✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

समास

अ
अनुस्वार यांनी
Mon, 05/03/2021 - 17:13  ·  लेख
लेख
समासातल्या रेषेला सुद्धा ओढ असते शाईची. तिथल्या मोकळ्या जागेला वाटतं आपल्यावरही उमटावी अक्षरांची काळी-निळी नक्षी. ती वाचतांना फिरावा कुणाचातरी हात आपल्यावरून आणि स्पर्श व्हावा थेट वाचकाच्या मनाला. अनुभवावीत ती भावनांची वादळे नि:शब्द होवून. पण समासाला कुणी सांगावं, तुझं रितेपणच कागदाच्या तुकड्याला त्या शब्दमुद्रा झेलण्यास योग्य बनवतं. ओळींत न सापडणारे अर्थ त्या समासाच्या पटलावरच लिहिले जातील. काही लिहायचे राहून गेले तर लेखकाला समासाचा किती आधार असतो. स्वतः सोबत घालवलेले एकांतातले क्षण म्हणजे आपल्या आयुष्याचा समास! जे राहून गेलं ते भरणारा मोकळा समास!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
मुक्तक

प्रतिक्रिया द्या
3147 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

कवीता समजावी इतकं छोटं आहे

गॉडजिला
Mon, 05/03/2021 - 20:41 नवीन
पण छान लिहलं आहे.
  • Log in or register to post comments

आखलेला समास!

Bhakti
Tue, 05/04/2021 - 21:48 नवीन
लहानपणी गृहपाठाच्या वहीत समासात अनुक्रमणिका आखली जायची.ती अनुक्रमणिका होती की स्वप्नांची पाखर ?पाखरू एक पाखरू दोन अशी असंख्य पाखर पंख लावायची आणि भुर्रर स्वप्नाच्याच आकाशात उडायची.हळू हळू लेखणीतली शाई गुलाबी झाली त्याच्याबरोबराच्या स्वप्नांची यादीने समास आकड्यांऐवजी चांदण्यांनी भरून जायचे...कधी ते पान सामासाला घेऊन भरकटलं आणि शाई जराशी हट्टी झाली कर्मयोगाच्या बाता मारत पुन्हा आकड्यांशी हातमिळवणी झाली....आतातर समास नाहीसाच झालाय ...आपल्यालाच आखावा लागतो कधी ओळींना अर्थ देण्यासाठी ,कवितेतील मात्रा मोजण्यासाठी,प्रेमाच फुलं चितारण्यासाठी!!समास आहे म्हणून तर आयुष्य सुटसुटीत आणि सोप्प झालाय नाहीतर नुसताच पसारा शब्दांचाच ! --भक्ती
  • Log in or register to post comments

सवाई प्रतिसाद

अनुस्वार
Wed, 05/05/2021 - 01:09 नवीन
गुलाबी शाई, आकडे ते चांदण्या... मग शेवटी पुन्हा आकडेच... किती सुंदर मेळ घातलाय. मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

तुम्ही लिहिलेल्या 'समास'

Bhakti
Wed, 05/05/2021 - 09:49 नवीन
तुम्ही लिहिलेल्या 'समास' वाचूनच डोक्यामध्ये समास आखत होते.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुस्वार

+१

तुषार काळभोर
गुरुवार, 05/06/2021 - 07:33 नवीन
सवाई प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुस्वार

धन्यवाद!

Bhakti
गुरुवार, 05/06/2021 - 10:48 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा