Skip to main content

दोन तासांत आणि 25 माणसांत लग्न कसे करावे?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 22/04/2021 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
फतवा: https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-lockdown-regulations… हे सरकार आल्या पासून विविध प्रकारचे आदेश किंवा सुचना , साॅरी फतवे, निघत आहेत... पण, हा फतवा मात्र खरोखरच विचार करायला लावणारा आहे... आम्ही आमच्या परीने ह्या फतव्याचे पालन, माझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी, करणार आहोतच. त्यासाठी काही नियमावली पण आखून ठेवणार होतो.. पण जालावर खालील नियमावली मिळाली.... -------------- दोन तासात लग्न समारंभ आटपायची नियमावली... 1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे. 2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे. 3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10ऐवजी 3मंत्र म्हणण्याची अट. 4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2मिनिटे दिली जातील. 5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल. 6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील. 7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10मिनिट दिले जातील... त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे.. *नियमावली संपली* ----------- आपल्या मनांत देखील, ह्या कार्याला आणि ह्या फतव्याला अनुसरून काही मुद्दे सुचत असतील तर जरूर सांगा...

वाचने 36606
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

मला पासपोर्ट काढताना लग्नाच्या सर्तीफेकेटची मूळ प्रत नाही म्हणून परत पाठवले ! बायकोचे नाव बदलले होते .त्यासाठी तिने प्रतिज्ञापत्र केले व मूळ सर्टिफिकेट सापडत नाही असा त्यात उल्लेख केला व दोन वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्याची कॉपी पासपोर्ट ऑफिसला सादर केली . त्यात गेझेट वगरे काही लागले नाही !

In reply to by चौथा कोनाडा

प्रतिज्ञापत्र, लग्नाची पत्रिका, विवाह प्रमाणपत्र, पेपरमधील जाहिरात हे नाव बदलल्याचे वैध पुरावे नाहीत त्यामुळे नाव बदलाची कायदेशीर प्रक्रिया करुन गॅजेट डिक्लेरेशन करून घ्यायला लागेल असे पारपत्र काढताना सांगितले गेले होते.

In reply to by चौथा कोनाडा

माझ्या लग्नानंतर बरी अर्धीचे नाव बदलले होते. त्यावेळी पारपत्रासाठी फक्त प्रतिज्ञापत्र द्यावे लागले होते. आता नियम बदलले असल्यास माहिती नाही.

काखेत  कळसा आणि गावाला वळसा . हल्लीच्या पिढीने तर लग्नाला पर्याय काढला आहे वेळ वाया जाऊ नये वाटत असेल तर लिव्ह इन सुरु करावे.  सर्वांच्या अनुमतीने योग्य वेळी सर्व हॊस मौज ,पाहिजे ते विधी, पाहिजे तितके लोक बोलावून लग्न साजरे करावे [ आमचे वय ७९ वर्षे असून वरील सूचनेस आमचा शुभाशीर्वाद आहे याची नोंद घ्यावी ]

In reply to by देशपांडे विनायक

वर देशपांडे विनायक यांनी लिहीले आहे तेच मी पण लिहीणार होतो. असे करता आले तरी कायदेशीर सर्टिफिकेट मात्र जरुर घ्यायला हवे.

In reply to by चित्रगुप्त

सामाजिक कारणे योग्य आहेत... शिवाय, मुलाला पण ते पटलेले नाही सौ.ला विचारले नाही, पण विचारले तर, ती आधी मला घराबाहेर काढेल...आणि असे घडले तर ती मुलाला कुटून काढेल... नकोच ते ...

In reply to by मुक्त विहारि

ब्रह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, असुर, गन्धर्व, राक्षस आणि पिशाच -- असे आठ प्रकारचे विवाह पूर्वी हिंदुस्थानात प्रचलित होते. याबद्दल जरा अभ्यास करून सोयीचा असेल त्याप्रकारे विवाह करून टाकावा. कोरोना मुळे जी सामाजिक स्थित्यंतरे आगामी काळात येऊ घातली आहेत त्यात या अष्ट्विवाहांचाही समावेश व्हायला हवा असे आम्हास वाटते.

In reply to by चित्रगुप्त

प्राजापत्य विवाहच योग्य आहे तो शास्त्र संमंत पण आहे संदर्भ : कौटिल्याचे अर्थशास्त्र , पान क्रमांक 238

In reply to by देशपांडे विनायक

वेळ वाया जाऊ नये वाटत असेल तर लिव्ह इन सुरु करावे. सर्वांच्या अनुमतीने योग्य वेळी सर्व हॊस मौज ,पाहिजे ते विधी, पाहिजे तितके लोक बोलावून लग्न साजरे करावे अव्यवहार्य पर्याय आहे. त्यापेक्षा घरच्या घरी हिंदू विवाह कायद्याप्रमाणे विवाह करावा हौस मौज आणि विधी वगैरे इतर लोकांसाठी असतात त्यांना एवढे महत्त्व देण्याची काय गरज आहे. कन्या वरेते रूपं माता वित्तं पिता गुणम बांधव: कुलम इच्छन्ति मिष्टान्ने इतरेजन: अर्थात मुलगी मुलाचे रूप पाहते. मुलीची आई मुलाच आर्थिक स्थिती आणि वडील मुलाचे गुण पाहतात मुलीचे बांध मुलाचे कुळ पाहतात बाकी सार्यांना फक्त लग्नात मिळणाऱ्या सुग्रास भोजनात रस असतो. म्हणजेच त्यांना फाटा मारायली मुळीच हरकत नाही. ज्याला कायद्याचे संरक्षण नाही कि समाजमान्यता नाही आणि मुलगा मुलगी एकमेकांशी वचनबद्ध ( commitment) होण्यास तयार नाहीत असला अचाट आणि अफाट पर्याय येथे कामाचा नाही सारे माझे मत आहे.

In reply to by देशपांडे विनायक

आपल्याला आपलं मन क्लीयर असेल तर बाहेरच्या गोष्टींकडे किती लक्ष द्यायचे! देवा ब्राह्मणाच्या आणि आई वडिलांच्या साक्षीने - आपल्या शपथा तयार करून- बोलून (घेऊन) लिव इन लग्नाला पर्याय म्हणून चालायला हरकत नाही कुणीतरी ते ८ प्रकारचे विवाह दिले आहेत त्यातले जबरदस्ती वाले (उदा राक्षस) सोडून बाकीचे आता समाजमान्य करायला हरकत नाही!

साखरपुडा झाला अस्ल्यास कोरोना जाइ पर्यंत लिवीन अनुसरावे असा फतवा लवकरच येणार आहे ? अशी अफवा कानावर आली आली आहे.

In reply to by गॉडजिला

आता फक्त दोन तासांत, हा समारंभ कसा उरकायचा? ह्यावरच गाडे अडले आहे ... पण, पुढच्या आठवड्यात ही अडचण पण दूर होण्याची शक्यता आहे ... भेंडी, मिपाकरांनाच राज्यशकट चालवायला द्यायला हवा... कारण, दोन्ही प्रश्र्नांना, तर्काला धरून उत्तरे मिळाली...

In reply to by मुक्त विहारि

रच्याकने भेंडी या शब्दाचा अर्थ जाणकार लोक एका हिण्दी स्लँगचा सब्सिट्युट म्हणुन घेतात...

In reply to by गॉडजिला

आयला, च्यायला ... हे शब्द जितके सहज वापरल्या जातात, तितक्याच सहजतेने हा शब्द मी वापरतो .... ह्या शब्दांना काहीही अर्थ नसतो

In reply to by मुक्त विहारि

हे बाकी भारी हं _/\_

अहो मुवि काका लग्न ठीक आहे हो , पण नंतर कसे करावे ? आधीच महामारी चालू है , त्यात घरात बसने ओघाने आले , मग कालौघाने बरेच सहन करणे आले . मला तर वाटत हे सर्व निवळल्यानंतर लग्न करावे . काय बोलता

लग्न झाल्या नंतर मुलीचे नाव बदलणे हा प्रकार च किळसवाणा आहे. जुन्या रुढी सोडून दिल्या पाहिजेत. नाव बदलून त्या मुलीची ओळख च पुसून टाकण्याचा हा गलिच्छ प्रकार आहे.

In reply to by Rajesh188

मात्र जन्म-प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट, घराची कागदपत्रे, वडिलांचे मृत्युपत्र वगैरेत असलेले माहेरचे नाव बदलून घेणे वगैरे फारच कटकटीचे वा अशक्यप्रायच असते. शिवाय हल्ली लग्न किती टिकेल, पुन्हा किती वेळा नाव बदलावे लागेल हेही सांगता येत नाही. म्हणूनच बहुधा परदेशात असली नाव बदलण्याची भानगडच नाही. किळसवाणे म्हणून नव्हे तर गैरसोयीचे आणि कटकटीचे असल्यामुळे मूळ नावच राहू देणे बरे.

In reply to by Rajesh188

मलापण हा प्रकार नाही पटत.. माझ्या नावाने जमीन करताना सोपं पडाव म्हणून माझं नाव बदलाव लागणार आहे.मला तर इच्छाच नाही,पण कायद्यामुळे काही दिवसांनी बदलाव लागणार आहे.

दोन तासानंतर चे नियम?

वेळमर्यादेची अडचण नाही. माणसांचा आकडा मात्र चुकलाय. २५ नको एकतर २४ हवे नाहीतर २६. विषम संख्या असेल तर कोणीतरी एक व्यक्ति बिनलग्नाची राहील किंवा एका व्यक्तिला दोन व्यक्तिंसोबत लग्न करावे लागेल.

टेंशन नका घेवु. आताच टीव्हीवर चालु असलेल्या बातमी नुसार कृषीमंत्र्याच्या मुलाच्या लग्नात २५ पेक्षा जास्त लोक असुन. आमदार खासदारच शासनाच्या नियमाला हरताळ फासत असल्याची चॅनेल बोंबाबोंब करत आहेत.

In reply to by इरसाल

माहिती बद्दल धन्यवाद