✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग २)

म
मदनबाण यांनी
Sat, 06/05/2021 - 20:27  ·  लेख
लेख

Lakshadweep is India’s jewel in the ocean.

The ignorant bigots in power are destroying it.

I stand with the people of Lakshadweep.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2021

The people of Lakshadweep deeply understand and honour the rich natural and cultural heritage of the islands they inhabit. They have always protected and nurtured it.
The BJP government and its administration have no business to destroy this heritage, to harass the people… 1/3

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 25, 2021
गांधी भाऊ आणि बहिण यांना इतक्या वर्षां नंतर लक्षद्वीप या छोट्याश्या बेटाची अचानक आठवण येउन, अचानक काळजी उत्पन्न होउन त्यांनी टिवटिवाट केला, इतर संबंधीत मिडिया देखील चाटुकारितेची संधी दवडणार कसा ? पण अचानक कुठेतरी गडबड झाली... कारण याच लक्षद्वीप बेटावर त्यांच्या तिर्थरुपांनी [ या सहलीत राहुल आणि प्रिया़का देखील अर्थातच होते. ] कशी सहल केली होती आणि त्या सहलीसाठी इंडियन नेव्हीला कसे दावणीला लावण्यात आले होते याची माहिती बाहेर येउ लागली ! ती माहिती खालील व्हिडियोत आपणास पाहता येइल. मग अचानक या दोघांना त्या ट्रीपची आठवण न येता त्या लक्षद्वीप बेटाची काळजी का वाटली असेल ? त्याचे उत्तर तुम्हाला खाली मिळाले तर पहा !

मदनबाण.....

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
70843 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचा कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी.....

मुक्त विहारि
Mon, 06/07/2021 - 11:47 नवीन
मुख्यमंत्र्यांचा कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्या यांचा आरोप.... ------- "Indefinite Village Ban To Cover Up CMs Scam In Korlai Allegation Of Kirit Somaiya | मुख्यमंत्र्यांचा कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्या यांचा आरोप" https://marathi.abplive.com/news/maharashtra/indefinite-village-ban-to-cover-up-cms-scam-in-korlai-allegation-of-kirit-somaiya-989688/amp --------- काय बोलावं, ते सुचेना....
  • Log in or register to post comments

आज ठीक ५ वाजता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/07/2021 - 15:17 नवीन
आज दिनांक ७ जून २०२१ रोजी, ठीक सायंकाळी ५ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाला उद्देशून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी आपापल्या टीव्ही, मोबाईलवर मौलिक विचारांचा लाभ घ्यावा. मला वाटतं, ब-याच दिवसानंतर ही थेटभेट असल्यामुळे आता काही तरी मोठी घोषणा करतील. निरुपयोगी दिवाबत्तीचा टास्क असणार नाही. जनतेने काय करावे आणि काय करु नये, लशीबद्दल काही नवीन घोषणा किंवा काही नव्या योजना मांडून सरकारप्रती आणि स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा एक नवा जुमला येण्याची शक्यता वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मोदींना ऐकण्यासाठी

श्रीगुरुजी
Mon, 06/07/2021 - 17:06 नवीन
मोदींना ऐकण्यासाठी मोदीद्वेष्टेच जास्त कासावीस झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेल....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/07/2021 - 17:25 नवीन
मनोरंजन- कार्टून- गाण्यांचे कार्यक्रम, सनातन वाहिन्यांवरील बाबा-बुवांच्या प्रवचनाइतकाच आनंद टीव्हीदर्शन-भाषणामुळे या द्वेष्टयांना होत असावा म्हणून ते उतावीळ होत असावेत असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आनंद कसला? आपण जंगजंग

श्रीगुरुजी
Mon, 06/07/2021 - 17:33 नवीन
आनंद कसला? आपण जंगजंग पछाडूनही आपल्याला काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही आणि मोदींची लोकप्रियता मात्र कायम आहे, या वैफल्यातून शिवीगाळ करण्यासाठी ते उतावीळ आहेत. तुमचा ट्विटरमास्टर नेता तर ट्विटर उघडून बसला असेल व मोदींचे भाषण ऐकता ऐकता टीका करणारी ट्विट्स लिहिणे सुरू असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालू द्या....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/07/2021 - 17:48 नवीन
बाकी, फेकाफेकीवर सविस्तर आढावा थोड्या वेळाने घेऊ....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भाषण सुरू व्हायच्या आधीपासूनच

