शेअरमार्केट ची बाराखडी... भाग ० : सुरुवात

गणेशा's picture
गणेशा in अर्थजगत
20 Mar 2021 - 2:02 pm

शेअर मार्केट आणि माझा वर्षापुर्वी तसा काही संबंध नव्हता.. आज Share market मध्ये आलेल्यास १ वर्ष पुर्ण होत आहे.
गेल्या एक वर्षभर जो अभ्यास केला त्यावरुन हि लेखमाला सुरु करत आहे. मी तसा काही कॉमर्स किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाहिये, पण mathematics & statistics हे माझे आवडते विषय होते. त्याचा शेअर मार्केट मध्ये खुप फायदा झाला. विशेषता Technical भ्यासा मध्ये .आणि या १ वर्षात १.५ लाखाचे ४ लाख करण्यात मी यशस्वी झालो. ते ही Intraday आणि future - Options न करता.

--
शेअर मार्केट हा तसा risky प्रकार समजला जातो.. पण तुम्ही जर अभ्यास करुन यात उतरत असाल तर नक्कीच risk खुप कमी असते ..
यात ढोबळ मनाने Long term आणि Short term ( positional) असे दोन भाग आहेत. Intraday आणि future - Options ( speculative ) हे विभाग अनुभवा नंतरच करावेत हे माझे म्हणणे आहे.

शेअर मार्केट म्हणजे निर्णय क्षमता, patience , timing आणी consistency ह्यांचे अचुक मिश्रण होय. शेअर मार्केट कडे व्यवसाय म्हणुन बघितला गेला की slow and steady wins the race ही म्हण लागु पडते. कुठल्याही प्रलोभनांकडे दुर्लक्ष करुन किंवा अभ्यास पुर्ण लक्ष दिले तर शेअर मार्केट मध्ये यशस्वी होता येते.
शेअर मार्केट मध्ये बौधीक कष्ट असतात.. कुठे ही फक्त बातम्या आणि प्रलोभनांमुळे तुम्ही तात्पुरते पैसे कमवु शकता परंतु कायम आणि सातत्य दाखवुन तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये आला तर नक्कीच तुम्ही यसस्वी होउ शकता.
ज्यांना अभ्यास करायचा नसतो तेच लोक शेअर मार्केट मध्ये अयशस्वी होतात.

शेअर मार्केट मध्ये आपण आपले Target set करायचे.. Long term Target आणि Short term Target set केल्यावर त्या साठी लागणारा अभ्यास आपण करत जायचा..
महिन्याला आपण जे पैसे टाकु ते कश्या पद्धतीने गुंतवायचे , Short termसाठी काय काय गणिती साणि सांखिकी अभ्यास आपण करायचा ते आपण हळु हळु पुढे पाहु.

आपला portfolio आपण बनवायचा. त्या साठी आपण किती वर्षासाठी किती रक्कम जमा करतोय हे सेट करुन त्या प्रमाणे महिन्याला त्या त्या कंपणीमध्ये पैसे टाकायचा निर्णय घ्यायचा, त्याच बरोबर दर महिन्याला आपण Long term (fundamental नुसार) आणि Short term (Technical नुसार) साठी investment करत असु तर आपल्या महिन्याच्या रक्कमेतुन त्याचे distribution करायचे.

आता माझे २ उदा. देतो
समजा मी असे ठरवले आहे, की माझे जे १५ वर्ष राहिलेले होम लोन मला ५-८ वर्षात पुर्ण करायचे आहे, किंवा मला लॉंग टर्म साठी काही पैसे पाहिजेत तर मी ते पैसे Fundamentally strong असलेल्या shares मध्ये टाकत जायचे. १२-१५ Fundamentally strong shares अभ्यासांती आपण वेगवेगळ्या sector मधुन घ्यायचे आणी आपल्या Long term Investment च्या फक्त 7-8 % एका कंपणीत टाकायचे. यालाच तुम्ही स्वताचा Personal mutual fund पण म्हणु शकता.

या बरोबर , तुम्ही Short term Investment goal ठरवुन, उदा. मी माझ्या मुलीची पुढच्या वर्षीची फी जमा करण्यासाठी, माझा Term Insurance भरण्यासाठी Investment करत असेल तर Technical, graphs, indicators यांचा अभ्यास करुन त्यातुन कमी वेळेत पैसे निर्माण करायचे. या साठी वेगवेगळे portfolios बनवले तरी चालतील.

१. या फोटो मध्ये, मी अर्धे अर्धे पैसे दोन्ही Long term आणि Short term विभागात टाकत आहे. १० लाख मी ८ वर्षात टाकेल असे धरले आहे.

२. यामध्ये मी मुलीच्या फी जमण्यासाठी चा portfolio , काही ३०-४० हजार पहिल्यांदा(जमल्यास टाका) आणि नंतर महिन्याचे ३-५ हजार टाकुन दर महिन्याला ५ हजार काढतो आहे दो दाखवला आहे. आणि लागेल तसे Withdrawal पण केले आहेत पैसे .
profit/month हा graph दाखवत आहे.
यात दिसते आहे की थोड्या थोड्या profit ने माझ्या एका वर्षाच्या फी चे पैसे निघाले आहेत. म्हणजे येथे माझी Investment ६०-७० हजार झालीये आणि मला तितकेच रुपये मिळाले ( ८ मार्च ला फी भरली मी :-)

----
पुधील भागात आपण
Share market fundamentals यावर भर देवु

आणि नंतर Technical कडे जावु.

