Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ८)

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 26/04/2021 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-m…

वाचने 60570
प्रतिक्रिया 205

प्रतिक्रिया

https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-m… ...... “हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-balasaheb-thorat-on-… ....... “देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे”; राहुल गांधींचं केंद्र सरकारवर टीकास्त्र https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-leader-rahul-gandhi-… ----- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, काहीही एकवाक्यता नाही...

In reply to by मुक्त विहारि

कुणीतरी एकाने ठरवायचं, बाकीच्यांनी हो ला हो म्हणायचं, टीका करायची नाही, उणीवा दाखवायच्या नाहीत यापेक्षा आपल्याच सहकारी पक्षावर टीका करणं, मतभेद असणं, हे जास्त चांगलं नव्हे का?

In reply to by तुषार काळभोर

हम्म खरे आहे. केंद्रीय नेत्यांनी लास मोफत द्या म्हणायचं, आणि राज्यस्तरावर लोकांनी आम्ही देणार नाही म्हणून सांगायचं. म्हणजे कसं, पक्षांतर्गत लोकशाही पण शाबूत राहते, आणि दोन्हीकडे सहकारी/विरोधी पक्षावर तोंडसुख पण घेता येते. सगळं कसं छान छान !!

करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार; मद्रास हायकोर्टाने फटकारलं देश करोनाशी लढा देत असतानीह राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग करोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. न्यायालाने सांगितलं आहे की, जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे हे जरी असलं तरी जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना आपला हा अधिकार बजावता येईल. सद्य परिस्थितीत बचाव व सुरक्षा यालाच सर्वाधिक प्राधान्य पाहिजे. उर्वरीत सर्व बाबी यानंतर येतात. (आता What about XYZ? च्या प्रतीक्षेत)

In reply to by तुषार काळभोर

बंगाल मधे (आणि इतर निवडणुक असलेल्या राज्यात) वोटींग आणि व्हॅक्सिन एकत्र ठेवायचे. मत टाका, लस घ्या आणि जा. दोन्ही एकात एक साध्य झाले असते. आठ टप्प्यात निवडणुका असल्यामुळे प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची सुध्दा कमतरता भासली नसती कदचित. आतापर्यंत ५ राज्यांच्या बहुतांश नागरीकांना पहिला डोस तरी मिळाला असता.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

कोरोना काळात लाखोंच्या रॅली काढनारे ईतके हुशार असतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला??

In reply to by मुक्त विहारि

राहूल गांधीनी जमवली म्हणून जगातील सर्वात हुशार व्यक्ती, प्रत्येक आंदेलनात सहभाग घेतलेला दाढीवाला पण घेईल का??? निवडणूकजीवी.

In reply to by मुक्त विहारि

या लोकांना पोटदुखी हीच आहे की मोदींचा पक्ष बंगालमध्ये निवडून यायची शक्यता बरीच वाढली आहे. तसे नसते तर यांनी गर्दीमुळे कोरोना वाढतो वगैरे तक्रार कधी केली नसती. दिल्लीच्या सीमेवर तथाकथित शेतकर्‍यांची गर्दी यांच्या फायद्याची होती म्हणून हे लोक तेव्हा त्याच गर्दीला बघून टाळ्या पिटत होते. आताही बंगालमध्ये मोदींच्या सभांना गर्दी न होता केवळ ममता किंवा काँग्रेस-रक्तमुखी मर्कटांच्या युतीच्या सभांना गर्दी झाली असती तरी अजिबात म्हणजे अजिबात तक्रार झाली नसती.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ममता पंतप्रधान आहे का?? जर पंतप्रधानालाच मास्क लावायचं तसेच दो गज की दुरी पाळायची नसेल तर टिव्ही वर भाषणबाजी का करायची?? पुन्हा कोरोना वाढला की राज्य सरकारांविरूध्द बोंबलायचे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

म्हणजे मुख्यमंत्र्याने हे सगळं नाही केले तरी त्यांना सगळे माफ का? किंवा मुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये कोरोना होत नाही असे काही आहे का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाकी मास्क, सोशल डिस्टंन्सींग सगळ्यांनीच पाळले पाहीजे, पण तरीही... मुख्यमंत्र्यांना किती दिवस नजरेआड करणार?

In reply to by सॅगी

सगळ्यात जास्त सोशल डिस्टंसिंग मा.मुं पाळलेय आतापर्यंत घरात बसुन. बाकी नाहि म्हणायला गेले तरी घरात २ कोरोना पेशंट असताना व त्यात त्यांची पत्नी हॉस्पीटल मध्ये अ‍ॅड्मीट असताना मा.मु स्मारकाचे उद्घघाट्न करत होते म्हणे.. आता याला काय म्हणावे ????

In reply to by यश राज

कोमट पाणी कोरोनाला घाबरत नाही !!!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बहुसंख्य जनतेने पहिला डोस सुद्धा घेतला नाही. डोस घेतल्यावर इम्युनिटी येण्यास वेळ लागतो. त्यामुळे हे शक्य नाही.

In reply to by तुषार काळभोर

अलाहाबाद कोर्टाने इलेक्शन कमिशनला पंचायत निवडणूक ड्युटी वरच्या १३५ लोकांच्या मृत्यबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. ह्या कारणांमध्ये काय पाऊले उचलली होती याचा पेपरवर्क स्वीकारणार नाही, कारण सरकारे २०२० च्या अनुभवांमुळे आत्मसंतुष्ट झाली होती हे आता स्वच्छ दिसते आहे.सरकारने काळजी घेतली असती तर दुसरी लाटीचा सामना करणे शक्य झाले असते,असे कोर्ट म्हणाले. हाय कोर्टानेच हि निवडणूक पुढे धकलायचे नाकारले होते कारण त्यावेळेस प्रोटोकॉल्स आणि राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेईल अशी अपेक्षा केली होती. https://www.livelaw.in/top-stories/allahabad-high-court-notice-to-state…

In reply to by नावातकायआहे

आमच्या ऑफिसात एक विदर्भातला तरुण आहे. त्याचं वडिलांच्या नावाने तिकडे रेशन कार्ड आहे. आणि हा वाघोली मध्ये राहतो. पिवळं रेशन कार्ड असल्याने महिन्याला १५-२० किलो धान्य मिळतं. सर्व कुटुंबाचं आधार कार्ड आणि बोटांचे ठसे नोंदविलेले आहेत. वडील हवी थोडं धान्य घेतात आणि मुलाला कळवतात. मुलगा ऑनलाईन चेक करतो या महिन्यात किती धान्य आलं आणि किती घेतलं, किती घ्यायचं बाकी आहे. आणि ते राहिलेलं वाघोली मध्ये घेतो. मी हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानात चौकशी केली, त्याने असं कुठं असतं का म्हणून नकार दिला.

सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त; हप्ते वसुली केल्याचे स्पष्ट ------------- https://m.lokmat.com/mumbai/sachin-vaze-sachin-vazes-diary-bar-owners-a… अजून किती माहिती मिळेल? ते सांगता येत नाही ....

शो मस्ट गो ऑन! आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण “आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेलं तरी काही हरकत नाही”, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे. - याला म्हणतात माज!

In reply to by तुषार काळभोर

सहमत.

In reply to by तुषार काळभोर

+ २

ऑक्सिजन शोरटेज आहे अश्या अफवा पसरवणार्या लोकांच्या प्रॉपरट्या जप्त करा असा फतवा योगी आदित्यनाथांनी काढला आहे. कोणत्याही हॉस्पिटल मध्ये, पब्लिक असो वा प्रायव्हेट, कोणताही ऑक्सिजन तुटवडा नाही. जो काय प्रॉब्लेम आहे तो ब्लॅकमार्केट आणि साठेबाजी मुले आहे . त्यामुळे, ऑक्सिजन शोरटेज आहे म्हणार्यावर fir टाका. का म्हणे, तर एका हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे असे बोलले जात होते आणि तिथे खरतर ऑक्सिजन होता. म्हणून हे पाऊल उचलले. योगीचे लॉजिक काय भारी आहे नाही ? ब्लॅक मार्केट आणि साठेबाजी मुले बाजारात ऑक्सिजन नसला तर त्याला तुटवडा म्हणत नसतात, नै का ? प्रॉपर्टी हिसकावणे म्हणजे काय फ्री मार्केट, काय कॅपिटालिस्ट, आहाहा. भांडवलशाहीचा अत्योच्च बिंदू म्हणायचे योगीजी. https://www.thehindu.com/news/national/other-states/seize-property-of-t…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोणतीही बातमी अजिबात न वाचता, स्वतः माहिती न शोधता, स्वतः अभ्यास न करता तातडीने प्रतिक्रिया देण्याची उच्च परंपरा अजूनही सुरूच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

वाचली बातमी. जंगलराजच सुरूय तिथे. मागे एका बलात्कार पिडीत मुलीला रात्रीतून जाळून टाकले. आता असे फतवे. अर्थात भाजपचे सपकार असल्याने आम्हाला काही मान्य करायचेच नाहीये. फक्त चांगले काम करनार्या ठाकरे सरकारला १०५ घरी बसवल्याच्या रागाची खदखद शांत करायचीय.

In reply to by कॉमी

आणि होम क्वांरांताईन असणाऱ्यांना आजिबात ऑक्सिजन मिळत नाहीये. गंभीर स्थिती असल्याशिवाय व्यक्तीला ऑक्सिजन मिळत नाहीये. त्यामुळे होम क्वांरांताईन लोकांना अडचण येत आहे. ह्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही का ? जर घरी ऑक्सिजन मिळत नसेल तर सर्वांना हॉस्पिटलात ऍडमिट व्हावे वाटेल अस वाटेल. https://www.google.com/amp/s/theprint.in/health/in-up-oxygen-is-now-exc… योगीजींचे १० प्लॅन्टस बांधकामात आहे त्यामुळे परिस्थिती काही दिवसात सुधारेल अशी आशा आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही घर एका दिवसात बंधू शकता का, फिल्मसिटीची घोषणा केल्याकेल्या सुरु झाली पहिला? लॉजिक नावाचा प्रकार तुमच्याकडे अजिबात म्हणजे अजिबातच नाही, असे तुम्ही सुरवाती पासून आहात कि काही विशेष मेहनत घेतली आहे.

In reply to by कॉमी

वरील अनुषंगाने हा निर्णय महत्वाचा आहे. सरकारी हॉस्पिटल मध्ये बेड नसेल तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये बेड मिळवून त्याचा खर्च राज्य करेल. गरजेची गोष्ट आहे. https://indianexpress.com/article/cities/lucknow/govt-hospitals-cant-tu…

In reply to by कॉमी

आपण ज्या बातमीचा संदर्भ दिला आहे, त्यातील मजकूर काहीश्या चुकीच्या पद्धतीने दिला आहे असं वाटतंय. या बातमीचे शीर्षक खोडसाळ व दिशाभूल करणारे आहे आणि ही बातमी "द हिंदू"ची असल्याने त्यात नवल नाही. त्याच बातमीत खालील माहिती आहे. Earlier, Mr. Adityanath, in a high-level meeting with officials, directed them to take action under the NSA and the Gangsters Act against “anti-social elements” involved in “blackmarketing” of medicine, spreading rumours and trying to spoil the atmosphere. The State police have taken cue from the government and launched a campaign against people accused of hoarding and blackmarketing medicine and oxygen cylinders. U.P. Police said it had so far arrested 42 persons and recovered 239 oxygen cylinders and 688 vials of Remdesivir.

In reply to by श्रीगुरुजी

Blackmarketing आणि होर्डिंग बद्दल अटक करण्याबाबत काहीच चुकीचे नाही. सोशल मीडियावर अफवा पसरवणे आणि "वातावरण बिघडवणे" यासाठी संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिलाय तो चिंताजनक वाटला. Yogi Adityanath has asked officials to take action under the National Security Act and seize the property of individuals who spread “rumours” and propaganda on social media and try to “spoil the atmosphere”. वातावरण बिघडवणे म्हणजे काय योगी जाणोत. त्याबद्दल अटक का व्हावी हे सुद्धा समजत नाही. हि प्रायोरिटी का आहे हे पण कळत नाही. ट्विटर मधन ट्विट काढायला लावणे आणि आता हे.

In reply to by कॉमी

ही सुरूवात आहे असं वाटतंय. हुकूमशाही कडे वाटचाल होतेय का देशाची??? ऊद्या विशीष्ट पक्शाबद्दल काही बोललं तरी कारवाई करतील. ट्वीट वर कारवाईचा आदेश म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रयत्न. आता जो भाजपच्या धोरणांवर टिका करतो तो भक्तांमध्ये बाय डिफाॅल्ट कम्युनीस्ट, देशद्रोही वगैरे गणला जातो. मला काय लोबल लावतात पाहुयात. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हुकूमशाही 2014 नंतरच येणार होती पण आली नाही, नंतर 2019 ला येणार होती तेंव्हा पण आलीं नाही. अत्ता 2024 ला बघू येतेय का.

In reply to by आग्या१९९०

हुकुमशाही परवडली, पण ही " अडाणीशाही " फार धोकादायक आहे. नक्कीच, म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले.

In reply to by रात्रीचे चांदणे

नक्कीच, म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले >>> तेव्हा थोडीच माहीत होते अडाणशाही आहे असं. २०१९ ला सैनिकांच्या बलिदानाचा फायदा झाला. पण आता जनतेला कळलेय अडाण शाही घातक आहे असं.

In reply to by आग्या१९९०

तुमचा तळतळाट समजू शकतो! दुर्दैवानी सगळ्या भिकारी लोकांनी भिकारी सरकार दोनदा निवडुन दिले हो! काय करणार??

In reply to by आग्या१९९०

टीका करण्यासारखं काही नसलं की अडाणी, बायकोला सोडणारा, अल्पशिक्षित अशी व्यक्तीगत टीका सुरू होते.

In reply to by श्रीगुरुजी

घराणेशाहीच्या पाईकांची, ही खासीयतच आहे.... कामे तर केलीच नाहीत आणि विचारले की, पळपुटेपणा करणारच ...

In reply to by श्रीगुरुजी

१००% आणि मग गुजराथी गुजराथी म्हणून सुरु करायाचा ! मोदी आणि शाह जर पंजाबचे असते तर दुसरी बोबं मारली असती ( तरी नशीब मोदी किंवा शहा जनेवू धारी नाहीत ) गडकरी आणि फडणवीस अशी जोडी जरी आली तरी मग पगडी / पागोटे अश्या फुसक्या बारामतीकर सोडणार छत्रपतींचे वारस भाजपत गेले ( तात्पुरते का होईना ) यामुले जो काही अल्सर झालाय ! एकूण काय "पचतच नाही " काँग्रेस इतर कोणी सत्तेवर येऊ शकतं हेच दुःखच आहे .. आम्हाला ना लोकशाहीच्या नावाखाली फक्त एका पक्षाचे आणि एका घराण्याचं राज्य पाहिजे आहे ..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ही सुरूवात आहे असं वाटतंय. हुकूमशाही कडे वाटचाल होतेय का देशाची??? नक्की काय ते ठरवा. जंगलराज-२ हे प्रमाणपत्र बातमी न वाचताच देऊन मोकळे आणि आता हुकुमशाहीकडे सुरूवात आहे का हे ठरविता येत नाही.

In reply to by कॉमी

प्राणवायू टँकर अडविणाऱ्यांना फासावर चढवू, अशी काल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा धमकी दिली. म्हणून ते लगेच फासावर चढवणार आहेत का?

In reply to by श्रीगुरुजी

मला व्यक्तिगत रित्या या गोष्टींमध्ये फरक आहे असे वाटते. असो. पुढे काय होईल त्यावर अवलंबून आहे, उगीच कोणाला अटक केली नाही तर चांगले.