श्रीगुरुजी
Mon, 06/07/2021 - 18:23 नवीन
भाषण सुरू व्हायच्या आधीपासूनच मोदींना झोडपणारी तुमची पोस्ट तयार असेलच. ती पोस्ट लगेच टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदी ची प्रीयता कायम आहे

Rajesh188
Tue, 06/08/2021 - 08:10 नवीन
Good joke. मोदी ची लोकप्रियता कायम आहे असे it cell लाच फक्त वाटत. त्यांना पण वाटत नाही पण तसेच लिहा तेव्हा च पैसे मिळतील अशी तंभी च असते. लोक तर वाट बघत आहेत कधी निवडणुका येतात आणि मोदींची लोकप्रियता काय आहे हे त्यांना दाखवून देतो असे झाले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नरेंद्र मोदी यांचं भाषण इथे सुरु आहे -

वामन देशमुख
Mon, 06/07/2021 - 17:19 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निरुपयोगी दिवाबत्तीचा टास्क

चौकस२१२
Mon, 06/07/2021 - 18:21 नवीन
निरुपयोगी दिवाबत्तीचा टास्क असणार नाही "नेहमीच येतो मग पावसाळा " या उक्ती प्रमाणे रतीबाचा विरोध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्तुत्य.

कॉमी
Mon, 06/07/2021 - 17:38 नवीन
७५% लसी केंद्र स्वतः विकत घेणार हा स्तुत्य निर्णय आहे, आणि टीका मान्य करून सुधार करण्यात आली असे दिसते.
  • Log in or register to post comments

खरच स्तुत्य निर्णय..

रामदास२९
Mon, 06/07/2021 - 17:52 नवीन
खरच स्तुत्य निर्णय.. राज्यान्ना आर्थिक शक्ति जास्त नसताना हा अधिकार देण चूक होते.. त्यापेक्षा केन्द्राने खरेदी करण चान्गला... नाहितर पन्जाब सरकार सारख होइल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

"राज्यांनी डिसेंटरलाइझड लस खरेदी मागीतलीच नव्हती"

कॉमी
Mon, 06/07/2021 - 17:57 नवीन
केरळ, बिहार, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश मधील मंत्र्यानी सांगितले आहे की डिसेंटरलाइझड लस खरेदी ची मागणी त्यांनी कधीही केली नव्हती. छत्तीसगडचे आरोग्य मंत्री म्हणतात की पहिल्या दिवसापासून आम्ही केंद्रीय खरेदी (centralised procurement) असावी ह्याच मताचे आहोत. कोणत्या राज्यांनी त्याविरुद्ध मागणी केली का हे माहीत नाही. जरी केली असली तरी केंद्राने त्याकडे दुर्लक्ष करायला हवे होते.
Chhattisgarh health minister TS Singh Deo said that his state had not asked to be allowed to procure vaccines. “We were saying from day 1 that there should be only one agency, the GoI, to purchase the vaccines. I don’t know any other state that wanted to buy on its own,” he said, adding that even if a state had requested for it, the Centre should not have blindly followed such advice.
नीती आयोगाने "राज्यांनी विनंती केल्यामुळे" हा निर्णय घेण्यात आला असे म्हणल्यावर ह्या प्रतिक्रिया आल्या आहेत. https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/states-deny-asking-goi-for-policy-to-buy-jabs-directly/amp_articleshow/83076941.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

केरळ, बिहार, तेलंगणा,

आग्या१९९०
Mon, 06/07/2021 - 18:03 नवीन
केरळ, बिहार, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश मधील मंत्र्यानी सांगितले आहे की डिसेंटरलाइझड लस खरेदी ची मागणी त्यांनी कधीही केली नव्हती. लसींचा तुडवड्याला केंद्राचा हलगर्जीपणा होता. अंगाशी आल्यावर राज्यांवर जबाबदारी ढकलली. असं तत्परतेने हक्काचा gst राज्यांनी मागितला तेव्हा दिला नाही,म्हणे राज्यांनी मागणी केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

+१

कॉमी
Mon, 06/07/2021 - 18:06 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

महाराष्ट्र, पंजाब दिल्ली आणि

रात्रीचे चांदणे
Mon, 06/07/2021 - 18:15 नवीन
महाराष्ट्र, पंजाब दिल्ली आणि उत्तरप्रदेश सरकार ने लसी विकत घेण्यासाठी टेंडर काढली होती. हा decentralisation चा प्रकार नव्हता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

प्रश्न.

