Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उपयोजक on Sat, 06/12/2021 - 12:11
भारतात पहिला ख्रिश्चन धर्मोपदेशक इ.स.५२ साली केरळात आला. पहिले मुस्लिम आक्रमण इ.स.७११ मधे झाले. तेव्हापासून या धर्मियांकडून भारतात जबरदस्तीने किंवा पैशाचं आमिष दाखवून किंवा भ्रामक गोष्टी सांगून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे यथाशक्ती प्रयत्न सुरु आहेत. ऐतिहासिक काळात मुस्लिम शासकांनी प्रामुख्याने तलवारीच्या जोरावर दहशत पसरवून तर ख्रिश्चनांनी तलवार,बंदूक आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधे गायीची चरबी लावलेले पाव टाकून कितीतरी हिंदूंचे धर्मांतर केले. याव्यतिरिक्त हिंदू धर्मातील जातीच्या पिरॅमिडमधे सर्वात तळाशी असणार्‍यांना तुम्हाला हिंदू धर्मात सन्मानाची वागणूक मिळत नाही; आमचा धर्म दयाळू आहे. तुम्ही तो धर्म स्विकारा वगैरे सहानुभूतीपूर्ण भाषणे देऊन इजा न करता अशा लोकांचे धर्मांतर केले गेले. सद्य काळात तलवार,बंदूक यांच्याकरवी धर्मांतर करणे शक्य नसल्याने लव जिहाद मार्फत मुस्लिम बनवणे, आर्थिक मदतीच्या बदल्यात ख्रिश्चन बनवणे हे प्रकार अजूनही सुरु आहेत. यातही ख्रिश्चन धर्मप्रसारक हे आघाडीवर आहेत. हिंदू मंदिरांप्रमाणे चर्चची रचना करणे, येशुला हिंदू पद्धतीप्रमाणे पुजा करणे हे प्रकार सातत्याने होतात. आता तर यापुढे जाऊन हिंदू मंदिरामधेच ख्रिश्चन धर्मातल्या खुणा घुसडणे हा प्रकार दक्षिण भारतात फार होतो आहे. तिरुपतीच्या बालाजी मंदिराच्या कमानीवर नक्षीकामादरम्यान येशुचे क्रॉस लावले गेले होते. नंतर आक्षेप घेतल्यावर ते काढून हिंदू पद्धतीच्या श्रीफल असलेल्या कलशांची नक्षी जोडण्यात आली. काही वर्षांपूर्वी काही नन धर्मप्रसारासाठी तिरुपती मंदिर प्रांगणात पोहचल्याचं वाचलं असेल. केरळच्या सबरीमलाच्या मंदिरात हिंदूंनी जाऊ नये म्हणून तिथल्या ख्रिश्चनांनी आणलेल्या अडथळ्यांबद्दल आपण वाचलं असेलच. काही महिन्यांपूर्वी आंध्रप्रदेशात हिंदू मंदिरांची तोडफोड करण्याचा सपाटाच तिथल्या ख्रिश्चन धर्मीय आक्रमकांनी लावला होता.शेवटी आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना (जे स्वत: ख्रिश्चनच आहेत) त्यांना या प्रश्नात लक्ष घालावं लागलं. अर्थात हे ढोंगच होतं. कारण याच जगनमोहन रेड्डी यांचे मामा हे कागदोपत्री हिंदू असून प्रत्यक्षात ख्रिश्चन आहेत. ते तिरुपती मंदिराच्या ट्रस्टवर महत्वाच्या पदावर आहेत. ही नेमणूक कोणामुळे झाली असेल हे सांगायला नको. त्यांच्या बोर्डावरील नेमणूकीला हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता पण बहुदा कमी पडल्याने ते अजूनही तिथे आहेत. पुढच्या काही वर्षात केरळचा धर्मांतराचा वेग कमी होईल इतक्या वेगाने हे सुरु आहे. कागदोपत्री हिंदू पण प्रत्यक्षात ख्रिश्चन. पैसे देऊन किंवा आजार बरा होणे याबद्दल भ्रामक गोष्टी सांगून भारतातले ख्रिश्चन धर्मोपदेशक धर्मांतर करत असतात. भारतात धर्मप्रसाराचा वेग मुस्लिमांच्या तुलनेत ख्रिश्चनांचा खूप जास्त आहे. मागे एका मोठ्या हिंदुत्ववादी नेत्याने ख्रिश्चन धर्मोपदेशक हे सायलेंट पॉयझनसारखे असल्याचे म्हटले होते. तमिळनाडूत इंग्रजांच्या काळात आलेले ख्रिश्चन धर्मोपदेशक किती ढोंगी होते हे सांगणारा आर्किऑलॉजिस्ट एच नागास्वामींचा व्हिडिओ https://youtu.be/N3D9_F83Gus भारतात जितके मुस्लिम आहेत त्यातल्या जवळपास ९९% जणांचे पूर्वज हे हिंदू होते. तलवारीच्या जोरावरच यातल्या बहूसंख्यजणांचे धर्मांतर झाले आहे. काश्मीरमधे राजा हरिसिंग असताना तिथल्या मुस्लिमांनी हिंदू धर्म स्विकारण्याची तयारी दर्शवली होती.