आज झालो भ्रष्ट मी
पसरले माझे दोन हात
पाठीवरती वार करुनि
केला साहेबा कुर्निसात
लावूनी चरणधूळ ललाटी
पकडून धरली गच गोटी
मागे वळूनी पाहतो तर
त्याचीही हिरवी शेपटी
कोण खोटा कोण खरा
हिशेब मनी नाही लागला
ज्याला मी साहेब समजलो
तोपण साला राघू निपजला
=======================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
वाचने
3295
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
राघू नाव आणि कवीचे नाव वाचून फार अपेक्षेने धागा उघडला
लावूनी चरणधूळ ललाटी
भापो...
दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेक लक्षण
माझे विरह काव्य
In reply to दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेक लक्षण by चित्रगुप्त
सर्वेषाम धन्यवादम
आसं है का?!
In reply to सर्वेषाम धन्यवादम by खिलजि