कॉमी
Mon, 06/07/2021 - 18:26 नवीन
ते माझ्यामते केंद्राच्या निर्णयानंतर झाले ना ? त्याआधी कोणी मागणी केलेली काय ? एकदा निर्णय झाल्यावर टेंडर भरण्याशिवाय पर्यायच नाही. नाहीतर टाळमटाळ केली असे वाटले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

राज्यांनी जागतीक टेंडर

आग्या१९९०
Mon, 06/07/2021 - 18:33 नवीन
राज्यांनी जागतीक टेंडर भरल्यावर लस उत्पादकांनी फक्त भारत सरकारशी बोलू, राज्यांशी नाही अशी भूमिका घेतल्याने केंद्र अडचणीत आले होते. राज्यांना अडकवला गेले आणि तोंडघशी पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

आणि केली असल्यास त्याकडे

कॉमी
Mon, 06/07/2021 - 18:28 नवीन
आणि केली असल्यास त्याकडे दुर्लक्ष करायला हव होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

एक उदाहरण

प्रदीप
Mon, 06/07/2021 - 21:30 नवीन
इथे पहा.... Image removed. आणि हेच सद्गृहस्थ आता हे म्हणत होते... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

राहुल गांधीचे म्हणणे ऐकून

कॉमी
Mon, 06/07/2021 - 21:43 नवीन
राहुल गांधीचे म्हणणे ऐकून मोदींनी लस खरेदी राज्यांकडे काही प्रमाणात सोपवली असे म्हणणे नसेल तर याचा पॉईंट काय समजला नाही. राहुल गांधीला "Greater say" म्हणजे खरेदी करण्याची जबाबदारी असे म्हणायचे असल्यास त्याचे तेव्हाचे मत चुकीचेच होते. आणि तो काय म्हणाला यापेक्षा राज्यांमधले मंत्री (काँग्रेस वा इतर वा भाजपशासित) काय म्हणतात हे अधिक महत्त्वाचे नाही काय ? राहुल गांधी नीती आयोगाने म्हणल्याप्रमाणे कोणत्याही राज्य सरकारशी संबंधित नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

लय भारी . .

सुक्या
Mon, 06/07/2021 - 21:53 नवीन
लय भारी . . वकील म्हणुन नाव काढाल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

धन्यवाद.

कॉमी
Mon, 06/07/2021 - 21:55 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

आणि

प्रदीप
Mon, 06/07/2021 - 21:39 नवीन
मला तुमचा हा कॅव्हिट आवडला, हां !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हा caveat आहे, पण त्यात

कॉमी
Mon, 06/07/2021 - 21:54 नवीन
हा caveat आहे, पण त्यात चुकीचे काय ? मी व्यक्तिष: सुरुवातीपासूनच केंद्राने जास्तीत जास्त खरेदी करावी मताचाच होतो. त्यामुळे अर्थातच त्याविरुद्ध मत मांडले असल्यास केंद्राने त्याकडे दुर्लक्ष करावे असेच मी म्हणीन ! राज ठाकरेंनी सर्वात पहिला केंद्राला पत्र लिहून राज्यांना औषध आणि ऑक्सिजन इत्यादी थेट विकत घेण्याचा हक्क मागितला होता तेव्हापासून मी त्याला आतार्किकच म्हणले आहे. प्रतिसाद सापडला नाही चटकन, नाहीतर दुवा दिला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

ही राज्ये नसतील कदाचित ..

