✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"लक बाय चान्स"

म
मुक्तसुनीत यांनी
Fri, 04/17/2009 - 06:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3367 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

एनर्जी

विनायक प्रभू
Fri, 04/17/2009 - 07:11 नवीन
फाउंटन = झोया
  • Log in or register to post comments

मी अजून

मेघना भुस्कुटे
Fri, 04/17/2009 - 07:20 नवीन
मी अजून पाहिलेला नाही. राहिला, राहिला, राहिलाच. पण आता बघावा लागणारसे दिसते. अवांतरः कोंकणा खात्या-पित्या घरची असल्यासारखी दिसते ते मला आवडते. (नाही, साधर्म्यामुळे नुसती जवळीक वाटते असे नव्हे!) एकाच छापातल्या अंगावरचे मांस खरवडून काढल्यासारख्या दिसणार्‍या आणि एकाच प्रकारच्या बिकिनीप्राबल्याच्या भूमिका करणार्‍या अनेकींपेक्षा ती वेगळी असल्याची ही आणखी एक खूण आहे. 'अभिनय खणखणीत आणि निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका निवडण्याचे कौशल्य + धाडस हवे - शरीर हे निव्वळ माध्यम, त्याला त्यापेक्षा महत्त्व नको' हे सूत्र त्यातून स्पष्ट दिसते. (मला आवडणारी आएशा टाकियाही अंमळ गुबगुबीत आहे, हा योगायोग म्हणावा की सुसंगती?!) अर्थात कोंकणाचे वजन जर सिनेमातल्या कुठल्याही गोष्टीला मारक / विसंगत ठरणारे असेल, तर ते नजरेला खुपणे स्वाभाविक आहेच.
  • Log in or register to post comments

मुद्दा

मुक्तसुनीत
Fri, 04/17/2009 - 07:24 नवीन
मी उपरोक्त मांडलेला मुद्दा ही सर्वार्थाने मला जाणवलेली बाब आहे. चित्रपटाला ही गोष्ट मारक आहे (किंवा इतर कुणाला मारक वाटेल) असे मला म्हणायचे नाही. आणि एकूण जमाखर्च लक्षात घेता ही अतिशय नगण्य बाब आहे हेही मी म्हणतो. या नटीचे हे काम तिच्या इतर अनेकानेक आवडलेल्या कामाइतकेच चांगले झाले आहे. बाय द वे , वजनाच्या बाबतीत आमचे नाते सध्याच्या ऋषि कपूर बरोबर आहे हे नमूद केलेले बरे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

मी उपरोक्त

मेघना भुस्कुटे
Fri, 04/17/2009 - 07:31 नवीन
मी उपरोक्त मांडलेला मुद्दा ही सर्वार्थाने मला जाणवलेली बाब आहे. आस्वाद किती सब्जेक्टिव्ह गोष्ट असते नाही? केवळ याचसाठी मी वर्तमानपत्रातली समीक्षणे (परीक्षणे?) बिनदिक्कत धुडकावून माझ्याशी जुळणार्‍या आणि न जुळणार्‍या लोकांची सिनेमाबद्दलची मते बघूनच सिनेमाला जाणं ठरवते. अर्थात तरीही अनपेक्षित गोष्टी होतातच. पण तितपत चालायचंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

.. परीक्षण

भडकमकर मास्तर
Fri, 04/17/2009 - 07:34 नवीन
.. परीक्षण मस्त आहे...बराचसा सहमत आहे.... ( कुठलाही प्रसंग न लिहिताही कशाला स्पॉइलर ऍलर्ट टाकता हो?) का कोण जाणे, मला फरहानचा आवाज सुद्धा आवडतो. ;) ... या सिनेमावर लिहिणार होतो ...राहून गेले होते... आता जरा घाईत आहे..दुपारी खरा स्पॉइलर ऍलर्ट टाकून भरपूर लिहितो ... :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

परिक्षण तरी चांगलं वाटतं आहे.

