✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

#तू म्हणालास...

प — प्राची अश्विनी, Tue, 05/18/2021 - 09:28
तू म्हणालास, पाऊस मला मुळी सुद्धा आवडत नाही. चिखल ओला सगळीकडे, एक काम होत नाही. ऐकून इकडे माझ्या डोळ्यात काळे ढग जमून आले. बरसणार होतेच पण मी निग्रहाने घालवून दिले. पाऊस म्हणजे वेडेपणा, खूप मस्ती तुझ्या कुशीत, पाऊस म्हणजे कटींग चहा अर्धा कप अर्धा बशीत. पाऊस म्हणजे चिंब मी, थोडी धीट थोडी भित्री. पाऊस म्हणजे आशिकीच्या पोस्टरवरची मोठ्ठी छत्री पण तुझ्यासारखं असं कुणी पावसावरती रुसतं का? भिजणं बिजणं सोडून कोरडं पावसात घरी बसतं का? तेव्हापासून रागावून मी एक्कही मेसेज केला नाही वाटलं तुझा येईल .. वाट पाहिली ....आला नाही. .... आज पुन्हा अवेळीच पाऊस वेडा बरसत आहे. आज पुन्हा मोबाईलवर तुझा नंबर शोधत आहे..

प्रतिक्रिया द्या
11552 वाचन

💬 प्रतिसाद (17)

वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/18/2021 - 12:14 नवीन
आवडला पाऊस. आशय तर थेट पोहचला. काल आभाळ भरून आल्यावर अशाच आठवणींचे ढग धावत होते. क्लास माहोल होता. आणि ही कविताही तितकीच आवडली. उसकी यादें कांच के टुकड़े और मेरा ईश्क नंगे पैर...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अहाहा...! क्लास, सुरेख रचना.

प्रचेतस
Tue, 05/18/2021 - 12:44 नवीन
अहाहा...! क्लास, सुरेख रचना.
  • Log in or register to post comments

छानच!

Bhakti
Tue, 05/18/2021 - 13:01 नवीन
छानच! वातावरणच भारीये सध्या मलापण काल तुझ्याकडे येणारी वादळवाट/वारा प्यायलेली मुलगी अशा काही कविता सुचत होत्या ;)
  • Log in or register to post comments

पाउस न आवडणारा माणुस विरळाच .

प्रज्ञादीप
Tue, 05/18/2021 - 15:11 नवीन
पाउस न आवडणारा माणुस विरळाच ...बाकी कविता छान
  • Log in or register to post comments

भारीये

टवाळ कार्टा
Tue, 05/18/2021 - 15:16 नवीन
भारीये
  • Log in or register to post comments

ह्यातील पाऊस न आवडणारा

आगाऊ म्हादया......
Tue, 05/18/2021 - 18:41 नवीन
माणूस मीच आहे जणू. खरंच मला पाऊस आवडत नाही. ओलं, चिखल, न संपणारी सर्दी वगैरे ह्या मुद्द्यांशिवाय, आतून जे काही हिरवे कोंब फुटू पाहतात, हॉर्मोन्स जो नाच करतात ह्या वातावरणात त्यांच्यामुळे पुढे एखादं पाऊल घसरण्याची भिती जास्त वाटते. मेंदू कडून निर्णयक्षमता मनाकडे सरकू लागते. कविता मस्त जमलीय, आधीचं मी का लिहिलं? कुणास ठाऊक.
  • Log in or register to post comments

:))

माहितगार
Tue, 05/18/2021 - 18:53 नवीन
:)) कविता वाचून छान हसू आले. डोक्यावर कामाचे दडपण नसेल तर पावसाळी वातावरणासारखे वातावरण नाही. पण कामाचे दडपण असेल तर पावसाळी हवा केव्हा एकदा संपते आणि नेहमी पाऊस पडतो त्या चेरापुंजी का काय तिथले लोक कसे काम करत असतील असा प्रश्न पडतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपववून झाल्यावर पावसाळा सिझन मस्त असला तरी काम असतेच असते :)
  • Log in or register to post comments

उत्तम !

प्रसाद गोडबोले
Tue, 05/18/2021 - 19:10 नवीन
उत्तम ! विषय छन आहे , कविता उत्तम आहे , पण अजुन जास्त रोम्यँटिक करता आली असती . अवांतर : बाकी आजकाल वृत्तबध्द कविता आणि गझल येत नसल्याने अन मुक्तछंदाचे विडंबन करण्यात मजा नसल्याने मिपावरील कुशल विडंबकांची कुचंबणा होत आहे हे जाताजाता नमूद करु इछितो . :)
  • Log in or register to post comments

छान कविता

उपयोजक
Wed, 05/19/2021 - 14:52 नवीन
लिहित रहा. पुकशु
  • Log in or register to post comments

मला पाऊस आवडत नाही..

तुषार काळभोर
Fri, 05/21/2021 - 08:03 नवीन
पण मला ती आवडते. आणि तिला आवडतो म्हणून आताशा मलाही पाऊस आवडायला लागलाय. Image removed. - महाबळेश्वरच्या पावसाळी वातावरणाचा फॅन
  • Log in or register to post comments

मस्तच...

संजय पाटिल
Fri, 05/21/2021 - 10:36 नवीन
बर्‍याच दिवसानंतर एक मस्त कविता वाचायला मिळाली!
  • Log in or register to post comments

एकदम गारवाच

गॉडजिला
Fri, 05/21/2021 - 12:06 नवीन
....
  • Log in or register to post comments

छान

सुरिया
Fri, 05/21/2021 - 12:35 नवीन
छान
  • Log in or register to post comments

बऱ्याच दिवसांनी एक

कंजूस
Fri, 05/21/2021 - 14:26 नवीन
कविता कळली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!:)

प्राची अश्विनी
Fri, 05/21/2021 - 19:33 नवीन
धन्यवाद!:)
  • Log in or register to post comments

पाऊस म्हणजे......

कर्नलतपस्वी
Fri, 05/21/2021 - 20:08 नवीन
पाऊस म्हणजे कादां भजी गरमा गरम ताजी ताजी........ छान
  • Log in or register to post comments

:):)

प्राची अश्विनी
Sat, 08/21/2021 - 13:35 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा