३) ज्या लेखाला प्रतिसाद दिला आहे तो लेख वरवर सरकत जातो,त्याचीजागा बदलू नये असे वाटते.
४) चर्चेतील प्रतिसादांना अक्ष्रराला रंग देता यावा तो टूल बार दिसत नाही ?
५)सदस्याच्या नावापासून पुढे (खरडवही ते गमन) आणि हजर सभासदांची नावे निळा रंग प्रयोग म्हणून करुन पाहिला तर जमेल का ?
मी जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये मिसळपाव बघते, तेव्हा प्रतिसाद बघताना कधीकधी आडवे स्क्रोल करावे लागते, वाक्ये दर्शनी भागाच्या पुढे जातात. हे न होता त्याची रूंदी (width ) निश्चित केल्यास ते चांगले दिसेल आणि सोयीचे जाईल.
३) ज्या लेखाला प्रतिसाद दिला आहे तो लेख वरवर सरकत जातो,त्याची जागा बदलू नये असे वाटते.
हे बिरूटेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणेच.
>>आडवे स्क्रोल करावे लागते
अगदी क्वचीत असे होते व ते कसे ते पण सांगतो. उदा. विकास आराखडा जर का मूळ लेखात कोणी मोठे चित्र टाकले तर मूळातच ते मॉठे होते म्हणजे आडवे स्क्रोल करावे लागते मग त्या अनुषंगाने खालील. सगळ्याच इतर मधे असे नाही करावे लागत, बरोबर? सगळ्यात तसे होत असेल तर आपल्या इंटरनेट एक्सप्लोरर जरा काही तरी सेटींग बघावे. कदाचीत नीलकांत जास्त सोपा उपाय सांगेल
>>तो लेख वरवर सरकत जातो
मला हा प्रकार आवडतो, म्हणजे स्क्रोल न करता लेटेस्ट चर्चा कूठे आलि ते कळते. सॉर्ट बाय "अंतीम (बरेचदा प्रतीसाद)लेखन" हे सेटींग आहे. बघ बूवा नीलकांत इतर लोकांनापण वाटले तर कर बदल म्हणजे सॉर्ट बाय लेटेस्ट "अंतीम मूळ लेखन"
बाकी गूड जॉब नीलकांत टेक इट इझी.
१)संकेतस्थळाची आडवी स्थानमर्यादा अंकात बांधलेली नाहिये. त्याला तांत्रीक भाषेत लिक्वीड सीएसएस असे म्हणतात. ही स्टाईलशीट संगणकाच्या रिझोल्युशन प्रमाणे स्वतःला तडजोड करते.
त्याचा फायदा हा की कमी रिजोल्युशनच्या संगणकावर सुध्दा संकेतस्थळ सरासरीने छान दिसतं. जास्त रिझोल्युशन मधे तर उत्तम दिसतंच. सध्या हे संकेतस्थळ 1024x768 या मधे उत्तम दिसतं.
२) लेखाला प्रतिसाद दिल्या गेला की तो लेख वर यावा म्हणजे नव्या प्रतिसादांसाठी वेगळी कळ द्यावी लागणार नाही आणि जे लेखन जुनं असूनही जिवंत आहे ते तात्काळ लोकांसमोर येईल . ही या लेखांच्या सरकत्या जागे मागची प्रेरणा.
- मिसळपावच्या कार्यशैली प्रमाणे , जर लोकांनी ही नवी पध्दत नको असं नोंदवल्यास तसे बदल केल्या जातील. पण लोकांना हे का आवडत नाहिये ते तर कळू द्या !
लिक्वीड सीएसएस बद्दल कळले.
पण लोकांना हे का आवडत नाहिये ते तर कळू द्या !
तुमचा मुद्दा पटला. पण आत्ताच असे झाले की सगळ्या नव्या लेखनाच्या यादीतून हाच लेख शोधायला वेळ लागला (तो खाली गेल्याने). अर्थात याला workaround आहे की जुन्या लेखाचा keyword देऊन "शोध" कदाचित घेता येईल, पण त्यासाठी शोध येथे पाहिजे.
असो. तुमचे काम वाढवण्याचा हेतू नाही - झालंच तर मदत होईल ही दृष्टी.
वरच्या समासात उजव्या बाजूला एक मेन्यु दिलेला आहे. त्यात लेख, चर्चा , काव्य अशी विभागणी आहे आणि त्यात लेख 'नवीन वर - जूना खाली' या पध्दतीने आहेत. तेथे प्रतिक्रिया दिली तरीही लेखाची जागा बदलत नाही. एखादा लेख तेथे शोधता येईल.
थोड्याच दिवसात शोध सुविधा देता येईल.
तात्या,
आपण आधी कबूल केल्याप्रमाणे सध्याच्या चालक नियुक्त पंचायत समितीची नावे जाहीर करावी.
एकदा लोकनियुक्त पंचायत झाली, की मग ती नावे जाहीर असतीलच.
- सर्किट
तात्या नावे जाहीर करतीलच.. पण तात्यांच्या आज दुपारीच आलेल्या व्यं. नि. ला मान देउन आम्ही पंचायत समितीचे सदस्यत्व "तात्पुरते" स्विकारले आहे. रसिक सभासदांनी ह्याची नोंद घ्यावी आणि तात्यांनी हे स्थळ स्थिर स्थावर झाले आहे असे वाटल्यास लवकरात लवकर निवडणुका घ्यावात.
-वरूण वैद्य (सभासद नाम -कोलबेर)
----------------------------------------------------------------------------
मिसळ पाव हाटेलाला पडदा नाही प्रत्येक सभासदाला मुदपाकखान्यात डोकावून बघता येते.
ह्या पूर्वी एका संचालकाला आम्ही "संपादकांची नावे जाहीर करावीत" अशा केलेल्या जाहीर विनंतीला संपादकांची जाहीर उत्तरे आली नाहीतच, पण संचालकांचे "संपादक मंडळाला आपली नावे जाहीर न करता अधीक चांगले काम करता येईल असे वाटते" असे खाजगी उत्तर आले होते. त्या पार्श्वभूमीवर येथील दोन पंचायत सदस्याम्ची जाहीर उत्तरे आलेली पाहून आम्हाला संतोष झाला.
- सर्किट
तात्यांच्या व्यं. नि. ला मान देउन आम्ही पंचायत समितीचे सदस्यत्व "तात्पुरते" स्विकारले आहे. रसिक सभासदांनी ह्याची नोंद घ्यावी आणि तात्यांनी हे स्थळ स्थिर स्थावर झाले आहे असे वाटल्यास लवकरात लवकर निवडणुका घ्यावात.
नीलकांत.
4 मिनीटे 33 सेकंद "वेळ" आधी
असे दिसत आहे. ह्यातील "वेळ" हा शब्द out of place वाटतो.
अंक शक्यतो मराठीमध्येच असावेत. सध्या केवळ १ हा अंक मराठीमध्ये दिसतोय. त्याचप्रमाणे नवीन प्रतिसादासाठी "4 new" हे ही मराठीच हवे.
तसेच, येथे फक्त स्वगृह हा पर्याय उपलब्ध आहे, मुख्यप्रॄष्ठ ला कसे जायचे?
आदरणीय तात्यासाहेब, नीलकांतराव, कवी नीलहंस आणि मिसळपाव चमू,
नवीन संकेतस्थळाच्या शुभारंभाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! ह्या संकेतस्थळास हार्दिक शुभेच्छा.
आपला
(हर्षभरित) प्रवासी
खरडवही मध्ये काढून टाका हा पर्याय शक्यतो उजव्या बाजूस असावा.
काही खेळांचे सॉप्टवेअर सोडले तर नकारात्मक गोष्टी उजवीकडे असतात. नो, डिलिट वगैरे.
भारतात मात्र 'डाव्यां'नी ती (नकारात्मक)आघाडी सांभाळली आहे.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
प्रवेश प्रतिबंधीत
तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही.
काही ठिकाणी असे का आहे?? अनेक गोष्टी अनेक ठिकाणी वाचता येतात. पण काही गोष्टी इतक्या अवाचनीय आहेत का??
ध्रुव
पाहूणे आणि सदस्य अशी ढोबळ विभागणी आहे. सदस्य नसलेल्या लोकांना मर्यादीत प्रवेश आहे. तुम्ही सदस्य म्हणून येण्याची नोंद केलेली असेल आणि एखाद्या दुसर्या खिडकीत जाण्याची नोंद केल्यास तुम्हाला सदस्याची मुभा नाहीशी होते. मात्र आधिक उघडलेल्या खिडकीत काही सदस्यांसाठी असलेले दूवे सक्रिय असू शकतात. आता सदस्य नसतांना तुम्ही जर त्यावर टिचकी मारलीत तर तुम्हाला वरचा संदेश दिसेल.
या उप्पर तुम्ही हा संदेश कुठे दिसला आणि त्यावेळी तुमचे वर्तमान (स्टेटस) काय होते? म्हणजे येण्याची नोंद केलेली होती? नव्हती , या बद्दल माहिती द्या. म्हणजे नेमके सांगता येईल.
१) मी पाहिलेल्या आतापर्यंत साठवण्याची पद्धत ही मायबोलीवरची सर्वात चांगली आहे.
अशी पद्धत असेल तर खुप सोप जात जुणे लेख वाचणे किंवा ४-५ दिवसापुर्वीचे वाचणे ह्यासाठी. अशी पद्धत वापरता आली तर बरच आहे.
ह्याच त्रासामुळे (अर्थात हा फक्त मला वाटत असेल) मी मनोगतावर फक्त वाचक आहे. आणि फक्त नवीनच वाचु शकतो. जुणे शोधण त्रासदायक आहे तिकडे. म्हणुन मी तिकडे पडिक नसतो. मायबोलीवर मात्र मी पडीक असतो. मिसळ पाव वर पण पडिक व्हायला आवडेल :)
२) इन्ग्रजी लिहिण्यासाठी एखादा शॉर्ट कट हवा. प्रत्येक वेळी त्या ड्रॉप डाउन बॉक्स मधे जाण त्रासदायक होतय. त्यापेक्षा दोन किंवा तीन कि वापरुन शॉर्ट कट कधीही बरा.
३) इकडे काही लोक येवुन तमाशा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याना वॅटेज देवु नये आणि पर्सनली हल्ला तर अजिबात करु नये. याने नवीन लोकाना साइट विषयी गैरसमज होउ शकतात. :)
४) वेगवेगळे विभाग असावेत जसे की गद्य,पद्य्,ललित्,अनुभव असे. आणि ते मेन पेज वर दिसावेत.
असो सध्या तरी एवढच.. अजुन काही असेल तर सांगेनच. :)
मिसळ पाव आवडणारा झकासराव पाटिल :)
मी जवळपास २ आठवड्यांनी मिसळपावचा सदस्य झालो. त्यात भरपूर लेख वाचायचे बाकी होते. इथे मला मागून सुरूवात करावी लागली.
काही लेख मी मधुनच निवडले. त्यात आता प्रत्येक प्रतिसादानंतर त्यांचा क्रम बदलतो.
असे काही करता येईल का जेणेकरून मी न वाचलेले किंवा एखादा प्रतिसाद न वाचलेले लेख वेगळ्या प्रकारे शोधून तेच मी एका मागोमाग वाचू शकेन?
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)
असे जे टॅब्ज वरच्या उजव्या कोपर्यात आहेत, तेथील लेख/कवितांचा क्रम प्रतिसादांप्रमाणे वर-खाली होत नाही. हव्या त्या टॅबवर क्लिक करून तुम्हाला कालानुक्रमे वाचन करता येईल.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
माझे म्हणणे होते की फक्त नवीन्/अद्ययावत लेख (जे मी वाचले नाहीत) शोधता येईल का?
जे टॅब्ज/दुवे वरच्या उजव्या कोपर्यात आहेत, त्यात फक्त लेखांची नावे दिसतात. परंतु कोणते नवीन आहेत किंवा कशात किती नवीन प्रतिसाद आहेत ते कळत नाहीत.
नमस्कार,
आपले एक नवीन मिसळपाव सदस्य दोनदिवसापासून भयंकर वाचन करुन प्रतिसादही देत आहेत. त्यांच्या वाचनाबद्दल, प्रतिसादाबद्दल आक्षेप नाही. पण त्यांच्या प्रतिसादांनी जूने लेख मुख्यपानावर आले आणि एखादा नवीन लेख हा फार मागे जातो आहे.असे एकाच वेळी नवीन चारपाच सदस्य आले आणि प्रतिसाद देत गेले तर जरा गोंधळ होईल असे वाटते, त्यात काही तरी बदल केले पाहिजे असे वाटते ! (लेखांची जागा बदलू नये असे वाटते आणि नवीन प्रतिसाद कोणाचा आहे,हेही पाहता आले पाहिजे )
स्वगृहाच्या पानावरही अंतिम प्रतिसाद कोणाचा आहे,ही पाहण्याची सोय झाली पाहिजे आणि प्रतिसाद देणा-याच्या ठिकाणी लेखक ऐवजी अंतिम प्रतिसाद (किंवा दुसरा कोणताही)असा शब्द करता येईल का ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडक्यात आणि स्पष्ट सांगायचे झाले तर मनोगतावर काव्य, गद्य इ. लेखनप्रकारानुसार केलेल्या गटांमध्ये कालानुक्रमे लेखन आणि दैनंदिन लेख सदरात अंतिम प्रतिसाद, त्या दिवसातले प्रतिसाद, त्या दिवसातले लेखन अशी सोय हवी.
(सुस्पष्ट)बेसनलाडू
तर मनोगतावर काव्य, गद्य इ. लेखनप्रकारानुसार केलेल्या गटांमध्ये कालानुक्रमे लेखन आणि दैनंदिन लेख सदरात अंतिम प्रतिसाद, त्या दिवसातले प्रतिसाद, त्या दिवसातले लेखन अशी सोय हवी.
कृपया मनोगताशी किंवा इतर कुणा संकेतस्थळाशी तुलना नको असे वाटते! मनोगत हे एक थोर संकेतस्थळ आहे यात काहीच वाद नाही.
उद्या आम्ही जर असं म्हटलं की मिसळपावप्रमाणेच मनोगतानेही त्याचा कारभार कुणाच्या हाती आहे, त्यात कोण कोण मंडळी प्रशासक म्हणून कार्यरत आहेत, हे जाहीर करावे तर मनोगत तसे करणार आहे काय? लाडूसाहेब, मिसळपावचा दाखला देऊन आपण हाच प्रश्न मारे सुस्पष्टपणे वगैरे मनोगतावर विचारणार आहात काय? किंबहुना, प्रशासकीय धोरणांबाबत मिसळपावचा दाखला देऊन विचारलेला प्रश्न मनोगतावर छापला जाईल किंवा नाही याचीच शंका आहे!:) असो..
तेव्हा कृपया तुलना नको असे पुन्हा एकदा वाटते!
असो, बाबारे नीलकांता जरा वेळ काढून या सदरात विचारलेल्या/उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांकडे तू लक्ष द्यावेस आणि ग्रामस्थ मंडळींना योग्य तो खुलासा करावास अशी तुला नम्र विनंती!
तात्या.
तात्या, तरीही मुखपृष्ठावरील अनुक्रमणिकेची मांडणी लेख / कविता प्रसिद्ध झाल्याच्या अनुक्रमाने असावी आणि प्रतिसादांप्रमाणे असू नये असे वाटते. ते सर्वांसाठीच सोयीचे आहे.
कृपया याचा विचार व्हावा.
साती
लाडूसाहेब, मिसळपावचा दाखला देऊन आपण हाच प्रश्न मारे सुस्पष्टपणे वगैरे मनोगतावर विचारणार आहात काय? किंबहुना, प्रशासकीय धोरणांबाबत मिसळपावचा दाखला देऊन विचारलेला प्रश्न मनोगतावर छापला जाईल किंवा नाही याचीच शंका आहे!:) असो..
--- हाहाहा! हा प्रश्न मला तुमच्याकडून अपेक्षितच होता! नाही, मुळीच विचारणार नाही. प्रशासकीय कात्री कुठे कशी लागेल याची खात्री आहे, तिकडे कुठली मते मांडायची आणि कुठली नाही, हे समजण्याइतकाही अनुभव माझ्याकडे नाही, असे मला वाटत नाही. दुसरे असे, की मनोगताचा दाखला येथे देऊन मी फक्त येथील तांत्रिक बाबतीत सुधारणेसाठी असलेला वाव लक्षात घेतला आहे. तोही सदस्यांच्या वाचनाबाबतच्या गरजा भागवण्यासाठी. प्रश्नबिश्न विचारायचा मुद्दा येथे मध्ये येतोच कुठे आणि कसा? की मनोगताचा दाखला एखाद्या चांगल्या गोष्टीसाठीही देणे लोकशाहीप्रिय मिसळपाववर वर्ज्य आहे? जेथे जो प्रश्न विचारायचा तेथे तो मी विचारलाच आहे :) कुठे उत्तराची अपेक्षा करायची तिकडे ती केलीही आहे. आणि इर्रेस्पेक्टिव ऑफ दि ऍन्सर, माझ्या मतांची सुस्पष्टता आणि प्रामाणिकपणा माझ्यासाठी जास्त मोलाचा आहे.
दुसरे असे, की मिसळपावची मनोगतशी तुलना करायचा मुळीच उद्देश नाही. पण मनोगतावा जर काही चांगले असेल, तर त्याचा दाखला येथे देणे मला गैर वाटत नाही. किंबहुना मिसळपावची तांत्रिक बाजू सदस्यांच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने अधिक बळकट होण्यासाठी तसे करणे प्रसंगी क्रमप्राप्तही ठरते. मात्र मनोगतावर मिसळपावसंबंधी काही लिहावयाचे झाल्यास आणि प्रशासकीय कात्री लागेल, असे वाटल्यास मी ते तिकडे लिहूच कशाला?
(स्पष्टवक्ता)बेसनलाडू
प्रश्नबिश्न विचारायचा मुद्दा येथे मध्ये येतोच कुठे आणि कसा? की मनोगताचा दाखला एखाद्या चांगल्या गोष्टीसाठीही देणे लोकशाहीप्रिय मिसळपाववर वर्ज्य आहे?
अहो वर्ज्य असतं तर तुमचा प्रतिसाद इथे राहिलाच नसता! Right?:))
इतर कोणत्याही थोर थोर संकेतस्थळांचे दाखले इथे देऊ नयेत हे माझं वैयक्तिक मत आहे! बाकी आपलं चालू द्या! इतर संकेतस्थळांचे आपल्याला अगदी हव्वे तितके गोडवे गा! मिसळपावला ते वर्ज्य नाही!! तात्याची आणि मिसळपावची मतं वेगवेगळी आहेत! कृपया माझं मत हे मिसळपावचं अधिकृत मत धरू नये!
मात्र मनोगतावर मिसळपावसंबंधी काही लिहावयाचे झाल्यास आणि प्रशासकीय कात्री लागेल, असे वाटल्यास मी ते तिकडे लिहूच कशाला?
हा हा हा! हे खरं आहे! आमचा शक्तिवेलू फोकलिचा अगदीच कोत्या मनाचा आहे!:)
तात्या.
बाकी आपलं चालू द्या! इतर संकेतस्थळांचे आपल्याला अगदी हव्वे तितके गोडवे गा! मिसळपावला ते वर्ज्य नाही!!
गोडवे गाणे आणि सुधारणेदाखल दाखला देणे या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत काय? गोडवे गायचे असते, तर पानभर लेख, कविता लिहिल्या नसत्या काय? कृपया पूर्वग्रहांच्या भरात साध्या गोष्टींचा विपर्यास न करता नीट विचार करूनच मग टोलेबाजी करायला हवी.
(टोलेबाज)बेसनलाडू
येथे नवीन सदस्यांना आमंत्रित करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून या संकेतस्थळाविषयी अनभिज्ञ मित्रांना आमंत्रण-पत्र पाठवण्याची सोय होईल आणि संकेतस्थळाचा लौकिकही वाढेल.
- आपला,
नवा गडी नवं राज्य
काहि आवडिचे लेख, चर्चात्मक लेख यांना बूकमार्क करण्याची सोय द्यावी,
जेणेकरुन मुखप्रुष्ठावरुन तो लेख हुडकण्यात वेळ जाणार नाही.
अर्थात सदस्याच्या 'वाटचाल' मधे त्याचे लेख दिसतातच!
पण जसजशी वाटचाल पूढे सरकेल, तशी तिथेही गर्दी दाटेल!
यशोदेचा घनश्याम
नमस्कार,
आज काही नवीन सोई येथे देत आहोत.
तुम्हाला हवा तो लेख मित्रांना पाठवण्याची सोय आता आहे.
मुद्रणसुलभ आवृत्ती दिलेली आहे.
दोन नवे ट्रॅकर लावले आहेत. मुख्य पानावर खाली वर न जाणारा आणि डाव्या बाजूच्या समासात नवे लेखन म्हणून पहिल्या सारखा प्रतिक्रिया आल्यावर वर-खाली जाणारा आहे.
ह्या सुविधांत काही तृटी आढळल्यास कळवावे ही विनंती.
मतपत्र आणि संपादक लवकरच देण्याचा प्रयत्न आहे.
तात्या आणि मिसळपाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन! आत्ताच या संकेतस्थळाचा सदस्य झालो आहे.
न लगे मुक्ती आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
घोषवाक्य मिसळपावाच्या तर्रीसारखे झणझणीत आहे, :)
मिसळपावच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
शुभेच्छुक,
शैलेश
भाईकाका एकदा म्हणाले होते की, "सभ्य, सुसंस्कृत, विनम्र माणूस कसा असतो, कसा दिसतो, असं जर मला कुणी विचारलं तर मी पटकन 'जयंत नारळीकर' असं उत्तर देईन!"
त्याच चालीवर असं म्हणावंसं वाटतं की, "सभ्य, सुसंस्कृत, विनम्र माणूस कसा असतो, कसा दिसतो?" असं तात्याला जर कुणी विचारलं तर तात्या पटकन 'शैलेश खांडेकर' हे उत्तर देईल! :)
असो, शैलेशरावांसारख्या प्रतिभावंताचे, शब्दप्रभूचे, आणि खंद्या 'मराठी'प्रेमीचे मिसळपाववर मन:पूर्वक स्वागत! त्यांनीही येथे उत्तमोत्तम लेखन करावे आणि मिसळपावची शोभा वाढवावी अशी त्यांना नम्र विनंती!
--तात्या अभ्यंकर.
त्याच चालीवर असं म्हणावंसं वाटतं की, "सभ्य, सुसंस्कृत, विनम्र माणूस कसा असतो, कसा दिसतो?" असं तात्याला जर कुणी विचारलं तर तात्या पटकन 'शैलेश खांडेकर' हे उत्तर देईल! :)
अगदी सहमत! खरंतर नारळीकरांच्या आणि खांडेकरांच्या चेहर्यात साम्य आहे असंही वाटून गेलं मला आताच. ;-)
मी शैलेशरावांना प्रत्यक्ष भेटलोय !
आणि प्रियालीताईंनी सांगितलंय हे मला आत्ताच चमकलं..
सज्जन दिसतो कसा, सज्जन वागतो कसा, वगैरे कुण्या भ्रमित अर्जुन्याने मला विचारले, तर मी शैलेशरावांकडे पाठवीन त्या बेण्याला.
- (सारथी) सर्किट
एखाद्या लेखास नवीन प्रतिक्रिया मिळाली की अनुक्रमणिकेत त्या लेखाच्या प्रतिसाद स्तंभात (column) किती नवीन प्रतिक्रिया आहेत ते दिसते. त्या दुव्यावर टिचकी मारली असता त्या लेखातील पहिल्या नवीन प्रतिसादावर आपण पोहोचविले जातो. हे छान आहे.
किंतु सध्या काही लेखांत मी नवीन प्रतिक्रियेच्या दुव्यावर टिचकी मारली असता, त्या प्रतिक्रियेवर जाणे होत नाही आहे. आपण लेखावर पोहोचविले जातो. :(
आणि मी पाहिल्याप्रमाणे ज्यात १ पानाच्या वर प्रतिसाद आले आहेत त्यात हे घडत आहे. बाकीचे नीट तपासले नाही.
वरचा प्रतिसाद २ र्या पानावर आहे.
१ नवीन वर टिचकी मारल्यावर, पहिल्या पानावरच्या लेखावरच आलो.
२ र्या पानावर आल्यावरही, प्रतिसादासमोर नवीन असे दिसत नव्हते.
प्रतिक्रिया
विनंती !
दुरुस्ती..
आडवे स्क्रोल
अहो
स्क्रोल आणि प्रतिसाद
लिक्वीड
वरच्या समासात..
पंचायत समितीची नावे
पंचायत समिती
जियो !!!!
आम्हीही
मस्त !!
नीलकांतराव,
मीही...
गद्य आणि पद्य
वर उजव्या बाजूला...
अंतिम लेखन
मुख्यप्रॄ
हार्दिक अभिनंदन
खरडवही
प्रवेश प्रतिबंधीत
नेमके कुठे दिसले ते कळेल का?
ते पान
प्रभारी पंचायत समीतीमधी
प्रतिक्रिया आणि प्रतिसाद
नील
ईंग्रजी
माझ्या सुचना
माझ्याकडून...
साहित्य/काव्य/चर्चा
माझे
मिसळपाव समिती लक्ष देईल काय !
थोडक्यात
तुलना नको,
तरीही!
मुळीच नाही
माझं वैयक्तिक मत!
पुन्हा तेच!
नवीन आमंत्रणे
आवडते लेख
नवीन सोई...
अरे वा
मस्त
अभिनंदन
शैलेशरावांचे हार्दिक स्वागत...
हाहा! एकदम सहमत
मी प्रत्यक्ष पाहिलय
नवीन प्रतिक्रिया...
सहमत....... तसेच झाले!
लिहायचे राहिले...