प्राजु
Fri, 04/17/2009 - 07:49 नवीन
या विकेंडलाच बघू. :) परवाच्या शुक्रवारी संदीप चित्रे आणि कुटुंब घरी आलेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत "आलू चाट" पाहीला. भन्नाट आहे सिनेमा. अतिशय कॉमेडी.. कुठेही वाह्यातपणा नाही. किंवा त्यातला नटीला कुठेही अर्ध्यानुरध्या कपड्यात दाखवलेली नाही. संपूर्ण सिनेमाभर ती सलवार कमीज मध्ये हिंडते. मला स्वतःला (माझ्या नवर्‍याला आणि चित्रे कुटुंबाला) तरी खूप आवडला हा सिनेमा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

आपला अभिजित
Fri, 04/17/2009 - 10:31 नवीन
मुक्त सुनीताने मुक्तछंदात उत्तम रसग्रहण केलंय चित्रपटाचं. बरेच दिवस त्यावर लिहायचं होतं, पण राहून गेलं होतं. अलीकडच्या काळात मला आवडलेला एक अप्रतिम चित्रपट! मांडणी, संयत हाताळणी, प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय, उत्तम पकड आणि उत्क्रुष्ट पटकथेचा नमुना म्हणजे हा चित्रपट. सुनीताने बरेच काही लिहिलेच आहे. मला सगळ्यात आवडलेले काही प्रसंग : १. इशा शर्वाणी ही नवथर नटी फरहानच्या मोहात पडते आणि रात्री, सगळ्यांची नजर चुकवून त्याला भेटायला त्याच्या खोलीतच घुसते. त्या वेळचे संवादही अप्रतिम आहेत. ती म्हणते, `ये कोट तुम्हारा है?' आणि मुद्दाम अंगात चढवते. त्यावर तो म्हणतो, `यहां के सभी कपडे मेरे हैं . सिवाय उनके, जो तुमने पहन रखें हैं.` त्यानंतरचा अपेक्षित प्रसंग आणि एकूण प्रसंगाचा मूड लक्षात आणून देणारा किती जबरदस्त संवाद आहे हा! `सूचक'पणे एकमेकांच्या भावना व्यक्त करणं, अंदाज घेणं, प्रतिक्रिया देणं नि आजमावणं, सगळंच दडलंय त्यात!! २. फरहान `स्टार' होतो, नि त्याचा सिनेमा सुपरहिट होतो, तेव्हाचा प्रसंग. कोंकणाने सर्वप्रथम त्याची शिफारस केली होती, हे तिचा गैरफायदा घेणार्‍या एका निर्मात्याला कळतं, तेव्हा त्याचा चेहरा गोरामोरा होतो. `अरेरे, तिला फसवलं नि आपण आता गोत्यात येणार' हे सगळं तो एका भावमुद्रेतून सांगून टाकतो! मतलबी, स्वार्थी दुनिया केवढ्या छोट्या प्रसंगातून मांडलेय!! ३. फरहान नि आपल्या नात्याविषयी काहीबाही छापणार्‍या पत्रकार मित्राच्या ऑफिसात घुसून कोंकणा त्याला त्याच्याच मासिकानं बडवते, तो प्रसंगही असाच थरारक नि कमी वेळेत मोठा परिणाम साधणारा!! झोया, फरहान नि कोंकणाला सलाम!
  • Log in or register to post comments

पाहिला

मदनबाण
Fri, 04/17/2009 - 10:41 नवीन
पाहिला हवा... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

परीक्षण

नंदन
Fri, 04/17/2009 - 10:49 नवीन
आवडले. एकच तक्रार की थोडे छोटेखानी आहे, अजून बोटे मोकळी सोडून लिहायला हवे होते :). चित्रपट पाहण्याजोगा आहे यात वादच नाही. सुरूवातीच्या अर्ध्या भागात टिपीकल हिंदी चित्रपटांची उडवलेली खिल्ली पाहताना अधूनमधून 'स्केअरी मूव्हीज' या चित्रपट-मालिकेची आठवण येत राहते. शेवटच्या प्रसंगातला 'पण यात तुझी तरी काय चूक' असा समजूतदारपणा दुर्मीळच (प्रत्यक्ष काय किंवा चित्रपटांत काय), पण कोंकोणा सेनने तो उत्तम वठवला आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

बघयचा आहे खरा...

मनिष
Fri, 04/17/2009 - 11:18 नवीन
हा बघायचा राहूनच गेला...डीव्हीडी मिळते का बघायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

यातले दोन प्रसंग फार आवडले..

एक
Sat, 04/18/2009 - 03:38 नवीन
एक. जेव्हा हृतिक रोशन बंद काचेतून खेळणार्‍या मुलांकडे बघत असतो तो. आणि शेवटचा जेव्हा शाहरूख खान हिरो ला उपदेश करतो तो. या प्रसंगात शाहरूख जेव्हढा कन्विन्सिंग वाटतो तेव्हढा तो मला त्याच्या आधिच्या कुठल्याच सिनेमात वाटला नाही. अजुन एक मजेदार प्रसंग म्हणजे मॅक मोहन ला त्याचा "हुकुमी" डायलॉग म्हणण्याची फर्माईश होते तो. काय भाव खाऊन म्हणतो तो :)
  • Log in or register to post comments

सौरभ शुक्ला

बेसनलाडू
Sat, 04/18/2009 - 03:48 नवीन
सौरभ शुक्ला हा एक क्यारेक्टर् माणूस आणि उत्तम अभिनेता आहे, असे मला वाटते. चित्रपटातले त्याच्या ऍक्टिंग स्कूल मधले अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचे प्रसंग, मार्गदर्शन वगैरे जाम धमाल आहे. मॅक् मोहन चा प्रसंग या स्कूलच्या पदविका/पदवी प्रदान सोहळ्यातला आहे ना? (स्मरणशील)बेसनलाडू मला या चित्रपटात ऋषी कपूर आणि जुही चावलाचे कामही आवडले :) (जूही फ्यान्)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

नाही आवडला

अनामिक
Sat, 04/18/2009 - 05:01 नवीन
...चित्रपटात असे वळण येते की चित्रपट या नायकाचा म्हणून सुरू तर होतो ; पण त्याच्या या प्रेयसीचा बघता बघता होऊन जातो.... मुक्तसुनीतांनी अगदी योग्य शब्दात चित्रपटाची ओळख करून दिली आहे. चित्रपटाची हाताळणी अतिशय चांगली असली तरी माझ्या दृष्टीने चित्रपट खूपच प्रेडिक्टेबल आहे... आणि थोडा कंटाळवाणा देखील, त्यामुळे नाहीच आवडला. खरंतर या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, त्याचं कारण म्हणजे १) कोंकणा सेन शर्मा - हिला कोणतीही भूमिका द्या, भूमिकेचं सोनं करते ही बया. अगदी सहज, सुंदर अभिनयाने हिने पहिलेपासूनच माझ्या मनावर कब्जा केलाय. २) झोया अख्तरचा पहिला चित्रपट असल्याने, आणि फरहानची बहीण म्हणून तिच्यावरचं प्रेशरही वाढलेलं होत त्यामुळे असेल कदाचित. ३) सध्याच्या हिंदी चित्रपटसृष्टीवर आधारीत आहे अशी पहिलेपासून समज असल्याने मधुर भांडारकरच्या चित्रपटाची जशी वाट पाहतो तशीच पाहत होतो. कोंकणा सोडलीतर चित्रपट फारसा नाहीच आवडला.... फरहानला नायक व्हायचं असतं पण त्याची जिद्द, तळमळ आपल्या पर्यंत पोचतच नाही. तो सुरवातीला जी काही धडपड करतो ती खूपच वरवरची वाटते.. म्हणजे कशी तर 'हं नायक झालो तर ठीक, अन् नाही तरी ठीक'. आणि त्यानंतर त्याला ज्याप्रकारे चित्रपट मिळतो ते तर आजच्या चित्रपटसृष्टीत अशक्याच्याही पलीकडचं वाटतं. हृतिक रोशनची भूमिका म्हणजे जशी दाखवण्यात आली ती फारच नाटकी वाटली... विशेषतः त्याचा आणि करन जोहरचा फोनवरचा संवाद... त्यानंतर तर चित्रपटात पुढे काय होणार ते खूपच अपेक्षीत आहे. न आवडण्याचं दुसरं कारण म्हणजे चित्रपटाची संथ गती... आधीच प्रेडिक्टेबल आणि त्यात संथगती असल्याने चित्रपट कंटाळवाणा होतो (म्हणजे मलातरी वाटला). दोघांचे अभिनय अगदी सहज आहेत हे मान्य, झोयाने अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रपट हाताळलाय हे ही मान्य, पण तरीही कुठेतरी काहीतरी कमी आहे असं वाटतं... थेट आतपर्यंत पोचतच नाही चित्रपट (चित्रपट मनोरंजनात्मक नसले अन वास्तवदर्शी असले की ते आतपर्यंत पोचले पाहिजे असे माझे मत आहे). चित्रपटाची कथा ७-८ वर्षांपासून तयार होती म्हणे.... ७-८ वर्षांपूर्वी आला असता तर तेव्हाचा म्हणून आवडलाही असता कदाचित! एकवेळ पाहून विसरण्यासारखा आहे अश्या मताचा मी आहे. (चित्रपटप्रेमी) अनामिक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा