नमस्कार मंडळी
सध्या मिपावर बाराखडीची चलती आहे. त्यामुळे म्हटले आपणही एक जिलबी टाकूया.
तर "जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्या शिकवावे , शहाणे करून सोडावे सकाळ जन" या समर्थांच्या उक्ती प्रमाणे मी हा धागा लिहितोय. कोणाच्या फायद्या तोट्याची जबाबदारी माझ्यावर नाही.अर्थातच प्रत्येकाने लेख आपल्या जबाबदारीवर वाचावा किंवा अनुकरण करावा हे सांगणे नलगे.
पुढील माहिती विकीवरून साभार ---
तर १९८३ मध्ये अमेरिकन क्रिप्टोग्राफर डेव्हिड चाम यांनी इ-कॅश नावाच्या अज्ञात क्रिप्टोग्राफिक इलेक्ट्रॉनिक पैशाची कल्पना केली. नंतर,त्यानेच १९९५ मध्ये डिजीकॅशद्वारे कुटचलनाच्या पेमेंट्सच्या सुरुवातीच्या स्वरूपात याची अंमलबजावणी केली ज्यात एका अशा आज्ञावलीची आवश्यकता होती जी वापरकर्त्याला बँकेतून पैसे काढण्यासाठी आणि/किंवा एकादी कूट किल्ली प्राप्तकर्त्याकडे पाठविण्यासाठी कामी येईल . यामुळे जारी करणारी बँक, सरकार किंवा कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे या व्यवहाराचा मग काढता येणार नाही.
याच धर्तीवर १९९८ मध्ये वी डाईंने "बी-मनी" चे वर्णन प्रकाशित केले, ज्याचे नाव निनावी, वितरित इलेक्ट्रॉनिक रोख प्रणाली आहे. त्यानंतर लवकरच निक निकोने बिट सोन्याचे वर्णन केले.बिटकॉइन आणि त्याचे अनुसरण करणार्या अन्य कूटचलनाप्रमाणेच बिट गोल्ड चे वर्णन इलेक्ट्रॉनिक चलन प्रणाली म्हणून केले गेले.
परंतु प्रथम विकेंद्रित कुटचलन , बिटकॉइन, २००९ मध्ये सतोशी नाकामोटो यांनी तयार केले होते.हा एक माणूस आहे कि एकत्र काम करणाऱ्या माणसांचा संघ हे अजून गुलदस्त्यात आहे. त्याने त्याच्या प्रूफ ऑफ वर्क स्कीममध्ये एसएचए -२५६, एक क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शन वापरला ज्याची फोड करणे अत्यंत कठीण आहे. आजच्या घडीलाही हे सर्वात लोकप्रिय कूटचलन आहे.
एप्रिल २०११ मध्ये, विकेंद्रीकृत डीएनएस बनवण्याच्या प्रयत्नात नेम कॉईन तयार केले गेले होते, जे इंटरनेटची सेन्सॉरशिप खूप कठीण करेल. त्यानंतर लवकरच, ऑक्टोबर २०११ मध्ये, लिटकॉईन सोडण्यात आला.आणखी एक उल्लेखनीय क्रिप्टोकरन्सी, पीअर कॉईनने प्रूफ-ऑफ-वर्क / प्रूफ-ऑफ-स्टेक हायब्रीड वापरले. त्यानंतर अशी अनेक कुटचलने येतच राहिली. साधारण ही सर्व कूट चलने ब्लॉक चेन तंत्र ज्ञानावर आधारित आहेत.
=====================विकी समाप्त================================
सध्या कायद्याने बऱ्याच देशात, ज्यात भारतही आलाच, कूट चलनावर बंदी आहे. कारण बॅंकिंगचे जे मूलभूत नियम आहेत, जसे की कोणत्या देशाने किती नोटा छापायच्या,देश देशातील चलनाचे गुणोत्तर काय असावे, ते कूट चालनास लागू पडत नाहीत. त्यामुळे रुपयाची /चलनाची किंमत घसरूनअर्थ व्यवस्था कोसळण्याची भीती सरकारला वाटते. परंतु तरीहि लोक याकडे आकर्षित होताहेत आणि गम्मत म्हणजे काही कंपन्या तुम्ही पगाराचा काही भाग कूट चलनात घ्याल का? असेही विचारू लागल्या आहेत. तसेच ही चलने खरेतर खरेदी विक्री करण्यासाठी (जसे आपण नोटा वापरतो) बनवली आहेत. पण लोक त्याचा शेअर मार्केट सारखा वापर करून फायदा कमावतात.
यासाठी बरेच ब्रोकिंग किंवा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहेत, पण ते बरेचदा डॉलर मध्ये व्यवहार करतात त्यामुळे आपल्याला मर्यादा पडते. तरीही वझीर एक्स, बिट बीएनएस, बिनन्स असे काही ब्रोकर ही सेवा भारतीय रुपयात ही देऊ करतात. फक्त तुम्हाला थेट बँक खाते लिंक ना करता त्यांच्या वॉलेटमध्ये गूगल पे ने पैसे टाकावे लागतात आणि खरेदी विक्रीची रक्कम तिथेच जमा होते जी नंतर बँक खात्यात घेता येते.
ही सगळी एक्स्चेंज बारा महिने चोवीस तास चालू असतात आणि खरेदी विक्रीची रक्कम २ मिनिटात वॉलेटमध्ये जमा किंवा वजा होते. या सर्व ब्रोकरचे स्वतःचेही एक कुटचलन असते पण कोणत्याही ब्रोकरकडून तुम्ही कोणतेही कुटचलन घेऊ/विकू शकता. जसे कुठल्याही ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वरून आपण कोणताही शेअर घेऊ शकतो तसेच.
पण सगळी अंडी एकाच टोपलीत ठेऊ नका हा नियम अर्थातच इथेही लागू होतोच. चला तर मंडळी - तुकोबा म्हणतात त्या प्रमाणे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, प्रमाणे लागा कामाला.(समाप्त)
वाचने
12737
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमचा पण हरणगांव ....
अजच्या घदीलही हे सर्वात
अजच्या घदीलही हे सर्वात लोकप्रिय कुत चलन आहे.हे वाक्य मला कुणवीत आहे.मोकलाया दाहि दिश्या
In reply to अजच्या घदीलही हे सर्वात by सतिश गावडे
लेखनातील चुकीबद्द्ल माफ करा
In reply to मोकलाया दाहि दिश्या by मुक्त विहारि
कुट चलनालाही आवाज आहे.
सध्या कायद्याने बऱ्याच देशात, ज्यात भारतही आलाच, कूट चलनावर बंदी
पण मी काय म्हणतो .....
In reply to सध्या कायद्याने बऱ्याच देशात, ज्यात भारतही आलाच, कूट चलनावर बंदी by तुषार काळभोर
नक्कीच करु शकता
In reply to पण मी काय म्हणतो ..... by मुक्त विहारि
आपल्याकडे वीजेची किंमत खूप जास्त आहे
In reply to नक्कीच करु शकता by राजेंद्र मेहेंदळे
हा धंदा चांगला आहे ....
In reply to नक्कीच करु शकता by राजेंद्र मेहेंदळे
हाहाहा
In reply to हा धंदा चांगला आहे .... by मुक्त विहारि
खोचक नाही....
In reply to हाहाहा by राजेंद्र मेहेंदळे
ओह अच्छा
In reply to खोचक नाही.... by मुक्त विहारि
अगदी असेच कन्विन्स करत असतात
In reply to ओह अच्छा by राजेंद्र मेहेंदळे
हा एक माणूस आहे कि एकत्र काम
जो पर्यंत कोपर्यावरचा
सहमत.
In reply to जो पर्यंत कोपर्यावरचा by चौथा कोनाडा
मान्य आहे
In reply to जो पर्यंत कोपर्यावरचा by चौथा कोनाडा
आणि त्यानंतर आलेल्या
In reply to मान्य आहे by राजेंद्र मेहेंदळे
शक्यता आहे
In reply to आणि त्यानंतर आलेल्या by चौथा कोनाडा
क्रिप्टो करंशी म्हणजे कुटचलन
ही चलने खरेतर खरेदी विक्री
मला समजले नाही
In reply to ही चलने खरेतर खरेदी विक्री by चौथा कोनाडा
कुटचलन सन्खेने मर्यादीत असल्याने त्याचा प्रचार
कुटचलनाची विश्वासार्हता हा
In reply to कुटचलन सन्खेने मर्यादीत असल्याने त्याचा प्रचार by गॉडजिला
As of February 2020, Bitcoin
In reply to कुटचलनाची विश्वासार्हता हा by चौथा कोनाडा
भारताने आधिक्रुत कुटचलन तयार
In reply to As of February 2020, Bitcoin by गॉडजिला
बीटकॉईन / कुटचलन यावर दै.
कुटचलनाची ओळख करून