सुक्या
Mon, 06/07/2021 - 22:11 नवीन
ही राज्ये नसतील कदाचित .. परंतु जालावर सहज शोध घेतला तर बर्‍याच ठिकाणी या मागणीच्या लिन्का सापदल्या .. उदा. https://www.livemint.com/news/india/states-wanted-removal-of-restrictions-on-vaccine-supply-no-reason-to-complain-now-vardhan-11619367997298.html https://www.business-standard.com/article/current-affairs/centre-clears-the-air-on-procurement-of-covishield-vaccine-for-states-121042201432_1.html आपल्या राज्याचे कोविड्वोलोजिस्ट मुख्यमंत्री "आमच्याकडे पैसा आहे ... एकरकमी पैसे भरायला तयार आहे" वगेरे वगेरे बाता मारत होते ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मिंट मध्ये जी यादी दिली आहे

कॉमी
Mon, 06/07/2021 - 22:52 नवीन
मिंट मध्ये जी यादी दिली आहे ती राज्ये फ्री लसीकरण करणार आहेत त्यांची. ५०%-राज्य आणि प्रायव्हेट हा निर्णय झाला १९ एप्रिलला. यादीतल्या सर्वांच्या घोषणा पाहणे जमले नाही, पण केरळ आणि महाराष्ट्राची पाहिली असता अनुक्रमे २१ आणि २८ एप्रिल ला, म्हणजे धोरण घोषित झाल्या नंतर आहे. धोरण जाहीर झाल्यावर फ्री लसीकरणाची घोषणा करणे म्हणजे आम्ही ज्या थेट लसी मिळवू, त्या मोफत देऊ असा होतो. त्याचा लसी केंद्रांनी घ्याव्यात कि राज्यांनी घ्याव्यात या मतावर काही फरक पडत नाही. आणि, ५०%च लसी केंद्र घेणार म्हल्यावर आपापल्या क्षमतेनुसार लसी खरेदी करणे हे राज्यांना क्रमप्राप्त ठरले होते ,नाहीतर त्यांच्या नागरिकांचे नुकसान झाले असते. कारण सरळच कि आधीपेक्षा कमी लसी केंद्राकडून पुरवल्या जातील.मग, ज्या घेतल्या स्वतंत्र पणे घेतल्या जातील त्याही लसी लोकांना विनामूल्य दिल्या जातील असा त्या घोषणांचा अर्थ होतो. त्यामुळे ह्या राज्यांनी स्वतंत्र लस खरेदीची मागणी केली होती असा नक्की निष्कर्ष काढता येत नाही. केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांनी सुद्धा फ्री लसीकरण घोषित केले म्हणून यादीत नाव आहे, पण त्यांच्या मंत्र्यानी स्पष्टपणे संगीतले आहेच की आम्ही केंद्राकडे अशी कोणतीही मागणी केली नव्हती. त्यामुळे नक्की कोणत्या आणि किती राज्यांनी अशी मागणी केली होती ते अस्पष्टच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

हि गोष्ट मोदी समर्थक सुद्धा

साहना
Tue, 06/08/2021 - 01:24 नवीन
हि गोष्ट मोदी समर्थक सुद्धा मान्य करतील. दुसरी वेव्ह येणार नाही म्हटल्यावर कशाला उगाच खर्च म्हणून केंद्र सरकारने लसी घेतल्या नाहीत आणि प्रकरण अंगाशी येताच राज्य सरकारांना जबाबारदार धरले. अगदी २ आठवडे मागे "health is a state subject" म्हणून ओरड करणारे चाटुकार मंडळी आज प्रधान सेवकांच्या थोर आणि ऐतिहासिक निर्णयाचे ढोल बडवत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मत.

कॉमी
Mon, 06/07/2021 - 19:09 नवीन
मधल्या काळात एकूण सरकारी मशिनरी (राज्य+केंद्र) यांचा किती अतिरिक्त पैसा खर्च झाला, राज्य सरकारच्या खरेदी प्रक्रियेत किती जास्तीचा वेळ लागला, याची माहिती मिळायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

सर्वोच्च न्यायालयाने suo moto

आग्या१९९०
Mon, 06/07/2021 - 17:48 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने suo moto दाखल करून घेऊन, लासिकरणावरून केंद्राकडून स्पष्टीकरण मागितले. राज्य आणि केंद्राच्या लसी खरेदीच्या किमतीत तफावत का? आणि केंद्रच सर्व लसी खरेदी करून राज्यांना का देत नाही? ह्या दोन प्रश्नांमुळे केंद्र अडचणीत आले. ३० जूनला सुनावणी असल्याने त्यापूर्वीच सारवासारव करून पांढरे निशाण फडकावले. हा सोशल मीडियाचा विजय आहे. ९०० रुपयात खासगीमध्ये मिळणारी लस आता १५० रुपयात मिळणार. लुटमार नही चलेगी.
  • Log in or register to post comments

