Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ८)

लेखक साहना यांनी बुधवार, 24/03/2021 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
- आमची माणसं, आमची वसुली - वसुलीच्या बाबतीत दुबई ची मक्तेदारी मोडत मुंबई आत्मनिर्भर झाली आहे. त्याशिवाय खंडणी वसुली हा सरकारी व्यवसाय झाला आहे. - भारताने इंग्लंड चा पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये धुव्वा उडवला. - फायजर आता तोंडाने घेणारी कोविड ची गोळी आणणार आहे (म्हणे). - आईसलॅन्ड मध्ये पुन्हा एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. मागे एकदा असे घडले तेंव्हा ६ महिने विमानसेवा खंडित झाली होती. - सुएझ कॅनाल मध्ये एक महाप्रचंड बोट अडकली आहे आणि त्यामुळे हजारो बोटींचा ट्रॅफिक जॅम झाला आहे. - कंगना राणावत जयललिताच्या बायोपीक मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर हल्लीच लाँच झाला आहे. - येथेच्छ खाऊन झाल्यानंतर पैसे मागितले म्हणून एक ढाब्यावाल्याला आणि त्याच्या ९ माणसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत गुंतवले. - मुंबई पुणे ची डेक्कन queen रेल्वेगाडी नव्या स्वरूपांत येणार आहे. - नांदेड येथे कोर्टाने एका बलात्कार्याला ६४ दिवसांत फाशीची शिक्षा सुनावली. - एका २२ वर्षीय मुलीने आपल्याच बापाला दारू पाजून जिवंत पेटवून दिले. बाप आपल्यावर लैगिक अत्याचार करत होता असा दावा तिने केला. - अधोवस्त्र आणि विग मध्ये लपवून काही कोटींचे सोने आणणाऱ्या लोकांना चेन्नई हवाई तळा वर पकडले. देशांत सोने आणणार्यांना शिक्षा करण्याच्या भारतीय सरकारच्या मूर्खपणाची किंवा आमच्यासारख्यानी केली. विरंगुळा म्हणून हे विस्मृतीत गेलेले गाणे : https://www.youtube.com/watch?v=eCpbYmO4Ndo

वाचने 55972
प्रतिक्रिया 193

प्रतिक्रिया

In reply to by स्वलिखित

हे एकच नव्हे अनेक उदाहरणे आहेत , पाकिस्तान मध्ये शहरांची आणि रस्त्यांची नावे बदलली आहेत , ना त्यांना कुठलाही इतिहास ना , आधार , अर्थात पाकिस्तान जन्माला आला तेव्हा पासूनच हि नावे बदलायला सुरुवात झाली
, यात नवीन ते काय.. ज्यांनी आपले बाप बदलले, ज्यांनी तलवारी समोर आपली सलवार उतरवली, दुश्मनांची आणि आक्रमकांची मुंडकी छाटायची सोडून "दुसरेच" काहीतरी छाटले.. त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा.. आयडेंटी क्रायसिस चे सर्वात बेस्ट उदाहरण म्हणजे पाकिस्तान... आणि त्यांचे इथे राहिलेले वंशज..!!

In reply to by स्वलिखित

चालायचेच !! देश तशी संस्क्रुती ... म्हणजे बघा बर्‍याच देशात शिक्षा म्हणुन खुले आम मुंडके छाटतात. तसे आपणही करावे का? नाही ना? मग ईतर करतात म्हणुन आपणही केलेच पाहिजे का? आम्रविकेत कुठल्याही हायवे ला कुणाचेही नाव नाही. नंबर असतो. तसे आपणही करावे ... म्हणजे नामांतराचा प्रश्नच मिटला .. काय म्हणता ??

In reply to by सुक्या

अमेरिकेत हायवेला नावे आहेतच, ती रोज वापरली जात नाहीत म्हणून लक्षात राहत नाहीत. उदाहरणार्थ आय-८८० ला Nimitz Freeway असे नाव आहे. तिथे असल्या गोष्टींच्या मागे फुकट वेळ खर्च करण्यापेक्षा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त डॉलर कमविणे हेच अंतिम ध्येय असल्याने उगाच कुणी यासाठी आंदोलने करत बसत नाही. आर्थिक स्वातंत्र्य भारतात अजून मिळायचे आहे, ते जर मिळाले तर या सगळ्या गोष्टींची तीव्रता आपोआप कमी होईल.

In reply to by मनो

खरी शंका = आर्थिक स्वातंत्र्य यात काय अपेक्षित असते? अमेरिकेत कोणते आर्थिक स्वातंत्र्य आहे जे आपल्याकडे नाही? त्याने काही अडचणी निर्माण होतील का? (समाजाला किंवा राजकारणी लोकांना)?

