Skip to main content

या आठवड्याचे व्यंगचित्र.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 14/04/2009 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/6912 अय्या!!! हे काय ? मी तर मोजा घेतला होता विणायला...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6936
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

धमाल !

(मोजा विणायला सुरुवात केल्यावर बहुदा फोन आला असावा मैत्रिणीचा त्यामुळे फोन संपेपर्यंत मोजा फारच मोठा झाला! ;)) चतुरंग

In reply to by चतुरंग

लॉजिक पटले! हल्ली जिकडे तिकडे असंख्य मुली सतत मोबाईल वर बोलताना दिसतात. वाहन चालवताना सुद्धा मोबाईल कानाशी असतो. पाठच्यांनी कितिही हॉर्न वाजवला तरी ह्यांच्या वर परिणाम शून्य. बहुदा घरच्या फोनचा आजार मोबाईलवर पोहोचला असावा. ह्या आजाराला (सतत फोन / मोबाईल कानाशी असणे) काय म्हणतात? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

मलाही लॉजिक पटलं. हल्ली काही मुलींचा एकच गाल टॅन / काळा झालेला दिसतो तेव्हा तर हे जास्तच पटतं. व्यंगचित्र आवडलं हे वे सां न ल. (रेडीओ ऍस्ट्रॉनॉमर्स अशा नॉईज तयार करणार्‍या गोष्टी, उदा. फोन, टी.व्ही. अंमळ कमीच वापरतात.) अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

हा,हा,हा... क्रोशाच्या सुया अगदी लार्ज साईझ आहेत. ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

In reply to by मदनबाण

मस्त व्यंगचित्र .
>> हा,हा,हा... क्रोशाच्या सुया अगदी लार्ज साईझ आहेत विणकाम आणि क्रोशा वेगळे. (knitting & crochet) . ह्या विणकामाच्या सुया दिसतायेत. क्रोशाच्या सुईला हूक असतो.

अगदी असेच म्हणतो

हा हा हा .. मस्त आहे :) -- लिखाळ.