सामान्य माणूस काय करु शकतो?
मित्रहो आपण बर्याचदा समाज माध्यमांवर विविध विषयांवर चर्चा करतो. काहीवेळा या चर्चा समाजात घडणार्या काही चुकीच्या किंवा दांडगाईने केल्या जाणार्या गोष्टींबद्दल असतात. गुंडांनी, राजकारण्यांनी कायदे धाब्यावर बसवून केलेली मनमानी असो किंवा धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर सार्वजनिक वाहतूकीला अडथळे आणणारी वास्तू बांधणे किंवा कर्णकर्कश्य संगीत लावून मिरवणूका काढणे किंवा विशिष्ट समाजाने आपण अल्पसंख्यक किंवा अन्यायग्रस्त असल्याचा आणि त्याद्वारे राजकारण्यांना एकगठ्ठा मतदान करुन त्याबदल्यात सार्वजनिक जीवनात मनमानी करणे, गैरफायदे घेणे , समाजाचे धार्मिकस्थान बांधणे, पैसे वाटून धर्मांतर करणे किंवा काहीवेळा मोठी लोकसंख्या असणार्या समाजगटांनी संख्याबळावर राजकारण्यांना वेठीस धरुन स्वत:च्या फायद्याच्या योजना पदरात पाडून घेणे, रस्त्यात धनदांडग्याची महागडी गाडी तुमच्या साध्या कारला,बाईकला धडकली तर काहीवेळा तुम्हीच कसे चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत होता याबद्दल वाद घालून नुकसानभरपाई न देता तो धनदांडगा चक्क सुटूही शकतो. पळूनही जाऊ शकतो. किंवा अगदी कामाच्या ठिकाणीही मॅनजमेंटकडून एखाद्या निरपराध्यावर अन्याय होऊ शकतो. राजकारणी,वकील,पोलिस आणि ऑफिसचे मॅनेजमेंट यांचे चक्क साटेलोटेही असू शकते. नियम धाब्यावर बसवून तुम्हाला निरोपही दिला जाऊ शकतो, पगार अडवला जाऊ शकतो, कपात केली जाऊ शकते, बालंट आणले जाऊ शकते. अगदी काहीही होऊ शकते.
असे एक ना अनेक अन्याय आपण पाहतो,अनुभवतो. हे सहन न होऊन समाजमाध्यमांवर त्याबद्दल रागही व्यक्त करतो. पण जे चुकीचे घडायचे ते घडतच राहते. परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून बिघडते. किंबहूना सामान्य लोक जास्तीतजास्त काय करु शकतात,किती उपद्रव करु शकतात याचा राजकारणी, गुंड, मवाली, दांडगेश्वर,लुटारु यांचा अभ्यास अजूनच पक्का होतो,नेमका होतो. पोलिसांची मदत घ्यावी तर तिथेही न्याय मिळेलच तोसुद्धा पदरचा एक पैसाही खर्च न करता याची शक्यता तशी कमीच. साधा मोबाईल फोन हरवल्याची पोलिसात तक्रार केली तर शोधण्यासाठी फोनच्या किंमतीइतके पैसे मागण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिस दरवेळी अन्यायच करतात असे नाही पण बहुतांश वेळा भरपूर शारिरीक,मानसिक,आर्थिक ताप होऊन, भरपूर कालापव्यय करुन मिळालेला न्याय हा न्याय कसा म्हणावा?
या सगळ्यात त्रास हा फक्त आणि फक्त सामान्य माणसालाच होतो. सोमिवरची अोरड सोमिवरच राहते. "कुठे या गुंड,राजकारण्यांच्या,धनदांडग्यांच्या नादाला लागता?" आपण कुटूंबवत्सल माणसे. उगाच यांना जाब विचारुन किंवा विरोध दर्शवून कशाला आपल्याच पायावर कुर्हाड मारुन घ्यायची असा विचार होतो. अर्थात यात चुकीचे काहीच नाही. आपण जरी अन्यायाला विरोध करणारे असू आणि त्यासाठी खस्ता खायची तयारी असली तरी यात आपले कुटूंबिय भरडले जाऊ शकतात. त्याची भिती वावगी नाहीच.
पण मग या अन्यायांवर काही असे उपाय असू शकतात का की ज्यामुळे राजकारण्यांना, गुंड-मवाल्यांना, समाजसंख्येच्या जोरावर दादागिरी करणार्यांना यात शिरकाव करता येणार नाही, झुंडशाही माजवता येणार नाही असा काही मार्ग असू शकतो का? इथे कोणी असा फारसा मानसिक ताप न होता किंवा शारिरीक इजा न होता सार्वजनिक जीवनातल्या अन्यायाविरोधात छोटा/मोठा लढा दिला आहे का? काय अनुभव होता? कमीतकमी त्रास होऊन असे अन्याय दूर करण्याचे काय उपाय/मार्ग असू शकतात?
अन्यथा हे असेच मागील पानावरुन पुढे जात राहील. अन्याय पाहणे किंवा अनुभवणे त्यातून मार खाणे किंवा नुकसान सोसणे आणि त्याबद्दल समाजमाध्यमांवर खंत व्यक्त करणे हे चक्र असेच फिरत राहील. यातून साध्य काहीच होणार नाही. ते कमीतकमी त्रासात साध्य होण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होऊ शकते. नवे मार्ग सापडू शकतात.
वर्गीकरण
परिस्थिती बघून योग्य निर्णय घेतले तर अन्याय टाळता येतो.
पण अन्यायाचा प्रतिकार का
लोकशाहीची एक चांगली गोष्ट
खरी स्थिती ही आहे
In reply to खरी स्थिती ही आहे by Rajesh188
फारच जोक मारता बा तुम्ही.
Learn technology to hack