पण मुर्ख हिंदू धर्माचार्यांनी याला नकार दिला. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक अल्लारखाँ यांचे पूर्वज मुळचे काश्मीरी ब्राह्मण. पण मुस्लिम बादशहाने त्यांच्या हिंदू राजाला मुस्लिम करु नये म्हणून त्याबदल्यात यांच्या पूर्वजांनी इस्लाम स्विकारला. टिपू सुलतानने मेलुकोटे या गावच्या ३०० वैष्णव ब्राह्मणांची हत्या केल्यामुळे तिथे दिवाळी साजरी होत नाही. त्याबद्दलचा हा व्हिडिओ https://youtu.be/F5FSA0bACZ8 धर्मांतर या विषयाबाबत देशात एक महत्वाचा भेद आहे. पंजाब,काश्मीर वगळता उत्तरभारत हा दक्षिण भारताच्या तुलनेत अफाट लोकसंख्या असलेला आणि कामासाठी देशात कुठेही जाण्याची तयारी असलेल्या लोकांचा प्रदेश. तर दक्षिण भारत हा उत्तर भारताच्या तुलनेत विकसित आणि कमी लोकसंख्या असलेला प्रदेश. दारिद्यामुळे ,लोकसंख्येमुळे टिकेचा धनी झालेला उत्तरभारत हिंदूधर्माला चिकटून राहणे याबाबत मात्र दक्षिण भारतापेक्षा कमालीचा सरस आहे. सद्यकाळात उत्तरभारतात उच्चवर्णीयांनी धर्मांतर केल्याची फार उदाहरणे नाहीत. याउलट धर्मांतर याबाबत दक्षिण भारतात अक्षरश: खेळखंडोबा झालेला अाहे. हिंदू धर्माबद्दल तुलनेने कमी असणारी आस्था हेच मुख्य कारण आहे. आंध्रात रेड्डी जातीच्या काही लोकांनी बर्‍याच वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे. रेड्डी ही आंध्रातली पूर्वीपासूनची उच्चवर्णीय आणि पैसे राखून असणारी जात आहे. तरीही धर्मांतर झाले आहे. दक्षिणभारतीय हे उ.भा च्या तुलनेत जास्त भावनिक किंवा हळवे असल्याने, सोशिकपणा कमी असल्याने धर्मांतरे होत असावीत. यावरुन दक्षिण भारतीयांचा सोशिकपणा ठरवावा का? https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/society/no-glory-in-dying/article19644990.ece/amp/ नाही म्हणायला अगदी गेल्या काही वर्षांपासून भाजप दक्षिणेत बर्‍यापैकी काम करु लागल्यापासून काही स्थानिक हिंदू मुन्नानीसारख्या हिंदू संघटना अस्तित्वात आल्या आहेत. पण तत्पुर्वी हे फारसे नव्हते. दक्षिण भारतीय जो धर्म स्विकारतील तो श्रद्धेने पाळतात अगदी उ.भारतीयांना लाजवतील इतका. पण फक्त गरीबी, आजारपण यामुळे नैराश्य आणि ख्रिश्चन किंवा मुस्लिम मुलगीच्या प्रेमात पडून तिचा धर्मबदलासाठी हट्ट हे तीन अडथळे नसतील तरच. ए आर रहमान गरीबीमुळे किंवा बिकट परिस्थितीमुळे तर युवन शंकर राजा, अभिनेते AVM राजन असे दक्षिणेतले बरेच प्रसिद्ध मुळचे हिंदू लोक प्रेमात पडून मुस्लिम किंवा ख्रिश्चन झालेले आहेत. हा असला प्रकार बॉलीवूड किंवा एकूण उत्तर भारतात इतक्या पटकन घडत नाहीत. याबाबतीत उत्तरभारताचे कौतुक केलेच पाहिजे. उत्तरप्रदेशात जसे मंदिर पाडून मशिद बांधली गेली होती तसेच चेन्नईतल्या मैलापूरच्या शंकराच्या मंदिराबाबत आहे. हे मंदिर सध्या जिथे आहे तिथे नव्हते. ते समुद्रकिनारी होते. ते जुलमी पोर्तुगीजांनी तोफा डागून