(आर्टिकल २९०: ध्वनिप्रदूषण आणि गावातील शांतता !)
प्रेरणा:
आमच्या इथे मिरवणुकांचा भरपूर त्रास आहे. पोलिस डीजे प्रेमी कार्यकर्त्यांना अगदी बड्डे, जयंती मयतीसाठी मिरवणुकीची परवानगी देतात. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना आता गाण्यांच्या तालावर नाचायची जणू सवय लागली आहे. येता जाता मग ते डीजे लावून मिरवणुका काढत आहेत. त्यामुळे जागरण आणि प्रकृतीच्या तक्रारी हा अनेकांचा रोजचा कार्यक्रम झालाय. पोलिसांना कळवले तर त्यांनी किरकोळ गुन्हे दाखल करून सर्वांना परत सोडून दिले. कार्यकर्त्यांचे डीजे लावून गोंधळ करणे ही नैसर्गिक गोष्ट आहे तिच्यात आम्ही फार काही करू शकत नाही. दिवाळीत किंवा निवडणुकीआधी सगळे गुन्हे मागे घेतले जातात असे मला सांगितले गेले आहे.
आपल्या संविधानात सेक्शन 290 आहे. त्यानुसार:
Punishment for public nuisance in cases not otherwise provided for.—Whoever commits a public nuisance in any case not otherwise punishable by this Code, shall be punished with fine which may extend to two hundred rupees.
या नुसार आपण या नाचप्रेमींना रस्त्यात मोठ्याने गाणी लावणे, त्या तालावर किंवा ताल सोडून मुक्तपणे नाचणे यावर संपूर्ण बंधने आणू शकत नाही. आता खरे तर संविधानातील आर्टिकल २९० हे आपण कसे interpret करतो त्यावर बरेचसे अवलंबून आहे. डिजेप्रेमींनी रस्त्यावर न येता मैदानावर किंवा बंदिस्त सभागृहात रीतसर परवानगी घेऊन नाचावे आणि त्याच्या साठी आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करून घ्यावी आणि बाहेर शांतता राहील असे बघावे असे आम्ही त्यांना सुचवले. पण ते धार्मिक उत्सवा आडून शांतता पाळण्यास तयार नाहीत. कार्यकर्त्यांना नाचायचे असेल तर आमची तशी हरकत नाही पण ते त्यांनी रस्त्यावर डीजे लावून न नाचता गावाबाहेर जाऊन नाचावे अशी विनंती आम्ही आमच्या गावातील पुढाऱ्यांना केली. पण त्यानी सेक्शन 263, 290 चा आधार घेऊन आम्ही त्यांना अडवू शकत नाही, दोनशे रुपये दंड फारतर करू शकतो असे सांगितले.
मी वकिलाचा सल्ला घेतला तर जवळपास सर्व कायदे कार्यकर्त्यांच्या बाजूने आहेत असे समजले.इलेक्ट्रॉनिक नोईज जनरेटर वापरायचा सल्ला मिळाला आहे. त्यानं म्हणे कर्कश्य आवाज होऊन ते गाणी बंद करतील.. पण हे कितपत परिणामकारक असतात ते इथे कोणास माहित आहे का ? आणि जर मी हे सिग्नल जनरेटर वापरले तर एखाद्या नाचोत्सुक कार्यकर्ता अभिव्यक्ती संरक्षक आर्टिकलचा भंग केल्यासारखे होईल का ?
यावर मध्यम मार्ग कोणता ?
शिवाय "एक नागरिक म्हणून आपल्याकडून समाजातील इतर लोकांना उपद्रव होणार नाही, अशी दक्षता मी घेईन " अशा अर्थाचे ही काही आर्टिकल संविधानात आहे का? सवाई गंधर्व संगीत महोत्सव आला की अनेकांना बरोब्बर शांतता कशी आवश्यक आहे याचा साक्षात्कार होतो..
आता यावर काही उपाय मिळेल, की 'डीजेवाले बाबू मेरा गाना बजाव' म्हणून आपणही वर्षानुवर्षे नाचत राहायचे?
प्रतिक्रिया
ही सोनिक कॅनन तयार करता येते
सोनिक कॅननचा सेफ्टी लॅच
आपल्या संविधानात? सेक्शन 290
विडंबन हाय.. अशे बदल करायला
एक जालिम उपाय..
समजा मिरवणूक बंद करायच्या
यांचीच मिरवणूक काढायची वेळ
हे विडंबन नाहीये तर वस्तुस्थितीच आहे.
आमच्या ओळखीच्या एका
आपण भारतीय लोक फार गोंगाट
सविस्तर लिहा ना शांततेविषयी
+१
काचा बंद करून आतमध्ये टाचणी
+१
मला इतर बाबीन्चा अन्दाज असल्याने
Finesta कंपनीचे साऊंड प्रूफ
माहीती बद्दल धन्यवाद