मधाळलेल्या कुण्या मिठीची
चव लाघवी पीठीसाखरी,
झळा भोवती वैशाखी तरी
गोड सावली आम्र पाखरी.
एकच पुरतो कटाक्ष तिरका
नजर अशी की तिख्खी मिर्ची,
पेटवते मग रंध्रांध्रातून
अन्वर ज्वाला आसक्तीची.
दातांचा तो चिमणी चावा
करकरीत जणु कैरी कच्ची,
शिरशिर अंगी हवीहवीशी
कशी लपावी नाजूक नक्षी?
स्पर्श असा की शामक अमला
तनामनाचा दाह उतारी,
कषाय जणू तो प्याल्यामधला
क्षणात देतो कशी उभारी.
खट्ट्या मिठ्ठ्या श्वासांमध्ये
शब्द बिचारे हरवून जाती.
नमकीन काही घडून जाते
अर्थ उगाचच शोधत बसती..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6278
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरा..
अवडलीच,
पैजारबुवा,
:)
In reply to जबरा.. by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद!
वाह !
कविता लैच आवडली. लिहिते राहा.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
मस्तच!
मस्तच!
क्या बात है..! एक नंबर.
क्या बात है..!
एक नंबर.
बिरुटे सर, भक्ती आणि प्रचेतस,
बिरुटे सर, भक्ती आणि प्रचेतस, धन्यवाद!
खुप छान शब्दवैभव
खुप छान शब्दवैभव
छान कविता
अजून एक शृंगारिक रचना आवडली. पण "सैल असावी मिठी" चा खुमार काही और होता.
सं - दी - प
हम्म्.
In reply to छान कविता by चांदणे संदीप
:)
भारी!!
एक लंबर लिव्हलंय!
बाब्बो....भारी
बाब्बो....भारी
आवडली
आवडली
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
आवडलीय कविता
मस्तच तै ..