पाडले आणि त्याठिकाणी चर्च उभारले. http://indiafacts.org/the-mylapore-st-thomas-myth-that-doesnt-seem-to-die-part-2/ त्यानंतर १६ व्या शतकात सध्याचे मंदिर उभारले गेले. उत्तरप्रदेशातल्या लोकांनी जसा लढा देऊन मंदिर पुन्हा उभारत आहेत तसा मंदिराच्या मूळ जागेसाठी लढा तमिळ हिंदूंनी दिला नाही. --------------------------------------------------------- धर्मांतर या अनुषंगाने काही प्रश्नदेखील आहेत. मिपावरच्या या विषयातल्या जाणकारांकडून याबाबत काही माहिती मिळावी. १. ज्यांची किंवा ज्यांच्या पूर्वजांची धर्मांतरे ही त्यांच्या मनाविरुद्ध झाली आहेत अशा लोकांना पुनश्च हिंदूधर्मात परतण्याबद्दल शासकीय स्तरावर जोरदार प्रबोधन करता येऊ शकते का? शासकीय स्तरावर का? तर ऐतिहासिक काळात भारतात हिंदूंची झालेली बहुतांश धर्मांतरे ही जबरदस्तीने झालेली आहेत. म्हणजे हा एकप्रकारे अन्यायच आहे. जसे इतिहासकाळात सामाजिक उतरंडीत उच्चवर्णीयांकडून झालेल्या अन्यायामुळे मागे पडलेल्या समाजांना आरक्षण देऊन पुढे आणले जाते तसेच या जबरदस्तीच्या धर्मांतराबाबत का होऊ शकत नाही? कारण त्याकाळी मनाविरुद्ध धर्म स्विकारलेला आहे. त्याकाळी घरपरतीची संधी मिळाली नाही किंवा शक्य झाले नाही. पण भारत स्वतंत्र झाल्यावर ही संधी मिळायला हरकत काय? संविधानानुसार भारतात कोणालाही कोणत्याही धर्म स्विकारण्याची मुभा आहे.पण हा कायदा झाला. त्या कायद्याला पोषक असे वातावरण नाहीये. म्हणजे अशा प्रकारे कायदेशीररित्या धर्म बदलता येतो ही माहिती ज्यांच्या पूर्वजांनी ऐतिहासिक काळात जुलमाने मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारला त्यांच्या सध्याच्या वंशजांपर्यंत पोहचली नसेल तर त्यांच्यापर्यंत ती पोहचवून पूर्वी झालेल्या अन्यायातून आज मुक्ती मिळवायला मदत करणे हे देशाच्या प्रशासनिक कारभारात यायला काय हरकत आहे? हे केल्यानंतरही ज्यांना मुस्लिम किंवा ख्रिश्चनच रहायचे आहे त्यांना राहू द्यावे.पण ज्यांना हिंदू धर्मात परतायचे आहे त्यांना शासकीय स्तरावरुन मदत मिळायला हरकत काय? त्यासाठी आधी तुम्ही हिंदू धर्मात परतू शकता हे प्रबोधन करणे ही पहिली पायरी आहे. २. ऐतिहासिक काळी तत्कालीन सर्वच जातींमधे धर्मांतरे झाली आहेत. पण यात दलित,अस्पृश्य जातीच्या लोकांची संख्या भरपूर आहे. सामाजिक अन्यायामुळे किंवा भितीमुळे किंवा काही साशंकतेमुळे जसे की आपल्या जातीचे हिंदू लोक आपल्याला स्विकारतील का अशा शंकेमुळे धर्मबदलास विरोध करणे समजू शकतो.पण तत्कालीन उच्चवर्णीय जातीतल्या ज्या लोकांना जबरदस्तीने मुस्लिम किंवा ख्रिश्चन व्हावे लागले त्यांचे आजचे वंशज आजही मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहेत. अगदी ब्राह्मणांसारखी जातीच्या पिरॅमिडमधे सर्वात वरच्या स्तरावर असणार्‍या जातीतले लोकही आजही मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहेत. https://en.m.wikipedia.org/wiki/Roman_Catholic_Brahmin यांना काय म्हणणार? ब्राह्मण म्हणणार की ख्रिश्चन म्हणणार? अगदी उदाहरण हवं असेल तर शफी इनामदार किंवा बॅरिस्टर अंतुले. कोकणात कुठेसा खान बहादूर पांगारकर मार्गही आहे म्हणे. या उच्चवर्णीयांच्या सध्याच्या वंशजांनी पुनश्च हिंदू धर्म न स्विकारण्याचे कारण काय असावे? की जी भिती वंचित जातींना आहे तीच यांनाही आहे? बाजीराव पेशवे - मस्तानी यांपासून जी वंशावळ सुरु झाली ती आजही मुस्लिमच आहे. त्यांनी बापाचा हिंदू धर्म स्विकारायला काय अडचणी असाव्यात? ३. भारतातले ख्रिश्चन धर्मोपदेशक आजार बरा करण्याच्या नावाखाली हिंदूंचे नदीत स्नान करुन बाप्तिस्मा करतात. वर असेही सांगतात की बाप्तिस्मा दिला म्हणजे धर्मांतर नव्हे. मग नक्की काय प्रक्रिया झाली की ख्रिश्चन धर्मात प्रवेश होतो? शिवाय अशी बरीचशी धर्मांतरे ही संबंधित शासकीय अधिकार्‍यापुढे जसे की मॅजिस्ट्रेट वगैरे होत नाहीत. ख्रिश्चन धर्मोपदेशक आणि तो धर्म स्विकारणारा या दोघांचा होकार मिळाला की झाले असा प्रकार होतो. अशा धर्मांतराला कायद्याने मान्यता नसेल तर पोलिस किंवा कायदेविषयक संस्था याकडे डोळेझाक का करतात? इतकी भरमसाठ धर्मांतरे कशी होतात? अशा धर्मोपदेशकांना अटक का होत नाही? ४. भारताचा नकाशा पाहिला तर गुजरातपासून ते प.बंगालपर्यंत किनारपट्टीच्या प्रदेशात ख्रिश्चन धर्मीयांचे प्रमाण जास्त आहे. किनारपट्टीच्या प्रदेशातच ख्रिश्चन धर्म इतका का पसरला असेल? ५. सद्यकाळात धर्मांतर करणार्‍या हिंदूंमधे गरीब,अशिक्षित हिंदूंचे प्रमाण जास्त असणे सहज शक्य आहे.पण काही वर्षांपूर्वी उल्हासनगरमधे हजारो सिंधी हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्विकारला. https://www.google.com/amp/s/www.afternoonvoice.com/ulhasnagar-sindhis-drifting-away-from-hinduism.html यामागचे नक्की कारण काय? कारण सिंधी हा समाज गरीबही नाही आणि अशिक्षितही नाही. व्यावसायिकतेत पुढारलेला हा समाज दीनवाणा,बापडा देखील नाही मग काय कारण आहे या धर्मांतराचं? ६. मुस्लिमांमधे धर्माचा पगडा इतका असण्याचं कारण काय असावं? गरीब हिंदू जर गरीबीला कंटाळून मुस्लिम किंवा ख्रिश्चन होत असेल तर हेच गरीब मुस्लिमांबाबत का होत नसेल? गरीबीला कंटाळून ते इस्लाम का सोडून हिंदू किंवा ख्रिश्चन का होत नसावेत? ७. केरळमधे हिंदूंची संख्या दिवसेंदिवस घटते आहे. आक्रस्ताळी मुस्लिम धर्मियांची तिथे दादागिरी बरीच वर्षे सुरु आहे. ख्रिश्चन धर्मोदेशकही सुखनैव काम करत आहेत. २०१४ पासून केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. केंद्राची ताकद ही नक्कीच राज्यसरकारपेक्षा जास्त असते. मग त्याच ताकदीचा वापर करुन भाजप केरळातल्या मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या या दादागिरीला आळा का घालू शकत नाही? किंवा याचप्रमाणे इतिहासात शिवरायांपासून पेशव्यांपर्यंत मराठा साम्राज्य असताना जे जुलमाने मुस्लिम/ख्रिश्चन बनले त्या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात का आणले नाही? नेताजी पालकरांना हिंदू धर्मात परत घेतले मग बाकीच्यांना का नाही? ८. सेंट झेविअर हा केरळमधे कमालीचा प्रभावी धर्मोपदेशक होऊन गेला. दिवसाला शेकडो जणांना ख्रिश्चन बनवायचा. याच्या नावाने इतक्या शाळा,महाविद्यालये असणे हे हिंदू धर्माला खिजवणे आहे का? एखाद्या कॉलेजचं नाव अौरंगजेब महाविद्यालय किंवा शाळेचं शाहिस्तेखान विद्यालय हे खपवून घेतले जात नसेल तर या सेंट झेविअरला झुकते माप का?
  • Log in or register to post comments
  • 23912 views

प्रतिक्रिया

Submitted by गॉडजिला on Fri, 06/18/2021 - 19:42

In reply to हिंदू धर्म वाढवा म्हणून मी स्वतः काय करतो by Rajesh188

Permalink

हिंदू वर टीका हिंदू च करतात. खरे आहे...

इतरांना कृतीत बिजी अस्ल्याने त्याना टिका करायला वेळ कुठं आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 06/17/2021 - 20:47

Permalink

हिंदू नी

हिंदू नी कोणत्याच राजकीय पक्षांच्या नादाला लागायची गरज नाही हिंदुत्व वादी म्हणून घेणारा पक्ष म्हणून स्वतःची ओळख सांगणाऱ्या पक्षाने सत्तेवर येवून सुद्धा हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम होतील ह्या साठी विशेष काही प्रयत्न केले नाहीत. हिंदू धरण वाढवा टिकाव म्हणून धर्माच्या पातळीवर च प्रयत्न करायला हवेत.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Fri, 06/18/2021 - 21:35

Permalink

मार्मिक

Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 06/19/2021 - 23:35

Permalink

हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Photography is the story I fail to put into words.”:- Destin Sparks
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 06/20/2021 - 01:50

Permalink

हिंदू साठी भारत ही एकमेव भूमी आहे

हिंदू साठी भारत ही एकमेव भूमी आहे पृथ्वी च्या पाठीवर.हा भारत हिंदू बहुसंख्य देश आहे हिंदू साठी एकमेव सुरक्षित आणि हक्काचा देश आहे. काश्मीर सोडले तर सर्व राज्याचे मुख्यमंत्री हिंदू आहेत. हिंदू हिंदू असा सारखा गजर राजकीय पक्ष करत असतात त्यांनी हिंदू आर्थिक, शैक्षणिक,तंत्रज्ञान, मध्ये जगात सर्वोच्च स्थानी असावेत म्हणून किती तळमळी नी प्रयत्न केले.? भारताच्या कानाकोपऱ्यात राहणारा हिंदू नागरिकाला त्याची प्रगती करता यावी म्हणून किती प्रयत्न केले? हिंदू उद्योग पती ,हिंदू प्रशासकीय अधिकारी,हिंदू मंत्री ,ह्यांनी हिंदू प्रगत व्हावेत ,प्रबळ व्हावेत म्हणून काय प्रयत्न केले? भारतातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या नागरिक पासून शहर,महानगरात राहणाऱ्या हिंदू ना जगातील सर्वोत्तम जीवन जगता यावे म्हणून काय केले? ह्या सर्वाची उत्तर आहे काहीच नाही केले. उलट हा देश गरीब च कसा राहील म्हणून . शेतकरी ,कामगार,ह्यांचे शोषण च केले. भ्रष्ट कारभार करून देशातील नागरिकांना त्यांच्या हक्क पासून वंचित केले. न्याय मिळण्यासाठी पण इथे वीस पंचवीस वर्ष वाट बघावी लागते.तो पण मिळेल ह्यांची खात्री नाही. कसले हिंदू हिंदू करताय .फक्त सत्तेसाठी. इथले हिंदू इतके धर्म प्रेमी असते तर भारताला आज सर्वोच्च स्थानी नेवून ठेवला असता. कारण भारत हाच एकमेव भूमी हिंदू कडे आहे. मुस्लिम लोकांना पण असेच मूर्ख बनवले त्यांच्या राजकीय पुढाऱ्यांनी. मुस्लिम धर्माची जगात जास्त संख्या असून सुध्दा. गरिबीत जीवन जगणाऱ्या लोकात मुस्लिम धर्मीय च असतील. मुस्लिम लोकांचे एक पण राष्ट्र आर्थिक ,लष्करी ,सामाजिक ,बाबतीत जगात सर्वोच्च नाही. त्या मुळे हिंदू संकटात,मुस्लिम संकटात अशी बोंब मारणाऱ्या लोकांकडे लक्ष न देणे हेच उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 06/20/2021 - 02:58

