संध्याकाळच आकाश तांबूस झालं होत.पाखर घराकडे झेपावत असतांना त्यांचे पंख त्या तांबूस आकशात एखाद्या उडणाऱ्या सावलीसारखे भासत होते.इवलाश्या खिडकीतून आभा हे सगळ निरखून पाहत होती.शेवटच गणित सोडवून कधी सायकल घेऊन मस्त चक्कर मारायला जाते इतकी उताविळ ती झाली होती.झाल एकदाच गणित सोडवून स्वत:शीच बोलत आभा पटकन “आई मी येते चक्कर मारून”अस बोलून ती खाली पोहचली सुद्धा.सायकल सुसाट चालवत ती मुख्य रस्त्याला पोहचली.थोड अंतर गेलं कि उजव्या वळणावर वळाली. आता नवीनच ट्रक झाला होता.तशी इथे पूर्वी शेती होती.पण आता मोकळे प्लॉटस पाडून इथे विक्रीसाठी होते. मोकळ्या जागेत हिरवळ आणि मध्यभागी जाणारा नुकताच तयार केलेला डांबरी रस्ता होता. आजूबाजूला कोणीही नव्हत.एरवी फिरणाऱ्या लोकांमुळे परीसर गजबजलेला असायचा पण आज रविवार त्यात पावसाचा अंदाज म्हणून त्यांनी दडी मारली होती.
आभा त्या मोकळ्या रस्त्याहून आनंद घेत आभा चकरा मारत होती.आभाळ भरून आल होत.थेंब पाऊसही सुरु झाला होता.दूर एक चाफ्याचं फुलांनी बहरलेल झाड तिला खुणावत होत.मोकळ्या हिरव्या गवतातून सायकल चालवत आता तिथे पोहचू.असा विचार करत तिने त्या मोकळ्या प्लॉटमधून सायकल पुढे केली.थोड पुढे गेल्यावर चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे झालेल्या चिखलाट आभाची सायकल फसली.ती जोर लावत सायकलं पुढे ढकलत होती ती तेवढीच फसत होती .तिचे शूज ,सायकलच्या मडगार्ड यात चिखल भरला होता त्यामुळे जड झालेल्या पावलांमुळे तिचा जीवही जड होऊन रडकुंडीला आला होता.
“थांब मी तुला मदत करते “ एक आवाज आला.लाल सुती साडी नेसलेली,छानसा आंबाडा ,ठसठशीत कुंकू लावलेलीतिशीतली एक बाई तिच्याशी बोलत होती.तिने आभाची सायकल अलगद उचालून रस्त्यापाशी आणली.
“एवढ्या पावसात असे एकटीने फिरू नये ,साप -विंचू फिरत असतात.” मघाशी ज्या जागेवर तिची सायकल फसली होती तिथे बोट करत लांब जाणारा साप तिने आभाला दाखविला.आभाला आता आपण तिथे असतो तर या विचारने भीतीने गाळण उडाली.
“चल पलीकडे एक डबक आहे तिथून या मोकळ्या बाटलीत पाणी आण आणि सायकलचे चाक स्वच्छ करू”
आभा पळतच पाणी आणायची त्यांनी सायकलच्या मडगार्डमधला चिखल दूर केला.
“तुम्ही कुठे राहता ?”आभाने त्यांना प्रश्न केला.
“मी इथेच जवळ राहते”ती बाई म्हणाली.
“तुम्हाला सापांची भीती वाटत नाही ?किती मोठा होता तो..”आभा आश्चर्याने बोलत होती.
“आधी वाटायची आता सापानेच मला इथे ठेवलंय कायमचं”ती बाई पुटपुटली.
छोट्याशा आभाला तिचे हे बोलणे काही समजले नाही.सायकल आता नीट चालते की नाही हे बघायला तिने जोरात ती चालवली.पुढे गेल्यावर आपण काकूंना थंक्स म्हणालोच नाही म्हणून ती परत आली तर तिला कोणीच दिसेना.काकू कुठे गेल्या इतक्या लवकर?
ती इकडे तिकडे शोधू लागली.तोच तिला लांबून पुन्हा तो साप दिसला.आभा पटकन घरी पळाली.
घरी येऊन तिने आईला घडला प्रसंग सांगितला.
“ प्रभात फेरीला गेलेल्या तिशीतल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यु झाला.” बातमी छोट्याशा टीव्ही स्क्रोलहून खाली जात होती.
-भक्ती
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5585
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
ही बालकथा आहे का ?
भूताची गोष्ट
छान.
छान
:)
वा
In reply to :) by Bhakti
हा हा हा
In reply to वा by गॉडजिला
गौर से देखो उस लेकरू को आप खुदको पावोगे
In reply to हा हा हा by Bhakti
जबरदस्त टिनेट..
In reply to गौर से देखो उस लेकरू को आप खुदको पावोगे by गॉडजिला
रचक्याने
In reply to जबरदस्त टिनेट.. by Bhakti
आरर...मिठाचा खडा लागला...
In reply to रचक्याने by Bhakti
छान चित्र उभं राहिलं समोर
मस्त..
सांगळेजी, पैजारबुवा खुप
सुटसुटीत भूतकथा आवडली!