Skip to main content

चालू घडामोडी - जुलै २०२१

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 02/07/2021 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड यांचे २९ जून २०२१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. rumsfeld त्यांनी प्रशासनिक जबाबदारीची पदे सांभाळायला सुरवात रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना १९६९ मध्येच केली. त्यानंतर अध्यक्ष झालेल्या जेराल्ड फोर्ड यांनी त्यांना सुरवातीला १९७४ मध्ये व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ आणि १९७५ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून नेमले. १९७७ मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर अध्यक्ष झाल्यानंतर रम्सफेल्ड जी.डी.सर्ल या खाजगी औषध कंपनीचे सी.ई.ओ बनले. १९८१ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे रॉनाल्ड रेगन अध्यक्ष झाल्यानंतर १९८३ मध्ये अध्यक्षांनी त्यांना इराकमध्ये सद्दाम हुसेनला भेटायला पाठवले होते. त्यावेळी इराण-इराक युध्द चालू होते आणि इराक अमेरिकेचा मित्रदेश होता आणि सद्दाम हुसेन अमेरिकेचा महत्वाचा साथीदार होता. डॉनल्ड रम्सफेल्ड यांना जॉर्ज डब्ल्यू बुश अध्यक्ष झाल्यावर २००१ मध्ये परत एकदा संरक्षणमंत्री म्हणून नेमले गेले. २००२-०३ मध्ये इराकमध्ये अतिसंहारक शस्त्रे आहेत म्हणून बुश प्रशासनाने खोटारडेपणा केला. त्यात परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांच्याबरोबरच संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड हे पण त्या खोटारडेपणात होते. २० वर्षांपूर्वी ज्या सद्दाम हुसेनला रम्सफेल्ड भेटले होते तोच माणूस किती नालायक आहे याचा प्रचार करण्यात ते पुढे होते. बुश २००४ मध्ये दुसर्‍यांदा निवडून आले. दुसर्‍या टर्ममध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री पदावर कॉलिन पॉवेल यांच्याऐवजी कॉन्डोलिझा राईसना नेमले पण डॉनल्ड रम्सफेल्डना संरक्षणमंत्रीपदावर कायम ठेवले. २००३ चे इराक युध्द अमेरिकन जनतेत खूप अलोकप्रिय ठरले. २००४ मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली तेव्हापर्यंत तितकी प्रतिक्रिया आली नव्हती पण २००५-०६ मध्ये अनेक अमेरिकन सैनिकांचा इराकमध्ये हकनाक बळी गेल्यानंतर ती प्रतिक्रिया जास्त उमटली. २००६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला आणि त्याबद्दल इराक युध्दाची घोडचूक जबाबदार ठरविण्यात आली. त्यानंतर रम्सफेल्ड यांना संरक्षणमंत्रीपदावरून काढण्यात आले. कॉलीन पॉवेल यांनी नंतरच्या काळात इराक युध्द आणि त्यावेळी केलेला खोटारडेपणा ही चूक होती असे निदान तोंडदेखल्या तरी म्हटले पण रम्सफेल्ड यांनी ते पण म्हटले होते असे वाटत नाही. बुश प्रशासनाच्या पहिल्या टर्ममध्ये ९/११ आणि नंतर भारतात संसदभवनावर हल्ला आणि त्यानंतर कालुचक हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळेस बुश प्रशासन भारताला 'संयम ठेवा' हा उपदेशाचा डोस पाजत होते. तसे करण्यातही डॉनल्ड रम्सफेल्ड पुढे होतेच. ९/११ नंतर आणि भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण असताना रम्सफेल्ड भारतात आले होते. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंगांशी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जसवंतसिंग फारसे खुषीत दिसत नव्हते असे टिव्ही चॅनेल्सवर बघितल्याचे आठवते. म्हणजे कदाचित संयम ठेवा हा 'दम' रम्सफेल्ड यांच्याकडून दिला गेला असावा ही शक्यता आहे. डॉनल्ड रम्सफेल्ड कितीही नालायक असले तरी त्यांची एक गोष्ट मला आवडायची असे नसले तरी भावायची. आपण अमेरिकेसारख्या महासत्तेच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये सत्ताधारी आहोत हा एक प्रकारचा अहंकार किंवा दर्प म्हणा असा त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवायचा त्यामुळे त्यांचे बोलणे नेहमीच एकदम 'डॉमिनेटिंग' किंवा खरं तर 'बुलिंग' करणारे असायचे. असो. डॉनल्ड रम्सफेल्ड यांच्या निधनामुळे अमेरिकेच्या इतिहासातील नालायक मंत्र्यांपैकी एक अध्याय संपला. आता हेनरी किसिंजरचा नंबर कधी लागतो ते बघायचे. बांगलादेशात याह्याच्या अत्याचारांना पाठीशी घालून लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या निक्सन आणि किसिंजर यांच्यासाठी नरकात जागा कायमस्वरूपी आरक्षित केली गेली असेल असे नेहमी वाटते. रम्सफेल्डही फार वेगळे नव्हते.

वाचने 53588
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

अजित पवारांबरोबर सत्ता स्थापण केल्यवर आपल्य इमेज ला तडा गेला व तो काही शहाणपणाचा निर्णय नव्हता हे फडवणीसांनी कबुल केल्याचे आठवते ..

In reply to by सुक्या

फडणवीस विरोधातही पूर्ण परीपक्व नेतृत्व वाटत नाहीत, त्यांची इमेज अजून खालावत आहे असेच भासते. स्वतःच्या पक्षातीलच लोक असे त्यांनी संपवायला नको होते स्वताचे स्थान मजबूत करायला त्यांनी इतर पक्षातील लोकांशी जुळते घेतले ही राजकीय अपरिहार्यता जरी समजून घेतली तरीही पण स्वगृही काही कलह टाळायला हवे होते

In reply to by गॉडजिला

राजकीय पक्षात एक ठराविक उंची गाढली की ती जागा टिकवणे हे सर्वात अवघड काम असते . प्रतिस्पर्धी व्यक्ती ला कमजोर करणे पण पक्षात आपल्या विरोधात आघाडी निर्माण होवू नये ही काळजी घेणे आणि निवडणुका पण जिंकणे हे सर्व करावे लागते. कोणी डोईजड होईल असे वाटायला लागले की त्या व्यक्ती ला निवडणुकीत पाडण्याचे काम स्व पक्षीय लोक च करत असतात . आणि हे सर्व राजकीय पक्षात होते. फडणवीस नी स्व पक्षीय विरोधकांचे पंख झाटण्याचे काम केले असेल तर ते स्वतःची जागा टिकवण्यासाठी गरजेचेच असते. शेवटी पद आणि सत्ता ह्याच्या मागे सर्व असतात. पक्ष निष्ठा,तत्व,हे असं काही नसते. एकच व्यक्ती च्या पक्ष निष्ठा,तत्व एकच आयुष्यात दर पाच वर्षांनी बदलणारी नी खूप नेते मंडळी आहेत.

In reply to by गॉडजिला

महाराष्ट्र भाजपत आता फक्त फडणवीसच (आणि त्यांचे शेपूट चंपा) आहेत. इतर सर्व नेते संपले आहेत. महाराष्ट्र संबंधात सर्व निर्णय फक्त फडणवीसच घेतात असे चित्र दिसत आहे. चंपाचा आचरटपणा आणि थिल्लरपणा पराकोटीचा वाढला असून पक्षावर त्याचा नकारात्मक परीणाम होत आहे. २०१४ पर्यंत महाराष्ट्रात गडकरी, गोपीनाथ मुंडे, खडसे, मुनगंटीवार, बावनकुळ, फडणवीस, तावडे अशी नेत्यांंची फळी होती. चंपा हे नाल सुद्धा कोणाला माहिती नव्हते.गडकरी केंद्रात गेले तर गोपीनाथ मुंडे अपघातात गेले. आता इतर सर्व नेते निष्प्रभ झाले आहेत किंवा त्यांना निष्प्रभ केले गेले आहे.