क्रमशः

अवांतर :
तुमचे ही संपुर्ण ज्ञान यात देत राहिल्यास जास्त मज्जा येइल, आणि माझे ही त्यामुळे ज्ञान वाढेल. शेअर मार्केट हा खुप मोठा पसारा आहे आणि यात जितके शिकेल तितके कमीच आहे.
technical short term shares च्या discussions साठी एक वेगळा धागा असावा असे वाटते आहे, जेथे रोजचे शेअर्स बोलले जातील, पण तो थोडा risky प्रकार वाटतोय.
(मी जी माहिती लिहितोय ती नंतर English मध्ये लिहिणार आहे, English चांगले नसल्याने तेथे ही अवघड वाटते आहे :-), पण link देइल नंतर)

- गणेशा
(IT मध्ये असला तरी लेखक Account - finance कंपणीचा मालक आहे :-) :-) :-)
)

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

22 Mar 2021 - 8:19 pm | Rajesh188

प्रश्नाची उत्तर मिळाली,काही शंका दूर होत आहेत.
धन्यवाद

मुक्त विहारि's picture

22 Mar 2021 - 8:26 pm | मुक्त विहारि

लेख आणि प्रतिसाद, दोन्ही मस्तच ....

नीलस्वप्निल's picture

22 Mar 2021 - 9:07 pm | नीलस्वप्निल

छान सुरुवात. शुभेच्छा

चौकस२१२'s picture

23 Mar 2021 - 5:47 am | चौकस२१२

उत्तम धागा काढला आहेत आणि डिव्हर्सिफिकेशन वैगैरे छान मुद्दे आहेत
आता तुम्हाला लवकरच उप धागे काढावे लागतील असे दिसतंय म्हणजे
- मूळ ( फंडामेंटल)
- तांत्रिक ( चार्ट )
- डेरीवेटीव्ह ( फुचर ऑप्शन )
एक दोन प्रश्न होते
- हि गुंतवणूक जी माध्यम किंवा दीर्घ काळाची जी आहे ती डिलिव्हरी करता असे दिसतंय तर ते आपण मार्जिन लोन घेऊन करता कि फक्त स्वतःचे भांडवलवर ? ( भारतात मार्जिन लोन ला काय म्हणतात ते माहित नाही पण उदाहरण द्यायचे तर अमेरिकेत १:१ या प्रमाणात ( टी ५०) लोन मिळते इतर देशात १:३ या प्रमाणात
- आपल्या अनुभवात कधी पूर्ण मंदी अनुभवली आहे काय? म्हणजे संपूर्ण बाजारच खाली गेलाय किंवा सामुर्ण बाजार नसला तरी एखादी कंपनी चा समभाग फारच खाली जाऊ लागलं तर % स्टॉप लॉस वार्ता का? %
- मंदीचं काळात भारतीय बाजारात फायदा करण्यासाठी डिलिव्हरी मध्ये समभाग शॉर्ट ( आधी विकणे मग घेणे) हे करता येत नाही .. त्यामुळे दीर्घ काळ मंदी असेल तर काय कराल? अर्हताःत हे खरे आहे का कि जरी डिलिव्हरी मध्ये समभाग शॉर्ट करीत येत नसले तरी दिवसाचं ट्रेडिंग मध्ये करता येतात?
- पोर्टफोलिओ मार्जिन हा प्रकार भारतात आहे का?

पोर्टफोलिओ मार्जिन हा प्रकार भारतात आहे का?

शेअर्स प्लेज करून त्यावर तुम्हाला मार्जिन मिळू शकते. डिलिवरी घेत असाल तर ते पैसे भरण्यासाठी थोडा अवधी जास्त मिळतो एवढेच. बाकी प्लेज करणे किती फायद्याचे ते प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीवर ठरते.

आपल्या अनुभवात कधी पूर्ण मंदी अनुभवली आहे काय? म्हणजे संपूर्ण बाजारच खाली गेलाय किंवा सामुर्ण बाजार नसला तरी एखादी कंपनी चा समभाग फारच खाली जाऊ लागलं तर % स्टॉप लॉस वार्ता का?

मागच्याच वर्षी करोनामुळे आलेली मंदी अनुभवलीये. पैसा काढून घेणार असाल तर स्टॉप लॉस लावणं योग्यच. लाँगटर्म साठी खरंतर मंदी ही गुंतवणुकीची उत्तम संधी मानायला हवी, अर्थात् ज्या कंपनीत पैसे गुंतवणार ती त्या लायकीची असली पाहिजे!

गणेशा's picture

23 Mar 2021 - 5:28 pm | गणेशा

प्रतिसाद खाली एकत्र separate देतो आहे...

