Skip to main content

आघाडी सरकारने, गेल्या वर्षभरांत किती कामे केली आहेत?

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 10/03/2021 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण पणे, गेले एक वर्ष, आघाडी सरकार, महाराष्ट्र राज्यावर, राज्य करत आहे... गेले एक वर्ष, हे सरकार नुसतीच, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, हे धोरण अवलंबत आहे, असे वाटते. सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे सुखावह होईल, हे बघणे, हेच सरकारचे मुख्य काम असते.. आर्थिक, संरक्षण, दळणवळण आणि अन्नपुरवठा.... ह्या जीवनावश्यक गोष्टी, हे सरकार नीट पुरवू शकत नाही... आर्थिक बाबतीत, रोजगार उपलब्ध केले नाहीत. संरक्षण, सामान्य माणूस ते उद्योगपती, कुणीच सुरक्षित नाही दळणवळण, मेट्रो कारशेडचे घोंगडे नुसतेच भिजवत ठेवले आहे अन्नपुरवठा, महागाई वाढतच आहे. अर्थात, हे माझे निरीक्षण आहे...इतर कुणाचे निरीक्षण वेगळे असूही शकते.... ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि वैयक्तिक शेरेबाजी करणे चालू असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत. -- मिपा व्यवस्थापन

वाचने 28835
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by स्वलिखित

त्यांच असं आहे.. कि गाढव पण चालेल. कुत्रा पण चालेल.. भले आपल्या देशातले नसले तर परदेशातून आणू.. पण पंतप्रधानपदी मोदी नको. bjp नको.. फक्त एवढा एकच अजेंडा घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद खरडत बसायचे..

In reply to by नावातकायआहे

"मोदीळ होणे" हा वाक्प्रचार मराठी भाषेला बहाल केल्याबद्दल "नावातकायआहे" यांचे जाहीर अभिनंदन.

In reply to by Rajesh188

As per citizenship law in India, Any foreigner becoming a citizen of India will be subject to conditions, which conditions are Indian becoming a citizen in their country. Which means the conditions an Indian has to face in becoming a citizen of Italy will be applied to an Italian person in becoming a citizen of India. ( This is amended now but this is unconstitutional I guess again Swamy is working on it) In Italy, You cannot be PM if you are not born in Italy. The same condition will apply to Italy person in India and hence Sonia Gandhi can’t become PM in India. आणि २००४ मध्ये श्रीमती सोनिया गांधी यांनी भारतीय नागरिकत्व घेतलं असलं तर ईटालियन नागरिकत्व सोडलेलं नव्हतं. हे बेकायदेशीर आहे ( कारण तेंव्हाच्या भारतीय कायद्याप्रमाणे तुम्हाला दुसऱ्या देशाचे नागरिकत्व सोडावे लागत असे) या कारणास्तव श्री स्वामी यांच्या पत्राप्रमाणे श्रीमती सोनिया गांधी याना पंतप्रधान होणे अशक्य होते. बाकी तुम्ही वाटेल त्या थापा मारता हे मी अनेक वेळेस दाखवलेले आहेच.

तो पर्यंत कोणत्या ही पक्षाचे सरकार येवू ध्या ते जनतेचे भले कधीच करणार नाहीत. सेने नी सत्तेत न येता संघटना म्हणून जरी काम केले असते तरी त्यांची किंमत खूप वाढली असती. तेच अरविंद केजरीवाल विषयी पण म्हणता येईल. लोक संघटित होवून स्वतःच्या हक्क विषयी जागरूक होत नाहीत तो पर्यंत कोणत्याच पक्षाचे सरकार आले तरी परिस्थिती बदलणार नाही.. अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल तरी संघटना करून बघा. एक पण काम अडणार नाही.

In reply to by Rajesh188

अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल तरी संघटना करून बघा. तुम्ही केली आहे का? सध्या हौसिंग सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर येण्यासाठी चार लोक तयार नसतात आणि तुम्ही इथे नसलेल्या गाजराचा हलवा विकताय?

In reply to by Rajesh188

आमच्या पहाण्यात एकच सक्षम समाज संघटना आहे. दुसरी कुठलीच नाही! एकवार स्वतः, प्रत्यक्ष अनुभव घ्या असे सुचवेन.

In reply to by खेडूत

सदर संघटनेचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचा वाटा आहे. सरसंचालकांनी हातात दांडी घेऊन काढलेल्या यात्रेला 75 वर्षे झाली म्हणून चड्डी घालून हातात दांडी घेऊन दांडी यात्रा काढणार आहेत

In reply to by कपिलमुनी

आपला दावा एखाद्या फुटकळ पक्ष प्रवक्त्यासारखा वाटतो. स्वातंत्र्य लढा हा इथे मुद्दा नसून सामाजिक, सेवाकार्य करण्याबाबत आहे. त्या बाबतील संघा इतकी चांगली संघटना माझ्या माहितीत दुसरी नाही. शेकडो संस्था उगाच उभ्या राहत नाहीत. अनेक लोक तिसऱ्या पिढीत निःस्वार्थ पणे काम करत आहेत. मी स्वतः किमान तीन संस्थांच्या सेवा कार्यात काम केले आहे. मला काही हजार रुपयांची मदत करावीशी वाटली तर ती परिवारातील संस्थेला देऊन टाकू शकतो कारण ती तिथे पोहोचणार, योग्य वापर होणार याची खात्री असते. आपला काही संघ कार्यकर्त्यावर राग असू शकतो. माझाही आहे. म्हणून संघटनेचे महत्त्व कमी होत नाही. आजही द्वेष करण्या ऐवजी एक क्षेत्र निवडून अल्पकाळ तिथे सहभाग द्याल तर वेगळेपणा सहज जाणवेल. संघ म्हणजे समर्पण. आपल्याला काही मिळावे म्हणून कुणी काम करत नाही. देशासाठी काहीं करावेसे वाटले तर ही कामे चालतात आणि आपल्याला पटतात त्यात मदत करावी. तर असो. आपली एकदा प्रत्यक्ष भेट झाली असल्याने हे सगळं लिहीत आहे. बाकी वाद वगैरे घालण्यात मला रस नाही! :))

In reply to by खेडूत

प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन

In reply to by श्रीगुरुजी

प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन

In reply to by कपिलमुनी

प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी, इथे स्वातंत्र्यलढा कुठनं मध्येच उपटला? बरं, आलाय तर येऊ द्या. त्यांत रास्वसंघाचं योगदान काय असं तुम्ही विचारताय. पण मग भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचं तरी कुठे काही योगदान होतं? इंग्रज गेले ते आझाद हिंद सेनेच्या उठावामुळे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा पै. सहमत. पण स्वातंत्र्य हे चरखा फिरवून आणि एका कुटुंबातील व्यक्तींमुळे मिळाले हे धांदात खोटे आयुष्यभर खरं समजणाऱ्या भारतातील सुशिक्षित अडाणी लोकांना कधी समजणार देव जाणे..

In reply to by बापूसाहेब

त्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही... हिटलरने साहेबाच्या तीन पिढ्यांची हानी केली, साहेबाला आपले घर सांभाळायचे होते, म्हणून साहेबाने फाळणी करून, तडजोड केली... आझाद हिंद सेनेमुळे, नेहरूंचा पंतप्रधान होण्याची शक्यता दिसायला लागली आणि सरदार पटेल यांना, महात्मा गांधी यांनी सांभाळले आणि नेहरू घराणे पंतप्रधान पद उपभोगू लागले... आता अडाणी जनतेला, घराणेशाही नको आहे...

In reply to by मुक्त विहारि

त्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही... असहमत. इथे राहिलो तर पॅन्ट शर्ट उतरवून खादीचा सदरा लेंगा घालावा लागणार. मग मड्डम जवळ नाय घेणार. या भीतीने साहेब गेला. हिटलरनी सायबाला चड्डी पण घालायची औकात ठेवली नस्ती ही अंधश्रद्धा आहे :-)

In reply to by रंगीला रतन

आता सामान्य माणसे देखील खादी वापरत नाहीत...खादीचा उपयोग फक्त मते मागण्यासाठी... अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते....

In reply to by मुक्त विहारि

अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते.... बरोबर. पण मला वाटते जपाननी काशी घातली नसती तर साहेबाला अजून लवकर पळावे लागले असते.

फक्त ह्याच कारणांमुळे भारताला स्वतंत्र मिळाले. मग तात्या टोपे भगतसिंग. राजगुरू लोकमान्य मौलाना आझाद. सुभाषचंद्र बोस क्रांतिसिंह नाना पाटील आणि अशी अनंत लोक ज्यांनी प्राणाचे दान दिले ते कशासाठी . असेच त्यांना जास्त मस्ती होती म्हणून की काय