लुटमार नही चलेगी

रामदास२९
Mon, 06/07/2021 - 17:54 नवीन
लुटमार नही चलेगी
खाजगी रुग्णालयान्ची .. .. आणि लस जास्त उपलब्ध होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ह्यात लूटमार कसली? अत्ता

रात्रीचे चांदणे
Mon, 06/07/2021 - 18:11 नवीन
ह्यात लूटमार कसली? अत्ता प्रत्येक डोस माघे जर फक्त 150 रुपये मिळणार असतील तर खासगी हॉस्पिटल्स लसी विकत घेतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

केन्द्राच्या खरेदी

रामदास२९
Mon, 06/07/2021 - 18:16 नवीन
केन्द्राच्या खरेदी किमतीपेक्षा १५० रुपये जास्त... जर त्यान्चे खर्च भागत असतील तर का नाही घेणार?? आणि आधी घेतच होते कि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

SC ने सांगितल्यामुळे केले

कॉमी
Mon, 06/07/2021 - 18:14 नवीन
SC ने सांगितल्यामुळे केले अशी आपत्ती ओढवण्याऐवजी आमचेआम्हीच केले, अशी स्ट्रॅटेजी दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हो, केंद्र सरकार गोंधळते हे

आग्या१९९०
Mon, 06/07/2021 - 18:28 नवीन
हो, केंद्र सरकार गोंधळते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. फार विचार न करता निर्णय घेते. नोटाबंदी,gst आणि आता लसीकरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/07/2021 - 19:13 नवीन
सहमत....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

लसीकरण सर्टिफिकेटवर

आग्या१९९०
Mon, 06/07/2021 - 17:58 नवीन
लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधानांचा फोटो छापणार नाही असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. इतके मोठे नुकसान टाळण्यासाठी यू टर्न घेतला गेला.
  • Log in or register to post comments

दीदींनी त्यांचा छापलाय हो!

नावातकायआहे
Mon, 06/07/2021 - 20:23 नवीन
https://www.ndtv.com/india-news/bengal-issuing-vaccine-certificate-with-mamata-banerjee-photo-report-2457322
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

छत्तीसगडच्या बघेलने पण

श्रीगुरुजी
Mon, 06/07/2021 - 20:28 नवीन
छत्तीसगडच्या बघेलने पण स्वतःचा फोटो छापलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

प्यारे देशवासियो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/07/2021 - 19:10 नवीन
तर मंडळी, टीव्हीवर मुरारीबापूचं प्रवचन ऐकत होतो. च्यायनल बदललं आणि आदरणीय पंतप्रधान यांचं देशाला संबोधन सुरु झालेलं दिसलं. आपल्याला काय ऐकण्याशी मतलब. तर, इकडच्या तिकडच्या जगभरातल्या गावगोष्टी करुन मला वाटलं भाषणातलं मुळ मुद्दा येतो की नाही, असे क्षणभर वाटले. 'लसमहोत्सवाची' घोषणा झाल्याचे आपणास आठवतच असेल तर तो उत्सव काही झाला नाही. लशीच नव्हत्या तर तो उत्सव होणे शक्यच नव्हते. पंचेचाळीस वर्ष वयाच्या लोकांची प्रचंड ओढातान आणि हाल आपण अनेकांनी अनुभवले होते. आता पुढील भाग महत्वाचा आजच्या संवादात होता तो म्हणजे १८ वर्ष वयावरील नागरिकांची जवाबदारी सरकारने एकदाची घेतली. पूर्वी ही जवाबदारी राज्यांवर दिलेली होती. आता २१ जूनपासून नियोजन करुन लसीकरणास सुरुवात करण्यात येईल असे सांगितले. एवढेच आजच्या संबोधनाचं महात्म्य होतं. बाकी, आता भाषणंच इतकी वरच्यावर येत असतात की त्याचं काही महत्व उरलेलं नाही. कंटाळवाणी भाषणं असतात. एक प्रेस नोट दिली असती तरी चाललं असतं. पण जनतेला आपला विसर पडू नये म्हणून अशा गप्पा आवश्यक असतात. पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जनतेची मनधरणी आणि जनतेला खुश करण्यासाठी जे काही योजना आणता येतील ( पूर्ण होऊ की न होऊ) ते ते यापुढे केंद्रसरकारला आणावे लागतील. मला वाटतं, आपलं अपयश झाकण्यासाठी, प्रतिमा सुधारण्यासाठी असे नवनवे फॉर्म्युले यापुढे येत राहतील. बाकी, लस आपण तयार केली, उत्पादन केले वगैरे हे ऐकून डोळे भरुन आले. सर्व तरुण मित्रांनी रांगेत लस घ्यावी, गोंधळ करु नये. मास्क, सॅनिटाइजरचा वापर करावा. आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. जय हिंद जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

