस सकाळी सुरू करायचे ठरवले.आईने चुलीवरच केलेला चहा घेऊन,प्रवास वर्णन ऐकवले.'स्थळाचा'उल्लेख तेवढा टाळला.जेवण केले आणि झोपी गेलो.
झोपेत टेम्पो,आणि सिलिंडरचीच स्वप्ने पडत होती. सिलिंडर वर,शेळ्या उड्या मारताहेत.ड्रायव्हर,क्लिनर,मामा,भाचा ,बापूसाहेब, कमी ,कमीची आई आदी मंडळी टेम्पोत बसली आहेत,मी टेम्पो ढकलत आहे,अशी दृश्ये दिसत होते.बापरे.!पुन्हा टेम्पो! खडबडून जागा झालो.घरीच अंथरुणावर होतो हे लक्षात आल्यावर जीव भांड्यात पडला.सूर्य बराच वर आला होता. गॅस सुरू करायचा होता.काही मित्र पण त्यासाठी घरी आले होते.म्हणून ती मोहीम हाती घेतली.शेगडीला नळी जोडली.पण सिलिंडर जोडायचे कसे?रेग्युलेटरच नव्हते.शोधाशोध केली. सापडत नव्हते.अनेक शंका मनात. बीडलाच राहिले की काय?की टेम्पोत विसरले?की गॅसवाल्यानेच दिले नव्हते.विचार करूनही काहीच आठवेना.रेग्युलेटर सापडले तर देवाला गुळाची शेरणी वाटायचेह कबुल केले.ब-याच वेळाने,खुंटीवर पिशवीकडे लक्ष गेले आले.त्यात तरी पाहू म्हणून पिशवी काढली तर रेग्युलेटर तिथे!शेवटी एकदाची गॅस जोडणी झाली.गॅस सुरू झाला.गॅसवरचा पहिला चहा.घरच्यांसह सर्वानी घेतला.चव तर आपल्या चहाचीच आहे,असे काहींचे मत पडले. काहींना मात्र खूपच वेगळा लागला.गॅसवर केलेले जेवण कसे लागते ते चाखून पाहायची मित्रांची इच्छा होती.परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही.कारण सिलिंडर वाहतूकीचा अनुभव लक्षात घेऊन,गॅसचा वापर फक्त चहासाठीच आणि अगदी अत्यावश्यक असेल तेव्हाच करायचा असा धोरणात्मक निर्णय आम्ही घरच्यांनी घेतला होता.
बाकी गावात पहिलीच गॅस शेगडी आल्याचा आनंद वेगळाच होता.अनेक जण पाहायला येऊ लागले.त्यांच्यासाठी चहा करण्यात आजच सिलिंडर संपते की काय अशी भिती वाटू लागली. मग नुसता गॅस दाखवायचा व काही महत्वाचे लोकांसाठी चुलीवरच चहा करायचा असे ठरवले. आपणही आपल्याघरी गॅस घ्यायचाच असे स्त्रीहट्ट,होऊ लागले...काहींनी तसे ठराव पण केले.आलेल्या पैकी अनेकांना सिलिंडर कसे आणले याची हकीकत सांगावी लागलो.ती स्टोरी ऐकून ऐकून घरातीलच नाही तर मित्रांनाही पाठ झाली.काही वेळाने माझ्या ऐवजी तेच परस्पर स्वतःची आणखी भर घालून ती स्टोरी सांगू लागले.सिलिंडर आणणे, हे हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला तेवढे जरी कठीण नाही ,तरी बरेच कठीण काम आहे,आणि ते कठीण काम मी पार पाडले म्हणजे मी फार युक्तीबाज आणि शक्तीमान पुरुष आहे असे काही लोकांचे मत झाले.ते त्यांनी चहा घेताना बोलून दाखवले. चहा पिऊन गेलेल्या,आणि गॅसवरचे स्वयंपाकाचा स्वाद घ्यायला उतावीळ असणा-यांपैकी काही नतद्रष्ट मात्र,'हा सगळा फालतूपणा आहे, मुळात गॅसचा वापर शरीराला घातक आहे,तसेच सिलिंडर आणणे चुटकीचे काम आहे,मी बावळट असल्याने एवढा आटापिटा करावा लागला',असे बोलल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले अख्खा दिवस गॅसवरच गेला.दुसरे दिवशी परत जायचे होते.
