माझी शाळा, निसर्ग शाळा
माझं माध्यमिक शिक्षण तोरणा विद्यालय, वेल्हे येथे झालं. टेकड्यांच्या कुशीत वसलेली.. माझी शाळा. दोन सुंदर इमारती, आंब्याची बाग, काजू-फणसाची झाडं, सर्वांनी मिळून तयार केलेले अंतर्गत रस्ते, पायऱ्या. पाठीशी खंबीरपणे उभा असलेला तोरणा किल्ला. सगळं स्वप्नवत. काळाच्या प्रवाहात निसर्गाशी अनुरूप असलेल्या त्या इमारती आणि टेकड्या जाऊन त्याची जागा तीन मजली इमारतीचे घेतली खरी, पण मन अजूनही रमते ते त्या जुन्या, निसर्ग-शाळेतच.
आम्हां विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया जिथे बांधला गेला, त्या विद्या मंदिराचे ऋण आजन्म राहील. तरीही फुलाची पाकळी म्हणून, आम्हां काही विद्यार्थ्यांनी मिळून शाळेसाठी गरज असेल त्या आणि जमेल त्या सुधारणा करण्याचं ठरवलं आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठीची पुस्तके. जेणेकरून त्यांना वाचनाची गोडी लागेल व त्यांचं भावविश्व विस्तारण्यास मदत होईल. अर्थातच वाचन संस्कृती शाळेतूनच जोपासण्यासाठी शिक्षकांचं योग्य मार्गदर्शनही तेवढंच महत्त्वाचं आहे.
सध्या तिथे ५ वी ते १२ वी चे वर्ग आहेत. वयानुसार किती गट करावे लागतील? आणि प्रत्येक गटासाठी कोणती पुस्तके योग्य असतील? अर्थातच शाळेतील शिक्षकांचंही मार्गदर्शन घेऊन अगदी आवश्यक अशाच गरजा पूर्ण करण्याचा आम्हां वर्गमित्रांचा मानस आहे.
इतरही काही सल्ला असेल तर स्वागतच आहे.
मिपाकर योग्य ते मार्गदर्शन करतील यात शंका नाही.
धन्यवाद.वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगला उपक्रम आहे. शुभेच्छा
मनो
धन्यवाद
मस्त उपक्रम
वा !
धन्यवाद
उपक्रम चांगला.
धन्यवाद
ग्रामीण भागात फोन आणि नेटवर्कची उपलब्धता.......
फोनची उपलब्धता
छान उपक्रम
व्याकरण आणि शब्दकोश आवर्जून
व्याकरण आणि शब्दकोश आवर्जून देते.चांगली सुचेना आहे.गणेशा
गणेशा
गणेशा
सर्वांचे आभार
आमच्या वर्गमित्रांनी एकत्र
आम्ही काही भौतिक
पण जास्त भर प्रत्यक्ष गरजू
श्री गणेशजी
चांगला प्रश्न आहे. सरकारी
आपल्या प्रश्नाचा रोख मला
धन्यवाद. हुशारी हा नक्कीच
मी तुमच्या शाळेतील ८ वी ते १०
धन्यवाद श्रीगुरुजी/सर.
अवांतर...
टेकडीच्या कुशीत, निसर्गाच्या
वां मस्तच
काही अपरिहार्य कारणांमुळे