दक्षिण भारत हा आम्हा मराठी लोकांसाठी तिकडच्या भाषा वेगळ्या असल्याने तसा कमी परिचयाचा प्रांत. तरीही ज्यांच्यासाठी हा अौत्सुक्याचा विषय आहे त्यांच्यासाठी कर्नाटक, तमिळनाडू , केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण ही राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील घडामोडींसंबंधी माहिती देणारा दक्षिणवार्ता हे वाहते पान आजपासून सुरु करत आहे. आपणही ही पाच राज्ये नि एक केंद्रशासित प्रदेश इथल्या घडामोडींबद्दल अवगत करुन या प्रवाहास यथाशक्ती हातभार लावीत जावे ही विनंती. _/\_
-----------------------------------------------------
आज तमिळनाडू , केरळ या राज्यातील विधानसभांचे निकाल आहेत. ते थोड्या वेळात येतीलच. पुदुच्चेरीतल्या मतांची मोजणी आज होते आहे. तमिळनाडूत DMK आणि AIDMK दोघांच्यात फार कमी तफावत आहे.कमलाहासन बहुतेक जिंकतील.केरळमधे नेहमीप्रमाणे काँग्रेस जिंकेलंसं वाटतंय.
तमिळ अभिनेते सुपरस्टार आणि स्पोर्टसकारचे संग्राहक अजितकुमार यांचा काल वाढदिवस झाला. त्यांना शुभेच्छा.
बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एका तरुणीची नोकरीच्या निमित्याने फसवणूक करुन अश्लील व्यवहार केल्याचा आरोप होतो आहे.त्याबद्दलची ही बातमी
| लेख वर्गीकरण |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजकीय / इतर बातम्या?
आणखी चार कडबोळी सरकारं आली तर काय होणार?
हम्म
In reply to राजकीय / इतर बातम्या? by कंजूस
तमिळनाडूत हिंदूद्वेष्टे द्रमुक आणि काँग्रेस ची युती येईल. जयललिता वारल्याने अण्णा द्रमुकचा घाम निघाला.
आज मदुरै
महानगरपालिका स्थापनेला ५० वर्षे पूर्ण.
https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/news/cities/Madurai/madur…
केरळमध्ये काँग्रेस जिंकेल असे
केरळमध्ये काँग्रेस जिंकेल असे भाकीत करणारे तुम्ही एकटेच.
अर्र
In reply to केरळमध्ये काँग्रेस जिंकेल असे by कॉमी
कम्युनिस्ट लिहायचं होतं. माय मिष्टेक :(
सिद्धार्थ ला धमक्या
बोम्मारिलू आणि रंग दे बसंतीचा अभिनेता म्हणून ओळख असलेल्या सिद्धार्थला भाजपाकडून ५०० च्या वर खून, रेप च्या धमक्या. एका भाजपा सदस्याने त्याचा नंबर लीक केला. धमक्या देणारे सर्व नंबर त्यांच्या डीपीसहीत रेकॉर्ड करुन पोलीसांकडे देत असल्याची माहिती त्याने दिली.
कर्नाटक
कर्नाटक : परिस्थिती गंभीर! ऑक्सिजनअभावी 24 जणांचा मृत्यू; येडियुरप्पांनी बोलावली बैठक
द्रमुकच्या गुंडांचा हैदोस
द्रमुकच्या विजयानंतर द्रमुक पुरस्कृत गुंडांनी जयललितांच्या नावाने गरीबांसाठी सुरु केलेल्या अम्मा उनवुक (अम्मा कँटीन) ची जागोजाग नासधूस सुरु केली आहे.
https://youtu.be/9EURnwIZbG8
असेंब्लीतूनही जयललितांचा फोटो हटवला.
छान!
In reply to द्रमुकच्या गुंडांचा हैदोस by उपयोजक
बंगालपासुन इन्स्पायरेशन घेतलं वाटते!
युवन शंकर राजा
इळय्याराजांचे सुपुत्र युवन संकर राजा उर्फ अब्दुल खालिक
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/yuv…
इळय्याराजांचे सुपुत्र युवन
In reply to युवन शंकर राजा by उपयोजक
इळय्याराजांचे सुपुत्र युवन संकर राजा उर्फ अब्दुल खालिक
हा धर्मांतरीत झाला आहे तर ! पहिल्यांदा काही टोटलच लागली नव्हती !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja
हो
In reply to इळय्याराजांचे सुपुत्र युवन by मदनबाण
पण इळय्याराजांना त्याचा हा निर्णय अजिबात आवडला नव्हता.
इळय्याराजांचा गंगैय्यामरन
In reply to युवन शंकर राजा by उपयोजक
इळय्याराजांचा गंगैय्यामरन नावाचा एक भाऊ सुद्धा संगीतकार आहे ना?
हो
In reply to इळय्याराजांचा गंगैय्यामरन by श्रीगुरुजी
धाकटा भाऊ गंगै अमरन्
कर्नाटक : कोरोना बेड घोटाळा
कर्नाटक : कोविड बेडच्या वाटपात सुरु असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आता कर्नाटकातील वातावरण तापले आहे. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी त्यांनी केलेल्या वादग्रस्त आणि गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी संबंधित घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी तेजस्वी सूर्या यानी बंगळुरू महानगरपालिकेने वॉर रूममध्ये नियुक्त केलेल्या 17 मुस्लीम कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सहआयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांत दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. या प्रकरणी एका महिलेसहीत 8 ते 10 जणांना अटक करण्यात आलीय.
काय आहे प्रकरण?
बंगळुरु महानगरपालिकेचे काही अधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी आणि काही दलाल कोविड बेडच्या वाटपाचे रॅकेट चालवत होते. यामध्ये रुग्णांना लाच घेऊन कोविड बेड उपलब्ध करुन दिला जात होता. रुग्णालयातील एखादा बेड रिक्त झाल्यानंतर तो ब्लॉक केला जात असे.त्यानंतर गरजू व्यक्तीकडून पैसे घेऊन त्याला हा बेड दिला जात असे. एखादा बेड विकला गेला नाही तर तो पुन्हा अनब्लॉक केला जात असे.
तेजस्वी सूर्या यांचा 17 मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर सवाल? भाजप नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी बंगळुरू महानगरपालिकेच्या वॉररुममध्ये 17 मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना या प्रकरणाला ‘धार्मिक रंग’ देण्याचाही प्रयत्न केला आहे. तेजस्वी सूर्या यांचा एक व्हीडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे की, हे लोक कोण आहेत, त्यांना कोणी नोकरीवर ठेवले? तुम्ही एखादा मदरसा चालवण्यासाठी लोकांची भरती केली आहे का?, असा सवाल तेजस्वी सूर्या यांनी उपस्थित केला.
पालिका आयुक्त सरफराज नवाज यांनाही आरोपाच्या झळा :
या आरोपाच्या झळा महानगरपालिका आयुक्त सरफराज नवाज यांच्यापर्यंतही पोहचल्यात. माझ्यावर आरोप करून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय यासाठी मला दु:ख होतंय, अशी प्रतिक्रिया नवाज यांनी व्यक्त केली. बेड वाटप प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नाही. मी सध्या कोविड केअर सेंटर आणि कचरा व्यवस्थापनाच्या कामात गुंतलो आहे. बेड वाटपात माझा कोणताही सहभाग नव्हता. मला त्याबद्दल काहीही माहिती नाही, असे सरफराज नवाज यांनी म्हटले. त्यानंतर आपण देखरेख तेजस्वी सूर्या यांनी आपण नवाझ यांच्या नावाचा उल्लेख केला नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच माफीही मागितली.
बीबीएमपी कोविड-19 वॉररुमचे प्रभारी डॉ. रेहान यांच्यासह आठ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. रात्री वॉर रूमवर छापा घालून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. संशयित कोरोना बाधित रुग्णांना 3 बेड देऊन त्यांच्याकडून 1.7 लाख रुपये वसूल करीत असल्याची निश्चित माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून त्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणासंबंधी संशयित नेत्रावती (वय 42 व रोहित (वय 32) यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. कोरोना रुग्ण डिस्चार्ज होताच 30 सेकंदात बेड्स ब्लॉक करण्यात येत होते. गृह विलगीकरणात असलेले रुग्ण व कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या
रुग्णांच्या नावे बेड्स ब्लॉकिंग करण्यात येत होते. एकाच्या नावावर 10 बेड्स ब्लॉक केल्याचे आढळून आले आहे.
बाधित रुग्णांना मदत देण्याच्या उद्देशाने व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले होते. त्या सर्व ग्रुपवर नेत्रावती सदस्य होती. ग्रुपवर बेड्स हवा असल्याचा संदेश येताच नेत्रावती त्यांच्याशी संपर्क साधायची. खासगी बेडस मिळतील, परंतु त्यासाठी तातडीने बुक करणे आवश्यक आहे, असे ती सांगायची. बेड्स हातचा जाईल या भीतीपोटी रुग्णांचे नातलग तिच्या खात्यावर पैसे जमा करायचे.
बेळगाव तालुक्यातील माहिती फलकावरुन मराठी गायब
बेळगाव तालुक्यातील माहिती फलकावरुन मराठी गायब
बेळगाव : बेळगावात मराठी ठसा पुसून कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्यात येत आहे. कानडीकरणाचा वरवंटा सीमाभागात अधिकच तीव्र झाला आहे. मराठी बहुभाषिक असणाऱ्या तालुक्याच्या पश्चिम भागातील उचगाव परिसरातूनच मराठीला हद्दपार करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू झाला आहे. उचगाव नाक्यावर उभारण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेतून मजकूर लिहिला असून मराठीला डावलण्यात आले आहे. यामुळे मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून उचगाव ते अतिवाडपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. यापैकी काही रस्त्याचे काम अद्याप शिल्लक आहे. संबंधित कामाच्या ठेकेदाराने प्रवाशांच्या सोयीसाठी उचगाव नाक्यावर दोन फलक उभारले आहेत. यामध्ये परिसरातील गावांची नावे लिहून अंतर लिहिले आहे. यासाठी केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. या भागात ९९ टक्के मराठी भाषिक आहेत. त्याचबरोबर शेजारच्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातील प्रवाशांचा सतत प्रवास असतो. त्यांना कन्नड भाषा अवगत नाही. सीमाभागातील मराठी भाषिकांनाही कन्नड भाषेतील फलक वाचता येत नाही. यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे.
स्थानिकांच्या सोयीसाठी स्थानिक भाषेत फलक असणे आवश्यक असतात. यापूर्वी या भागातील सर्व फलक मराठीतूनच होते. मात्र कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्यासाठी मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे मराठी भाषिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. कन्नड भाषेबरोबर मराठीतूनही उल्लेख करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे. मराठी भाषिक संतप्त फलकावरुन मराठी भाषेला डावलण्यात आल्याने मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कन्नड, इंग्रजीबरोबर मराठीतून माहिती लिहिण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील मराठी भाषिकांतून देण्यात आला आहे.
अस बघा
In reply to बेळगाव तालुक्यातील माहिती फलकावरुन मराठी गायब by उपयोजक
मराठी कानडी वादाचा मुद्दा बाजुला ठेवुन....
सिंह झोपलाय तर माकडाने त्याचे कान ओढले तर सिंहाने पंजा मारला तर (तो काय व्हाटस्पमधला सिंह नाही आजुन कान ओढ माझे सांगायला) काय होईल?
कुणी तरी माकडाने म्हणे अशीच गर्जना केलेली मग सिंह चिडला तर जबाबदार कोण ?
अस झाल तर त्यांच राज्य आहे कानडी कानडवणारच सॉरी कानफटवणारच नं ?
बरे झाले
https://www.opindia.com/2021/05/tamil-nadu-hindu-procession-local-musli…
संस्कृतमधे बोलणारे गाव
https://timesofindia.indiatimes.com/travel/destinations/a-village-where…
ओम्मान चांडी
यांनी इझराईलमधे पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मल्याळी महिलेला आदरांजली वाहिल्यावर मल्याळी मुस्लिमांचे पित्त खवळले आहे. हॅशटॅग चालवताहेत.
https://www.facebook.com/oommenchandy.official/photos/a.101533342494764…
ह्म्म्म्म
In reply to ओम्मान चांडी by उपयोजक
मुस्लिम सहिष्णु आहेत असे म्हणणारे आता डोळेझाक करतील.
हैद्राबाद
हैदराबादमधल्या हुसेनसागर तलावात, कोरोनाव्हायरसचं जेनेटिक मटेरियल आढळून आलं आहे. एखाद्याला कोरोनाव्हायरस झाला की त्याचा काही अंश त्या माणसाच्या विष्ठेमध्ये येतो, आणि वर सांगितलं तसं हे सांडपाणी तलावात लीक झालं तर हे मटेरियल तलावाच्या पाण्यातही मिसळतं. हैदराबादमधल्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी'शी संबंधित २ संस्था गेले ७ महिने यावर अभ्यास करत आहेत, आणि या मटेरियलच्या कमी जास्त होणाऱ्या प्रमाणावरून कोरोनाच्या पुढच्या लाटेचा पत्ता अधिक लवकर लागणं शक्य आहे, असा निष्कर्ष त्यांनी नुकताच काढलेला आहे. ही पद्धत वापरणं हे एका फटक्यात शहरातल्या जवळपास सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यासारखं आहे, आणि हे दर थोड्या थोड्या दिवसांनी परत परत करणंही शक्य आहे!
फेबुवरुन साभार
एशिया नेट
प. बंगालमधे भाजप कार्यकर्त्यांवर होणार्या हल्ल्यांबद्दल काही का दाखवत नाही असा प्रश्न विचारणार्या व्यक्तीला उद्धटपणे उत्तर देणार्या एशिया नेट या केरळमधील प्रमुख वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना राज्य भाजपच्या कोणत्याही प्रेस मीटला न बोलवण्याचा निर्णय केरळ भाजपने घेतला आहे. या निर्णयाविरोधात केरळ टिव्ही वृत्तवाहिन्यांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
कर्णन्
या जातीप्रथेवर टीका करणार्या तमिळ सिनेमाचा सध्या चांगलाच बोलबाला होतो आहे. अॅमॅझोन प्राईमवर उपलब्ध आहे.
सलमानसोबत काम करेन पण
https://metrosaga.com/throwback-ill-work-with-salman-khan-on-only-one-c…
जग्गी वासुदेव उर्फ सदगुरु
https://www.google.com/amp/s/www.siasat.com/tn-finance-minister-calls-j…
https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/news/national/tamil-nadu/…
जग्गी वासुदेव ह्यांच्या ईशा
In reply to जग्गी वासुदेव उर्फ सदगुरु by उपयोजक
जग्गी वासुदेव ह्यांच्या ईशा फाउंडेशन ने संरक्षित जंगलांमध्ये विनापरवाना बांधकाम केले आहे. त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांनी बांधकाम केलेल्या क्षेत्रात हत्तींचा वावर असे, त्यांच्या बांधकामामुळे हत्तीनीं आपला रस्ता बदलला, आणि त्यामुळे शेत जमीन आणि माणसांशी हत्तींचा संबंध येऊन कलह होण्याची शक्यता वाढली आहे.
https://www.newslaundry.com/2021/05/17/how-sadhguru-built-his-isha-empi…
सदगुरु उर्फ जग्गी वासुदेव
In reply to जग्गी वासुदेव ह्यांच्या ईशा by कॉमी
सदगुरु उर्फ जग्गी वासुदेव उत्कृष्ट इंग्रजी, ओशोंचा प्रभाव व तसेच काहीसे मुक्त वातावरण ठेवायचा प्रयत्न, युट्युबवर पिआर टीम कडुन सद्गुरु श्ट्स फलान इन स्टाइल, लॉ स्टुडंट गॉट शट बाय सद्गुरु... टायटलचे विडीओ वगैरे वगैरे मुळे तरुणांत लोकप्रिय झाले नसते तरच नवल होते.
नवाझ सद्गुरुंबद्दलचे मत आहे-
In reply to सदगुरु उर्फ जग्गी वासुदेव by गॉडजिला
नवाझ सद्गुरुंबद्दलचे मत आहे- श्रीमंतांसाठी फील गुड अध्यात्म. त्यात काही वावगे अर्थातच नाही.
टायपो.
In reply to नवाझ सद्गुरुंबद्दलचे मत आहे- by कॉमी
माझे*
नवाझ हे चुकून आले.
२ गोष्टी यांच्याबद्दल
आपण जरी गुरु वगैरे भानगडीत पडत नसलो तरी २ गोष्टी यांच्याबद्दल मान्य करतो
१) चांगली मुद्देसूद बोलणारी व्यक्ती म्हणून त्यांचे बद्दल आदर नक्कीच आहे
, २) मला भावलेले म्हणजे त्यांचे कार्यक्रमाचे नियोजन ,आश्रमाचे कपडे याचाट कलात्मकता आढळते .. निरखून बघा ..
जपनाम
In reply to २ गोष्टी यांच्याबद्दल by चौकस२१२
जपनाम जपनाम !
ख्या ख्या ख्या
In reply to जपनाम by कपिलमुनी
कडक प्रतिसाद :)
PTR पळणीवेल
यांचे कुटुंब मदुरै मधील एक सुप्रसिद्ध कुटुंब आहे. १६ व्या शतकात नायक घराण्याच्या कारकिर्दीत पळणीवेल यांचे एक पूर्वज अरियंथ मुदलीयार (तिरुमलाई नायक यांचे सैन्य जनरल) यांनी मदुरैच्या सुप्रसिद्ध अशा मीनाक्षी मंदिराची पुनर्बांधणी केली होती.
त्यांच्या कुटुंबीयांनी मीनाक्षी अम्मन मंदिर आणि सबरीमाला मंदिराच्या बांधकामाला बरेच सहाय्य केले आहे. असं असताना ते डीएमके सारख्या नास्तिक/ब्राह्मणद्वेष्ट्या राजकीय पक्षात का सामील झाले समजत नाही. पळणीवेल यांचे शिक्षणही भरपूर झाले आहे. तरी ही दुर्बुद्धी का सुचावी? :(
प्रश्न.
In reply to PTR पळणीवेल by उपयोजक
डीएमके नास्तिक/ब्राम्हणद्वेष्टा कशावरून ? हा प्रश्न चॅलेंज म्हणून न घेता, माझे अज्ञान म्हणून घ्या.
आणि, ब्राम्हणद्वेषाचा भौतिक परिणाम समजतो, नास्तिक पक्षाचा काय भौतिक परिणाम असणार आहे ?
@कॉमी
In reply to प्रश्न. by कॉमी
https://www.quora.com/Why-do-Tamil-brahmins-often-criticise-DMK-or-Karu…
@गॉडजिला,
@गॉडजिला,
सदगुरु यांच्या विषयी आदर ठेवुन असे सांगु इच्छितो की हल्ली ते जे योग्य ते बोलले पाहिजे त्याच बरोबर स्वतःचे अधिकचे जे नको बोलायस हवे ते देखील बोलताना दिसतात.
उदा. :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “I realized then that even though I was a tiny speck in an infinite cosmos, a blip on the timeline of eternity, I was not without purpose.“ :- R.J. Anderson
सदगुरु यांच्या विषयी आदर
In reply to @गॉडजिला, by मदनबाण
सदगुरु यांच्या विषयी आदर ठेवुन असे सांगु इच्छितो की
जग्गी वासुदेव यांच्या विषयी काही अशा गोष्टी माझ्या कानावर पडल्या आहेत की त्यांच्या विषयी आदर कोणी ठेवला काय आथवा नाकारला काय मला तरी कसलाच फरक पडत नाही...
मी फक्त ते प्रसिद्ध का वाटतात याचे विवेचन दिले आहे _/\_
ज्या गुरुचे मार्केटिंग, पीआर आणि आयटी सेल तगडे
ज्या गुरुचे मार्केटिंग, पीआर आणि आयटी सेल तगडे त्या गुरुची भगतगणांची फौज मोठी असे साधे समीकरण आहे. हे अध्यात्मिक गुरू देश विदेशात मोठाले आश्रम आणि उच्चशिक्षित भगतगण बाळगून असतात. त्यांची राहणी विलासी असते त्याबद्दल काही बोलायला गेलो की गुरुळ झालेले भगत वस्सकन अंगावर येतात.
तमिळ लोक समंथावर संतापले
https://maharashtratimes.com/entertainment/manoj-bajpayee-the-family-ma…
शिक्षणात राजकारण
https://www.opindia.com/2021/05/kerala-professor-venom-hindus-suspended…
पूर्ण भारतात हे केल्यास बराच वेळ सत्कारणी लागेल काही महिलांचा
https://www.thenewsminute.com/article/kerala-minister-suggests-censorin…