संध्याकाळी गल्लीतल्या नानूकाकांनी घरी बोलावले.गॅसची,सिलिंडरची आस्थेने चौकशी केली.मी त्यांना फायदे समजावून सांगितले.पुन्हा एकदा सिलिंडर कसे आणले त्याची उजळणी झाली.नानुकाका,काकू फारच प्रभावित झाल्याचे दिसले.काकांनी काकूंना माझ्यासाठी चहा करायला सांगितले.'काही खायला पण घेऊन ये वकील साहेबासाठी,'असेही वर सांगितले.हे नानूकाका आणि काकी,चिकट म्हणून प्रसीध्द होते.लोक उगीच
बदनामी करतात एखाद्याची,चिवडा खाताना विचार आला.चिवड्याला वास होता,पण शेवटी चिवडा तो चिवडाच की,आणि किती प्रेमाने दिलेला!चहा घेताना,मी परत कधी येणार याची काकांनी चौकशी केली.'येतोय पुढच्या शनिवारी.काही काम आहे का?'चहा चिवड्यालाजागून विचारले.'अरे बरं झालं,ते काय झालं ,हिचा भाऊ आहे ,सप्लाय खात्यात बीडला,माहीत आहेत नं?त्याच्या घरी काम होते." हे ऐकले की मनी एकदम चांदणेच फुलले.काकूच्या या भावाची स्मार्ट मुलगी कॉलेज मधे होती,ती आठवली.धडधड वाढली.कुठल्यातरी निमित्ताने तिच्या घरी जायची संधी मिळत असेल तर आणखी काय हवे होते?."जाईन की काय काम आहे सांगा ",मी अधीर होऊन विचारले."अरे त्याने,आमच्या नावे गॅस घेतलाय." काकानी सुरुवात केली."शेगडी अन सिलिंडर येऊन पडलंय त्याच्या घरी.ते इकडे कसे आणायचा हाच प्रश्न होता.टेम्पोवाला तुझा मित्रच आहे म्हणल्यावर काळजीच नाही.येताना शेगडी अन सिलिंडर तेवढं घेऊन ये तुझ्या मित्राच्या टेम्पोतनं''.काकानी आपले पत्ते उघडे केले.बापरे!म्हणजे पुन्हा टेम्पो,पुन्हा सिलिंडर आणि वर शेगडी ही !
पण आता नाही म्हणणे शक्य नव्हते.मी मुकाट्याने मान हलवली.
सहा महिन्यानंतर .........
( हे अनेक शिनुमा,शिरीयेल यांच्या सौजन्याने )
गावात आणि आजूबाजूच्या गावी अनेकांकडे गॅस शेगड्या आल्या.सिलिंडर पुरवठा अर्थातच बीडहून!
मी,गॅस एजंसीवाले,टेम्पोवाले,यांच्याशी वेगवेगळे तोंडी करार करुन,टेम्पोतून सिलिंडर वहातूकीचा व ग्रामीण ग्राहकांना पुरवण्याचा बेकायदेशीर पण किफायतशीर जोडधंदा सुरू केला.तो वकीलीच्या कायदेशीर पण तोट्यातल्या धंद्यापेक्षा जोरात चालू लागल्याने,नंतर वकीली हाच जोडधंदा बनवला.
नीलकंठ देशमुख .
nilkanthvd1@gmail.com
(समाप्त)
..
,
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त! मजा आली.
मस्त! मजा आली.