राघव's picture

23 Mar 2021 - 7:13 am | राघव

वाचतोय. :-)

चौकस२१२'s picture

23 Mar 2021 - 8:21 am | चौकस२१२

आपण म्हणताय ते झाले मार्जिन लोन मी म्हणतोय ते पोर्टफोलिओ माजींन फरक असा कि पोरफोलिओ मार्गी मध्ये जर एखादा लॉन्ग अँड शॉर्ट दोन्ही असेल तर त्याचाच मार्जिन ला फायदा होतो... असो या धाग्यात वाढवत नाही कारण लेखक शॉर्ट करीत नाही आणि भारतात प्रत्यक्ष शेअर शॉर्ट करणे शक्य नाही

राघव's picture

23 Mar 2021 - 4:43 pm | राघव

माय बॅड. माझ्या समजण्यात गफलत झाली. मग तुम्ही म्हणताय त्याबद्दल मला माहिती नाही. :-)

बेकार तरुण's picture

23 Mar 2021 - 11:38 am | बेकार तरुण

छान लेख.
वाचत आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत .....

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Mar 2021 - 1:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

एंजल,शेअरखान्,रेलिगेअर्,जिओजित वगैरे ब्रोकर वेगवेगळे मार्जिन देउ करतात, ज्यात आपल्याला खेळता येते. हे म्हणजे शॉर्ट टर्म लोनच समजा. त्यांच्या पैशावर आपण खेळायचे आणि व्यवहाराअंती घेतलेले मुद्दल परत करुन झालेला नफा/तोटा काढुन घ्यायचा.

किंबहुना कोण ब्रोकर किती मार्जिन देतो आणि किती ब्रोकरेज घेतो यावर त्यांची लोकप्रियता ठरते. अगदी ५ पैसा.कॉम किवा झिरोधावर मनापासुन प्रेम करणारे खुप बघितलेत. हे झाले ट्रेडींग. पण ईंट्रा डे, फ्युचर ऑप्शन्स,कमॉडिटी वगैरे मध्ये खेळणार असाल तर रोज डोळ्यात तेल घालुन बसायला हवे. तेव्हढा वेळ (आणि ऐपत) नसल्याने मी त्या भानगडीत पडत नाही. मात्र निवडक १०-१२ समभाग जमवत राहणे, त्यावर सतत लक्ष ठेवणे, अधे मधे थोडा नफा वसुल करणे किवा विकत घेउन अ‍ॅव्हरेजिंग करत राहणे ईतपत करतो. पण ईतकाही धोका पत्करायचा नसेल तर म्युचुअल फंड्स,पी पी एफ झिंदाबाद.

Mutual funds,चा अनुभव नाही...

सामान्य माणूस असल्याने, धोपट मार्ग न सोडणेच उत्तम..

राघव's picture

23 Mar 2021 - 4:50 pm | राघव

मी देखील हेच करतो. डे ट्रेडींग, फ्यूचर-ऑप्शन्स, कमोडिटी मधे खूपच जास्त अभ्यास आणि सतत लक्ष ठेवावे लागेल जे सध्या तरी शक्य नाहीये.
म्युच्युअल फंड एक चांगला प्रकार आहे, पण त्यात डायरेक्ट फंड्स मधे गुंतवणूक करणं श्रेयस्कर पडतं असा अनुभव आहे.
बाकी पीपीएफ, एनपीस, सोव्हेरीअन गोल्ड बॉण्ड्स छानच. वेगवेगळ्या बास्केट्स कधीही चांगल्याच. :-)

गणेशा's picture

23 Mar 2021 - 6:13 pm | गणेशा

आपण मार्जिन लोन घेऊन करता कि फक्त स्वतःचे भांडवलवर ?
- आपल्या अनुभवात कधी पूर्ण मंदी अनुभवली आहे काय? म्हणजे संपूर्ण बाजारच खाली गेलाय किंवा सामुर्ण बाजार नसला तरी एखादी कंपनी चा समभाग फारच खाली जाऊ लागलं तर % स्टॉप लॉस वापरता का? %
त्यामुळे दीर्घ काळ मंदी असेल तर काय कराल?

@ चौकस जी,

प्रश्न जरी मार्जीन आणि मंदी बद्दल असले तरी थोडे विस्तृत लिहितो -

मंदी
खरे तर तुम्ही Short term आणि long term असे वेगवेगळे Portfolio बनवत असाल तर तुमच्या Strategies एकाच वेळेस या दोन्ही प्रकारतील shares साठी वेगळ्या असतील
उदा.
अ. जेंव्हा तुम्ही ५ - ८ वर्षाचा विचार करुन कुठले shares घेतले असतील तर त्याचा fundamental base हा उत्कृष्टच असला पाहिजे .. ते अभ्यासा व्यतिरिक्त फक्त बोली माहितीवर ऐकुन घेतलेले shares नसावेच नसावे.
तर अश्या वेळेस मंदी आपल्याला खरेदीची उत्कृष्ट संधी देते.. तुमच्या कडे असलेले shares हे तुम्ही त्याच्या deep ला खरेदी केले पाहिजेत. त्यामुळे "मंदी म्हणजेच संधी"

तरीही माणुस चुकू शकतो असे मान्य केले तर fundamental Portfolio बनवताना तुम्ही तुमच्यकडे असलेल्या एकुन भांडवलाच्या फक्त ७-८ % रक्कमच एका share मध्ये गुंतवली पाहिजे. जेणे करुन चुकुन तुमचा अभ्यास चुकीचा ठरला(शक्यता कमी असते ) किंवा कंपणी बंद झाली तरी तुमच्या एकुन भांडवलाचे फक्त ७-८ % च धोक्यात आलेले असतात.

याचे माझ्या पोर्टफोलिओ मध्ये असलेल्या चुकीच्या share चे उदा देतो. तो का आहे ते.

माझ्याकडे १० shares तीन महिने अभ्यास करुन घेतले होते, आणि करोना चे रुप पाहता मला वाटले पुढील काळात Credit cards/online business यांचीच चलती राहिल ते दिसतेय. म्हणुन मी SBI cards हा share समविष्ट केला.
पण मला Telecom domain वाढेल असे पण वाटले. मग असलेल्या तीन कंपणीतुन मी reliance/Idea/ Airtel या मध्ये लक्ष घातले.
मी जरी अभ्यासांती निर्णय घेत असलो तरी सारासार विचार करता भारतात फक्त तीन कंपणी आहेत त्यामुळे Idea बंद पडणार नाही अशी माझी खात्री झाली.
सोबत माझा राजकीय अभ्यास असल्याने मी प्रथमच कर्जबाजारी असलेली Idea माझ्या long term portfolio मध्ये अ‍ॅड केली.
हा तसा चुकीचा निर्णय ठरु शकत होता. असे खरे तर केले नव्हते पाहिजे. मग मी reliance १००० रुपयाला माझ्या portfolio ला अ‍ॅड केले, कारण जर Idea बंद पडली तर याचा फायदा reliance ला होईल. आणी Airtel Short term ला technical पध्दतीने घेत आणि विकत राहिलो.

आता आपण समजु, मंदी आली किंवा इतर कारणाने idea बंद पडली, तर मी तीचे ३ रुपयाने ४००० shares घेतले आहेत, माझ्या long term portfolio च्या १० %. म्हणजे ते पैसे पुर्ण बुडले नाही तरी बुडतील असे धरले.
त्यावेळेस reliance २२०० रुपये झालेला आहे, त्यामुळे त्यात गुंतवलेले १० हजार मला १२००० परत देतायेत. आणि प्रत्येक deep ला चांगले share घेताना मी १३०० ला १८०० ला हे अजुन घेतलेले आहेतच.
पण आता Idea ने तग धरलाय आणि प्रत्येक १० रुपये वाढीला मला ४०००० रुपये मिळत आहेत. आणि reliance चे आता माझ्याकडे १५ share झालेत.
त्यामुळे कधी कधी मंदीत असा एखादा चुकीचा शरे त्रास देवु शकतो , तर त्याची सोय व्यव्स्थीत केलेली असावी, आणि त्यात गुंतवलेले भांडवल हे योग्य प्रमाणात हवेच.
उगाच तो share उद्या १३ ला जाईल म्हणुन लाखो रुपये एकाच share मध्ये टाकु नये. म्हणजे जास्त तोटा होणार नाही.
पण ८ वर्षात चुकुन Idea १०० रुपये गेला तर तो मला ४ लाख देइल हे नक्की. पण ही Pure risk आहे, पण एखादा असा share आपल्या portfolio मध्ये असला तरी चालतो अपवाद म्हणुन. पण हा share fundamental criteria fulfil करत नसल्याने मी recommend करत नाहीये. फक्त असा long term portfolio मधील share बद्दल काय होउ शकते ते लिहिले आहे.
बाकी चांगले share अ‍ॅडच करावेत.

ब.
Short term portfolio मध्ये मात्र या उलट राहते. तुम्ही ग्राफ प्रमाणे अभ्यास करता ( नंतरच्या भागात विस्तृत सांगेलच), आणि प्रत्येक analysis हे पुर्ण बरोबर कधीच नसते , त्यामुळे तुम्ही strict stop loss लावलेला हवाच. ( तरीही ऑक्टोबर पासुन माझे १०० % technical बरोबर आले आहे, पण त्या आधी २० % जे चुकले होते ते shares मी लॉस मध्ये काढलेले होते.
मी या साठी GTT चा वापर जास्त करतो.

मला वाटते मार्जिन हे भारतात max to max T5 दिवसा करता मिळते, पण माझे म्हणणे मी थोडे विस्तृत मांडतो..

share market मध्ये येणारा सामान्य माणुस असेल तर त्याने स्वताचे भांडवल वापरावे हे कधी हि योग्य राहते, कारण ब्रोकर चे margin वापरत असाल तर तुम्हाला फायदा जसा जास्त होतो तसा तुमचे खुप मोठे नुकसान हि होउच शकते.
मी स्वता short/intraday/options करत नसल्याने यात जास्त खोल गेलो नाही. परंतु यात भविष्यात मी जाईल. पण त्या आधी मी ठरवलेले आहे, माझ्याकडे ४ वर्षे अनुभव हवा, माझ्याकडे पैसा हवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्याकडे वेळ हवा.. त्यामुळे ह्या प्रश्नाचे मी व्यवस्थीत उत्तर देवु शकत नाहिये ..

परंतु, याबरोबरच Investment बद्दल मी काही बेसिक मुद्दे मांडतो .
( मला खरेच वाटते आहे Share market basics असा धागा काढलाच पाहिजे)

Diversification हे Investment चे main सुत्र आहे. त्यामुळे तुम्ही तुमची गुंतवणुक नेहमी diversified ठेवली पाहिजे असे माझे मत आहे.
त्यामुळे मंदी, Sectorial मंदी आणि इतर वेळेस तुम्ही त्यातुन सावरु शकता )
उदा. तुम्ही तुमच्या गुंतवणीकाचा काही भाग हा बँकेत ठेवावा. ( जर Emergency म्हणुन लागले तर)
काही पैसे Mutual funds मध्ये आणि काही पैसे gold किंवा bond मध्ये गुंतवले पाहिजे.

जर तुम्ही यातले काही केले नसेल तर तुम्ही share market मध्ये येवु नये असे माझे स्पष्ट मत आहे.

(वयक्तीक रीत्या मी स्वता २० जानेवारी २०१८( मुलीचा वाढदिवस) पासुन जेंव्हा मी मार्केट मध्ये येण्याचे ठरवले तेंव्हा पासुन Mutual funds आणि gold मध्ये पैसे गुंतवत आहे, आणि ते फक्त मुलीच्या लग्न आणि higher education शिवाय मी काढणार नाही आणि नंतर २०२० ला मी मार्केट मध्ये आलोय).

बिटाकाका's picture

23 Mar 2021 - 9:28 pm | बिटाकाका

मार्जिन च्या बाबतीत माझे मत थोडे निराळे आहे. माझ्यामते मार्जिन हे आपल्यासारखे गुंतवणूकदार आणि ब्रोकरेज हाऊस दोघांसाठी विन-विन परिस्थिती आहे. मी इन्ट्राडे आणि शॉर्ट टर्म दोन्ही साठी मार्जिन सोय वापरतो. अर्थात, बहुतेक ब्रोकरेज हाउसेस मार्जिन हे जास्तीत जास्त एक वर्षासाठी देत असल्याने लॉंग टर्म साठी फायदा नाहीये. पण स्वतःची विकत घेण्याची क्षमता (buying power) वाढवण्यासाठी मला वाटतं मार्जिन पेक्षा दुसरा चांगला मार्ग नाहीये.
**********
एक उदाहरणासह पाहू. समजा माझ्याकडे ३५ हजार रुपये आहेत. माझ्या अभ्यासाने मी अबक कंपनीचा शेअर घेण्याचे ठरवले आहे ज्याची किंमत ५०० रु. आहे. माझ्या अभ्यासानुसार हा शेअर पुढच्या २ महिन्यांत १५ ते २० टक्के चढणार आहे. आता माझ्याकडे असलेल्या ३५००० रुपयांमध्ये मी या कंपनीचे साधारण ७० शेअर घेऊ शकेन. पण तेच मी मार्जिन सोय वापरली तर माझी घेण्याची क्षमता वाढेल. बहुतेक सगळे मोठे ब्रोकरेज हाऊसेस साधारणपणे ५०% ते ६५% मार्जिन देतात. हे मार्जिन प्रत्येक शेअर नुसार वेगवेगळे असू शकते (ब्रोकरेज हाऊसच्या त्या शेअर च्या रिस्क ऍनालिसिस नुसार). समजा आपला शेअर चांगला आहे आणि ब्रोकरेज हाऊस त्या शेअर साठी ६५% मार्जिन देते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही समजा १ लाखाचे शेअर्स घेतले तर तुम्हाला फक्त ३५ हजार भरायचे आहेत आणि ब्रोकरेज हाऊस ६५ हजार भरेल. आता माझ्याकडे असलेल्या त्याच ३५ हजारांमध्ये मला १ लाखांचे म्हणजेच २०० शेअर्स घेता येतील. समजा तो शेअर खरेच २०% (५०० रु. वरून ६०० रु. ला) चढला तर मला आधी १००x ७०=७००० रु. नफा घेता आला असता तोच मार्जिन मूळे १००x२००=२०००० रु. होईल. आता यात ब्रोकरेज हाऊस चा काय फायदा? तर माझ्यामते त्यांचा दुहेरी फायदा आहे. १. ते तुम्हाला दिलेल्या मार्जिन वर १० ते १३% व्याज आकारतात. वरील उदाहरणामध्ये मी त्यांचे पैसे समजा दोन महिने (शॉर्ट टर्म) वापरले, तर मला साधारणपणे १५०० रु. इंटरेस्ट द्यावा लागेल. म्हणजेच माझा नफा २००००-१५००=१८५०० रु. असेल. म्हणजेच थोडक्यात मी १५००रु. चा धोका पत्करून नफा ७०००रु. वरून १८५०० ला नेण्याची संधी निर्माण केली. २. ब्रोकरेज हाऊसेस चा दुसरा फायदा म्हणजे त्यांचे ब्रोकरेज कमिशन. माझी विकत घेण्याची शक्ती वाढवून ते त्यांची जास्त कमिशन मिळण्याची संधी निर्माण करतात.
*********
माझ्या मते बहुतेक सगळीच ब्रोकरेज हाउसेस इंट्राडे साठी मार्जिन सोय घ्यायलाच लावतात. मी तरी इंट्राडे कॅश मोड मध्ये कधी केलेले नाही.

गणेशा's picture

23 Mar 2021 - 11:08 pm | गणेशा

बिटाकाका,
तुम्ही एकदम चांगले समजुन सांगितले आहे, आणि मला एक वर्षासाठी मार्जिन मिळते हे माहिती नव्हते, खरे तर मी तसा प्रयत्न पण कधी केला नाही मार्जिन मिळवण्याचा त्यामुळे हि असेल..

पण तुम्ही यात चोख अभ्यास करून उतरताय हे लिहण्यावरून कळत आहे, पण जे नविन आहेत त्यांनी या पासून थोडे लांब रहावे असे मला वाटते...
कारण याची दुसरी बाजू तितकीच जोखमीची आहे...

उदा.

जर तुम्ही घेतलेले २०० shares,१०० रुपयाने पडून ते ४०० रुपये झाले आणि stop loss hit झाला तर २०००० रुपये इतका तोटा तुम्हाला होईल,
पण त्याच वेळेस ब्रोकर कडून घेतलेले ६५००० अधिक १५०० रुपये व्याज हि तुम्हाला द्यावेच लागेल.
म्हणजे तुमच्या कडे असलेल्या ३५००० रक्कमेतून तुम्हाला तुम्हाला तोटा सहन करावा लागेल २१५०० रुपये. म्हणजे तुमच्याकडे राहतील (३५०००- २१५०० = १३५०० रुपये.)
म्हणजे तोटा हि त्याच प्रमाणात सहन करावे लागेल.
त्यामुळे नविन जे लोक मार्केट मध्ये येतील त्यांनी मार्जिन न वापरता आपला अनुभव वाढवून मग risk घेतली पाहिजे असे माझे वयक्तिक मत आहे..
तुमचे असेच अनुभव लिहीत रहा.. आवडला रिप्लाय...

शाम भागवत's picture

23 Mar 2021 - 11:32 pm | शाम भागवत

🎯

तुमच्या वरच्या उदाहरणातील दोन निसटत्या बाजू.

१. जर मार्जिन वापरले नाही तर तुमचा तोटा ७० (कारण ३५ हजारात तेवढेच शेअर आले असते) x१०० = ७००० आणि मार्जिन वापरले तर तोटा २१५०० हे गृहीतक मार्जिन शी निगडित नाहीये तर तुमच्या त्या शेअर च्या अभ्यासाशी आणि तुम्ही त्या शेअर मध्ये किती रिस्क घ्यायची ठरवली आहे याच्याशी आहे. म्हणजेच जर तुम्ही तोटा कमी व्हावा म्हणून ७० quantity घेणार असाल तर तीही तुम्ही मार्जिन वापरूनच घेऊ शकता. म्हणजे तीच ७० quantity तुम्ही स्वतःचे १२५०० आणि ब्रोकरेज हाऊस चे २२५०० वापरून घेऊ शकता. म्हणजेच वरील उदाहरणात जर शेअर ४०० ला गेला तर तुम्हाला ७००० + २५० (व्याज) = ७२५० एवढा तोटा होईल. म्हणजेच तुम्ही २५० रुपयांची जास्तीची जोखीम घेऊन स्वतःचे ३५०००-१२५००= २२५०० रु. मोकळे केलेत जे तुम्ही इतर शेअर्स मध्ये डायव्हर्सिफिकेशन करू शकता. याउलट २५० रु. जोखमीत नफ्याची बाजू मी वरच्या प्रतिसादात सांगितली आहे.

२. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे जेव्हा ब्रोकरेज हाऊसेस तुम्हाला लाखातले ६५ हजार देत आहेत तेव्हा ते तुम्हाला फक्त व्याज कमावण्यासाठी ओपन एंडेड लोन देत नाहीत तर तुमचे घेतलेले शेअर्स हे त्यांच्याकडे सेबीच्या नियमानुसार तारण ठेवतात. त्यामुळे एका लिमिटच्या वरचा तोटा होत असेल तर ते तुम्हाला तुमचे स्वतःचे मार्जिन वाढवण्याची सूचना करतात. जर तुम्हाला ते शेअर्स ठेवायचे असतील तर तुम्ही स्वतःचे मार्जिन वाढवून ठेऊ शकता नाहीतर मग ब्रोकरेज हाऊस ते स्वतःच विकून तुमचा पुढचा लॉस होण्यापासून वाचवतात. हे मी कदाचित नीट शब्दात इथे समजावू शकलो नसेन तर मी एक उदाहरण घेऊन नंतर विस्ताराने सांगू शकेन. फक्त सांगायचा मुद्दा हा आहे की उलट मार्जिन च्या केस मध्ये लॉस होत असेल तर तो शेअर काढायचा की ठेवायचा हा तुमच्या आणि ब्रोकरेज हाऊसच्या बाजूने महितीपूर्वक निर्णय (informed decision) असेल. त्यामुळे जास्त सेफ आहे असे मला वाटते. याशिवाय असा मार्जिन मध्ये घेतलेला शेअर कोणत्याही क्षणी ब्रोकरेज हाऊसचे पैसे भरून (वरील उदाहरणात २२५००) डिलिव्हरी मध्ये कन्व्हर्ट करता येतो. म्हणजे गरज वाटलेच तर तुम्ही तुमच्या मूळ ३५ हजारात ७० शेअर ह्या परिस्थितीला केव्हाही परत जाऊ शकता.

गणेशा's picture

24 Mar 2021 - 12:33 pm | गणेशा

धन्यवाद...
हे खुप शिकण्यासारखे आहे, तुम्ही छान सांगितले आहे..

या संपूर्ण सिरीज चा मुळ उद्देश हा एकमेकांच्या अनुभवाने आपले ज्ञान वाढवणे हाच आहे..

धन्यवाद.. नक्कीच उपयुक्त माहिती..

Rajesh188's picture

24 Mar 2021 - 11:02 pm | Rajesh188

शेअर मार्केट मधील खाचा खोचा माहीत होण्यासाठी तुमची ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे.

शाम भागवत's picture

23 Mar 2021 - 11:31 pm | शाम भागवत

🎯

सुबोध खरे's picture

24 Mar 2021 - 12:21 pm | सुबोध खरे

आपले अभ्यास आणि विश्लेषण उत्तम आहे

परंतु प्रत्येक प्रतिसादात कंपनी च्या ऐवजी कंपणी ( या इंग्रजी शब्दाचा उच्चार कंपनी असाच आहे) वाचताना उत्तम पुलाव खाताना दाताखाली सारखा खडा आल्यासारखे होते.

गणेशा's picture

24 Mar 2021 - 12:29 pm | गणेशा

धन्यवाद सुबोध जी,
Next time पासून चूक सुधारेल.

न आणि ण, यात माझा खुपच प्रॉब्लेम आहे..
अगदी खून आणि खूण यात तर अर्थच वेगळा होतो..
खरे तर ह्या सुधारणा खुप आधी झाल्या पाहिजे होत्या, पण काही केल्या लक्षात राहत नाही.. प्रयत्न करेन नक्की..

गोंधळी's picture

24 Mar 2021 - 9:22 pm | गोंधळी

बाजार परत क्रॅश होईल का? परत केसेस वाढत आहेत.

आग्या१९९०'s picture

24 Mar 2021 - 10:39 pm | आग्या१९९०

तीच शक्यता जास्त आहे. त्यात युएस बाँड रेट हि वाढत आहे. आपल्यासाठी negative आहे.

चौकस२१२'s picture

25 Mar 2021 - 8:24 am | चौकस२१२

मार्जिन घेणे हि दुधारी तलवार आहे हे नक्कीच लक्षात ठेवणे जरुरीचे आहे
पण बिटाकाका तुम्ही त्याचा एका वेगळ्यदृष्टकोनातून उपयोग सांगितला आहे तो हि विचार करण्यासारखा आहे, त्याचा "विविधतेसाठी "असा उपयोग करता येतो हि ती कल्पना , बरोबर?
१०० आपले आणि १०० मार्जिन मिळत असेल तर २०० एकाच कंपनी चे शेअर घेण्याऐवजी
५० + ५० असे त्या कंपनी चे घेणे आणि मग उरलेले तुमचे ५० तुम्ही दुसऱ्या शेअर साठी वापरू शकता असेच ना

मार्जिन बद्दल अजून एक प्रश्न ( गृहीत डिलिव्हरी, डे ट्रेडिंग बद्दल नाही )
- बहुतेकदा भारतात मार्जिन हा प्रश्न विचारला कि असं उत्तर मिळते कि लोन अंगानेस्ट शेर .. म्हणजे आधी तुमच्या कडे शेर असतील तर त्यावर अजून पैसे वापरयाला देऊ
इथे याचा दुहेरी अर्थ समजा तुमचहय कडे सुरवातीला रोख आहेत १०० ( त्याचे अजून तुम्ही शेर घेतले नाहोयेत ) तर ते १०० + उसने १०० असे मार्जिन लोन धरून तुम्ही नवी सुरवात २०० ची करू शकता .. शेवटी ब्रोकर ला धोका तेवढाच असतो .. फक्त २ पद्धती असतात.. भारतात पण तसे असते का?
- वर्षभरच मार्जिन मिळत हे काय? म्हणजे आज मार्जिन वर शेर घेतले आणि असे धरुयात की वर्षभरात "मार्जिन कॉल " येण्याइतकं तो कधी खाली गेलाच नाही तरीही तुम्हाला वर्षाचं एकेरी जबरदस्तीने ते मार्जिन लोन मिटवावा लागते???
- मार्जिन लोन व सधया साधारण किट टक्के व्याज दार आहे तिकडे ?
- याशिवाय मार्गीं संबंधी काही किचकट प्रश्न आहेत ते मी तुम्हाला व्यनि करून विचारेंन

आग्या१९९०'s picture

25 Mar 2021 - 8:52 am | आग्या१९९०

साइड वे मार्केटमध्ये मार्जिन घेतल्याने फायद्यापेक्षा तोटाच होतो. ज्या व्यक्तीचा कमीतकमी १०-१५ वर्ष मार्केट मध्ये मार्जिनचा अनुभव असेल त्याचाच सल्ला घ्यावा. गेली ५-६ वर्षात जे मार्केटमध्ये आले आहेत त्यांनी जास्त काळजी घ्यावी. लाँगटर्म करता स्वतःचे भांडवल असले तरच उडी घ्यावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2021 - 2:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@ गणेशा

दीर्घकाळ गुंतवणुकीत रिटर्न्स कमी मिळतात असे माझे मत आहे. उदा. अ आणि ब मधे माझ्या पाच वर्षाच्या गुंतवणुकीत रिटर्न्स करन्ट व्हाल्यु १९ % दिसत आहे, हे इतक्या दीर्घगुंतवणुकीत ठीक आहे का ?

आणि दररोजच्या शेयरच्या खरेदी विक्रित स्टॉपलॉस, शेयर गड़गड़ला, लो झाला, हाय झाला विक्री करायची, नफा थेट खात्यात असे ऑटो खरेदी विक्री करणारे काही प्रोग्राम्स असतात का ? सकाळपासून गळ टाकून बसायचं पेक्षा असं सोपं काही जुगाड़ असतं का ?

-दिलीप बिरुटे

ऑटो खरेदी विक्री करणारे काही प्रोग्राम्स असतात का ?

हो असतात, मी तेच वापरतो.. Sept आणि oct मध्ये मला जो short term चा प्रॉफिट झाला तो सगळा auto खरेदी विक्री होता..कारण तेंव्हा कंपनीत खुप होते...

सविस्तर उद्या लिहितो मी मला थोडा वेळ द्या..

दीर्घकाळ गुंतवणुकीत रिटर्न्स कमी मिळतात असे माझे मत आहे. उदा. अ आणि ब मधे माझ्या पाच वर्षाच्या गुंतवणुकीत रिटर्न्स करन्ट व्हाल्यु १९ % दिसत आहे, हे इतक्या दीर्घगुंतवणुकीत ठीक आहे का ?

या साठीच मी या week end ला पुढचा भाग लिहायला घेतोय, त्यात तुम्हाला या संबंधी बरीच माहिती मिळेल...
Long term goal आणि short term goal should be different for different reason..
आणि long term share साठीचे काय paramter आहेत तेच आपण पाहणार आहोत पुढच्या भागात...

माझे mutual fund sip चे ३ वर्षाचे - २२% + वाढलेत, त्यामुळे दूसरा भाग लिहिल्यावर तुम्ही काय काय पाहिले आणि काय काय गोष्ट बरोबर आणि चूक केली हे पुन्हा तपासून पहा..

मी नक्कीच तुमच्या प्रतिसादा मुळे लवकरच लिहायला घेतो आहे...

गणेशा's picture

26 Mar 2021 - 6:33 pm | गणेशा

माझे mutual fund sip चे ३ वर्षाचे : २२% + वाढलेत, त्यामुळे दूसरा भाग लिहिल्यावर तुम्ही काय काय पाहिले आणि काय काय गोष्ट बरोबर आणि चूक केली हे पुन्हा तपासून पहा..

साबु's picture

26 Mar 2021 - 2:57 pm | साबु

छान लेख माला होइल हि. ज्या लोकाना अभ्यास करायला वेळ नाहि त्यान्च्यासाठि https://www.smallcase.com/ कसे आहे.
माझ्या २-३ मित्रा कडुन ह्या बद्दल ऐकले आहे.

टिपः मि https://www.smallcase.com/ चा सेल्स एजेन्ट नाहि आहे. तुमचे मत जाणुन घ्ययला आवडेल.

गणेशा's picture

26 Mar 2021 - 6:34 pm | गणेशा

धन्यवाद..

मी स्वतः पाहिलेली नव्हती हि site.. नक्कीच बघेल..

मुच्युअल फंड सारखाच थोडासा प्रकार आहे. थीम बेस असतो. त्या थीमला पूरक अशा कंपन्या यात असतात. झिरोधा स्वतः याला प्रमोट करतेय.
अजून अभ्यास चालू आहे. यात खरेदी/विक्री कशी करायची याचा अंदाज घेतोय. आणिक कोणास काही माहित असल्यास सांगावे.

धर्मराजमुटके's picture

11 Aug 2021 - 10:40 am | धर्मराजमुटके

१. शेअर मार्केट मधे कमविलेल्या नफा / तोटा आयकर भरताना कसा दाखवायचा ? आपण ज्या ब्रोकर फर्म कडून शेअर खरेदी /विक्री करतो ते आपल्याला एप्रील ते मार्च अशा आर्थिक वर्षाचे स्टेटमेंट देतात काय ?
२. ब्रोकर फर्म आपल्या उत्पनातून झालेल्या फायद्यावर कर कापून (टीडीएस) सरकार कडे स्वतः भरणा करतात काय ?