हरिद्वारमधे कुंभमेळ्यात झालेले पहिले शाही स्नान हे सध्या सुशिक्षितांच्या रागाचे निमित्य ठरत आहे. करोनाची दुसरी लाट दररोज शेकडो बळी घेत आहे,दिवसेंदिवस बळींचा आकडा वाढत आहे. असे असूनही कुंभमेळ्याला परवानगी मिळालीच कशी? अगदी वर्तमानपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली गेली होती दोन दिवसांपूर्वी. येत्या २७ एप्रिलला चौथे शाही स्नान आहे आणि ते करण्याविषयी विचार सुरू आहे. ३० एप्रिलला मेळ्याची अधिकृत समाप्ती आहे. बहुतेक आखाडे शाही स्नानावर ठाम आहेत.
साधू म्हणताहेत की कधीतरी मरायचंच आहे तर शाही स्नान करुन,देवाचा आशिर्वाद घेऊन मरु. अतिरेकी धर्मगंडी विचारांनी भारलेल्यांकडून समंजसपणाची, जबाबदारीने वागण्याची फार अपेक्षा ठेवता येणारच नाहीये पण मुद्दा हा आहे की केंद्र शासनाने अशा परिस्थितीत परवानगी दिलीच कशी. बरं दिली तर परिस्थितीचे गांभीर्य अोळखून कुंभमेळा ऐनवेळी रद्द का नाही केला? तो रद्द करणं हे इतकं कठीण असावं? जीवापेक्षा धार्मिक स्नान महत्वाचं आहे? राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. भाजप आणि कुंभमेळा यांचा हिंदू धर्माशी अभेद्य संबंध असला तरी त्यापायी होणारा जीवाचा खेळ नक्कीच निषेधार्ह आहे. कुंभमेळ्यातून करोनाचा प्रसार झाला हे लक्षात न घेता त्याची तबलिगींच्या मेळाव्याशी तुलना करुन त्यापेक्षा कुंभमेळा बरा. तबलिगींसारखे घाणेरडे प्रकार किंवा उद्दामपणा तरी आम्ही हिंदूंनी केलेला नाही असे काही कुंभमेळा समर्थकांचे म्हणणे आहे. कुंभमेळ्याचा उद्देश हिंदू मेळे तबलिगींच्या मेळ्यापेक्षा जास्त शिस्तबद्ध,स्वच्छ आणि नेटके आहेत हे दाखवणे हा आहे का? काहीजण म्हणत आहेत की जिथे कुंभमेळा नव्हता अशा बर्याच ठिकाणी करोना पसरला की. त्याचं काय करणार? पण जिथे पूर्वनियोजन करुन करोनाचा प्रसार रोखणे शक्य आहे तिथे तो रोखणे महत्वाचे की जिथे नियंत्रण ठेवणे कठीण आहे अशा ठिकाणांशी तुलना करत बसायचं?
या सगळ्यात तोटा होईल तो भाजपचा. सगळं माहित असून आणि शक्य असूनही करोना पसरु दिल्याने भाजपचा जनाधार काही प्रमाणात कमी होईल आणि विरोधक याचा उपयोग प्रचारात करतील इतके मात्र नक्की!
वाचने
8100
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
कठीण आहे
अत्यंत चुकीचा निर्णय
माझी शंका
बहुधा अकबराच्या काळात ह्या
In reply to माझी शंका by अरविंद कोल्हटकर
जोपर्यंत,
कुंभमेळा झाला नसता तरी काही
विषाणू चे कॉकटेल झाले आहे इथे
In reply to कुंभमेळा झाला नसता तरी काही by अमर विश्वास
दुसराच भयंकर strain इथे
In reply to विषाणू चे कॉकटेल झाले आहे इथे by Rajesh188
https://timesofindia.indiatimes.com/india/indian-variant-found-i
सेल्फ गोल करू नका हो ....
हे असंच चालायंच !
काही मुद्दे
माहितीपूर्ण
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
माहितीपूर्ण
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
माहितीपूर्ण
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
तुमचे सर्वमान्य
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
तुमचे सर्वमान्य
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार