वॉटरगेट (भाग २)
वॉटरगेट (भाग १)
______________________________________________________________________________
वॉटरगेट दरोडा प्रकरणात पकडलेल्या ५ जणांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यांची तपासणी करताना त्यांच्याकडे २,३०० डॉलर्स, प्लॅस्टिकचे हातमोजे, घरफोडीची हत्यारे, वॉकीटॉकी, पोलिसांचे संभाषण ऐकण्यासाठी रेडिओ स्कॅनर, कॅमरा, फोटो काढण्याचे ४० रोल्स याबरोबरीने अश्रूधूर सोडणारी छोटी बंदूक व इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडली. ही उपकरणे ते डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयात लपवून ठेवणार होते. त्याच बरोबरीने एक डायरी सुद्धा होती ज्यात व्हाईट हाउसचा एक अधिकारी होवार्ड हंटचा दूरभाष क्रमांक लिहिलेला होता.
या ५ जणात एक जण होता जेम्स मॅकॉर्ड (जयुनिअर) जो पूर्वी सीआयए मध्ये काम करीत होता आणि निक्सनच्या पुनर्निवडीसाठी स्थापण्यात आलेल्या Nixon's Committee to Re-Elect the President (CREEP) चा सदस्य होता.
दुसर्या दिवशी या ५ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार बॉब वूडवर्ड सुद्धा न्यायालयीन कामकाजाचे वार्तांकन करण्यासाठी न्यायालयात उपस्थित होता. पैसा हाच या दरोड्यामागील उद्देश असावा अशी सर्वांचीच समजूत होती. तुमचा व्यवसाय काय असे न्यायाधिशांनी सर्वांना विचारल्यानंतर, मी पूर्वी सीआयए अधिकारी होतो असे जेम्स मॅकॉर्डने अभिमानाने सांगितले. हे ऐकल्यानंतर वूडवर्ड एकदम दचकला. हा साधा दरोडा नसून काहीतरी वेगळाच प्रकार असे त्याला वाटायला लागले. सुरूवातीच्या प्रश्नोत्तरात जी माहिती मिळाली त्यामुळे एक अस्पष्ट चित्र व त्याचे एकसंध नसलेले तुकडे त्याच्या मनात जमा होऊ लागले.
रिचर्ड निक्सन
१९५२ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे आयसेनहॉवर राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले होते. त्यांनी उपाध्यक्ष म्हणून रिचर्ड निक्सन यांची निवड केली होती. आयसेनहॉवर १९६१ पर्यंत राष्ट्राध्यक्ष होते व निक्सन याच काळात उपाध्यक्ष होते. १९६० मध्ये निक्सन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक लढविली होती. परंतु जॉन केनेडींच्या लोकप्रियतेसमोर त्यांचा निभाव लागला नाही व पराभव झाला. १९६४ मधील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक ते लढले नाहीत. परंतु १९६८ मध्ये तत्कालीन उपाध्यक्ष ह्युबर्ट हम्फ्रेंचा पराभव करून ते राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले. १९४५ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी निक्सन प्रथम सिनेटचे सदस्य झाले. ते तेव्हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरूण सिनेट सदस्य होते. ते आपल्या कट्टर साम्यवादविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. १९६० मध्ये निक्सन यांनी पहिल्यांदा जॉन केनेडींविरूद्ध अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढविली. परंतु त्यात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. १९६२ मध्ये त्यांचा कॅलिफोर्निया राज्यपालपदाच्या निवडणुकीतही पराभव झाला. परंतु १९६८ मध्ये त्यांनी दुसर्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढविली व चुरशीच्या लढतीत ते अगदी थोड्या फरकाने विजयी झाले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी व्हिएतनाम बरोबरील युद्ध थांबविणे व चीनशी संबध सुरळीत करणे याला प्राधान्य दिले. १९७२ मध्ये मॉस्कोला भेट देऊन द्विपक्षीय संबंध सुधारणे व शस्त्रे कमी करणे यासाठी रशियाबरोबर महत्त्वपूर्ण करार केले. १९७२ मध्ये पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी त्यांनी Committee to Re-Elect the President (CREEP) या नावाची एक समिती स्थापन केली होती जिचे काम होते विरोधकांवर व त्यांच्या कुटुंबियांवर गुपचुप पाळत ठेवणे, त्यांचे दूरभाष संभाषण चोरून ऐकून ते ध्वनीमुद्रित करणे, खोटी कागदपत्रे बनविणे, या सर्व बेकायदेशीर गोष्टींसाठी सरकारी यंत्रणा वापरणे, विरोधकांवर मात करण्यासाठी Slush Money व Hush Money अशा संद्येने ओळखला जाणारा बेहिशेबी पैसा वापरणे, विरोधकांच्या नावाने अफवा पसरवून त्यांची बदनामी करणे व काहीही करून दुसऱ्यांदा निवडणुक जिंकणे. अमेरिकेचे माजी अॅटर्नी जनरल जॉन मिचेल हे या समितीचे प्रमुख होते. त्यांच्या काळात सीआयए, एफबीआय अशा सरकारी तपासयंत्रणांना सुद्धा Rat Fucking म्हणजे Dirty Tricks साठी वापरले गेले. १९७२ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षांतर्गत निवडणुकीत एडमंड मस्की हे अत्यंत तगडे उमेदवार प्राथमिक फेरीत आघाडीवर होते. त्यांना फ्रेंच कॅनडियन वंशाच्या लोकांबद्दल राग आहे व त्यांनी स्वत:च असे आपल्याला सांगितले असा दावा करणारे पत्र (हे पत्र Cannuck letter या नावाने प्रसिद्ध आहे) एका मोठ्या वॄत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांची प्रतिमा खूप डागाळली व त्यामुळे त्यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. नंतर या प्रकरणाचा FBI कडून तपास झाला व हे पत्र बनावट असून ते CREEP या निक्सनना मदत करणार्या समितीनेच बनविले होते हे तपासांती आढळले. परिणामी डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्या जागी जॉर्ज मॅकगव्हर्न या तुलनेने दुर्बल उमेदवाराला उमेदवारी दिली. हे फारसे लोकप्रिय नव्हते. त्यामुळे १९७२ मध्ये निक्सन दुसर्यांदा अगदी सहज विक्रमी मतांनी निवडून आले. त्या निवडणुकीत निक्सनना एकूण ५३७ इलेक्टोरल मतांपैकी तब्बल ५२० मते मिळाली होती. ५० पैकी ४९ राज्यात त्यांना बहुमत मिळाले होते व एकूण मतांपैकी ६०.७ % मते त्यांना मिळाली होती. मॅकगव्हर्नना फक्त District Of Columbia व Massachusett ही दोनच राज्ये जिंकता आली होती. निक्सनचा विजय हा अमेरिकेच्या इतिहासातील विक्रम होता व तो अजूनही अबाधित आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात वॉटरगेट प्रकरण उघडकीस येऊनही व त्यात निक्सनचा हात असल्याची चर्चा होत असूनही त्यांना हा प्रचंड विजय मिळाला होता. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ५ महिने आधी वॉटरगेट कॉम्प्लेक्समधील डेमोक्रॅटिक पक्षच्या मुख्य कार्यालयात गुपचुप चोरून ऐकणारे बग्ज बसविणे व तेथील कागदपत्रांच्या गुपचुप नकला करून घेण्याची योजना सुद्धा CREEP नेच बनविली होती. डेमो़क्रॅटिक पक्षाची निवडणुक योजना आधीच गुपचुप समजून घेणे यासाठीच ही योजना बनविली गेली होती. या ५ जणातील ४ जण पूर्वी CIA साठी काम करीत होते. एक सर्वसामान्य चोरी अशा तर्हेनेच या प्रकरणाकडे प्रारंभी पाहिले जात होते. परंतु बॉब वूडवर्डच्या मनात शंका येऊ लागल्या होत्या. त्या शंकांची उत्तरे त्याला सापडत नव्हती. या ५ चोरांना कोणी वकील दिले, वकीलाला पैसे कोण देणार आहे असे काही प्रश्न त्याच्या मनात घोळत होते. त्याने त्या वकीलालाही विचारून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु समाधानकारक माहिती मिळली नाही. एफबीआय ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत होती त्याविषयी सुद्धा त्याच्या मनात संशय होता. (क्रमशः) _________________________________________________________________________________________ CREEP (Nixon's Committee to Re-Elect the President) - निक्सनच्या पुनर्निवडीसाठी स्थापण्यात आलेली समिती

वाचने
8873
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
छान चाललीये मालिका.
छान. रोचक आहे मालिका...
In reply to छान. रोचक आहे मालिका... by कॉमी
वुडवर्ड हा या प्रकरणातील ३
+१
मस्त
In reply to मस्त by चंद्रसूर्यकुमार
पण निक्सनना ५० पैकी ५० राज्ये जिंकायची महत्वाकांक्षा होती
In reply to मस्त by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद!
+२
In reply to +२ by तुषार काळभोर
+३
+१
वाचतो आहे..एकुणात या निवडणुका
In reply to वाचतो आहे..एकुणात या निवडणुका by खेडूत
सर्व संदर्भाचे दुवे सर्वात
रोचक मालिका. अमेरिकेतले
हा ही लेख भारी !
माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक
माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक
भारत ..
मालिका रोचक होत आहे ...
देजा वू?