रडायची सवय काहीही केल्या जात

आग्या१९९०
Mon, 06/07/2021 - 19:35 नवीन
रडायची सवय काहीही केल्या जात नाही. मागील ६० वर्षाचे रडगाणे गायले. फक्त ६०% लसीकरण २०१४ पूर्वी झाले , कुठल्या लसिकरणाबद्दल बोलत होते? आणि भारतात कोविडवर बनलेल्या कोणत्या दोन लसी?
  • Log in or register to post comments

मला वाटतं...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/07/2021 - 20:11 नवीन
>>>>भारतात कोविडवर बनलेल्या कोणत्या दोन लसी? मला असं वाटतं. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्यासाठी जेव्हा असहकाराचं आंदोलन भारतात सुरु होतं. तेव्हाच कोवीशील्डची साथरोग नियंत्रण-प्रतिबंधात्मक उपायावर प्रास्ताविक तयार होतं, हस्तलिखिते उपलब्ध झाली की इथे टाकतो. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ऑ??

नावातकायआहे
Mon, 06/07/2021 - 20:25 नवीन
ऑ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मोदींच्या भाषणानंतर द्वेष्टे

श्रीगुरुजी
Mon, 06/07/2021 - 19:55 नवीन
मोदींच्या भाषणानंतर द्वेष्टे नेहमीसारखेच चेकाळले आहेत. मोदी कसे चुकत होते व केवळ आम्ही सांगितल्यामुळे ते चुका सुधारत आहेत, हे सांगण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. हे पाहून मोदी गालातल्या गालात हसत असतील. लांबवर दगड फेकायचा आणि ते पाहून काहीतरी खायचा पदार्थ असणार या समजुतीत तो सगळ्यांंच्या आधी आपण हस्तगत करावा म्हणून कुत्र्यांची झुंड त्या दिशेने पळत सुटते. मोदींच्या भाषणानंतर किंवा एखाद्या घोषणेनंतर तसंच होत आलंय आणि होत राहील.
  • Log in or register to post comments

ब्वार्र

कॉमी
Mon, 06/07/2021 - 20:00 नवीन
हाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लांबवर दगड "फेकायचा"

आग्या१९९०
Mon, 06/07/2021 - 20:51 नवीन
लांबवर दगड "फेकायचा" घोडा मैदान जवळ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समोर असे फेकून चालतं का बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बघा काय होतंय ते. तोपर्यंत

श्रीगुरुजी
Mon, 06/07/2021 - 21:28 नवीन
बघा काय होतंय ते. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा खुळखुळा खेळत बसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आता काय?

सॅगी
Mon, 06/07/2021 - 20:02 नवीन
आता काँग्रेसचे युवराज हसर्‍या चेहर्‍याने काय पॉझीटीव्ह ट्वीट करतात याकडे समस्त द्वेष्ट्यांचे लक्ष लागले असेल...तसेही वर काहींना पंतप्रधानांचे भाषण रडवे वाटले म्हणे :)
  • Log in or register to post comments

बोलके व्यंगचित्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/07/2021 - 22:54 नवीन
Image removed. व्यंगचित्र सौजन्य : MANJUL@MANJULtoons ट्वीटरवरुन साभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मंजुलटून्स

कॉमी
Mon, 06/07/2021 - 23:04 नवीन
या मंजुल वर कारवाई करावी असे "भारतीय law enforcement agency"नी ट्विटर ला सांगितले आहे. https://m.thewire.in/article/rights/centre-asks-twitter-to-take-action-against-cartoonist-manjuls-profile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा