नेटफ्लिक्स,ॲमेझॉन,सोशल मीडिया
अन-इन्स्टॉल कर सगळं
गच्च भरून गेलंय डोकं
अजून किती कोंबशील
वाचू नकोस
काही अर्थ नसतो त्यात
पुस्तकांचाही वैताग येण्याचे दिवस
आणि व्हिस्कीचाही कंटाळा येण्याच्या रात्री
सगळे स्वतःपासून पळण्याचे धंदे
बंद करून घे चहुबाजूंनी कडेकोट
मग स्वतःला कवटाळ
व्हायचं ते होईल भेंचो
कायकू डरताय ?
साधी हुरहूर तर आहे
तिला डरण्याचं वय आहे का हे?
संध्याकाळी ग्रेसची प्रॅक्टिस कर,
भय इथले संपत नाही वगैरे..
मग पाठोपाठ आत्मकरुणेचा महापूर
मोठमोठ्ठे लोंढे येतायत दुथडी..
झेपणार नाही तुला.. पळ..
शेपूट घाल नेहमीसारखा
गटांगळ्या खा
ओरड.. बचाव बचाव..
शेवटी कण्ह..
कण्हणं महत्वाचं..
ते जमलं की बाकी काही अवघड नाही
कोऱ्या पानांकडं दुपारभर बघत बसून शब्दांचा पाऊस पडणार असतो का?
त्यापेक्षा झाडाच्या सळसळत्या पानांना जास्त माहिती असतं,
त्यांना विचार.
तुझ्या आत उरलंय का तसं काही सळसळणारं ?
जिवंत जीवघेणं संज्ञाप्रवाही वगैरे काही?
मग काही लिहूबिहू नकोस
आणि लिहिलंस तर मला पाठवू नकोस
पाठवलंस तर वाट पाहू नकोस
वाट पाहलीस तर तसं सांगू नकोस
स्वतःचेच त्रास पुरे झालेत
त्यात हे आणखी नको
साचलायस तू..
फुटशील एखाद्या दिवशी
किंवा सुकून जाशील
थांब तुला तसा शापच देतो
तुझी नौका फुटो
वल्ही तुटो
तटबंदी ढासळो
उतरो हे मुखवटे
वाहो तुझ्यात काही
आणि तुझ्यातूनही काही वाहो
उसळो थुईथुई कारंजे पेशीपेशींतून
लाभो निष्कंप मन अखेरीस
लख्ख होवो जाणिवा
आणि त्यांच्या उजेडात मरणवाट दिसो..
(हे ललितबिलित नाही
आणि कविताबिविताही नाही..
काय आहे कुणास ठाऊक..)
वाचने
6667
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे ललितबिलित नाही
हे ललितबिलित नाही आणि कविताबिविताही नाही.. काय आहे कुणास ठाऊक..जे काही आहे मनापासून आहे आणि तेवढेच पुरे आहेएकदम समर्पक शीर्षक "शाप"!
...
In reply to एकदम समर्पक शीर्षक "शाप"! by Bhakti
लै डेंजर शापै.
जबरदस्त
शत प्रतिशत.....
धन्यवाद
अगदी खरंय.
नेमकं उलट असतं…
In reply to अगदी खरंय. by अनुस्वार
कंस विसरल्याने द्विरूक्ती करावी लागतेय
In reply to नेमकं उलट असतं… by सोत्रि
छान
ह्या आशयघन आणि खुप आतून
कुटून कुटून
In reply to ह्या आशयघन आणि खुप आतून by सोत्रि
अध्यात्म = अधि + आत्म म्हणजे
In reply to कुटून कुटून by गॉडजिला
नक्कीच पोचलेले अधिकारी पुरुष आहात आपण,
In reply to अध्यात्म = अधि + आत्म म्हणजे by सोत्रि
अध्यात्म = अधि म्हणजे जास्त +
In reply to नक्कीच पोचलेले अधिकारी पुरुष आहात आपण, by गॉडजिला
छआन
आभार..