Skip to main content

..बहुतेक रेशमी होते!

लेखक राघव यांनी रविवार, 18/04/2021 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
आकार घडीव घडले.. [पण] आघात अनावर होते! डोळ्यांशी डोळे भिडती.. संवाद कोवळे होते! स्वत्वाची ओळख नाही.. [प्रतिबिंब सोवळे होते!] अंधार असु देत जरासा.. तेजाचीच सवय होते! आयुष्य क्षणांतून घडते.. अन् क्षण, मोजके होते! -- निसटून जातसे काही.. बहुतेक रेशमी होते! राघव
लेखनविषय:

वाचने 5677
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मस्त आवडली. पण 2रे कडवे ओळ कंसात का लिहिली ?

छानच !
स्वत्वाची ओळख नाही.. [प्रतिबिंब सोवळे होते!]
हे तर खासच !

आयुष्य क्षणांतून घडते.. अन् क्षण, मोजके होते!
हे खासच! सं - दी - प

विडंबन वाचून मग इथे पोचलो.. कविता झकास जमली आहे.. अतिशय आवडली पैजारबुवा,

खास.आवडली रचना. -दिलीप बिरुटे

👌 सगळ्याच ओळी खुप छान.