तात्या,
असेच "असायला हवे होते" हे शीर्षक दिले म्हणून बरे झाले. कारण आणखी हजार-दोन-हजार वर्षांनी तेव्हाच्या इतिहास संशोधकांनी "हे असेच होते" म्हणून खुश्शाल ठोकून दिले असते. आत्ताचे इतिहास संशोधक जसे कुठल्यातरी शिलालेखावरून सांगतात ना, तसेच. (त्यांना काय माहिती बिचार्यांना, की हजार वर्षांनी लोकांनी गंडावे म्हणून कुणीतरी तो शिलालेखाचा प्र्याक्टिकल जोक केला आहे !)
- (वर्तमान संशोधक) सर्किट
कोणी काही म्हणो -
>>दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं.
मी याच्याशी सहमत! असतात हो अशी माणसं अगदी आजकालच्या जगातही.
आता तुमच्या व्यासाच्या गोष्टीत
>>समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता.
हाहाहा!!! हे वाक्य जरा भारीच आहे.
शेवटची सही (व्यासद्वेष्टा गणेशभक्त) तात्या अशीच असायला हवी होती.
सर्व सदस्य लेख मजेत घेतील अशी आशा करू. एखाद्याला नको नको ते प्रश्न पडले तर उपक्रमावरील ॥जय गणेश॥ चर्चेत धाडून द्या. ;-)
>>दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं.
>>मी याच्याशी सहमत! असतात हो अशी माणसं अगदी आजकालच्या जगातही.
हीहाहाहाहा ..:)
आपला,
(एकशिंगी राक्षस) तात्या.
>>दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं. मी याच्याशी सहमत! असतात हो अशी माणसं अगदी आजकालच्या जगातही.
कोण हो माणसं? मराठी संस्थळांवर अशी काही माणसं आहेत का? आणि त्यांचा आपल्याला असा काही अनुभव आला आहे का हो प्रियालीताई? :)
चला! उशीर होतो आहे. निघतो आता! हरिनाम सप्ताहाला जायचं आहे! :)
तात्या.
कोण हो माणसं? मराठी संस्थळांवर अशी काही माणसं आहेत का? आणि त्यांचा आपल्याला असा काही अनुभव आला आहे का हो प्रियालीताई? :)
काय तात्या!!! ट्यूब इतक्या दिवसांनी पेटली की का काय? :))))))))))))))
असो, "तो मी नव्हेच" असं चटकन म्हणून टाका आणि माझा रोख इतर कोणावर जात असेल ते कोण याची कल्पना करा.
(चतुर) प्रियाली.
>समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता.
> च्यामारी व्यासाला कुणीच विचारेना.
याला (म्हणजे दुसर्या वाक्याला) 'पुरावा' आहे. व्यासाकडे तीन बायका बळेच पाठवल्या. (वेगवेगळ्या दिवशी एक-एक करून - तीन्ही एकाच दिवशी नाही.) एकीने गच्च डोळे बंद केले. दुसरी घाबरून पांढरी फटक पडली. आणि तिसरी गरीब बिचारी मोलकरीण होती, तिला सगळे काही सोसायची सवय होती, हीदेखील पिडा तिने सोसली.
आता हा तपशील व्यासांनीच स्वतःबद्दल लिहिला की लेखनिकानी घुसडला ते तुमचे तुम्ही बघा.
>> तिसरी गरीब बिचारी मोलकरीण होती, तिला सगळे काही सोसायची सवय होती, हीदेखील पिडा तिने सोसली.
खरं आहे! मला बिचार्या त्या गरीब मोलकरणीची दया येते. आठ आठ दिवस अंघोळ न केलेल्या व्यासाशी संग करायचा म्हणजे पिडाच नव्हे तर मरण यातनाच म्हणायच्या त्या! :)
आपला,
(विदूर) तात्या.
मजा आली वाचायला.
आमच्या बातमीदाराकडूनः-
असापण एक सीन डोळ्यासमोरून गेला की गणपतीमहाराज तृप्त भोजन करून आवडते स्त्री सोबत आवडते पेयपान करत असताना दूरचित्रवाणीवर कूठल्याश्या एका वाहीनीवर एका कार्यक्रमात व्यासमूनी मात्र गणपतीमहाराजांवर खोटेनाटे आरोप करत होता व त्या सभागृहातील काही बापेलोक ( फारतर एखादी पोरीबाळी, सगळ्या नाही बर का!) फिदीफिदी हसत होते. मग मात्र गणपतीच्या तळपायाची आग सोंडतच घूसली. ठरवले आता मात्र ह्या व्यासाची *** टाईट करायची!
*** साठी समर्पक शब्द सूचवा. इफ आय नो गणपती वेल "लंगोटी" कूड बी वन ऑफ द ऑप्शनस
##आमच्या बातमीदाराचा व्यास कॉर्प, व्यास इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, महाभारत इंटरनॅशनल ह्या कोणाशीही कूठलाही हितसंबध नाही.
तात्या
खरंच वाचायला मजा आली.
<< व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता.
हा हा हा :)
एकविसाव्य शतकातील दैवविषयक विचारासाठी संशोधकाला खरेच फार मोलाची माहिती आहे ! ;)
<< उगाच चारचौघात बिचार्या या व्यासाच्या इज्जतीचा कशाला फालुदा करा?!' असा उदारमतवादी विचार करून होकार भरला आणि 'गणपती व्यासांचा लेखनिक होता' ही व्यासांनी पिकवलेली कंडी जनमानसात अगदी आजपर्यंत खरी मानली गेली! :)
:)) व्यासांचा आय.पी. एड्रेस शोधून ते लेखन कोणाचे हे ठरवता आले असते !
बाकी तात्या,
ऋषी मुनींच्या आणि त्या व्यासांच्या (ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणा-यांच्या नव्हे )मागे लागून फार दुष्मन्या ओढवून घेता तुम्ही ! तुमच्याबद्दल लिहून लिहून त्यांच्या वह्या गच्च भरुन गेल्या असतील अन व्यास तर तुमच्या नावानं एक स्वतंत्र नोंद, खातेवहीत करत असेल ! तुम्हाला नडणारी /लढणारी माणसं म्हणजे त्याचाच परिणाम हे लक्षात कसं येत नाही तुमच्या ! ;)
आणखी कथा येऊ दे ! आठवून आठवून लिहा ! तब्येत खूष होते अशा लेखनाने. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>:)) व्यासांचा आय.पी. एड्रेस शोधून ते लेखन कोणाचे हे ठरवता आले असते !
बिरुटेसाहेब, ते सर्किटचं काम आहे आणि त्यालाच ते जमतं! तेव्हा व्यासाचा आय पी पत्ता शोधण्याचे काम तुम्ही सर्कीटलाच सांगा! :)
तात्या
त्या प्रकरणात आमचे देवबाप्पा आमच्यावर रुसलेत.
मी कशाला रुसू? इथे येणारी सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात बाप माणसे आहेत.आणि ती अशी एखाद्या विषयावरून वाद-विवाद करता करता शत्रुत्वाच्या पातळीवर पोचणार असतील तर आमच्यासारख्या सामान्यांचे काय होणार ह्या काळजीने चलबिचल होते इतकेच. वादे वादे जायते तत्वबोध: !असे म्हणता म्हणता वादे वादे जायते विषयांतर: ! आणि त्याही पुढे जाऊन मुष्टीप्रहार:(शाब्दिक) असे जर असेल तर मग काळजी वाटणारच! ती काळजी व्यक्त करण्याचा आम्ही एक केविलवाणा प्रयत्न करून पाहिला इतकेच. पण दोन्ही बाजू आपापल्या जागी ठाम आहेत हे पाहून आम्ही आपले सुरक्षितपणे पतली गली मधून पसार झालो.
रुसलो मात्र कुणावरही नाही.कारण जूने जाऊ द्या मरणा लागूनी असे केशवसुत(बरोबर ना) म्हणून गेलेत. रोजच नवनवीन काही तरी घडत असते तेव्हा हे भूतकाळाचे ओझे उगाच कशाला बाळगा. तेव्हा हल्लीच्या भाषेत "अपडेट" राहणे प्रशस्त वाटते.
अनिल अवचटांच्या 'धार्मिक' या पुस्तकात एक किस्सा आहे. महर्षी विनोद हे गुरुपौर्णिमेला स्टेज वर एक प्रयोग करित असत. त्यात एक तांब्याची तार असे ती अँटेना म्हणून काम करत असे. त्याद्वारे यांचे गुरु म्हणजे व्यास हे त्या अँटेनाद्वारे यांच्या शरिरात प्रवेश करित असत. एकदा असाच अंगात व्यासांचा संचार होण्याला वेळ लागत होता. अर्थातच प्रेक्षक वेठीस धरले होते. वैतागुन एक महाविद्यालयीन युवक म्हणाला 'अजुन आला कि नाही तो भडवा व्यास"
प्रकाश घाटपांडे
आपल्या इथे गणपतीला विवाहित समजतात. त्या उलट दक्षिण भारतात त्याला ब्रह्मचारी समजतात. हे काय गौडबंगाल आहे?
आपल्या इथे कार्तिकस्वामीला ब्रह्मचारी समजतात आणि दक्षिणेत तो चक्क विवाहित मानला जातो. आता बोला!
अटलबिहारी बाजपेयींच्याच शब्दात "मै अविवाहित हूं, ब्रम्हचारी नही !"
भारत का नेता कैसा हो ? अटलबिहारी जैसा हो !
अब की बारी अटल बिहारी !!!
- सर्किट बाजपेयी
<<त्या उलट दक्षिण भारतात त्याला ब्रह्मचारी समजतात. हे काय गौडबंगाल आहे?>>
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख कुणी ब्रह्मचारी असा केला कि ते " मी फक्त अविवाहित आहे' अशी दुरुस्ती करीत असतं.
प्रकाश घाटपांडे
अहो.. गणपतीने दक्षिण भारतात सांगितले नसेल की विवाहित आहे म्हणून आणि कार्तिकस्वामींनी इथे सांगितले नसेल की ते विवाहित आहेत म्हणून. ;)
आता आपल्यालाही सांगितलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवावा लागेल. प्रत्यक्षात कोण भेटले आहे त्यांना(किंवा त्यांच्या बायकांना) ?
किमान अठ्ठावन वर्षाचा माणूस असेल असे वाटत होते पण तो अडतीस वर्षांचा आहे असे कळते. मग असे ज्येष्ठतेचे बेअरिंग का बरे घेतले असावे?
असो. चर्चा आवडली.
(बुचकळ्यात पडलेला) विश्वजीत
किमान अठ्ठावन वर्षाचा माणूस असेल असे वाटत होते पण तो अडतीस वर्षांचा आहे असे कळते. मग असे ज्येष्ठतेचे बेअरिंग का बरे घेतले असावे?
अरे ३८ म्हणजे खूप वर्ष झाली. मला हे टोपणनाव तर त्याही आधीपासून पडलेले आहे. मी 'तात्या' म्हणूनच जन्माला आलो म्हणेनास..:)
असो..
तात्या.
हसून हसून मुरकुंडी वळली. मिसळपाववर आल्यापासून(=मिसळपाव सुरु झाल्यपासून) असा लेख वाचला नव्हता. च्यायला आजूबाजूचे सहकर्मचारी बघाया लागलेत..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
तात्या, तुम्ही दिलेले अवतरण 'वायफळाचा मळा' (कॉ॑टिनेन्टल प्रकाशन) ह्या पुस्तकातील आहे. त्यातील इतर लेखही (विशेषतः ऋतु॑वरील विनोदी लेख) मस्त आहेत. एक॑दरीत चि.वि. लिहायचेच लई भारी! मी ऑर्कुटवर चि.वि. जोशी या॑ची कम्युनिटी स्थापन केली आहे, त्या॑चे चाहते आस्वाद घेऊ शकतात.
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=16432055
तात्या, तुम्ही दिलेले अवतरण 'वायफळाचा मळा' (कॉ॑टिनेन्टल प्रकाशन) ह्या पुस्तकातील आहे.
येस्स! अगदी बरोब्बर. मी 'वायफळाचा मळा' हे पुस्तकाचे नांवच विसरून गेलो होतो. छोटेखानी, परंतु फारच छान पुस्तक होते ते!
द्रौपदीच्या थाळीची कथा चिविंनी त्यातच लिहिली आहे! :)
आपला,
(वायफळाचा मळाप्रेमी) तात्या.
चिंतामण विनायक जोशी :)
त्यांच्या नायकाच नाव चिमण हे चुकुन चिंतामणच चिमण झाल अस वाचल मी. चु भु द्या घ्य.
त्यांची ४-२ पुस्तके माझ्या संग्रही आहेत. छान आहेत. :)
वायफळाचा मळा वाचल्य जबरा आहे :)
हा प्रतिसाद जरा अवांतरच झाला नै
त्यानी पहिला विनोदी लेख लिहिला तो ' टीकाकार आणि न्हावी' कॉलेजच्या हस्तलिखित मासिकासाठी, त्यात शेवटी बाबुराव न्हावी म्हणतो, 'हे पाहा चिमणराव.. ' हे त्या॑नी 'चि॑तामणराव' असेच लिहिले होते पण 'प्रि॑टी॑ग मिष्टेक' झाल्यामुळे चिमणराव झाले. हेच ना॑व कायम ठेवण्याबाबत त्या॑चे मेव्हणे प्रा.वा.गो.काळे आग्रही राहिले व पुढे ते ना॑व मराठी साहित्यात अजरामर झाले
आपल्या इथे गणपतीला विवाहित समजतात आणि कार्तिकस्वामीला ब्रह्मचारी . त्या उलट दक्षिण भारतात त्याला गणपतीला ब्रह्मचारी समजतात तर कार्तिकस्वामीला दक्षिणेत विवाहित मानला जातो.
र्धम प्रसार करताना ऐका माणसाने - गणपती कार्तिकस्वामी आणि दोन देव्या अश्या पाच मुर्ति एकाच पोत्यात भरुन हिमालयातून दक्षिण भारतात आणल्या पण स्थापना करताना जरा ( लांबचा प्रवास करुना आल्याने थकून गेला होता.....जरा विस्मरणही .......पर्यायाने) अदला बदल झाली ................आणि पुढे तिच प्रथा पडली.....ही.......साठा ऊत्तराची कहाणी पाचा ऊत्तरी सुफळ संपुर्ण ..................
गणपती व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता.
सांभाळुन व्यास सात चिरंजीवात आहेत म्हणे .(.......मग अजूनही भेट्तील)
खरं तर वाचायला मजा नाही मज्जा आली.
बाकी इतिहास संशोधक हाच ऐक संशोधनाचा विषय आहे !
तात्या,
चि विं च्या कल्पनेतली कथा लय भारी अन तुम्ही लिवलेली तर त्याहून भारी...
"व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता "
:) :)
"गणपती मिश्किलपणे मनाशीच हसला आणि त्याने 'जाऊ दे, उगाच चारचौघात बिचार्या या व्यासाच्या इज्जतीचा कशाला फालुदा करा?!' असा उदारमतवादी विचार करून होकार भरला.."
बाप्पा पयल्यापासूनच लय उदार...
"पुढे केव्हातरी गणपतीने व्यासाला खाजगीत भेटायला बोलावून व त्याच्या कानाखाली दोन सणसणीत आवाज काढून, 'यावेळेस सांभाळून घेतलं आहे, पण पुन्हा माझ्याबद्दल अश्या कुठल्याही थापा मारल्यास तर सोंडेनी उचलून फेकून देईन. चल, चालता हो आता!' असा सज्जड दम भरला!"
ये हुयी ना बात....
प्रतिक्रिया
असायला हवे होते !
:-)
हीहाहाहा!
कोण हो? :)
ट्यूबलाईट
हल्ली
स्त्रीवर्ग आणि व्यास
>> तिसरी
बाय द वे
स्टोरी आवडली
इफ आय नो...
मस्त !!
मस्त !
सर्कीटच काम!
नको रे बाबा !
काहीच्या काही!
गुरुपौर्णिमा
त्या महाविद्यालयीन युवकाचे नाव.....
वा!
हेच म्हणतो..
गणपती विवाहित की ब्रह्मचारी?
आपल्या तात्यालाही
अटलबिहारी
हेच
ब्रह्मचारी कि अविवाहित?
वर बघा
मिष्किल
अहो..
ओसाडवाडीचे देव
एकंदर
'तात्या' नावावरून
जन्माला आलो तोच..
तुफान हसलो
ते पुस्तक
येस्स!
चिं वि जोशी
हे खरे आहे
प्रमोद काका मी सांगतो गोष्ट
तात्या, चि
(विषय दिलेला नाही)
गीता का