चैत्री पाडवा....
नवी पालवी चैत्राची ती,
रंग तिचा हिरवा..
पारंब्यांवर झोके घेई,
एक वेडा पारवा...
पानोपानी फुलली जाई,
दरवळे अंगणी मरवा..
मुदित सृष्टी बहरून जाई,
वसंत ऋतु हा बरवा..
मंदिरातला मृदुंग बोले,
सुमधुर तो केरवा..
संध्यासमयी कानी येई,
दूर कुठे मारवा..
सजतील सदने, गुढ्या तोरणे,
पाडवा आहे परवा..
नववर्षाची नवीन स्वप्ने,
संकल्प मनी ठरवा.....!
जयगंधा..
११-४-२०२१.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4625
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
मरवा
In reply to वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.
In reply to मरवा by सुरिया
असे पाठवून देतो. लागली लॉटरी
In reply to वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे राम...!
In reply to असे पाठवून देतो. लागली लॉटरी by प्रचेतस
अगदी खरं!
In reply to हे राम...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to अगदी खरं! by Bhakti
स्वतःचे मेसेज स्वतःला का
स्वतःचे मेसेज स्वतःला का
मस्त..
सुरेख
सर्व रसिकांना, मनापासून