खल्लास एकदम
खल्लास एकदम
द मा मिरासदारांची आठवण झाली हा भाग वाचुन
उत्तम कहाणी. रोज नवीन भाग येत असल्याने सलगता राहिली आणि उत्सुकता कुठेही कमी झाली नाही.
पुलेशु
खूप धन्यवाद,प्रतिसादाबद्दल .
In reply to खल्लास एकदम by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खूप धन्यवाद,प्रतिसादाबद्दल .
अगदी कहर आहे!
बेक्कार हसत राहिलो, आणि तुमच्या सिलेंडरसारखाच गडाबडा लोळत राहिलो, नीलकंठ देशमुख साहेब! खरंच खूप मजा आली!
बाकी, जशी कथा फुलत गेली तशीच लेखनशैलीही फुलत गेली असे वाटते. म्हणजे उत्तरोत्तर पंचेस, कोट्या वगैरे अगदी मस्त येत गेल्या. सिलेंडर डिलिव्हरीचा धंदा हा तर अगदी कहर आहे!
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान
In reply to अगदी कहर आहे! by वामन देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले.
क्या बात!एकदम खास !
क्या बात!एकदम खास !
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
In reply to क्या बात!एकदम खास ! by Bhakti
धन्यवाद प्रतिसादाबद्दल मनापासून आभार
हे हे हे... झकास गोष्ट..
हे हे हे... झकास गोष्ट..
धन्यवाद प्रतिसादाबद्दल आभार
In reply to हे हे हे... झकास गोष्ट.. by सुखी
धन्यवाद प्रतिसादाबद्दल आभार
लै म्हंजे लैच झकास
लै म्हंजे लैच झकास
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
In reply to लै म्हंजे लैच झकास by सुबोध खरे
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
मस्त..
खरंच खूप मजा आली. हा भाग पण मस्त झालाय.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. छान
In reply to मस्त.. by योगी९००
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. छान वाटले.
खूप सुंदर
आता तुमच्यापासून आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. येऊ द्या नवीन काहीतरी. धन्यवाद.
धन्यवाद. छान वाटले. प्रयत्न
In reply to खूप सुंदर by गुल्लू दादा
धन्यवाद. छान वाटले. प्रयत्न करीन. अपेक्षा पूर्ण करण्याचा
उपसंहार रोचक...
सीजन टू येऊ दे... नवा गडी नवं राज्य म्हणत.. तसेही धंद्याचे काही अनुभव आले असतीलच की सिलेंडर पोचवायच्या ?
वाट बघत आहेच.
छान वाटले वाचून. भट्टी जमून
In reply to उपसंहार रोचक... by गॉडजिला
छान वाटले वाचून. भट्टी जमून यावी लागते.
ही तर जमली असे प्रतिसादावरून वाटते बघूया.
खुप मस्त.
खुप मस्त.
एक शंका. रेग्युलेटर कसा बसवला, कारण त्या काळी एजंसी चा मेकॅनिक एका विशिष्ट पान्याने तो बसावायचा. आता सारखा सहज बसवण्याजोगा नव्हता.
धन्यवाद. ते सिक्रेट आहे..
In reply to खुप मस्त. by मराठी_माणूस
धन्यवाद. ते सिक्रेट आहे..
चला...
साठा शिलींडराची कहाणी, सुफळ संपूर्ण झाली!!
बाकी नानूकाकूंच्या भावाच्या घरी काय झाले, ती एक रोचक उपकथा आली तरी चालेल :)
धन्यवाद. बघूया तिथे काय होईल
In reply to चला... by तुषार काळभोर
धन्यवाद. बघूया तिथे काय होईल ते!पण ते ही आपल्या हाती नसते.
लेखकच तुम्ही.
कित्येक दिवसांत चांगली कथा वाचनात आली नव्हती. शैलीही बहारदार. उगाच पाल्हाळ नाही. नेमकं ठोसे मारून सांगितले.
खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल
In reply to लेखकच तुम्ही. by कंजूस
खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल वाचून उत्साह वाढला
एक नंबर कथा झाली!
एक नंबर कथा झाली!
नवस फेडलात का? :)
धन्यवाद.
In reply to एक नंबर कथा झाली! by रंगीला रतन
धन्यवाद.
तेव्हा नाही पण आता तुम्हा लोकांचे जे प्रेम मिळत आहे त्यामुळे आता शेरनी वाटावी वाटते आहे.
खुमासदार कथा!
खुमासदार कथा!
प्रत्येक भागातले पंचेस खासच होते. मझा आला.
- (सिलींडरसाठी कधीही आटापिटा न करावा लागलेला) सोकाजी
आभारी आहे. छान वाटले.
In reply to खुमासदार कथा! by सोत्रि
आभारी आहे. छान वाटले.
आभारी आहे. छान वाटले.
In reply to खुमासदार कथा! by सोत्रि
आभारी आहे. छान वाटले.
आभारी आहे. छान वाटले.
In reply to खुमासदार कथा! by सोत्रि
आभारी आहे. छान वाटले.
हाहा.. मजा आली..
हाहा.. मजा आली..
5 ही भाग अत्यंत मजेशीर..
आभार मनापासून. उत्साह वाढला.
In reply to हाहा.. मजा आली.. by बापूसाहेब
आभार मनापासून. उत्साह वाढला.
मस्त
मस्त किस्सा आणि त्याची मांडणी पण खुमासदार.
धन्यवाद. खूप छान वाटले
In reply to मस्त by सरिता बांदेकर
धन्यवाद. खूप छान वाटले प्रतिसाद वाचून
छान शेवट.
छान शेवट.
भारी!!
मस्तय!!
धन्यवाद.
In reply to भारी!! by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद.
सुफल संपूर्ण
एका सिलिंडर साठी किती तास ऑक्सिजन वर काढावे लागले याची सुरेख आणि चमत्कारिक कहाणी सुफल संपूर्ण झाली.
धन्यवाद. तुम्हा वाचकांचे काही
In reply to सुफल संपूर्ण by रमेश आठवले
धन्यवाद. तुम्हा वाचकांचे काही क्षण छान गेले हे महत्वाचे.
असाच एक किस्सा
असाच एक किस्सा ऐकीवात होता. फक्त तो फ्रीज (रेफ्रीजरेटर) बाबत होता.
साधारण १९८४ च्या सुमारास तसा रेफ्रीजरेटरचा वापर चांगला होता पण मेनली शहराकडील लोकांच्यातच जास्त दिसायचा. असाच ओळखीतल्या एकाने त्याच्या गावाकडे रेफ्रीजरेटर नेला. (नेताना त्याला सिलेंडर सारखा त्रास नाही झाला मात्र). त्यानंतर गावातले बरेच लोक उगाचच यांच्याकडे रेफ्रीजरेटर बघायला व गार पाणी प्यायला यायचे. कोणाकडे पाहूणे येणार असतील तर यांच्याकडे गार पाण्याच्या बाटल्या, बर्फ वगैरे आधीच बुक व्ह्यायचे. रस्तावरून येता जाता उगाचच चौकशी करायच्या उद्देशाने लोकं यांच्याकडे यायचे. काही गाववाले तर फ्रीजचे गार पाणी पिऊन नंतर यापेक्षा आपल्या विहीरीतल्या पाण्याच्या गारव्याने जास्त समाधान मिळते असे काहीतरी बोलायचे. घरचे फार वैतागले होते. यांचा बघून वर्षा-दोनवर्षात गावातल्या इतर काही लोकांनी रेफ्रीजरेटर घेतल्यावर यांचा हा ताप कमी झाला.
छान. या निमित्ताने फ्रिज आठ
In reply to असाच एक किस्सा by योगी९००
छान. या निमित्ताने फ्रिज आठ वले!
अहो इतकेच काय ... आमच्या
In reply to असाच एक किस्सा by योगी९००
अहो इतकेच काय ... आमच्या पुर्ण गावात एका कडे रेफ्रीजरेटर होता . . . त्यावर .. " रेफ्रीजरेटर ने लाईट बिल खुप येते" पासुन " रेफ्रीजरेटर मधले गार पाणी बाधते. आपले माठाचे पाणी उत्तम" इथपर्यंत बाता होत होत्या ....
सिलींडर पुराण आवडले ... हे
सिलींडर पुराण आवडले ... हे नमुद करायचे राहीले ... मजा आली.. वाचुन ..
धन्यवाद. अभिप्राय वाचून छान
In reply to सिलींडर पुराण आवडले ... हे by सुक्या
धन्यवाद. अभिप्राय वाचून छान वाटले
सर्व भाग वाचले
अतिशय खुमासदार लेखन. तिसरा आणि चौथा तर कमालच
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
In reply to सर्व भाग वाचले by गोरगावलेकर
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
कथाकथन कराच
नीळकंठ देशमुख,
बाटला घरी नेला खरा पण परत कसा केलात? त्यासाठी काय काय करावं लागलं त्याचीही इष्टोरी येउद्या! :-) हिच्यासारखीच खुमासदार शैलीत पायजे हां.
तुम्ही कथाकथनात उतराच. आम्हां वाचकांना मेजवानी मिळेल.
आ.न.,
-गा.पै.
बाटला? कळले नाही.
In reply to कथाकथन कराच by गामा पैलवान
बाटला? कळले नाही.
तुम्हाला सिलिंडर म्हणायचे आहे का?
इष्टोरी आवडली हे बाकी छान.
मला ही छान वाटले
बाटला = सिलिंडर
In reply to बाटला? कळले नाही. by नीलकंठ देशमुख
नीळकंठ देशमुख,
होय, बाटला म्हणजे सिलिंडर. बाटलीचं पुल्लिंग.
परत नेतांना काय यातायात करावी लागली? एसटीत घेतला का? रिकामा असेल तर न्यायला काहीच हरकत नसावी बहुतेक.
आ.न.,
-गा.पै.
भारी लिहीले आहे एकदम झाकास!
भारी लिहीले आहे एकदम झाकास!
धन्यवाद
In reply to भारी लिहीले आहे एकदम झाकास! by पाषाणभेद
धन्यवाद
हा .... हा .... हा .... !
मस्त मजा आली सिलेंडर सोबत प्रवास करायला आणि फरफट अनुभवायला !
🥇
नीलकंठ देशमुख
_/\_
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !
धन्यवाद. आपणा सर्वानाच लिखाण
In reply to हा .... हा .... हा .... ! by चौथा कोनाडा
धन्यवाद. आपणा सर्वानाच लिखाण वाचून आनंद मिळाला, हे कळतंय प्रतिसाद पाहून. छान वाटते आहे. पण जबाबदारी ही वाढली आहे.
पाहूया कितपत निभावता येईल ते.
छान
सर्व भाग वाचले. मस्त! आणखी लिहा. यात अनेक उपकथानके दडलेली दिसताहेत.
धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
In reply to छान by स्मिताके
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. प्रयत्न करतो. अनेक वाचकांना यात पुढे काही असेल असे वाटत आहे. त्यामुळेच मलाही तसे वाटू लागलंय.
सर्व भाग वाचले. कथा मजेदार
सर्व भाग वाचले. कथा मजेदार झाली आहे.
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
In reply to सर्व भाग वाचले. कथा मजेदार by ॲबसेंट माइंडेड…
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
लिखाण आवडले...
लिखाण आवडले...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
In reply to लिखाण आवडले... by मदनबाण
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
मस्त खुसखुशीत
एकदम चकली लिखाण आहे
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. चकली
In reply to मस्त खुसखुशीत by कपिलमुनी
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. चकली आवडली हे छान झाले