नमस्कार मंडळी,
बोका-ए-आझम हे मिपावरील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. त्याला मी अगदी दोन-तीन वेळेला भेटलो असेन आणि फोनवर फार तर सात-आठ वेळा बोलणे झाले असेल. तरीही आमच्या दोघांच्याही आवडीनिवडीचे विषय बर्यापैकी सारखे असल्याने त्याच्याशी माझी चांगली मैत्री झाली होती. २०१७ च्या सुमारास एकदा मिपावर कोणत्यातरी प्रतिसादात मी लिहिले होते की एकदा मला मिपावर स्वातंत्र्योत्तर भारताचा राजकीय इतिहास ही प्रदीर्घ लेखमाला लिहायची आहे. त्यानंतर त्याचा मला फोन आला होता आणि त्या लेखमालेसाठी त्यालाही लिहायला आवडेल असे त्याने मला सांगितले. त्याबद्दल आणखी दोन-तीनदा फोनवर बोलणे झाले तरी मी मुलखाचा आळशी असल्याने मीच चालढकल करत राहिलो. त्यातून पुढे या लेखमालेचे काहीच झाले नाही. नोव्हेंबर २०१८ मध्ये काळाने बोक्याला आपल्यापासून हिरावून नेले. मी पण मिपापासून २०१८ ते २०२१ या काळात दूर होतो.
फेब्रुवारी २०२१ मध्ये मी मिपावर परत आल्यापासून बोक्याशी या विषयावर बोलणे झाले होते त्याविषयी आपण काहीच केले नाही याची टोचणी लागली होती. स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासावर लेखमाला लिहिणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. तेव्हा सगळ्या इतिहासावर नाही तरी स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक महत्वाचे पर्व- आणीबाणी याविषयी तरी काहीतरी लिहावे असे मी ठरविले. त्यातही १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची लोकसभेवर झालेली निवड रद्द ठरविणारा ऐतिहासिक निकाल दिला त्याविषयी काहीतरी लिहावे असे ठरविले. त्यातून या लेखमालेची कल्पना सुचली. गेल्या काही दिवसात मी पुढील दोन पुस्तके वाचली. ही लेखमाला त्या दोन पुस्तकांवर आणि थोडेफार इंटरनेटवर केलेल्या इतर शोधावर आधारीत असेलः
१. प्रशांत भूषण यांचे The Case That Shook India: The Verdict That Led To The Emergency
२. कुलदीप नय्यर यांचे Judgment: Inside Story of the Emergency in India .
खरं सांगायचं तर प्रशांत भूषण आणि कुलदीप नय्यर हे दोघेही मला आवडत नाहीत- म्हणजे त्यांचे राजकीय विचार मला आवडत नाहीत/ पटत नाहीत. तरीही या दोन पुस्तकांमध्ये 'फॅक्ट्स' म्हणजे घटना जशा घडल्या त्याचाच परामर्श आहे. त्यामुळे या दोन पुस्तकांना आधार घेण्यात मला तरी काही गैर वाटत नाही. तसेच १९७० ते १९७६-७७ पर्यंत इंदिरा गांधींच्या काँग्रेसकडून Socialist India नावाचे एक साप्ताहिक प्रसिध्द केले जायचे. इंदरकुमार गुजराल, नंदिनी सत्पथी वगैरे काँग्रेसचे नेते या साप्ताहिकाशी निगडीत होते. त्याचे अंक गुगल बुक्सवर बघायला मिळाले. त्याचाही संदर्भ घेतला आहे.
आताचा बेत असा आहे की १ जूनपासून लेखमालेचे भाग इथे टाकायला सुरवात करेन. १२ जूनला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला ४६ वर्षे पूर्ण होतील. त्या दिवशी तो निकाल आला हा भाग येईल. तो लेखमालेतील नववा भाग असेल. हे सगळे भाग लिहून तयार आहेत. १२ ते २५ जून १९७५ पर्यंत म्हणजे आणीबाणीची घोषणा होईपर्यंत नक्की काय घडामोडी घडल्या याविषयीही वेळ मिळाल्यास लिहिणार आहे. मात्र आणीबाणी लादली हा भाग बरोबर २५ जूनला येईलच याची खात्री आता देऊ शकत नाही कारण पुढचे भाग लिहून व्हायचे आहेत. कुलदीप नय्यर यांनी आणीबाणीवर इतरही काही पुस्तके लिहिली आहेत. ती वाचून त्या पुस्तकांचाही संदर्भ जमल्यास घेईन. पहिले १० भाग त्या खटल्याशी आणि निकालाशी संबंधित असल्याने त्यात कायदेशीर गोष्टी येतील. कायदा या विषयात मी कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी त्या विषयात भरपूर रस मला आहे. हे भाग रटाळ आणि कंटाळवाणे होणार नाहीत याची शक्य तितकी काळजी घेऊन पहिले ९ भाग लिहून तयार आहेत. तसेच तेव्हाच्या घटनांमधील पात्रांचा आताच्या काळातील कोणाशी संबंध आढळला तर त्याविषयीही लिहिणार आहे.
तेव्हा बोका-ए-आझमच्या स्मृतीस अभिवादन करून या लेखमालेची सुरवात करत आहे. पहिल्या भागात भेटू १ जूनला.
वर्गीकरण
वाचने
17662
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
सविस्तर येऊ द्या
वा !
उत्तम सुरूवात! उत्सुकता!
शुभेच्छा!
इतिहास नक्कीच.
वाट बघतोय
अरे वा! मस्त होईल लेखमाला!
अरे वा वा...
.
In reply to अरे वा वा... by सुखी
🙏
वाट बघतोय
सुरेख सुरुवात.
बोका-ए-आझम हे मिपावरील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते
तुमचे लेख म्हणजे मेजवानीच.
वा छान.
वाह
आन दो
चंसुकु,
शुभेच्छा!
बोका-ए-आझमच्या शी माझ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennonसहमत
In reply to बोका-ए-आझमच्या शी माझ्या by मदनबाण
लेखनाला मनापासून शुभेच्छा.
प्रास्तावना
लेखमालेला खुप साऱ्या शुभेच्छा
कायदा या विषयात मी कोणतेही
कायदा या विषयात मी कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी त्या विषयात भरपूर रस मला आहे.माझेही असेच आहे. मालिका विषय माझ्या जन्मापूर्वीचा असला तरी वाचायला आवडेल. पुढच्या भागाची वाट बघतोय.लेखमालेस शुभेच्छा
लेखमाले बद्दल खूप शुभेच्छा
बोकाशेठ यांना या मालिकेतून
आपल्या लेखमालेस शुभेच्छा.
बाकी आणीबाणीच्या सरकारी छळाचा
१२ ते २५ जून १९७५ पर्यंत
वा, शुभेच्छा!
छान.
आपले वय ६५ पेक्षा कमी असेल तर
गुजरातचे आंदोलन
In reply to आपले वय ६५ पेक्षा कमी असेल तर by सर टोबी
इथे पहा...
In reply to गुजरातचे आंदोलन by प्रदीप
प्रश्न.
In reply to आपले वय ६५ पेक्षा कमी असेल तर by सर टोबी
आणीबाणीवरील लेख हा आपल्या
In reply to आपले वय ६५ पेक्षा कमी असेल तर by सर टोबी
आणीबाणीवरील लेख हा आपल्या मनाच्या सच्चेपणाचा कस पाहणारे आव्हान असेल.म्हणजे आणिबाणी हा खूप चांगला निर्णय होता, ते अनुशासन पर्व होते, त्या काळात देशाची प्रचंड प्रगती झाली, आणिबाणीचे सर्व जनतेने उस्फूर्त स्वागत केले होते, त्या काळात जनता अत्यंत आनंदी होती, पोलिस अत्यंत सौजन्यशील होते, त्या काळात समाजहिताचे असंख्य निर्णय घेतले होते . . . असे लिहिले नाही तर ते लेखन खोटारडेपणा समजला जाईल.आणीबाणीचा उद्देशच सत्ता
शुभेच्छा.
आशिर्वाद
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगली गोष्ट
In reply to आशिर्वाद by प्रदीप
लेख एकाच बाजूने विचार करून लिहिले नसावेत
स्वागत
“इंदिरा गांधींविरोधात न्यायालयानं दिलेला ‘तो’ निर्णय प्रचंड हिंम
आणीबाणी जाहीर करणे
राज्य घटने प्रमाणे वागणे
In reply to आणीबाणी जाहीर करणे by Rajesh188
देशात आणीबाणी जाहीर करून त्या
In reply to आणीबाणी जाहीर करणे by Rajesh188