In reply to by गॉडजिला

या आधी एक प्रतीसाद होता ... संपादक मंडळाला काय आक्षेपार्ह दिसले कुणास ठाउक. तो प्रतीसाद उदवण्यात आला ... असो. फडणवीसांचा आक्रस्थाळेपणा वाढला आहे हे नक्की. परंतु एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करताना त्याचा सखोल अभ्यास ते करतात. त्यात त्यांचा वेळ वाया जातो हे खरे परंतु तसे करणारा दुसरा नेता मला तरी महाराष्ट्रात दिसत नाही. त्यात अजुन तरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत ... वासरात लंगडी गाय शहाणी म्हणुन फडणवीसांना अजुन तरी पर्याय दिसत नाही .. राहीली गोष्ट तिघाडी सरकारची ... यात अजुन तरी ताळमेळ दिसत नाही ... एका सरकारात आहे तरीही एकमेकांचे पाय ओढणे चालु आहे .. २ वर्षे झाली तरी अजुन काही भरीव काम दिसत नाही. लहान मुलांसारखे हिशेब चालु आहेत .. कुठलेही प्लॅनिंग दिसत नाही ... बर्‍याच वेळा बेधडक खोटे बोलणे चालु आहे .. भीक नको पण कुत्रा आवर असली परीस्थीती आहे ...

In reply to by सुक्या

हे सुक्या ह्यांना उद्देशून नाही, पण हा अनेकदा दिसून येणारा ट्रेंड- विशेषतः उजव्या बाजूच्या जनतेत -- मी पाहिला आहे व तो थोडा अस्वस्थ करणारा आहे. तर ह्या बाजूची बहुतांश जनता, त्यांच्या आवडत्या नेत्याविषयी नेहमीच असा अ‍ॅपोलोजॅटिक सूर का ठेवते? म्हणजे.' काय करणार? त्यांच्यापेक्षा दुसरा चांगला नेता सध्या दिसत नाही'. मोदींपासून, फडणवीसांपर्यंत हे भाजपचे समर्थक असेच का म्हणत असतात? आता हे उदाहरण पहा: "(१)एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करताना त्याचा सखोल अभ्यास ते करतात......तसे करणारा दुसरा नेता मला तरी महाराष्ट्रात दिसत नाही. (२) त्यात अजुन तरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत .." मग आपल्या अजून आपल्या नेत्यांत कसले गुण हवे आहेत? बरे, फडणवीसांनी बर्‍यापैकी राज्यशकट, अतिशय कठीण राजकीय परिस्थीतीत, पाच वर्षे चालवला.' हो, ते तर आहेच, पण आम्हाला ह्यापे़क्षा सक्षम, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता पाहिजे' म्हणजे असा सर्वगुणी, बहुसंपन्न नेता जगात कोठे कोण आहे? भाजप सोडा, इतर कुठल्या प़षात सध्या तो आहे? पूर्वी होता? (हे थोडे साधे ठेवण्यासाठी आपण हे भारतापुरतेच मर्यादित ठेऊयांत. कारण बाहेरील नेत्यांविषयी आपली माहिती मर्यादित असेल. हेही एक ह्यानिमीत्ताने मी नमूद करतो-- इतर कुठल्याही पक्षाचे समर्थक त्यांच्या नेत्याविषयी इतके उदासिन दिसत नाहीत-- अगदी केजरीवालच्या आपचे समर्थकही.

In reply to by प्रदीप

फक्त त्याबाबतीतच नव्हे, इतरही बाबतीत असाच बोटचेपेपणा अनुभवास येतो. आणि फक्त अशा फोरम्स वरच नव्हे, तर समोरासमोर च्या चर्चेत सुद्धा. म्हणा ना, "भारत हे हिंदुराष्ट्र व्हावे हे माझे मत आहे", किंवा "काँग्रेसमुक्त भारत हाच सुखी भारत"! तर ते तसं म्हणणार नाहीत. भारतात मुसलमान जास्त सुखी आहेत त्याचे कारण हिंदू सहिष्णू असतात असं काही तरी तर्कट मांडत बसतात. डायरेक्ट बोलायला लोकांना लाज वाटते की काय कोण जाणे. कुणी तरी "यांनी पोलीस केसेस केल्या म्हणून त्यांनी ईडी लावली आणि म्हणून भाजप सरकार हे सुद्धा भाजप विरोधी सरकार प्रमाणेच आहे" असं काही तरी तर्कट लावलं तर हो ला हो म्हणून माना डोलावतात. भारत पाकिस्तान दोन्ही देशातली जनता एकमेकांवर प्रेम करते असं कुणी तरी फालतू लिहिलं तरी हो करतात. "पण काय करणार, पाकिस्तानातली आर्मी वाईट" असं काही तरी गुळमुळीत बोलतात. हाच प्रयत्न आधीच्या काँग्रेस सरकारने केला. "आम्ही पहिल्यांदा अणुबॉम्ब वापरणार नाही". "स्वतः हल्ला करणार नाही". इ.इ. मी अशा वेळी सरळ उलटा स्टान्स घेतो. हो, आम्हाला पाडायचच आहे हे सरकार; हो, आम्हाला पाकिस्तानला आणि तिथल्या जनतेला पण संपवायचं आहे; हो, आम्हाला हिंदुराष्ट्रच हवं आहे आणि बाकीचे इथे दुय्यम नागरिकच असतील असं म्हटलं की हा सेक्युलर प्रयत्न गप्प होतो.

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार ह्यांचे ९८ व्या वर्षी निधन. एकूण ६५ चित्रपट त्यानी केले. राज-देव-दिलीप पैकी दिलीप हे त्या पिढीतले हयात असणारे अभिनेते होते. भावपूर्ण श्रद्धांजली

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वाचून वाईट वाटले...

In reply to by Rajesh188

वाह. दुःख झाले नाही तर ठीक आहे हो. मला दुःख झालेच नाही सांगायची काय गरज आहे ?

In reply to by Rajesh188

एखाद्या कलाकाराचे जाणे काहीच वाईट नाही असे म्हणणे त्यालाच शोभते ज्याला कलेची आवड नाही. त्यामुळे तुमच्या वाक्याशी सहमत नाही. असे वाक्य फक्त वादविवाद वाढवू शकतात. सहमती नाही.

सर्व धर्मांना,जाती ना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.सर्व राज्यांना पण योग्य प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. आताच्या भारताच्या केंद्रीय मंत्री मंडळात मुस्लिम धर्माला प्रतिनिधित्व न देणे हे काही चांगले लक्षण नाही.

In reply to by वामन देशमुख

झालं! म्हणजे आता त्यांनी घटना पण वाचायची? अरे कुठे नेवून ठेवलाय मिपा माझा !!

In reply to by कॉमी

तो यशस्वी झाल्यावर अनेक लोकं भेटत अन विचारत असत की जर त्यांनी त्यांचा धर्म बदलला तर ते देखील यशस्वी होतील का त्यावर रेहमान हसून उत्तर देत असे नो, दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स :)

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्रसिंग यांचे निधन झाले आहे. ते वेगवेगळ्या कारकिर्दीत राज्याचे २० पेक्षा जास्त वर्षे मुख्यमंत्री होते. Virbhadra Singh


क्युबाच्या कम्युनिस्ट सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. गेली ६० पेक्षा जास्त वर्षे कम्युनिस्ट दमनचक्राखाली राहिलेल्या क्युबन लोकांची स्वातंत्र्याची मूलभूत प्रेरणा उफाळून आली. कधीतरी हे होणारच होते. लवकरच क्युबातून कम्युनिस्ट राजवटीचे समूळ उच्चाटन होईल आणि क्युबातील लोकही स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकतील ही अपेक्षा. आपण आरोग्यक्षेत्र आणि शिक्षणात अगदी फार मोठी क्रांती केली आहे असा या डाव्या राजवटींचा नेहमीच दावा असतो. पण ते बिंग कधीनाकधी फुटतेच. क्युबात ते फुटले म्हातार्‍या झालेल्या फिडेल कॅस्ट्रोवर उपचार करायला स्पेनहून डॉक्टर बोलवावा लागला तेव्हा. भारतातल्या डाव्या पुरोगामी विचारवंतांचा लाडका चे गव्हेरा याच फिडेल कॅस्ट्रोच्या मंत्रीमंडळात मंत्री होता. त्याने क्युबात फायरींग स्क्वाडद्वारे हजारो लोकांना ठार मारले होते. (एकीकडे अहिसेंचे जप जपणार्‍या आपल्या पंतप्रधानांनी असल्या खुनशी दहशतवाद्याला क्रांतिकारक असे म्हणत दिल्लीत घरी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावून मोठा सन्मान केला होता). कम्युनिस्ट राजवट अशी सरकारी दहशत असते तोपर्यंतच चालू शकते. जेव्हा त्या दहशतीची पकड सैल व्हायला लागले तेव्हा ही जुलमी राजवट पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळते हे जगात अनेक ठिकाणी बघायला मिळाले आहे. पण ही दहशत असते तेव्हा इतकी असते की तिथल्या लोकांना आपला जीव धोक्यात घालूनही तिथून पळून जाणे नाहीतर तिथेच कुजून मरणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात. विकीपीडीयावरील बातमी खरी असेल तर अमेरिकेत २०१९ मध्ये २३ लाख ८१ हजार क्युबन वंशाचे लोक होते. आणि खुद्द क्युबाची २०१९ मधील लोकसंख्या किती? तर १ कोटी १३ लाख. म्हणजे गेल्या ५० वर्षात क्युबातून किती लोक अमेरिकेत पळून गेले असतील बघा. आणि असे समुद्रातून पळून जाताना किती लोक मरण पावले असतील कोणाला माहित. इतक्या लोकांना इतकी वर्षे गुलामीत ठेवणारी ही राजवट लवकरात लवकर नष्ट व्हावी ही सदिच्छा. हे सगळे होत असताना तरी जगातील मोठ्या विद्यापीठांमधील डाव्या विचारांनी भारलेल्या ढुढ्ढाचार्य प्रोफेसर लोकांना सद्बुध्दी सुचावी ही अपेक्षा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आपण आरोग्यक्षेत्र आणि शिक्षणात अगदी फार मोठी क्रांती केली आहे असा या डाव्या राजवटींचा नेहमीच दावा असतो. पण ते बिंग कधीनाकधी फुटतेच.
थोडक्यात सर, डॉ व प्रा हे टोटल गंडलेलेच प्रकरण असते म्हणताय का डावीकडे ?
हे सगळे होत असताना तरी जगातील मोठ्या विद्यापीठांमधील डाव्या विचारांनी भारलेल्या ढुढ्ढाचार्य प्रोफेसर लोकांना सद्बुध्दी सुचावी ही अपेक्षा.
काही लोक मानसिकदृष्ट्या आतून इतके कमकुवत झालेले असतात की तर्कशुद्ध विचार करता आला नाही तर ते भयंकर अस्वस्थ होतात चीडचीड व असुरक्षित फील करू लागतात, मानसिक पातळीवर म्हणून त्याना सतत भारलेले (नामस्मरणाने न्हवे तर तर्कशुद्धतेने) असणे व्यसन बनते त्यातून ते कधीच बाहेर न पडून निखळतेची अनुभूती विसरलेले सुप्तक्रांतीवादाचे आत्मकैदी असतात, मग ते ना तुमचे ऐकतील ना इतर कोणाचे... खरे तर असा प्राणी हार्मलेस असायला हवा आणि असतोही जोपर्यंत तो आतील गाठ आपसूक जपायच्या स्थानी नसतो म्हणूनच क्युबा अजून टिकला... त्याच्या भौगोलिक स्थानामुळे

In reply to by गॉडजिला

थोडक्यात सर, डॉ व प्रा हे टोटल गंडलेलेच प्रकरण असते म्हणताय का डावीकडे ?
अगदी असेच. जगातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये समाजवादी/डाव्या विचारांनी प्रभावित असलेले अर्थशास्त्राचे प्रा.डॉंचा आकडा बघितला तर हैराण व्हायला होईल. हार्वर्ड, केंब्रिज, बर्कले वगैरे या लोकांचे मोठे बालेकिल्ले आहेत. यांचे एक आश्चर्य वाटते. अगदी इकॉन-१०१ म्हणजे अर्थशास्त्रातील पहिला कोर्स त्यांनी घेतलेला असतो त्याला हरताळ फासणारी मते त्यांची असतात. उदाहरणार्थ मागणी-पुरवठा न्यायाने 'इक्विलिब्रिअम पॉईंट'च्या वर मिनिमम वेज वाढवल्यास त्याचे दुष्परिणाम होतात हे अगदी इकॉन-१०१ मध्ये असते. पण तरीही या प्रोफेसर लोकांपैकी अनेकांचे मिनिमम वेज वाढवावे हे मत असते. वेनेझ्युएलाची समाजवादी धोरणांमुळे कशी वाट लागली आहे हे जगजाहिर आहे. पण २००७ मध्ये जोसेफ स्टिगलिझ या नोबेल पारितोषिक मिळालेल्या ढुढ्ढाचार्यांनी कॅराकसला जाऊन ह्युगो चॅवेझचे अगदी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर ४-५ वर्षात त्याच धोरणांचे दुष्परिणाम समोर आल्यावर हे महाशय गायब झाले. आपल्या विषयाच्या मूलभूत तत्वांविरोधात मते ठेवली तरी नोबेल पारितोषिक मिळाले असे इतर कोणत्याही विषयाच्या बाबतीत होत नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अर्थ शास्त्रात नोबेल मिळवणारे एकंदर प्राध्यापक आणि शांततेसाठी नोबेल मिळवणारे एकंदर राजकारणी हे धन्यवाद लोकच आहेत. खरं तर हि दोन्ही नोबेल पारितोषिके हि मूळ नोबेल पारीतोषिकाला कलंकच आहेत असे माझे मत आहे.

In reply to by सुबोध खरे

अर्थशास्त्राच्या नोबेलविषयी बराचसा सहमत पण १००% सहमत नाही. याचे कारण हे नोबेल पारितोषिक मिळालेल्या लोकांच्या यादीत पुढील मोठी नावेही आहेत- १. फ्रेडरीक हायेक २. मिल्टन फ्रीडमन ३. जेम्स बुकॅनन ४. गॅरी बेकर ५. डॅनिएल कॅनेमन ६. थॉमस सार्जंट ७. रिचर्ड थेलर पण त्याबरोबरच अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जी, जोसेफ स्टिगलिझ वगैरे नावेही आहेत.

In reply to by सुबोध खरे

खरं तर हि दोन्ही नोबेल पारितोषिके हि मूळ नोबेल पारीतोषिकाला कलंकच आहेत असे माझे मत आहे. सहमत, मलाला आणि ओबामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार कशासाठी जाहीर झाला हे समजत नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

सहमत ... अगदी शब्दाशब्दाशी सहमत. अर्थशास्त्र व शांतता ... ही दोन्ही नोबेल फक्त चमकोगिरी साठी आहेत. (अर्थशास्त्रचे नोबेल हे "नोबेल मेमोरी प्राईझ" आहे. ते एक अजुन सबळ कारण चमकोगिरी साठी.)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

क्युबा ह्या देशाला आंदोलन करण्याचं अनुभव आहे.आंदोलन होणे समाज जिवंत असण्याचे लक्षण आहे. आता पर्यंत क्युबा चा मानवी निर्देशांक उच्च च होता . भारता पेक्षा उत्तम. Source wikipedia. आता corona मुळे संकट आले आहे .ते प्रश्न सोडण्यास समर्थ आहेत. अमेरिका किंवा बाकी साम्राज्य वादी देशांनी तिथे हस्तक्षेप करू नये.

हल्लीच अमेरिकेन नेव्हीने समुद्रात प्रचंड मोठा स्फोट घडवुन, त्यांच्या नौदलातील जहाजावर [ USS Gerald R Ford - सगळ्या नवी आणि सगळ्यात अद्ययावत आण्विक शक्तीने संचालित] त्या स्फोटामुळे काय परिणाम होतो हे पाहणे या स्फोटाचे कारण होते. [ यासाठी १८ टन स्फोटके वापरली गेली आणि या स्फोटामुळे 3.9 क्षमतेचा भूकंप उत्पन्न झाला. ] हा व्हिडियो मुद्दामुन मोठा आकारात देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।

एक mbbs doctor निर्माण करण्यासाठी कमी १ करोड खर्च होतो. गरीब पण अतिशय बुद्धिमान मुल सरकारी कॉलेज मधून किरकोळ खर्चात डॉक्टर होतात. बुध्दी कमी आणि पैसे जास्त आणि बुध्दी जास्त आणि पैसे कमी. मग उत्तम दर्जा चे डॉक्टर कोठून निर्माण होतात. खासगी कॉलेज मधून की सरकारी.

१. एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांनी पुण्याजवळीत जमिन व्यवहारात केलेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी न्यायाधीश दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे अशी बातमी आली आहे. त्यांना मंत्रीमंडळातून काढायचा निर्णय योग्य होता असे वरकरणी तरी वाटते. २. प्रीतम मुंडेंना मंत्रीमंडळात स्थान न दिल्यामुळे मुंडे समर्थक पदाधिकार्‍यांनी राजीनामे देऊन दबाव बनवायचा प्रयत्न केला. अर्थात त्याचा काहीच उपयोग झाला नाही. स्वतः मोदींनी गुजरातमध्ये केशुभाई पटेल, काशीराम राणा वगैरे बलदंड नेत्यांना शिंगावर घेऊन त्यांचे साम्राज्य संपवले होते. त्यापुढे प्रीतम-पंकजा मुंडे अगदीच चिल्लर आहेत. त्यांची दखलही मोदी घेतील असे वाटत नाही. प्रीतम मुंडे गोपीनाथरावांची कन्या म्हणून दोनदा लोकसभेवर निवडून गेल्या. तसे पूर्वजांच्या लोकप्रियतेवर (पुण्याईवर मुद्दामून म्हणत नाही) राजीव गांधी आणि राहुल गांधी पण निवडून गेले होते. पूर्वीच्या काळात अशी पूर्वजांची लोकप्रियता कित्येक वर्षे उपयोगी पडत असे. आता मात्र तो कालावधी कमी झाला आहे हे नक्की. काही काळ पूर्वजांच्या लोकप्रियतेचा फायदा होईलही पण त्यानंतर स्वतःच्या हिंमतीवरच पुढची वाटचाल असते. १६ व्या लोकसभेत प्रीतम मुंडेंनी नक्की काय केले याविषयी लोकसभेच्या संकेतस्थळावर शोधाशोध केली. कोणत्याही महत्वाच्या चर्चेत त्यांनी भाग घेतला आहे असे दिसले नाही. किंवा ऑक्टोबर २०१४ मध्ये पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेल्यानंतर थेट २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारीची घोषणा झाली या मधल्या काळात कधी प्रीतम मुंडेंनी काही केले आहे असे विशेष ऐकायलाही आले नाही. मग फक्त गोपीनाथरावांची मुलगी या एका पात्रतेवर मंत्रीपदावर दावा त्यांचा असेल तर मोदी तरी ते नक्कीच मान्य करणार नाहीत. चार महिन्यांपूर्वी गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यात अहमदाबाद महापालिकेसाठी स्वतः नरेंद्र मोदींच्या पुतणीला उमेदवारी दिली गेली नव्हती. जर स्वतःच्या लोकप्रियतेचा असा राजकीय फायदा मोदी स्वतःच्या नात्यातील लोकांना महापालिका निवडणुकीतही करून देत नसतील तर अन्य कोणाच्या कन्येला असे थेट केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळेल ही शक्यता शून्य. तीच गोष्ट पंकजा मुंडेंची. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस गोपीनाथराव हयात असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते. पण ते अचानक गेले. मग तो वारसा आपल्याला थेट मुख्यमंत्री बनवेल अशी अपेक्षा त्यांची होती हे नक्की. स्वतःचे कर्तुत्व काय वगैरे गोष्टी फाट्यावर मारायच्या. इंदिरा गांधींचा मुलगा म्हणून राजीव थेट पंतप्रधान बनले त्याप्रकारे गोपीनाथरावांची मुलगी म्हणून आपल्याला मुख्यमंत्री बनवावे ही अपेक्षा त्यांची होती. अर्थातच मोदी त्याला धूप घालणे शक्य नव्हते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये फडणवीसांनी त्यांना परळीतून पाडले हे अगदी मान्य केले तरी ते अंतर थोडेथोडके नाही तर २५ हजारांचे होते. तसेच दुसरा कोणी येऊन यांना यांच्या हक्काच्या मतदारसंघातून इतक्या मतांनी पाडू शकत असेल तर त्यांचा पायाच मुळात ठिसूळ होता हे नक्की. मतदारांना गोपीनाथरावांचा वारसदार म्हणून मत द्यायचेच ठरविले असेल तर त्यासाठी धनंजय मुंडे अधिक योग्य वाटले हे सत्य कसे नाकारणार? भाजपत अशी अमक्याचा मुलगा-मुलगी म्हणून सत्तापद हवे अशाप्रकारची संस्थाने निर्माण होत असतील तर ती खतम व्हायलाच हवीत. स्वतः मोदींनी केशुभाई पटेल या बलदंड नेत्याचे साम्राज्य उध्वस्त केले होते त्यापुढे हे इतर लोक म्हणजे अगदीच फुटकळ.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाऊ तोरसेकरांनी कालच मुंडे भगिनींच्या नाराजीचा समाचार येथे घेतला आहे. तेही तुमच्याप्रमाणे हेच म्हणतात की मोदी असल्या निव्वळ घराणेशाहीवर कसले क्लेम्स मागणार्‍यांना कसलीही दाद देणार नाहीत. आपण सांगितलेलीच गुजरातमधली उदाहरणे त्यांनीही दिलेली आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

१) झोटिंग समितीच्या अहवालाच्या ज्या बातम्या पूर्वी आल्या होत्या आणि आता येत आहेत त्यात काहीतरी गडबड आहे. २०१७ मध्ये हा अहवाल आल्यानंतर ऑक्टोबर २०१९ पर्यंत हा अहवाल फडणवीसांनी उघड केला नाही. अगदी विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनातील आपल्या शेवटच्या भाषणातही खडसेंनी हा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी केली होती. त्या अहवालात खडसेंना क्लीन चिट दिली आहे अशी बातमी माध्यमांमध्ये आली होती. कदाचित त्यामुळेच तो अहवाल जाहीर झाला तर आपले निर्दोषत्व सिद्ध होईल असे खडसेंना वाटले असावे. खडसे निर्दोष सिद्ध झाले तर त्यांना उमेदवारी नाकारता येणार नाही असे कदाचित फडणवीसांना वाटले असावे म्हणूनही तो अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा. तो अहवाल मंत्रालयातून गहाण झाला अशी मागील आडवड्यात बातमी होती. त्यावर वृत्तवाहिन्यांवर समूह चर्चा सुद्धा झाली होती. मंत्रालयात अजूनही फडणवीसांंची काही माणसे आहेत व त्यांनीच तो अहवाल गहाळ केला असावा, असे तारे राष्ट्रवादीच्या सदासंतप्त विद्या चव्हाणांनी तोडले होते. आता माध्यमे सांगताहेत की त्या अहवालात खडसेंवर ठपका ठेवलेला आहे. यात खरे खोटे काय हे समजणे अवघड आहे. कदाचित राष्ट्रवादीसाठी आता खडसेंची उपयुक्तता संपली असावी, म्हणून अशा बातम्या सोडल्या जात असाव्या. २) मुंडे भगिनींचे फारसे कर्तृत्व नाही हे बरोबर आहे. परंतु मंत्रीपदावर विराजमान केलेल्या भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार, दानवे, राणे इ. चे तरी कर्तृत्व काय आहे? भाजपमध्ये बंड करणाऱ्यांंना किंमत नसते व ते बाहेर पडून एखाद्या मोठ्या पक्षात न जाता स्वतंत्रपणे लढले तर त्यांना किंंमत नसते हा इतिहास आहे. पूर्वी अण्णा डांगे, वाघेला, केशुभाई पटेल, कल्याणसिंह, यशवंत सिन्हा इ. नी हे अनुभवले आहे. त्यामुळे मुंंडे भगिनींच्या नाराजीला काडीचीही किंमत मिळणार नाही. उद्या फडणवीसांनी बंड केले किंवा ते बाहेर पडून पक्ष वगैरे काढला तर त्यांची सुद्धा अशीच अवस्था होईल, कारण भाजपत व्यक्तीला किंमत नसून फक्त पक्षाला किंमत असते. फडणवीस म्हणजे अवतारी महापुरूष अशी समजूत असणाऱ्या भक्तांनी हे समजून घेणे आवश्यक आहे कारण फडणवीस जे काही आहेत ते स्वकर्तुत्वाने नसून फक्त पक्षामुळे आहेत. अशा परिस्थितीत पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांंना संपवून फडणवीसांचा मार्ग निष्कंटक झाला असला तरी त्यामुळे पक्ष दुर्बल होत आहे हे अजून भाजप नेतृत्वाला सुद्धा समजलेले दिसत नाही. मुंडे भगिनींना मागे खेचून त्यांंच्याबरोबर पक्षाचे सुद्धा नुकसान होणार आहे. पवार, जगनमोहन रेड्डी, ममता वगैरेंंनी बाहेर पडून स्वत:ला प्रस्थापित करून दाखविले. पवार स्वबळावर पक्षाला सत्तेत आणू शकले नसले तरी बऱ्यापैकी जागा मिळवितात. माझ्या आठवणीत भाजपत असा एकही नेता नाही ज्याने आपला वेगळा पक्ष स्थापन करून बऱ्यापैकी यश मिळवले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

परंतु मंत्रीपदावर विराजमान केलेल्या भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार, दानवे, राणे इ. चे तरी कर्तृत्व काय आहे?
इतरांविषयी मला माहित नाही पण डॉ.भागवत कराड एकदम लहान गावातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन एम.बी.बी.एस आणि एम.डी झाले आहेत. तसेच स्वतःच्या लोकसंग्रहाच्या आधारावर ते सुरवातीला औरंगाबाद महापालिकेवर अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. असा माणूस पक्षाला उपयोगी पडू शकेल हे हेरून गोपीनाथ मुंडेंनी त्यांना भाजपमध्ये आणले. त्यानंतर जवळपास २५ वर्षे ते भाजपचे संघटनेचे काम करत आहेत. स्वतः मोदी कित्येक वर्षे संघटनेत होते आणि देशभरातील संघटनेत असलेल्यांशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क असतो आणि त्यांचा लोकसंग्रह विलक्षण आहे. त्यातून ते चांगले आहेत आणि मंत्रीपदाची संधी दिल्यास चांगले काम करू शकतील असे मोदींना वाटले असायची शक्यता आहे. संघटनेत चांगला असलेला माणूस चांगला प्रशासक होऊ शकेलच असे नाही हे केशुभाई पटेलांच्या उदाहरणावरून समजून येईलच. पण त्यांना मंत्री म्हणून संधी द्यायला हवी असे मोदींना वाटले असायची शक्यता आहे. आताच्या मंत्रीमंडळ फेररचनेत मंत्रीमंडळातून वगळले गेलेले ओरिसाचे प्रतापचंद्र सरंगी पण असेच संघटनेतले होते. त्यांना मोदींनी मंत्री म्हणून संधी दिली होती. कदाचित मोदींच्या अपेक्षेला ते पुरे पडले नसावेत म्हणून त्यांना मंत्रीमंडळातून वगळलेले दिसते. त्याप्रमाणेच भागवत कराड यांची मंत्री म्हणून कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही तर त्यांनाही मोदी वगळतीलच.

In reply to by श्रीगुरुजी

पवार स्वबळावर पक्षाला सत्तेत आणू शकले नसले तरी बऱ्यापैकी जागा मिळवितात
पवारांनी कोलाम्ट्याउड्या मारायचे बंद केले तर ते शक्य आहे. अन्यथा सोनियांना विरोध करायला नवा पक्ष स्थापन करायचा आणि त्यांच्याच सोबत मांडवली करायची. पवारांनी कधी कोनत्या विरोधी पक्षाला थेट अंगावर घेतल्याचे ऐकीवात नाही. त्यामुले पवार हे बारामती सोडले तर इतरकुठेही एक हाती सत्ता आणी शकतील असे विश्वासार्ह उरलेले नाहीत

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजपत अशी अमक्याचा मुलगा-मुलगी म्हणून सत्तापद हवे अशाप्रकारची संस्थाने निर्माण होत असतील तर ती खतम व्हायलाच हवीत. सही रे सही ! आणि त्याबरोबर एकूणच राजकारणातील हि प्रथा कमी झाली तर बरेच (सर्व पक्षात ) आता पुढची या विषयातील गम्मत दिसेल ती शरद पवार राजकारणातून निवृत्त होतील तेव्हा मुलगी , पुतण्या कि जसे इंग्लडात एक मतप्रवाह जाते कि राणी "निवृत्त" झाली कि एक पिढी गाळून विल्यम लाच करा राजा ...!!! मग महाराष्ट्रात हि हेंहच लागू करणार काय ? क्रमांक कोणाचा? पार्थ कि रोहित ! लगे रहो मुन्नाभाई आपण अंकित आहोत त्यामुळे आपल्याला राजा आणि राजपुत्र पाहिजेतच .. तेवहा बसा लेको दशकानुधके असेच जगातील सर्वात मोठी लोकशाही झिंदाबाद !

उद्या फडणवीसांनी बंड केले किंवा ते बाहेर पडून पक्ष वगैरे काढला तर त्यांची सुद्धा अशीच अवस्था होईल, कारण भाजपत व्यक्तीला किंमत नसून फक्त पक्षाला किंमत असते.
अगदी खरे आहे.
फडणवीस म्हणजे अवतारी महापुरूष अशी समजूत असणाऱ्या भक्तांनी हे समजून घेणे आवश्यक आहे
बरोबर.
कारण फडणवीस जे काही आहेत ते स्वकर्तुत्वाने नसून फक्त पक्षामुळे आहेत.
मग कुठलेही बुजगावणे निव्वळ भाजपामधे आहे, म्हणून ते मोठे होते का? मग खडसेंचे काय झाले? मुंडे भगिनी काय करताहेत ? मी फडणवीसांचा भक्त वगैरे नाही. मात्र ते चांगले कार्य करताहेत, हे नाकारता येणार नाही. आणी म्हणूनच त्यांचे पक्षष्रेष्ठी त्यांचे मत विचारात घेतात. ह्याच आठवड्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीतील वृत्तांताचा काही अंश, जो मुंडे भगिनींच्या सम्दर्भातला आहे, तो इथे पहावा. भाऊंनी म्हटल्याप्रमाणे, नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. त्यासाठी त्याला जनताभिमुख होऊन बरेच कष्ट करावे लागतात. हेच थोडेफार, ह्या वृतांतानुसार त्यांना मोदींनी सुनावले आहे, असे दिसते.

In reply to by प्रदीप

",,,, कारण भाजपत व्यक्तीला किंमत नसून फक्त पक्षाला किंमत असते." हे असेच राहावे असे मनि वाटते पण सध्या भाजपच काही ठिकाणी आयाराम / गायराम पक्ष होतोय त्यामुळे भीती हि कि हा भाजपचाच गुण हळू हळू नामशेष होईल कि काय

In reply to by प्रदीप

मग कुठलेही बुजगावणे निव्वळ भाजपामधे आहे, म्हणून ते मोठे होते का? मग खडसेंचे काय झाले? मुंडे भगिनी काय करताहेत ? मी फडणवीसांचा भक्त वगैरे नाही. मात्र ते चांगले कार्य करताहेत, हे नाकारता येणार नाही. आणी म्हणूनच त्यांचे पक्षष्रेष्ठी त्यांचे मत विचारात घेतात. मुळात मोठे म्हणजे भाजपत मोठे का सर्वत्र मोठे? भाजपत कितीही मोठे असले तरी भाजपबाहेर ते शून्य असतात अशी अनेक उदाहरणे आहेत व फडणवीसही त्यास अपवाद नाहीत. भाजपत कितीही मोठे असले तरी एकदा पक्षाने लाथाडायचे ठरविले की त्यांचा पालापाचोळा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या जातीच्या मतांसाठी बनावट अहवाल तयार करून सवलतींचा वर्षाव करून इतर जातींंचा बळी देणे, खुर्ची टिकविण्यासाठी सहकाऱ्यांचा विश्वासघात करणे, भ्रष्टांना पाठीशी घालणे, अत्यंत भ्रष्ट जातीयवादी आयारामांची खोगीरभरती करणे, युतीसाठी लाचारी करून पक्षाचे नुकसान करणे इ. कार्ये निदान मी तरी मोठी कार्ये मानत नाही. ह्याच आठवड्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीतील वृत्तांताचा काही अंश, जो मुंडे भगिनींच्या सम्दर्भातला आहे, तो इथे पहावा. भाऊंनी म्हटल्याप्रमाणे, नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. त्यासाठी त्याला जनताभिमुख होऊन बरेच कष्ट करावे लागतात. हेच थोडेफार, ह्या वृतांतानुसार त्यांना मोदींनी सुनावले आहे, असे दिसते. बीड जिल्ह्यातील पद्मश्री मिळालेल्या व्यक्तीला तुम्ही भेटला आहात का असे मोदींनी पंकजा मुंडेंंना विचारले म्हणे. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी, नवीन मंत्री झालेल्यांंपैकी किती जण या व्यक्तीला भेटले असावे? नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. तसेच मतांसाठी एखाद्या विशिष्ट समाजाची काळजी घेत सुद्धा (ते सुद्धा लबाडी करून आणि इतर समाजांवर अन्याय करून) कुठलाही नेता मोठा होत नसतो. अवांतर - बाकी भाऊ तोरसेकरांचे राजकीय अंदाज आता फारसे खरे ठरत नाहीत असे जाणवित आहे.

In reply to by श्रीगुरुजी

+१ भाउंचा निष्पक्षपणा हळू हळू संपत असुन ते पुर्ण भाजपा समर्थक झाले आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरूजी व सौंदाळा ह्या दोघांना एकाच प्रतिसादात उत्तरे देत आहे. श्रीगुरुजी, तुम्ही फडवणीसांवर इतकी त्वेषाने माहितीपूर्वक टीका वेळोवेळी करत असता, तेव्हा लवकरच कधीतरी मोदीशा तुम्हालाच पुढील निवडणूकांच्या विचारविनीमयासाठी बोलावतील, असे आता वाटू लागले आहे. कदाचित तुम्हालाच ते फडणवीसांच्या जागेवर बसवतीलही! तसे त्यांनी केलेच तर आम्ही तुमच्या चुका काढण्यासाठी उत्सुकतेने, बाह्या सरसावून तयार राहूच! अर्थात, 'काय करणार, हाच सध्या सर्वांत उत्तम नेता दिसतो' वगैरे नेहमीच्या कॅव्हिट्स सुरूवातीच्या हनीमून काळात वापरू. पण त्यानंतर तयार रहा, बरं. :) :) :) सौंदाळा, तसे असेलही. पण येथे त्यांनी केवळ वस्तुस्थिती मांडली आहे, असे दिसते.

In reply to by प्रदीप

फडणवीसांवर माझा राग का आहे हे मी अनेकदा सोदाहरण स्पष्ट लिहिले आहे. त्यांच्या काही निर्णयांचा मला थेट फटका बसला आहे व भविष्यात बसेल. मला त्यातून जे दिसते व वाटते ते मी लिहितो. त्यातील काही आडाखे खरे ठरतात, काही चुकतात. त्यामुळे इतरांनी सुद्धा मुद्द्यांंवर बोलावे अशी अपेक्षा करतो. अर्थात मुद्देच संपले असतील तर . . .!

In reply to by श्रीगुरुजी

बीड जिल्ह्यातील पद्मश्री मिळालेल्या व्यक्तीला तुम्ही भेटला आहात का असे मोदींनी पंकजा मुंडेंंना विचारले म्हणे. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी, नवीन मंत्री झालेल्यांंपैकी किती जण या व्यक्तीला भेटले असावे?
पद्मश्री मिळालेले अनेक लोक असतात. म्हणजे भाजपच्या सगळ्या लोकांनी पद्मश्री मिळालेल्या व्यक्तींना भेटायला जायचे असा त्याचा अर्थ नाही. मुद्दा हा की पद्मश्री मिळालेले हे सद्गगृहस्थ पंकजांच्याच मतदारसंघाच्या आसपास कुठेतरी आहेत. त्यामुळे त्यांना पंकजा भेटल्या आहेत का हा प्रश्न आला. मंत्रीमंडळ विस्तारात किती लोक परळीच्या आसपासचे आहेत? त्याहून महत्वाचे म्हणजे असले प्रश्न कधी शब्दशः घ्यायचे नसतात. पंकजांचा सामान्य मतदारांशी संपर्क तुटलेला आहे हे सूचित करायला मोदींनी हे एक उदाहरण का वापरले नसेल? म्हणजे भाजपच्या लोकांनी कोणाकोणाला पद्मश्री मिळाली आहे त्याची यादी घेऊन त्यातील सगळ्यांना भेटायला जावे असे मोदींना म्हणायचे नसावे असे वाटते.

वरून हुकूम च आलं आहे घराणेशाही विषयी पोस्ट करत जा. त्याची अंमलबजावणी करावीच लागते. बी जमिनीत टाकल्यावर फळ यायला काही दिवस जावे लागतात बी पुरले की लगेच फळ येत नाही. त्या प्रमाणे घराणेशाही निर्माण होण्यासाठी किती तेरी दशक पक्ष सत्ताधारी असावा लागतो. घराणेशाही ही अनेक दशकं हमखास जिंकणाऱ्या पक्षात च निर्माण होते. अपयशी पक्षात निर्माण होत नाही.

In reply to by Rajesh188

Bjp वाले घराणेशाही विषयी बोलतात तेव्हा लय मज्जा वाटते. १८८ आपल्याला मज्जा वाटते हे वाचून बाकी अनेकांना हि "मज्जाच "वाटते तुम्हाला काँग्रेस म्हणायचे आहे का? (चाचा, इंदू , राजू, सुनबाई आणि पप्पू ) खर तर तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते कळले तर तो सुदिन,

In reply to by चौकस२१२

सरळ सोप्या शब्दात लीहले आहे अनेक दशक जो राजकीय पक्ष सत्तेत असतो त्या पक्षातच घराणे शाही निर्माण होते. काँग्रेस स्वतंत्र मिळायचा अगोदर पण भारतीय राजकारणात दबदबा ठेवून होती आणि स्वतंत्र नंतर ६० ते ६५ वर्ष सत्तेत होतो विरोधक अगदी कमजोर होते. त्या मुळे काँग्रेस मध्ये घराणेशाही निर्माण झाली . Bjp हा किंवा त्यांची पितृक संस्था ह्यांचा दबदबा भारतातील लोकात खूप कमी होतं . आणि आता ते सत्तेवर आहेत. त्यामुळे ह्या पक्ष घराणेशाही निर्माण करण्याच्या स्टँडर्ड मध्ये . मला वाटतं हे अडाणी लोकांना पण समजेल .

सरळ सोप्या शब्दात लीहले आहे अनेक दशक जो राजकीय पक्ष सत्तेत असतो त्या पक्षातच घराणे शाही निर्माण होते. काँग्रेस मधील घराणेशाही चा असा पाठपुरावा "अजब तर्कातून" निर्माण करणे" याला खूप हुशारी लागते पण काय आहे बरेचदा खूप हुशार माणसाची अशी विधाने आमचयासारख्या "अडाणी " डोक्यावरून जातात बर गेलं बाजार १८८ हे हि सांगावे कि आपण जो तर्क लढवला आहे तो सगळ्या जगातील राज्यकारणाला लागू पडतो का? कारण असे कि इतर देशात १५-२० वर्षे सलग पंतप्रधान पॅड एकाच व्यक्ती कडे राहिलेल दिसत तिथे नाही घराणेशाही दिसली ते?

आज दहावीचा निकाल लागला आहे. ९९.५% विद्यार्थी पास झाले आहेत. हा निकाल पूर्ण अंतर्गत मूल्यांकनावर झाला होता त्यामुळे शाळांमध्ये पूर्ण वस्तुनिष्ठ मूल्यमापन न होता भरमसाठ गुणांची खिरापत वाटली गेली असायची शक्यता आहे. तसे झाले असल्यास पुढे खूपच प्रश्न निर्माण होतील. अकरावीचे प्रवेश देताना सगळे कट-ऑफ खूप वर जातील. काही वर्षांपूर्वी 'बेस्ट ऑफ पाच' अशी पध्दत दहावीला महाराष्ट्रात होती तेव्हा माझ्या पुतणीला १००% दहावीला मिळाले होते. या 'बेस्ट ऑफ पाच' पैकी गणित, विज्ञान, संस्कृत या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतील हे समजू शकतो. पण इतर विषयांमध्ये- भाषा/समाजशास्त्र यात १००% मार्क कसे काय मिळाले असतील हे माझ्या तरी समजापलीकडचे आहे. तसे असेल तर गेल्या काही वर्षांपासूनच मार्क वाटायचे प्रमाण वाढले होते आणि ते पण बोर्डाकडून. तर मग शाळा किती मार्क वाटत असतील? मग काय कट-ऑफ १००% ला नेणार का? सगळेच समजायच्या पलीकडचे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण काही वर्षांपासून ९९.९ % मिळवणारे विद्यार्थी आहेत. पण ज्ञान झीरो. पाहिले ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील काहीच ह्यांना समजलेले नसते. कोणत्याच विषयात सखोल ज्ञान नसते. 99.9% वाले फक्त नोकरी करतानाच मिळतील विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या यादीत ही मुलं बिलकुल नसतात. फक्त पाठांतर वर कारकुनी करण्याच्या लेव्हल चे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

राज्यात एकूण १,०४,६३३ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत. https://maharashtratimes.com/career/career-news/fyjc-admission-2021-stu… मटामधील याच बातमीत पुढील माहिती दिली आहे-- ssc या माहितीप्रमाणे ६.३४३% विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत. यामुळे अकरावीच्या प्रवेशाचा पेच निर्माण व्हायची शक्यता आहे अशा बातम्या आहेत. यावर्षी दहावी झालेले विद्यार्थी २००५ मध्ये जन्माला आले असतील. त्यावेळी ग्रहदशा नक्की काय होती हे त्या विषयातील माहिती असलेल्या कोणीतरी खरोखरच तपासून बघायला हवे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बाकी बोर्डाचे दहावीचे निकाल लागले नसतील तर पण त्यांच्या मुलांना स्टेट बोर्ड पेक्षा जास्त गुण देवून त्यांच्या उद्धार करणार. ह्या चादाओढीत ११० टक्के मार्क देवू नये म्हणजे झाले.

युजीसीने इतिहासाचा नवा अभ्यासक्रम आणायचा बेत केला आहे. त्यात मुघलांना वगळण्यात आले आहे आणि त्याजागी राणाप्रताप, विक्रमादित्य वगैरे भारतीय राजांचा उल्लेख असणार आहे. हे नक्कीच स्वागतार्ह पाऊल आहे. मी कॉलेजमध्ये इतिहास कधी शिकायला गेलो नव्हतो त्यामुळे बी.ए, एम.ए पातळीला इतिहासात काय शिकवतात माहित नाही पण शाळेत असताना मात्र बाबरापासून औरंगजेबापर्यंत सगळी वंशावळ एकापेक्षा जास्त वेळा होती. दक्षिणेतील पांड्य, चालुक्य हे राजे, आपल्या शिवाजी महाराजांसारखे आसामातील लचित बुडफुकन तसेच देशाच्या इतर भागातील वेगवेगळी राजघराणी यांचा उल्लेखही नसायचा. जहांगीर कसा न्यायप्रेमी होता, शाहजहान कसा कलाप्रेमी होता वगैरे कौतुके वाचत आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमुकअमुक काँग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव कसा पास झाला हे अनेकदा वाचत माझा शाळेत असताना इतिहासाचा अभ्यास झाला. हा प्रकार बंद होणार असेल आणि सातवाहन, चालुक्य, पांड्य, मौर्य, कलिंग, गजपती वगैरे राजघराण्यांविषयी, ताजमहालऐवजी हाळेबिडूची आणि दक्षिणेतील इतर मंदिरे याविषयी शिकायला मिळणार असेल तर ते चांगले असेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कॉंग्रेसने या मुद्द्याला विरोध सुरू केला आहे. दुसरीकडे मुंबईतील एका पुलाला मोइनुद्दीन चिस्ती व एका उद्यानाला टिप्या सुलतानाचे नाव देण्याचा ठराव शिवसेनेने आणला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका आमदाराने अजान स्पर्धा घेण्याचा घाट घातला होता. शिवसेना हिंदुत्ववादी होती/आहे असे समजणारे बाळ ठाकरेंचे चाहते, हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही शिवसेनेशी १९८९ पासून युती केली आहे असे सांगून स्वतःच्या घोडचुकीचे समर्थन करून ठाकरे घराण्यासमोर लाचारी करणारे भाजप नेते यांच्या कानफटात पुन्हा एकदा सणसणीत चपराक बसली आहे. शिवसेना मराठीवादी, हिंदुत्ववादी वगैरे कधीच नव्हती हे माझ्यासारख्या राजकारणाचा गंध नसलेल्याला समजते, परंतु शिवसेना हिंदुत्ववादी आहे हा भ्रम १९८०च्या दशकात भाजपला का व कसा झाला व तो भ्रम अजूनपर्यंत का टिकलाय याची कल्पना नाही. परंतु उद्या उद्धव ठाकरेंनी नुसता डोळा मारला तरी महाराष्ट्रातील भाजपचे नेते लगेच लाळ गाळत धावत मातोश्रीवर जातील याची मला खात्री आहे.

In reply to by श्रीगुरुजी

दुसरीकडे मुंबईतील एका पुलाला मोइनुद्दीन चिस्ती व एका उद्यानाला टिप्या सुलतानाचे नाव देण्याचा ठराव शिवसेनेने आणला आहे. P1 संदर्भ :- Shiv Sena MP Rahul Shewale wants the newly constructed Mankhurd Govandi flyover to be named after “Garib Nawaz” Khwaja Moinuddin Chishti.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]

हिंदुस्थान मध्ये हिंदू संस्कृतीचा इतिहास शिकवणे गरजेचे आहे .त्याच बरोबर स्थानिक पातळीवर जे राजे होवून गेले त्यांचा इतिहास शिकवणे गरजेचे. मुघली इतिहास शिकवण्याची गरज नाही. मुघलांना अजुन पण त्यांच्या धर्माचे उगमस्थान पॅलेस्टाईन ,इस्त्रायल च भाग च प्रिय आहे. कोणत्या ही देशात राहत असले तरी त्यांची निष्ठा तिकडेच असते.

In reply to by Rajesh188

हिंदुस्थान मध्ये हिंदू संस्कृतीचा इतिहास शिकवणे गरजेचे आहे .त्याच बरोबर स्थानिक पातळीवर जे राजे होवून गेले त्यांचा इतिहास शिकवणे गरजेचे. मुघली इतिहास शिकवण्याची गरज नाही. मुघलांना अजुन पण त्यांच्या धर्माचे उगमस्थान पॅलेस्टाईन ,इस्त्रायल च भाग च प्रिय आहे. कोणत्या ही देशात राहत असले तरी त्यांची निष्ठा तिकडेच असते.
प्रतिसाद वाचल्यावर हा गामा पैलवान किंवा श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद असेल असं वाटलं. पण राजेश की यांनी हा प्रतिसाद लिहला आहे हे पाहून एक क्षण मी झोपेत आहे की काय असं वाटल. पहिल्यांदाच मी राजेश १८८ यांच्या या प्रतिसादाचे अनुमोदन करतो.

केरळ सरकारने 21 तारखेला होणारी ईद साजरी करण्यासाठी 3 दिवस lockdown मध्ये शिथीलता आणली आहे. तर उत्तर प्रदेश येथे 25 तारखेला होणाऱ्या कनवर यात्रे मूळे व्यथित होऊन सुप्रीम कोर्टाने स्वतःहुन उत्तर प्रदेश सरकार ला नोटीस पाठवली आहे. सध्यातरी उत्तर प्रदेशातील कोविड रुग्णांची दैनंदिन वाढ ही 100 च्या आत आहे तर केरळ मध्ये दिवसाला 13000 पेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडत आहेत.

In reply to by रात्रीचे चांदणे

ही सगळी डाव्या पुरोगामी विचारवंतांची इकोसिस्टीम आणि त्या इकोसिस्टीमची ताकद आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो तथाकथित शेतकरी नोव्हेंबरच्या शेवटपासूनच यायला लागले होते. तेव्हा त्या तथाकथित शेतकर्‍यांचे उद्दिष्ट यांच्या अजेंड्याला साजेसे असल्याने इतकी गर्दी झाल्याने कोरोना वाढेल याची चिंता या पुरोगामी विचारवंतांच्या नियंत्रणातील मिडियामध्ये (एन.डी.टी.व्ही, स्क्रोल, वायर वगैरे) नव्हती. पण नंतर दुसरी लाट आल्यावरही सुरवातीला महाराष्ट्रातच आकडे वाढत होते म्हणूनही तितक्या प्रमाणावर कोरोनाचा उल्लेख नव्हता. पण नंतर उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशात आकडे वाढायला लागल्यावर मग केवढी मोठी दुसरी लाट आदळली आहे याविषयी जगभरातील पेपरांमध्ये लिहून यायला लागले. मग त्यासाठी कुंभमेळा आणि बंगालमधील मोदींच्या सभा कशा जबाबदार आहेत हा नवा नरेटिव्ह तयार झाला. जसे काही ममता वगैरे मोठ्या सभा घेतच नव्हते. अजूनही दुसरी लाट संपलेली नाही. पण अर्ध्याहून जास्त आकडे महाराष्ट्र आणि केरळमध्ये असल्याने परत एकदा या लाटेचा उल्लेख आता फारसा होताना दिसत नाही. इतके दिवस केरळ मॉडेलचे कौतुक सांगणारे सगळे विचारवंत गायब झालेले दिसतात. केरळ सरकारच्या निर्बंधांमध्ये बकरी ईदसाठी शिथिलता आणायच्या निर्णयाचे समर्थन होऊच शकत नाही. तरीही तिथे या विचारवंतांचे लाडके कम्युनिस्ट सरकार असल्याने त्याविषयी कोणी बोलताना दिसत नाही. आणि गंमत म्हणजे इतके सगळे होऊनही कम्युनिस्ट सरकार कसे धर्मनिरपेक्ष आणि योगी कसे धर्मांध म्हणून रकानेच्या रकाने हेच हलकट लोक लिहून आणतील. ही हलकट डाव्या पुरोगामी विचारवंतांची इकोसिस्टीम जिथे असेल तिथून कोणतीही दयामाया न दाखवता मुळापासून उखडून टाकायला हवी. मला शक्य होईल तितके ते काम मी मिपावर तरी करत आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकाशातील माता आपल्याला नक्कीच यश देवो. आपण विषय काढलाच आहे तर डावी विचारसरणी तथाकथित प्रस्थापितांवर नेमकी काय जादू करते की ते त्या विचारसरणीची बाजू उचलू लागतात ? यावर आपले निरीक्षण अवश्य नोंदवावे... एखाद्या गोष्टीचे मूळ काय हे समजून घेतले तर मुळासकट उपटणे सोपं होतं

मुस्लिम राष्ट्रांनी घेरलेल्या भारताला कट्टर तेचा किती मोठा धोका आहे ह्याची हिंदू ना जाणीव आहे. शरीयत नुसार देशाचा कारभार चालत असणारे किंवा तसा चालवा अशी इच्छा असणारे देश भारताच्या भोवती आहेत. तिथे सर्व धर्म भाव असल्या चिल्लर विचारला किंमत नाही. आणि कधी हे ते भारताला निशाणा बनवू शकतात. हा झाला बाहेरून धोका . अंतर्गत धोका काय आहे ह्याची चुणूक रोज paper मध्ये वाचायला मिळते. 1) हिंदू ना सण साजरे करण्यापासून रोखणे. मग त्या साठी ध्वनी प्रदुषण,पाणी प्रदूषण,रस्त्यावर गर्दी असले पॉइंट पुढे केला जातात पण मूळ हेतू . हिंदू ना सण साजरे करता आले नाही पाहिजेत. २) भारतात असणारी नास्तिक लोक ही खरी नास्तिक नाहीत ढोंगी आहेत. नास्तिक विचाराच्या आडून हिंदू च्या परंपरा,रिती रीवाज बंद पडतील ह्या साठी झटणारे आहेत. त्यांना अस्तिक फक्त हिंदू च आहेत असे वाटत. बाकी मुस्लिम,ख्रिस्त ,आणि बाकी धर्मातील अंध श्रद्धा,श्रद्धा ह्या वर ते कधीच भाष्य करत नाहीत. ३)हिंदू ना कायद्या पुढे सर्व समान असा उपदेश देत असतात पण समान नागरी कायदा मात्र ह्यांना नको असतो. अल्पसंख्याक म्हणून खास सुविधा हव्या असतात. तेव्हा नेमकं समानतेचा विसर पडतो. सर्व पुढील धोके हिंदू ना माहीत आहेत. म्हणून तर bjp बहुमत नी सत्तेत आहे. पण bjp sarkar ni हिंदू ना आर्थिक बाबतीत दुर्बल करतील असे निर्णय घेवू नये. हीच फक्त माफक अपेक्षा आहे. आणि विरोध पण त्याच पॉइंट वर आहे.

In reply to by आनन्दा

भाजप एकीकडे उद्धव ठाकरेंना डोळा मारत आहे तर त्याचवेळी दुसरीकडे पवारांना खाणाखुणा करीत आहे. दोघांपैकी कोणीतरी एक जण पटेल या आशेवर गळ टाकले आहेत. त्यापैकी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद सोडणार नाही. त्यामुळे युती केली तर बिहारप्रमाणे भाजपला फार तर काही मंत्रीपदे मिळतील. कदाचित चंपा आणि फडणवीस हे दोघेही उपमुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादीला पटविले तर निम्मा काळ राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल. तसेच अर्थ, गृह, महसूल, नगरविकास या महत्त्वाच्या खात्यांपैकी निम्मी खाती राष्ट्रवादीला द्यावी लागतील. असल्या भ्रष्ट पक्षाशी युती केली तर समर्थक संतापतील हा अजून एक मुद्दा. परंतु भाजपचे महाराष्ट्रातील सध्याचे नेते हे लाज, लज्जा, शरम, स्वाभिमान याच्या पलिकडे पोहोचून अत्यंत निगरगट्ट झाले असल्याने ते समर्थकांच्या संतापाला काडीचीही किंमत देणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्र मध्ये bjp नी सेने शी युती न करता स्व बळावर निवडणूक लढावी असे श्री गुरुजी ह्यांचे मत आहे आणि bjp समर्थक मतदार चे पण तेच मत आहे असे त्यांचे मत आहे. Bjp हाच फक्त हिंदुत्व वादी पक्ष आहे सेना ढोंगी आहे असे पण त्यांचे मत आहे. मग आता परिस्थिती अनुकूल आहे bjp नी युती तोडली नाही सेनेने तोडली आहे. बिन औषधाची खरूज गेलो असे समजायचे. पण राजकारणी लोकांना सर्व बाजूंनी विचार करावा लागत. पक्ष सत्तेत नसेल तर पक्ष फुटण्याची भीती असते. त्या मुळे जास्त दिवस पक्ष सत्तेबाहेर असला नाही पाहिजे. Bjp ला स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी उशीर लागेल.सेने शी युती केली की सत्ता लगेच मिळेल . हे गणित आहे. सेना थोडी तरी हिंदुत्व वादी आहे पण नितीश कुमार पक्का संमधर्म वाला आहे तरी वासरात लंगडी गाय शहाणी समजून bjp नी नितीश बरोबर जुळवून घेतले आहे. ते फक्त तिथे पक्ष सत्तेत असावा म्हणून.