Permalink

जो हिंदू बलवान पाहिजे

जो राजकीय पक्ष ,संघटना हिंदू बलवान झाला पाहिजे .हिंदू चे हिंदुस्तान हे राष्ट्र जगात बलवान झाले पाहिजे असा प्रामाणिक हेतू म्हणून हिंदू एकजुटीचा मंत्र सांगत असतात. त्यांनी घरोघरी जावून हिंदू च्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. ज्यांना गरज आहे त्यांना आर्थिक ,कायदेशीर मदत केली पाहिजे. जे हिंदू उद्योगपती आहेत त्यांनी त्यांच्या कंपनीत,संस्थेत,दुकानात जे हिंदू काम करत आहेत त्यांचे आर्थिक शोषण करू नये. प्रशासकीय अधिकारी ,पोलिस ह्यांनी हिंदू ना लगेच योग्य न्याय द्यावा. हे ज्यांना जमत असेल त्यांनी च हिंदू हिताच्या गप्पा माराव्यात. स्वार्थी हिंदू ना सत्ता मिळावी म्हणून शोषित लोकांनी सर्व दुःख ,अडचणी विसरून ह्या स्वार्थी लोकांना मदत करायची काही गरज नाही. धर्म परिवर्तन करून मदत मिळत असेल तर हिंदू नी धर्म परिवर्तन का करू नये?
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Sun, 06/20/2021 - 15:56

Permalink

एक समाधानाची बाब म्हणजे ex

एक समाधानाची बाब म्हणजे ex-मुस्लीम समुदाय आहे
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Sun, 06/20/2021 - 15:59

Permalink

असं म्हटलं जातं की प्रिंटिंग

असं म्हटलं जातं की प्रिंटिंग प्रेस क्रिश्चन धर्म संपवला आणि सोशल मीडिया मुस्लिम धर्म संपवेल
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Sun, 06/20/2021 - 16:00

Permalink

असं म्हटलं जातं की प्रिंटिंग

असं म्हटलं जातं की प्रिंटिंग प्रेस क्रिश्चन धर्म संपवला आणि सोशल मीडिया मुस्लिम धर्म संपवेल
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Sun, 06/20/2021 - 16:00

Permalink

असं म्हटलं जातं की प्रिंटिंग

असं म्हटलं जातं की प्रिंटिंग प्रेस क्रिश्चन धर्म संपवला आणि सोशल मीडिया मुस्लिम धर्म संपवेल
  • Log in or register to post comments

Submitted by बापूसाहेब on Sun, 06/20/2021 - 16:02

In reply to असं म्हटलं जातं की प्रिंटिंग by NiluMP

Permalink

असं का म्हटलं जात ????

असं का म्हटलं जात ???? काही स्पेसिफिक कारणे???
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 06/24/2021 - 12:01

Permalink

म्हणून??

https://thebhongaa.com/2021/06/24/dalits-fall-short-of-respect-they-convert-to-christianity-telangana-cm/
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com