In reply to by तुषार काळभोर

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे दोन व्यक्तींना सरकार च्या लुडबुडीशिवाय आर्थिक व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य. मागील ३० वर्षांत अमेरिकेतील अर्थी स्वातंत्र्य बऱ्यापैकी कमी झाले असले तरी भारताच्या तुलनेत ऐरावत आणि गंगू तेल्याचे गाढव इतका फरक आहे. तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही हा रिपोर्ट पाहू शकता https://www.heritage.org/index/ एक सोपे उदाहरण पहा. अमेरिकी MRP नावाचा दळभद्री प्रकार नाही. तुम्ही तुमच्या मालकीची वस्तू तुम्हाला वाट्टेल त्या किमतीला विकू शकता. ह्या एका स्वातंत्र्याने ग्राहक आणि विक्रेता ह्यांचा फायदा होतो. वीज म्हणजे ऊर्जा क्षेत्र भारत सरकारने आपल्या ताब्यांत ठेवले. ह्याची परिणीती भारत मागासलेला राहण्यात झाली. ऊर्जा हा सर्व क्षेत्रांचा क्षेत्रांचा पाया असल्याने एकदा ह्या क्षेत्राचे बॉटल नेक झाले कि इतर सर्व क्षेत्रे मागे पडतात. १९५० मध्ये नेहरू सरकारने नवीन कपड्याच्या गिरणी निर्माण करण्यावर बंदी घातली. ह्याचा परिणाम म्हणून भारत जगाच्या तुलनेत वस्त्रोद्योगात खूपच मागे पडला. आज बांगलादेश आणि इंडोनेशिया आमच्या पुढे आहे. आर्थिक स्वातंत्र्य नसल्याने काय नुकसान होते सर्वांत चांगले उदाहरण म्हणजे APMC कायदा आणि त्यांतून झालेले शेतकऱ्यांचे नुकसान. आर्थिक स्वातंत्र्याने समाजाचा फायदा आणि राजकारणी मंडळींचे नुकसान होते. आर्थिक व्यवहारावर सरकारचा अंकुश असला कि सर्वांच्या शेंड्या राजकारणी मंडळींच्या हातात असतात त्यामुळे त्यांचा फायदा होतो.

In reply to by सुक्या

नावे असतात पेंसिफिक कोस्टल हायवे, सेंट्रल एक्सप्रेस वे. कोरियन मेमोरियल, डाल्टन हायवे इत्यादी. पण हि नवे विशेष महत्वाची नसतात. आकडे महत्वाचे. अमेरिकेतील रस्त्यांचे नंबर रँडम नसून त्याला अर्थ असतो, GPS आधी हे नंबर अत्यंत महत्वाचे असायचे. सम आकडा असेल तर इंटरस्टेट पूर्व पश्चिम म्हणजे आडवा जातो. विषम संख्या असेल तर उत्तर दक्षिण जातो. आकडा पूर्व पासून पश्चिम पर्यंत वाढत जातो. US १ अटलांटिक महासागराजवळ आहे तर us १०१ पश्चिम किनारपट्टीवर आहे. तीन आकडे असतील तर त्याचा अर्थ तो महत्वाचा रास्ता नसून एखाद्या महत्वाच्या रस्त्याला जोडणारा जोड रास्ता असतो. १०१ ह्याला एकमेव अपवाद आहे. त्यामुळे विना मॅप न वापरता आपण बऱ्यापैकी दिशा समजू शकतो.

- हरप्पा मधील लोक त्या काली सुद्धा मल्टिग्रेन पौष्टिक लाडू खात होते असे निदर्शनास आले आहे. - सुएझ कालवा किमान आणखीन १ आठवडा तरी बंद राहणार आहे असे वाटते. जहाजाचे नाक जमिनीत घुसले आहे आणि इजिप्त मधील प्रत्येक ओढनौका हिला खेचण्यात गुंतली आहे. - दारू च्या व्यवसायातून सरकार बाहेर पडेल असा स्तुत्य निर्णय केजरीवाल ह्यांनी घेतला आहे त्याच बरोबर दारू विकत घेण्यासाठी वयोमर्यादा आता १८ असेल, २१ नाही. हा सुद्धा निर्णय स्तुत्य आणि बरोबर वाटतो. - महाराष्ट्रातील रिवर्स चाणक्य रामदास आठवले ह्यांनी राष्ट्रपती कोविंद ह्यांची भेट घेऊन महाराष्ट्रांत राष्ट्रपती राजवट लावण्याची विनंती केली. - मोदी ह्यांनी नेहमी प्रमाणे यु टर्न घेत दिल्लीला राज्य दर्जा देण्याऐवजी दिल्लीची स्वायत्तता काढून घेणारा कायदा पारित केला. माझ्या मते मोदी ह्यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे आणि लोकशाही विरोधी आहे. केजरीवाल हा माणूस कितीही नालायक असला तरी लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहे. मनीष सिसोदिया सारखे नेते किमान विनोद तावडे पेक्षा जास्त चांगले काम करत आहेत. - आदित्य ठाकरे ह्यांना एड्स झाला आहे अशी खोटी बातमी सोशल मीडिया वर पसरून बरीच मोठी खळबळ उडाली. पण हि बातमी TV९ च्या बातमीला एडिट करून पसरवण्यात आली आहे असे स्पष्टीकरण देण्यात आले. - ऑक्सफर्ड चे स्कॉलर अभिजित सरकार ह्यांनी हिंदू विरुद्ध गरळ ओकली आणि लहान असताना आपण कश्या प्रकारे सरस्वती देवीच्या मुर्त्या फोडत होतो हे त्यांनी सांगितले. त्याशिवाय ऑक्सफर्ड मधील एका हिंदू युवा विद्यार्थिनीला सुद्धा त्यांनी टार्गेट केले. ऑक्सफर्ड ने त्यांना हाकलून लावावे अशी मागणी अनेक हिंदू लोकांनी केली. (ज्या लोकांना स्वतः एखादे विद्यापीठ चालविण्याची लायकी नाही त्यांनी इतरांना सॅले देऊ नयेत असेच कदाचित ऑक्सफर्ड ह्या मंडळींना सांगेल) - ईयूटुब आसुसून प्रेरणा घेऊन केरोसीन लावून स्वतःचे केस सरळ करण्याच्या प्रयत्नात एका बारा वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःला आग लावून घेतली. - मोदी सरकारच्या कृषी सुधारणांचा फायदा घेत अनेक भारतीय स्टार्टअप्स पुढे सरसावल्या आहेत. ह्या वर्षी एकूण २०० मिलियन डॉलर्स चे फंडिंग ह्यांनी मिळवले आहे. - भारतांत कोरोनाची दुसरी लाट (कि तिसरी) आली आहे हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रांत रोग विशेष पसरला असून दिल्लीत सुद्धा रोगाने थैमान मांडले आहे. - शेतकऱ्यांचे आंदोलन फुस्स झाले असे असे वाटते. थोर शेतकरी नेत्यांनी बोलावलेल्या लुधियाना मधील कृषी महापंचायीतला ३००० हजार लोक सुद्धा आले नाहीत म्हणून वैफल्यग्रस्त होऊन पुन्हा पंजाब आणि हरियाणात कधीही पुन्हा महापंचायत घेणार नाही असे गुरनामसिंग चारुनि ह्यांनी सांगितले आहे. - शेतकऱ्यांनी २६ मार्च ला भारत बंद घोषणा केली आहे.

दिल्लीला राज्य दर्जा देण्याऐवजी दिल्लीची स्वायत्तता काढून घेणारा कायदा पारित केला. मुळात दिल्लीला राज्याचा दर्जा देणे हीच चूक आहे. कारण दिल्लीत देशाची आणि आंतराष्ट्रीय संस्था यांची सर्व महत्त्वाची/ मुख्य कार्यालये आहेत त्यामुळे त्या "राज्याचे" धोरण कायम केंद्र सरकारशी जुळणारे असणे आवश्यक आहे. उद्या महत्त्वाची आंतराष्ट्रीय अर्थशास्त्रीय परिषद होणार असताना केजरीवाल सारख्या टमरेल गँगच्या माणसाने १ लाख आंदोलनजीवींना आंदोलन करण्यास परवानगी दिली तर काय अनर्थ होईल हे लक्षात घ्या? उमर खालिद सारख्या अतिरेकी माणसावर दिल्ली मध्ये दंगे करण्याबद्दल UAPA सारख्या अत्यंत महत्त्वाच्या कायद्याखाली खटला भरण्याबद्दल केवळ परवानगी देण्यासाठी श्री केजरीवाल यांनी ३ वर्षे लावली. हा काही कोंबडी चोरीचा खटला नव्हता. दिल्लीतील सुरक्षा हि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. अशा ठिकाणी श्री केजरीवाल सारखा बेभरवशी माणूस प्रमुख असणे हेच अत्यंत धोक्याचे आहे. दिल्ली हि केंद्र शासितच असावी असे माझे मत आहे आणि त्याला माझ्या बहुसंख्य लष्करी आणि नागरी मित्रांनी दुजोरा दिला आहे. लोकशाहीत अशा गोष्टी ज्याला रास्त मर्यादा (reasonable restrictions) म्हणतात, आवश्यक आहेत. उदा. लग्न करणे हा मूलभूत हक्क आहे. परंतु लष्करात २५ वर्षापर्यंत आपल्याला लग्न करता येत नाही आणि आपण केलेच तर आपल्याला सरकारी घर हक्क म्हणून मागता येत नाही. या रास्त मर्यादा (reasonable restrictions) घटनेशी सुसंगत आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

मुळांत कुठल्याही राजधानीत, किमान माणसे असावीत... चाणक्यचे हेच मत होते आणि चीन मध्ये राजधानीच्या बाबतीत, हीच पद्धत होती... इतकेच कशाला? छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील, राजगड आणि रायगडावर, कमीतकमी राबता कसा राहील? ह्याचीच काळजी घेतली होती...

In reply to by सुबोध खरे

दिल्ली राजधानी असली तरी महत्वाचे शहर आहे आणि असंख्य लोक इथे राहतात. भारत सरकार कॅन्सर प्रमाणे वाढून अवाढ्यव्य झाले आहै ह्यांत त्यांची काही चूक नाही. सर्वच गोष्टी सरकारी सोयीने का बरे कराव्यात. पाहिजे तर असंख्य सरकारी खाती दिल्ली बाहेर हलवली जाऊ शकतात. काही प्रमाणात केंद्रीय सरकारला दिल्लीच्या रोजच्या गोष्टींत निर्णय क्षमता असली पाहिजे हा आपला मुद्दा पटतो पण मोदी सरकारचा कायदा त्या दृष्टीने अजिबात नाही. केजरीवाल सरकार कडून त्यांची निर्णय क्षमता काढून घ्यावी आणि त्यांच्या प्रत्येक प्रकल्पांत खो घालावा असा उद्धेश्य वाटतो. त्याशिवाय दिल्लीला संपूर्ण राज्याचा देण्याच्या मोदी ह्यांच्या आश्वासना पासून हा यू टर्न आहे.

In reply to by साहना

दिल्लीला संपूर्ण राज्याचा देण्याच्या मोदी ह्यांच्या आश्वासना पासून हा यू टर्न आहे. केजरीवाल सारखा बेभरवशी माणूस दिल्लीचा मुख्यमंत्री होतो यानंतरच त्याचे तोटे काय आहे ते समोर आले आहेत. एखाद्या दहशतवादाला उघड समर्थन करणाऱ्या माणसावर खटला भरण्यासाठी तीन वर्षे थांबायला लागले तर दिल्लीची सुरक्षा कशी करणार हा फार मोठा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. बाकी दिल्लीची अर्धी लोकसंख्या तेथील केंद्रीय आणि परदेशी कार्यालये आणि त्याला अनुषंगिक सेवांसाठीच तर आहे तेंव्हा कार्यालये बाहेर हलवली तर हि लोकसंख्या सुद्धा तेथे हलवावी लागेल आणि केवळ नवी दिल्ली च्या ऐवजी अत्याधुनिक दिल्ली असे नामकरण सोडले तर पुन्हा तेच प्रश्न उपस्थित होतील.

In reply to by सुबोध खरे

पाहिले तर दिल्ली जी देशाची राजधानी आहे तिची सीमा कोणत्या ह्या विषयी निर्णय घेता. अमुक इतके वर्ग फूट चे शहर जे दिल्ली आहे आणि ते शहर देशाची राजधानी आहे. हे ठरवल्या नंतर तो भाग पूर्णतः केंद्र शासित प्रदेश असलाच पाहिजे . विविध राज्यातील अन्याय ग्रस्त लोक तिथे प्रदर्शन करतात .. विविध राज्यातील महत्वाची लोक तिथे राहतात . त्या मुळे त्या भागात विशिष्ट राजकीय पक्ष ची सत्ता बिलकुल नको. एक स्वतंत्र संस्थेचे तिथे सरकार असावे. ते पक्ष विरहित असेल. इथपर्यंत ठीक आहे गुरगाव पासून नोएडा पर्यंत दिल्ली आहे. त्या लोकांचा स्वतःचे राज्य असावे ही अपेक्षा मोदी नाकारू शकत नाहीत .जरा स्वतःच्या बुध्दी नी मत व्यक्त करत जा

In reply to by Rajesh188

बरोबर आहे. एक स्वतंत्र संस्थेचे तिथे सरकार असावे. तुमची ही मागणी मान्य करुन राष्ट्रपती सारखे राजधानीपती असे नवीन घटनात्मक पद निर्माण करुन त्यावर तहहयात तुमची नेमणूक करावी असा आदेश मी भारताच्या घटना समितीला देत आहे.

In reply to by सुबोध खरे

दिल्लीची अर्धी लोकसंख्या तेथील केंद्रीय आणि परदेशी कार्यालये आणि त्याला अनुषंगिक सेवांसाठीच तर आहे तेंव्हा कार्यालये बाहेर हलवली तर हि लोकसंख्या सुद्धा तेथे हलवावी लागेल आणि केवळ नवी दिल्ली च्या ऐवजी अत्याधुनिक दिल्ली असे नामकरण सोडले तर पुन्हा तेच प्रश्न उपस्थित होतील..... हा प्रयोग, इतिहासात करून झाला आहे.देवगिरीला, राजधानी करण्याचा....

In reply to by मुक्त विहारि

त्या साठी दिल्ली च्या सीमा fix करा. सरकारी कार्यालय,मंत्र्यांचे निवास स्थान,विविध राज्याचे प्रती निधी,विविध देशाचे प्रतिनिधी . ह्यांचे निवड स्थान . ह्यांची हद्द fix करा. देश भरातील आंदोलक आंदोलन करून निषेध व्यक्त करू शकतील त्यांना जागा ध्या. आणि ह्या सर्व घटकांना सामावून घेईल ती देशाची राजधानी आणि ती स्वायत्त संस्थे च्या नियंत्रणात हवी . त्याचे सभासद सर्व राज्य असतील. केंद्र सरकार देशातील विविध राज्यांशी भेदभाव करते हे जग जाहीर आहे. आणि बाकी राहिलेला भू भाग हे स्वतंत्र राज्य असेलच पाहिजे

In reply to by Rajesh188

बरोबर आहे. मुक्त विहारी तुम्ही वरील सर्व मागण्या मान्य करुन त्याप्रमाणे त्वरित कार्यवाही करावी असा आदेश मी तुम्हाला देत आहे :)

In reply to by Rajesh188

यापूर्वीही जागा दिलीच होती ना , मग लाल किल्ल्यावर कशाला गेले होते हे लोक्स ?? झक मा... हे लोकसभेवर जात नाहीत , लोकसभेवर चाल करून जातात

In reply to by सुबोध खरे

> केजरीवाल सारखा बेभरवशी माणूस दिल्लीचा मुख्यमंत्री होतो यानंतरच त्याचे तोटे काय आहे ते समोर आले आहेत. होतो म्हणजे काय ? लोकांनी भरपूर मते घालून निवडून दिलाय. आपल्याला ना आवडणारी व्यक्ती निवडून येते म्हणून त्याच्या मुसक्या आवळ्यांसाठी कायदे पास करणे मला तरी बरोबर वाटत नाही (केजरीवाल हा अत्यंत नालायक माणूस आहे असे मला वाटत असले तरीही).

In reply to by साहना

साहना ताई कोणत्याही नावडत्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्याबद्दल माझेही आपल्यासारखेच मत आहे केजरीवाल यांच्या बद्दल माझे जे मत आहे तेच श्रीमती ममता बॅनर्जी यांच्या बद्दल आहे. परंतु दोन्हीच्या भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे एवढेच लक्षात घ्या. तसे का आहे याचे मी आता विश्लेषण करत नाही( वर बऱ्यापैकी सांगितलेले आहेच.) बाकी मोदी रुग्ण हे असहिष्णुता लोकशाहीची गळचेपी इ मुद्द्यांचे वेळेस श्री केजरीवालांचेच उदाहरण देत असतात कारण ते सोयीचे आहे. पण त्यामागची पार्श्वभूमी गाळून टाकण्यास विसरत नाहीत

माचो (macho man) मोदी यांची विजय यात्रा रोखणाऱ्या केजरीवालला धडा शिकवण्यासाठी दिल्लीतील फुकट्या लोकांनी निवडून दिलेले सरकारच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिक्षण ,आरोग्य असल्या फालतू गोष्टीमध्ये अडकून राहिल्याने हे सरकार लोकांसाठी चांगले निर्णय घेत नव्हते. उद्या सगळी पोर उत्तम प्रकारे शिकली तर यात्रा मध्ये यांचे झेंडे घेऊन कोण नाचणार? म्हणून अत्यंत खुनशीपणे घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत ! मैदानात हरवता आले नाही म्हणून काय झालं? सत्तेचा गैरवापर करणार नाही तर आलमगीर मोदीशा कसले? मागच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने एल जी ला थांबवले होते तर या वेळी कायदाच बदलला ! आता न्यायालय घंटा काय करणार ??

In reply to by कपिलमुनी

सहमत आहे.... मतभेद असावेत, मनभेद नकोतच, पण मने जुळत नसतील तर, वैयक्तिक चिखलफेक नको... माझ्या कडून, तुमच्यावर, वैयक्तिक चिखलफेक झाली असल्यास, क्षमस्व...

In reply to by कपिलमुनी

खुनशी, आलमगीर मोदीशा, घंटा हे एखाद्याच्या संदर्भात वापरण्यासाठी सभ्य शब्द आहेत का?

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला पटत नसेल तर लिहीत जाऊ नका , मागच्या वेळीही तुम्हाला हेच सांगितले होते! आणि लिहिले तर कमीतकमी तेवढा प्रामाणिकपणा दाखवा. नाही लिहिले तर स्पष्ट लिहा की" वरील प्रतिसाद कपिलमुनी यांना नव्हता".. बघू काय निवडता

In reply to by कपिलमुनी

एवढं का झोंबलं? स्वतः असभ्य लिहायचं आणि प्रत्युत्तर मिळालं की नामानिराळे रहायचं!

In reply to by श्रीगुरुजी

सभ्य की असभ्य तुम्ही कोण ठरवणार ?? तुमच्यात कबूल करायचा प्रामाणिकपणा नाही इतके समजले, इथून पुढे मला प्रतिसाद दिले नाही तरी चालेल

ह्या corona काळात इतके कायदे मोदी सरकार नी संसदेत पारित करून घेतले आहेत तो भारतीय संसदीय लोकशाही च्या काळातील उच्चांक असावा. लोक हात धुवत,बसले आहेत आणि केंद्र सरकार हात धुवून घेत आहे.

तू माझ्याकडं बोट कसकाय केलं , माझं नावच का घेतलं , इतक्या रागानं बघितलेच कसकाय , बघून घेईन , बाहेर भेट मग दाखवतो , इतके बारीकाव का बे तुम्ही , त्यापेक्षा तमिळनाडु मध्ये राहायला गेलेलं पुरतं , एक हेलिकॉप्टर , चंद्राची सफर , घरी एक रोबोट आणि बरेच काही , कोण येणार असेल तर सांगा , बुकिंग करून ठेवतो .

In reply to by स्वलिखित

त्यापेक्षा आमचा, 3-13-1760 ग्रह उत्तम तुम्ही पण या ... फक्त तिथे, दगड आणि माती, खायला लागेल

In reply to by मुक्त विहारि

सध्या आमच्या इकडे रोज हळदी चालू आहेत त्यामुळे रोज वेगळ्या ग्रहावर फेऱ्या होत आहेत. आज नेपच्युनवर जाऊन यावा म्हणतो.

In reply to by रंगीला रतन

पण आजकाल, आपल्या आकाशगंगेत, जास्त मजा राहिलेली नाही...असे माझे वैयक्तिक मत आहे... आज, शनिवारी रात्री, 3-13-1760, ग्रहावर जायला परत यान निघणार आहे... बाय द वे, नेपच्यून वर, बर्फात तळलेला ड्रॅगन चांगला मिळतो...

In reply to by मुक्त विहारि

सध्या तीनेक दिवस सलग सुट्टी आणि होळी-धुराडा असल्या कारणे आजच औषधाची व्यवस्था करून ठेवली , औषध बरोबर आहे का 2 झाकणाने चेक केलय , तगडा माल मिला है , दोनेक वर्षांपूर्वी मालकांनी का कोणी तर धागा काढल्याचे आठवतेय , प्रा डॉ चा फोटो भारी चिपकावला होता , आता शोधण्याचे कष्ट होत नाहीत ,

श्री मोदींनी बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले होते म्हणे. मनात अनेक प्रश्न उभे राहतील हे वाचणार्‍याच्या; पण उत्तरे मिळतील ह्याची खात्री नाही. श्री मोदी व सत्याग्रह हे दोन शब्द एकत्र ऐकूनच मनात अनवट भावना उमटतील काहींच्या. मोदींचा बांग्लादेशासाठी सत्याग्रह

In reply to by श्रीगुरुजी


In reply to by श्रीगुरुजी

पुरावे आहेतच हो. परंतु हत्तीच्या पाठीवर बसलेल्या माशीने किल्ल्याचे दार तोडण्यात आपला सहभाग होता असे म्हटल्यास हास्यास्पद वाटणारच.

In reply to by नगरीनिरंजन

आजकाल लगेच गैरसमज होतात म्हणून खुलासा: वरील प्रतिसादात हत्ती हे रुपक इंडिया नावाचे आधुनिक राष्ट्र व त्याच्या सेनेसाठी योजलेले आहे. अशा या बलशाली हत्तीचा प्रतिनिधी म्हणून गेल्यावर हत्ती म्हणूनच वावरायचे असते. माशी असतानाचे स्वतःचे व्यक्तिगत पराक्रम सांगणे अस्थानी असते हे कळेल तो सुदिन!

In reply to by नगरीनिरंजन

असं असं, म्हणजे, आज एखादा स्वातंत्र्यसैनिकाने वक्तव्य केलं की स्वातंत्र्यसमरात माझा सहभाग होता, तर ते हास्यास्पद असेल? अतार्किक, दुसरं काही नाही. मोदीद्वेषज्वर अवघड गोष्ट आहे. मी सत्याग्रहात भाग घेतला होता या साध्या सरळ वाक्याला, मी सत्याग्रह केला म्हणून बांग्लादेश स्वतंत्र झाला असे भाषांतर करण्यासाठी किती अभ्यास लागत असेल.

In reply to by बिटाकाका

हास्यास्पद तुलना! स्वातंत्र्यसमरात भाग घेणार्‍यांनी इंग्रज सरकारविरोधात सत्याग्रह केला. स्वतःच्या सरकारसमोर नव्हे. पाकिस्तानात जाऊन केला असता हा सत्याग्रह तर वंदन केले असते.

In reply to by नगरीनिरंजन

खलील प्रतिसाद वाचा. त्यापेक्षा जरा गुगलूनच बघा ना आंदोलन कशासाठी होते, मग अतार्किक प्रश्न विचारा की ते आंदोलन कुठे करायचे होते ते.

In reply to by नगरीनिरंजन

आणि अजून एक, खालील लिंक वर पूर्ण भाषण उपलब्ध आहे. ते पूर्ण ऐकल्यावर ठरवता येईल की ते हत्ती म्हणून काय म्हणाले, माशी म्हणून काय म्हणाले, ते तसं का म्हणाले, त्याच्या पुढचं वाक्य काय होतं वगैरे वगैरे. https://youtu.be/ANidurzVZu0

In reply to by बिटाकाका

मोदीप्रेम अवघड विषय आहे. सगळे बाकीचे भाषण आहे तेच आणि तेवढेच हवे होते हाच तर मुद्दा आहे. स्वतःचे पराक्रम स्वतःच्या तोंडून सांगायची गरज काय होती? विशेषतः आंदोलन करणार्‍या लोकांना संसदेत आंदोलनजीवी म्हटल्यावर? हे स्वतःच्या आंदोलनाचे भांडवल केल्यासारखे नाही का?

In reply to by बिटाकाका

सत्याग्रह ह्या शब्दाची मालकी एका घराण्याकडे असल्याने तशा भावना उमटणं साहजिक आहे. सहमत.. एका घरण्याशिवाय दुसरा कोणी सत्याग्रह करूच शकत नाही.. !!!

In reply to by बिटाकाका

खरं की काय? म्हणजे साने गुरुजी, विनोबा भावे व गेलाबाजार आपले अण्णा हजारे वगैरे सुद्धा त्या घराण्याचे होते असे म्हणायचे आहे की काय? दुसरे असे की बांग्लादेशास स्वतंत्र होण्यापासून रोखणारे होते पश्चिम पाकिस्तानचे सरकार मग तिकडे जाऊन धरायला हवा ना सत्याचा आग्रह? आपल्याच सरकारसमोर आंदोलन करण्यात तेव्हा हशील असेल बुवा! आता लगेच देशद्रोही म्हणतात अशा लोकांना.

In reply to by नगरीनिरंजन

अहो इतरांच्या सत्याग्रहाला आमचा आक्षेप आहेच कुठे? पण मोदींच्या सत्याग्रहाच्या वक्तव्याने ज्वर फुलून आलेल्या लोकांनी याचे उत्तर द्यावे. ************ राहता राहिला प्रश्न आपल्या सरकार समोर आंदोलन केल्याचा तर हे आंदोलन आपल्या सरकारने वेगळ्या बांग्लादेश मागणीला ताबडतोब पाठिंबा जाहीर करून लागेल ती मदत पुरवावी यासाठी केले गेले होते. आता हे आंदोलन पश्चिम पाकिस्तान सरकारसमोर कसे काय करायचे होते बुआ? ************ देशद्रोही वगैरे व्हिक्टिम कार्ड आता जुने झाले. बाय द वे, आज बलुचिस्तान ला वेगळा करण्यासाठी सरकार ने मदत करावी अशी मागणी झाली तर त्याला देशद्रोही म्हटलं जाईल का?

In reply to by बिटाकाका

तेवढी असती तर असलं कशाला लिहिलं असतं त्यांनी? बाकी निरंजन नगरकर यांना एक सांगायचं आहे. की आम्ही हिंदू राष्ट्र करणारच आहोत. कितीही आपटा.

In reply to by पिनाक

अखंड हिंदुस्थान . भारत,पाकिस्तान,बांगलादेश अखंड हिंदुस्थान ही मागणी मान्य झाली असती . आणि खरोखर तसा देश अस्तित्वात आला असता तर आज देशाची अवस्था काय असती. अजुन ४० कोटी मुस्लिम लोकसंख्या ह्या देशात वाढली असते म्हणजे ४० प्लस २० कोटी म्हणजे. ६० कोटी मुस्लिम ह्या देशात असते. मग ही जी मागणी अखंड हिंदुस्थान ची जे पक्ष,संघटना करत होत्या ते योग्य होते की अयोग्य.

In reply to by Rajesh188

हा हा हा.. देश जोडणे म्हणजे त्याचे लोक पण आपल्यात घेणे असा गैरसमज दिसतोय तुमचा. आम्ही त्या भूमी बद्दल बोलतोय. लोकांना भूमिखाली स्थान मिळेलच.

In reply to by पिनाक

हा हा हा.. देश जोडणे म्हणजे त्याचे लोक पण आपल्यात घेणे असा गैरसमज दिसतोय तुमचा. आम्ही त्या भूमी बद्दल बोलतोय. लोकांना भूमिखाली स्थान मिळेलच. ही कमेंट देताना तुम्ही विचार केला आहे का? अखंड हिंदुस्थान म्हणजे मुस्लिम विरहित देश पाकिस्तान,बांगलादेश सह. कुठून येतो एवढा कुविचार ग्रस्त आत्मविश्वास. तुम्ही म्हणता ते त्रिवार तरी शक्य झाले असते का? काही ही टाइप करायचे .

In reply to by पिनाक

अखंड हिंदुस्थान . भारत,पाकिस्तान,बांगलादेश अखंड हिंदुस्थान ही मागणी मान्य झाली असती . आणि खरोखर तसा देश अस्तित्वात आला असता तर आज देशाची अवस्था काय असती. अजुन ४० कोटी मुस्लिम लोकसंख्या ह्या देशात वाढली असती म्हणजे ४० प्लस २० कोटी म्हणजे. ६० कोटी मुस्लिम ह्या देशात असते. मग ही जी मागणी अखंड हिंदुस्थान ची जे पक्ष,संघटना करत होत्या ते योग्य होते की अयोग्य.

In reply to by बिटाकाका

बाय द वे, आज बलुचिस्तान ला वेगळा करण्यासाठी सरकार ने मदत करावी अशी मागणी झाली तर त्याला देशद्रोही म्हटलं जाईल का?
देशद्रोही फक्त शेतकरी, विद्यार्थी अशा स्वतःचे हक्क मागणार्‍या लोकांना म्हटलं जातं. बाकी काड्या करायला सरकारची ना नाही.

In reply to by नगरीनिरंजन

तसं काही नाही हो, जितकं मोदी विरोधक व्हिक्टिम कार्ड खेळण्यासाठी स्वतःला देशद्रोही म्हणवतात तेवढे मोदी समर्थकसुद्धा नाही हो. या देशात मोदींना विरोध करणारेच तेवढे शेतकरी, विद्यार्थी वगैरे राहिलेत बाकी सगळे अंधभक्त झाले आहेत, नाही का?

In reply to by बिटाकाका

असं होय. हे लोक स्वतःच जाऊन स्वतःवर सेडिशनच्या फिर्यादी दाखल करतात हे माहित नव्हतं.

In reply to by बिटाकाका

खरंच तुमचा इतरांच्या सत्याग्रहाला आक्षेप नसेल. मी तुम्हाला काही म्हणतच नाहीय. इतरांना सत्याग्रह केल्याबद्दल आंदोलनजीवी म्हणणार्‍यांचं व नंतर स्वतःच्या आंदोलनाची टिमकी वाजवणार्‍यांचं काय?

In reply to by नगरीनिरंजन

आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटले होय, बरं बरं, मला वाटले अशी आंदोलन मॅनेज करणारी एक जी टीपीकल टोळी सगळीकडे समान दिसतेय त्यांना म्हंटले असेल. चुकलंच मोदीजींचं! *************** काही कोटी विद्यार्थी, काही कोटी शेतकरी, बोटावर मोजण्याइतक्याच देशद्रोहाच्या केसेस? कोर्ट का नाही फेटाळून लावत अशा खोट्या केसेस काय माहीत.

In reply to by बिटाकाका

कोणती टोळी बरे? अजून टुकडे टुकडे गँग कोण आहे हे सरकारला माहित नाही. (साकेत गोखल्यांनी आरटीआय टाकून विचारले होते). तशीच ही कोण टोळी आहे त्यांची नावे का जाहीर करत नाहीत? एकदा नावे जाहीर झाली म्हणजे मग आमच्या सारख्या अज्ञ लोकांना कळेल तरी.

In reply to by नगरीनिरंजन

आंदोलनजीवी असे गुगल इमेजेस मध्ये शोधा, मिळून जाईल. ********* तुम्हाला माहीत नाही म्हणता मग सेडिशन कुणावर लावली म्हणता?