असाच एक मुंबईमधला नाका.
सकाळची १० ची वेळ.
मी थांबलो होतो बस करता.
इतक्यात एक टेंपो येताना दिसला. लक्षात राहायचे कारण असे की त्यात ड्राईवरच्या बाजुला एक पन्नाशीचे गृहस्थ कोंबुन बसले होते.
ड्राईवरने टोल भरला.
जरा पुढे आल्यावर ऑक्ट्रॉयच्या शिपायाने टेंपो अडवला. गृहस्थ खाली उतरले. त्यांनी शिपायाला एक पत्र दाखवले. पण शिपाई काही टेंपो सोडेना. साधारण बोलण्यावरुन गृहस्थ मास्तर असावेत असे वाटले. ही जात कुठुनही ओळखता येते. थोड्या वेळ्याने मास्तर रागारागाने मोठ्या साहेबाला भेटायला ऑफिसमधे गेले. १५ मिनिटाने विलक्षण तापलेला चेहेरा घेउन बाहेर आले.
शिपायाच्या हातावर १० रुपयाच्या दोन नोटा कोंबुन परत टेंपोत बसले.
टेंपो पुढे निघाला.
तुमच्या आमच्या संरक्षणासाठी आजकाल नाक्यावर सिमेंटच्या पोत्यामागे बंदुकधारी पोलीस उभे असतात.
असाच एक पोलीस त्याचा किल्ला सोडुन पुढे आला. त्याने टेंपो थांबवला. मास्तर सारखे घड्याळाकडे बघत होते.
आता ही काय कटकट म्हणुन मास्तर पुन्हा खाली उतरले.
पोलीस म्हणाला "एंट्री"
आता मास्तरला पॅरॅलिसीस चा ऍटक येण्याचेच बा़की होते.
ड्राइवरने परिस्थिती ओळखली.
मास्तरना बाजुला केले आणि पोलिसाशी हस्तांदोलन केले.
टेंपो पुढे निघाला.
मास्तरांनी टेंपोत बसल्यावर आपल्या हातातले पत्र बाहेर भिरकावले.
ते नेमके माझ्या पायाशी.
'स्विकार पत्र' होते ते शाळेचे. मास्तर ने दोन बाके दान दीली होती शाळेला.
जाता जाता: बाळ कोल्हटकरांचे नाटक आठवले. कलीयुगात प्रवेश करायला द्वारपाल देवाकडे सुद्धा 'एंट्री' मागतो.
वाचने
4093
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मास्तर
+१
In reply to मास्तर by अवलिया
पर्फेक्ट
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
हो
उदात्त
In reply to हो by विनायक प्रभू
सबसे
In reply to उदात्त by अवलिया
प्रेत यात्रा
तुम्ही
मेलेल्या
In reply to तुम्ही by अवलिया
थोडक्यात
मी काल इथे
In reply to थोडक्यात by विनायक प्रभू
मास्तरे
जग
चपखल
In reply to जग by चिरोटा
वा...
In reply to जग by चिरोटा
जोरात ! --
In reply to जग by चिरोटा
+१
In reply to जोरात ! -- by लिखाळ
कलियुग!
तुमच्या
वरचा
In reply to तुमच्या by रेवती
खरंच आहे..
हे तर मी