Skip to main content

||चाफा..||

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 02/06/2021 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण भुइचाफा जो आत लपवता कंद मृण्मयी पहिली सर अन् रुजून येई. तुझी आठवण हिरवा चाफा मोहवणारा खुणावणारा दृष्टीला परि नच दिसणारा. तुझी आठवण पिवळा चाफा मधुगंधाने दरवळणारा सुकला तरिही जाणवणारा. तुझी आठवण कवठी चाफा तिन्हिसांजेला हळू उमलतो रात्रि सुगंधी सोबत करतो. तुझी आठवण खुरचाफ्यासम अपर्ण होउन मूक फुलांनी भरून अंगण तुलाच अर्पण.
लेखनविषय:

वाचने 3418
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

एकाही चाफ्याला सोडले नाहीये..म्हणून चाफा बोलेनासा झाला होय? रच्याकने :- कविता आवडली, पैजारबुवा,

दरवळत राहील अशी कविता! नागचाफा अन् तांबडा चाफा का वगळलात?

लिहीते राहावे. -दिलीप बिरुटे

आठवणीत राहील अशी सुरेख कविता.