Skip to main content

संसार एक घर

लेखक जागु यांनी बुधवार, 15/04/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
संसार, म्हणजे एक घर थोड गुपितच ठेवावं आरपार दिसू नये म्हणून पडद्यांनी सजवावं संसार, म्हणजे एक घर भावनांना हळूवार टिपावं अश्रूच्या धारांना पागोळ्यांत साठवावं संसार म्हणजे एक घर प्रेमाच्या पायावर बांधावं उन्हाच्या झळा साहण्यास सोशिकतेच छप्पर असावं संसार म्हणजे एक घर काचेच्या खि़डक्यांचं असावं तडा जाऊ नये म्हणून विश्वासाच कुंपण असावं संसार म्हणजे एक घर प्राजक्ताने अंगणी फुलाव टाकाऊ वस्तुंनाही तडजोडीने सजवावं.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3918
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्त जागू.सुंदर. संसार म्हणजे एक घर नाव विश्वास असावं छत असावे चांदणे दार मायेचं असावं!

काय लिहु?? ईतक्या साध्या भाषेत कस काय लिहीता आपण ? असाच एक प्रश्न पडतो.. सुहास मिपादर्शनम सुखकारकम..

छान आहे कविता. मीनल.

संसार, म्हणजे एक घर भावनांना हळूवार टिपावं अश्रूच्या धारांना पागोळ्यांत साठवावं - हे मला फार भावलं.

सोपी भाषा.... संसार, म्हणजे एक घर भावनांना हळूवार टिपावं, अश्रूच्या धारांना पागोळ्यांत साठवावं छानच आहे...

किती सहजपणे किती मोठ्या गोष्टी सांगितल्यास ग! खूप खूप भावली तुझी कविता मनाला. :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

सहज आणि सुंदर. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

कविता आवडली :) संसार म्हणजे एक घर दोन जीवांचं स्वप्न असावं संकटवादळे असंख्य तरी एकमेकांचा आधार व्हावं संसार म्हणजे एक घर आनंदाचं आंगण असावं भरभराटीचा वारसा अन् सुखी लक्ष्मीने नांदावं आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

संसार म्हणजे एक घर प्रेमाच्या पायावर बांधावं उन्हाच्या झळा साहण्यास सोशिकतेच छप्पर असावं व्वा. सह्ह्ही. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

संसार म्हणजे एक घर काचेच्या खि़डक्यांचं असावं तडा जाऊ नये म्हणून विश्वासाच कुंपण असावं क्या बात है! खूपच आवडली कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

उमेश, सुहास, मिनल, दत्ता, स्वाती, क्रांती, सँडी,मराठमोळा,शितल, मदनबाण्,प्राजू तुम्हा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

अतिशय सुरेख कविता... भावली. सुचेता