"शब्द हे शस्त्र आहेत", हे वचन आपण सगळेच नेहमी ऐकतो. शब्द हे जपून वापरा, ते फार सामर्थ्यवान असतात. त्यांचा अर्थ तर काही वेळा माणसाच्या मनाचा (माझ्या मते जीभेचाही) चेंदामेंदा करतो.
मला अनेक शब्द कोड्यात टाकतात. त्यांचे अर्थ तर मला कळत नाहीतच पण त्यांचे उच्चारही कठीण वाटतात. काही शब्द उच्चारताना तर जीभ वळतच नाही."चटईला टाचणी टोचली" किंवा "काळे राळे,गोरे राळे,राळ्यात राळे मिसळले." सारखी अवघड शब्दरचना नाही हं! पण अनेक शब्दांचे उच्चार आणि अर्थ मला गोंधळात टाकतात. माझी एक लहानपणीची मैत्रीण होती. ती खूप सावकाश शब्द उच्चारायची. तिच्या तोंडून 'चें ग रा चें ग री','ग ड ब ड गोंधळ', प ळ वा प ळ वी ' असे शब्द ऐकताना गंमत वाटायची. हसू यायचं.
मला अनेक हिंदी गाण्यांचे शब्द समजत नाहीत. अर्थ समजत नाही.
"चिलमन, चष्मेबद्दूर, जुस्तजू, इनायत, तहकिकात, तकल्लुफ, मुपलिस,"असे कितीतरी शब्द.
"चलो कि चलके सियासी मुकमिरोसे कहो
कि हमको जंगो जदल के चलन हे नफरत है"
किंवा
"गुजिश्ता जंगमें घर ही जले मगर इस बार"
किंवा
"तसव्वुरात की परछाईयाॅ" असे शब्दप्रयोग केले की मी फाफलते.
हिंदी गाण्यात "हिवडा में नाचे मोर" म्हटल्यावर मी मोर नक्की कुठे नाचतोय हे न कळल्यामुळे गोंधळात पडले. मग हिवडा शब्दाचा अर्थ हृदय आहे हे कळले.
"जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश बहाले हिजरा तुम्हारा दिल है" हे गाणं इतक्यांदा ऐकूनही आईशप्पथ मला त्याचा उच्चार करता येत नाही, आणि अर्थही कळलेला नाही. आत्ताही लिहीण्यातली चूकभूल देणे घेणे.
"बंबईसे आया है बाबूजी नन्हा" असेच गाण्याचे शब्द आहेत असे मला वाटत होतं. आणि एवढा मोठा घोडा देवानंद 'नन्हा' कसा असं मला आश्चर्य वाटत असतानाच एका मैत्रिणीने तो शब्द "चिनोन्ना" असा दाक्षिणात्य आहे असं समजावलं.
शाळेतील वयात प्रतिजैविक 'पेनिसिलीन' या साध्या शब्दानं दांडी उडविली होती. नंतर कॉलेज शिकताना "ऑन्थाॅपाॅमार्फालाॅजी"-(मानववंशशास्त्र) हा शब्द जिभेवर घाव घालून गेला होता.
संस्कृतमध्ये "भिद्यादुर्यदुदारदर्दुरदरीदीर्घादरिद्रद्रुमाः।" हा श्लोक पाठ करताना जीभेला पक्षाघात झाला.
ज्यात"माय सिन"- ऊर्फ "माझे पाप" हा शब्द आहे अशी अनेक ॲंटिबायोटिक्सची नावं उच्चारताना तिरपीट उडते. क्लोरोमायसिटिन की कायसेसे नाव,त्याने दचकवलं होतं.
आयुर्वेदातही अशीच औषधींची जीभेला योगासने करायला लावणारी नावे आहेत,"कार्पासमूलासव,मकरध्वज, बृहत् वातचिंतामणी,सारस्वतारिष्ट,त्रयोदशांगगुग्गुळ,खदिरादित्वक्!!
कोरोना आला आणि अनेक नवे शब्द कळले. लाॅकडाऊन, जनता कर्फ्यू, पाॅझिटिव्ह, निगेटिव्ह, स्वॅब टेस्ट,क्वारन्टाईन,पॅनडेमिक इ.इ.
रेमडेसीवीर हे असंच एक औषध. प्रथम उच्चारणात तो शब्द जिभेवर चढतच नाही. घटवावा लागतो. अनेक रिपोर्टर्सची,न्यूज रीडर्सची,बाईट देणाऱ्या पुढाऱ्यांची, यू ट्यूब वरच्या राजकीय विश्लेषकांची हा शब्द उच्चारताना बोबडी वळल्याचं दर्शकांनी ऐकलेलं आहे. मला तर सुरुवातीला रेमडेसीवीर हे नाव ऐकल्यावर ते "रामदेसीवीर",असं पतंजलिचं औषध आहे असं वाटलं. आणि त्याचा भ्रष्ट इंग्रजी उच्चार रेमडेसीवीर करताहेत अशी खात्री पटली.
सुरुवातीच्या काळात ट्रंपसाहेब रागावल्यावर आपण अमेरिकेला हायड्रोक्सिक्लोरोक्विन नावाचं औषध निर्यात केलं होतं. ते नावही लक्षात राहायला कठीण आणि जिभेला व्यायाम करायला लावणारं होतं. "डाॅक्सिसायक्लिन,(सर्व औषधांचे उच्चार माझ्या कुवतीनुसार, आगाऊ क्षमस्व), "डेकथामेथासोन,""टोसिलिझूमॅब" ही औषधांची नावही जीभेला आकर्णधनुरासन करायला लावणारी. कोरोना काळात प्लाझ्मा हे काय प्रकरण आहे ते नव्यानेच कळलं. काॅनव्हालसेंट प्लाझ्मा ट्रिटमेंट हे नाव ऐकल्यावर भीती वाटली.
औषधांची नाव कसं सोपं हवं. दुकानात जाऊन दुकानदाराकडे,"अहो जरा एक टोसीलिझूमॅब द्या हो ."असं कसं मागायचं? त्यातून प्रिस्क्रिप्शनवरच्या गिचमिड्या अक्षरातून टोसीलिझूमॅब बरोबर वाचणं केवळ जगन्नियंत्यालाच शक्य आहे.
सरळ ,साधे ,सोपे असावेत शब्द. आणि आयुष्यही!
वाचने
21682
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
ममामिया
मस्त, शिर्षकाचा अर्थ काय ?
अगदी हेच मनांत आले होते
In reply to मस्त, शिर्षकाचा अर्थ काय ? by मराठी_माणूस
"बंबईसे आया है बाबूजी नन्हा"
"बंबईसे आया है बाबूजी नन्हा" असेच गाण्याचे शब्द आहेत असे मला वाटत होतं. आणि एवढा मोठा घोडा देवानंद 'नन्हा' कसा असं मला आश्चर्य वाटत असतानाच एका मैत्रिणीने तो शब्द "चिनोन्ना" असा दाक्षिणात्य आहे असं समजावलं.हा लेख उघडण्याच्या क्षणापर्यंत हे बोल "बंबईसे आया है बाबूजी नाना" असे आहेत ही माझी समजूत होती.हा हा
एक सुचलं.
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असा शब्द नाहीच अस्तित्वात असे गुगळे म्हणतात ,
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कमरेच्या काठावरील पिवळे
मी पण असाच हिशोब लावला होता ,
In reply to कमरेच्या काठावरील पिवळे by आंद्रे वडापाव
लंगोट ???
In reply to कमरेच्या काठावरील पिवळे by आंद्रे वडापाव
महिषासुरमर्दिनी स्तोत्र
In reply to कमरेच्या काठावरील पिवळे by आंद्रे वडापाव
मला ए रेहमान यांनी दिलेल्या
In reply to महिषासुरमर्दिनी स्तोत्र by तुषार काळभोर
मजा आली वाचताना.
=))
"जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश
नुकतीच ताटातूट झालेलं
In reply to "जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश by सतिश गावडे
अर्थासाठी धन्यवाद !!!
In reply to नुकतीच ताटातूट झालेलं by आंद्रे वडापाव
गाणे ऐकून पाहिले.
In reply to अर्थासाठी धन्यवाद !!! by सतिश गावडे
हिंदी कुठे संपते आणि उर्दू कुठे सुरु होते
In reply to अर्थासाठी धन्यवाद !!! by सतिश गावडे
हिंदी भाषिकाना स पासून सुरू
In reply to हिंदी कुठे संपते आणि उर्दू कुठे सुरु होते by चौकस२१२
गुजराथी भाषिकांची गम्मत
In reply to हिंदी भाषिकाना स पासून सुरू by विजुभाऊ
पहीली ओळ
In reply to "जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश by सतिश गावडे
खुसरो आणि गुलजार
In reply to "जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश by सतिश गावडे
माझ्याकडून छोटीशी मदत
- चिलमन: पडदा; खासकरून मुस्लिम घरात चटई सारखा असतो तो.
- जुस्तजु: ओढ, ध्यास
- तहकीकात: तपास
- तकल्लुफ: तसदी
इनायतचा अर्थ ईर्षा असावा का अशी शंका येते.इनायत = कृपा
In reply to माझ्याकडून छोटीशी मदत by सर टोबी
तकल्लुफ: तसदी संकोच
In reply to माझ्याकडून छोटीशी मदत by सर टोबी
तसदीसंकोचवाह
खुसखुशीत लेख
फ्रेंच! :-)
In reply to खुसखुशीत लेख by गामा पैलवान
आजी तू महिषासुरमर्दिनि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja+१
मॅन्डेरिन
In reply to +१ by वामन देशमुख
आणि तो
In reply to मॅन्डेरिन by स्मिता.
आभार
In reply to +१ by वामन देशमुख
तुमचे लेख नेहमीच अतिशय विचारपरिवर्तक असतात.
"बंबईसे आया है बाबू सलोना "
ज्वार भाटा = भरती ओहोटी
In reply to "बंबईसे आया है बाबू सलोना " by सिरुसेरि
तो शब्द इफ्तदा नसून इब्तदा
In reply to "बंबईसे आया है बाबू सलोना " by सिरुसेरि
एक तर्क - रंगरेज या शब्दाचा
एक शंका - अनेक शास्त्रीय
वा !
रंगरेज - कपडे रंगवणारा
छान माहिती . कदाचित बजजवा या
मूळ शब्द बजाजच आहे. गाण्यात
In reply to छान माहिती . कदाचित बजजवा या by सिरुसेरि
मय से मीना से ना साकी से
अर्थ
In reply to मय से मीना से ना साकी से by उपयोजक
हो
In reply to अर्थ by तुषार काळभोर
मय = दारू
अरेरे..
In reply to मय = दारू by आंद्रे वडापाव
नाही नाही..
In reply to अरेरे.. by तुषार काळभोर
तुषार,आंद्रे वडापाव
गापुची-गापुची गम-गम
टेलेफोनधुनमे हसनेवाली
In reply to गापुची-गापुची गम-गम by चौथा कोनाडा
हाहा
In reply to टेलेफोनधुनमे हसनेवाली by आंद्रे वडापाव
हा .... हा .... हा .... !
In reply to हाहा by कॉमी
"कुवलय तव मुख तिला , अजि
"जिहाले मस्ती मुकुम् ब रंजीश बहाले हिजरा तुम्हारा दिल है"
भरपूर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.