Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी सोमवार, 08/03/2021 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे. https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-co… याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seein… त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gan… इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.

वाचने 44738
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nia-taking-over-pr… गुन्हेगार पकडल्या गेला पाहिजे, मग तो राज्य सरकारने पकडावा किंवा केंद्र सरकारने....

In reply to by Vichar Manus

गुणगान नक्कीच करीन .... साधू हत्याकांड ते मुकेश अंबानी यांच्या घरापाशी सापडलेली स्फोटके .... फक्त राजकारणच करत आहे.... एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवत आहोत, असे म्हणायचे आणि स्त्रीला "हरामखोर" म्हणायचे...

In reply to by मुक्त विहारि

भारतात असा दिन उजाडणं अवघड आहे. इथे साधा घुंगट म्हणजेच पदर ओढणे कसे स्त्रीसाठी अपमानास्पद आहे.. तिच्या हक्कांचे उल्लंघन आहे.. पुरुषसत्ताक विचारसरणी इ इ बोलले जाते. असे हे सो कॉल्ड विचारजंत हिजाब आणि बुरखा याबाबत बोलायची वेळ आली कि लगेच शेपट्या आत घालतात.. मूग गिळून तोंड बंद करतात. आणि बोललेचतरी धार्मिक बाब म्हणून समर्थन करतात..

In reply to by बापूसाहेब

माझी बायकोने अशी पूर्ण काळ्या कपड्यात झाकलेली बाई पहिली कि खूप हळहळते.. या बायका कस काय राहात असतील अश्या वेषात.. फक्त डोळ्याची झापडे दिसतील एवढीच जागा सोडून बाकी सगळं काळ्या कपड्यात गुंडाळून घ्यायचे.. किती अनकंफर्टेबल असेल हा प्रकार.. कधी कधी गंमतीने अरे ती बघ कचऱ्याची पिशवी चाललीये असे म्हणते.. अर्थातच असे म्हणून ती त्या स्त्रीचा अपमान करत नसते तर तिला कचऱ्याच्या काळ्या पिशवीसारखी वागणूक देणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृती चा अपमान करत असते.

In reply to by बापूसाहेब

घरात धर्म आणि बाहेर एकसमान कायद्याचे राज्य हवे... एका धर्माला एक न्याय आणि दुसर्या धर्माला दुसरा न्याय नको...

In reply to by मुक्त विहारि

केवढा मोठा विनोद अरब देशात तुम्हाला त्याचे कायदे पाळावे लागतात आणि इतर देशात ह्याच्यासाठी कायदे करण्यासाठी मतदान करावे लागते. ज्या ज्या देशात सक्षम आणि स्थानिक लोकहित जपणारी लोकशाही नाही आहे ते मुस्लिम होण्याच्या वाटेवर आहेत

https://www.loksatta.com/maharashtra-news/maratha-reservation-modi-gove… स्वतःचे अपयश झाकायला, नेहमीचा उपाय....आता आरक्षण मिळाले तर म्हणणार, केंद्राचा विरोध असूनही, खेचून घेतले...डब्बल ढोलकी, किती दिवस वाजवणार?

In reply to by मुक्त विहारि

१०२ वी घटनादुरूस्ती २०१८ साली केली आहे , त्याबद्दल नेहरू जबाबदार आहेत. नेहरूंचा टीव्र णिशेद !!

In reply to by कपिलमुनी

मराठा, जाट, गुज्जर सगळ्यांना आरक्षण देऊन केंद्र सरकार पायावर धोंडा कशाला पाडून घेईल. केंद्राची भूमिका सातत्याने विरोधाचीच राहिलेली आहे आणि रहाणार आहे. हे सगळं सगळ्या पक्षांना आधीच माहिती होतं. पण स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणे चालू आहे. हे फक्त "बोट दाखवा" सरकार आहे. बाकी मराठा आरक्षण कधीच देता येणार नाही हे सुद्धा कायम सत्य आहे. एखादी व्यक्ती गरीब आहे म्हणून दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या हक्कांपासून वंचीत करणे असे कधीच होऊ शकत नाही. अ व्यक्तीच्या बापाला पैसे कमवायची अक्कल नव्हती म्हणून ब व्यक्तीची नोकरी घेऊन अ व्यक्तीला देण्यासारखं आहे हे. मराठा हे सामाजिक दृष्ट्या कधीच मागास नव्हते, नव्हे, सातत्याने ते राज्यकर्ते आणि अगदी गावांमधल्या समाजांचे नेते होते. त्यांना आरक्षण देणे हा बाकीच्या समाजांवर अन्याय ठरेल आणि हा मूर्खपणा सुप्रीम कोर्टात टिकणारा नाही.

In reply to by पिनाक

मराठा आरक्षण देणार ही भाजप ची घोषणा होति की हो ! बाकी मध्यंतरी शेठ ने इंधनच्या वाढत्या दामाबद्दल जुन्या सरकारांकडे बोट दाखवले होते त्यची आठवण झाली हो

In reply to by कपिलमुनी

बर मग? विचारा भाजप राज्य सरकारला त्याबद्दल. केंद्राने मक्ता घेतलाय का राज्ये चालवायचा? का मी मक्ता घेतलाय भाजप च्या जाहिरनाम्याचा?

In reply to by पिनाक

जे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार एखाद्या विशिष्ट जातीला राखीव जागा देते, त्या सरकारला जनता पुढील निवडणुकीत सत्तेवरून पायउतार करते असा १९९०पासूनचा इतिहास सांगतो. - १९९० मध्ये जनता दलाच्या वि. प्र. सिंहांनी मंडल आयोग दाखवून इतर मागासवर्गीयांना राखीव जागा दिल्या. परंतु १९९१ मध्ये ते परत सत्तेवर आले नाहीत. - १९९२ मध्ये जयललिताने राखीव जागा ६९ % पर्यंत वाढविल्या. परंतु १९९६ मध्ये ती सत्तेत परतली नाही. - २०१३ मध्ये मीणा जातीला राखीव जागा देऊनही वसुंधराराजे सरकार सत्तेबाहेर गेले. - २०१३ मध्ये केंद्र सरकारने जाटांना राखीव जागा देऊनही मनमोहन सिंग सरकारचा निवडणुकीत पराभव झाला. - २०१४ मध्ये महाराष्ट्रात तत्कालीन चव्हाण सरकारने मराठा व मुस्लिमांना राखीव जागा दिल्या. परंतु २०१४ मध्ये जनतेने ते सरकार घालविले. - २०१८ मध्ये महाराष्ट्रात मराठ्यांना राखीव जागा देऊनही २०१९ मध्ये फडणवीसांना जावे लागले. एखाद्या जातीला राखीव जागा देऊनही त्या जातीचे मतदार राखीव जागा देणाऱ्या पक्षाला लगेच होणाऱ्या निवडणुकीत मत देतातच असे दिसत नाही. परंतु एका विशिष्ट जातीला राखीव जागा दिल्याने इतर जातींवर निश्चितच अन्याय होतो व त्यामुळे ते पुढील निवडणुकीत राखीव जागा देणाऱ्या पक्षाला सत्तेतून घालवितात असेच चित्र दिसत आहे. अर्थात याला काही अपवाद असू शकतील. परंतु बहुतांशी असेच चित्र दिसत आहे. हा इतिहास दिसत असूनही सत्ताधारी पक्ष पुन्हा पुन्हा तीच चूक का करीत राहतात हे समजत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

>>> - २०१३ मध्ये मीणा जातीला राखीव जागा देऊनही वसुंधराराजे सरकार सत्तेबाहेर गेले. >>> दुरूस्ती . - २००८ मध्ये गुज्जर जातीला राखीव जागा देऊनही वसुंधराराजे सरकार सत्तेबाहेर गेले.

भारत सरकार आधारभूत किंमत थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करणार ह्या घोषणेवर दलाल मंडळींना राग येऊन हे आंदोलन करणार आहेत. माझ्या मते इतर जनतेने दंडुका घेऊन ह्या आंदोलनकर्त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. माझ्या आधीच्या समजुतीपेक्षा हि मंडळी जास्तच निर्ल्लज आणि आडमुठी आहेत. https://indianexpress.com/article/cities/chandigarh/arhtiyas-to-go-on-s…

In reply to by साहना

"Currently, arhtiyas (commission agents) get the payments in their accounts, which they in turn pay to farmers through cheques. The Centre has to pay 2.5 per cent commission to arhtiyas who facilitate procurement of the crop from farmers to government agencies and take commission for that from the government. " ही खरी गोम आहे. फुकट सरकार चा पैसा वापरायला मिळतो. शेतकर्‍याला उशिरा दिला काय किंवा उपकार केल्यासारखा दिला काय. मधल्या मधे घपला करायला भरपुर वाव आहे. ऊगाच नाही सगळे उर बडवताय ...

आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या १०३ व्या दिवशी वेगळा नजारा बघायला मिळाला. सध्या कोणत्याही वाहिन्यांवर आंदोलनविषयी बातम्या दाखवल्या जात नाहीत. सरकार विरोधात जिथे कुठे काही चाललेले असेल त्याबाद्लची माहिती, चित्रण, दाखवायचे नाही. असे केंद्र सरकारचे धोरण आता हळूहळू भारतियांच्या लक्षात येत आहे. एका मोठ्या लोकशाहीच्या देशात होणारी भारतीयांची होणारी गळचेपी महाभयंकर आहे, पुढे काय काय होईल याची कल्पना आज तरी अशक्य आहे. हजारो- महिला स्वखर्चाने आंदोलनात सहभागी होतात,सर्व काही महिला,भाषण,संचलन, कार्यक्रम सब कुछ महिला... पण दुर्दैवाने 'गोदी' मीडिया ते दाखवत नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेतकरी आंदोलनात सहभागी होणा-या सर्व महिलांना, महिला शक्तिला आणि महिलांच्या लढ्याला आपला कड़क सॅल्यूट आहे. आंदोलन स्थळाचा नजारा...महिला शक्तिचा जागर. लिंक -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका मोठ्या लोकशाहीच्या देशात होणारी भारतीयांची होणारी गळचेपी महाभयंकर आहे
काय जोक मारताय काय राव. हे श्रीमंत शेतकर्‍यांचे, अडत्यांचे, दलालांचे आंदोलन हे भो. आलीशान तंबू, तंबूत एसी, कूलर, लंगर चैन हे भो. बाकी सर्वसामान्य भारतीयांमध्ये मी पण आहे, आपली गळचेपी कुठे झालेली दिसली नै भो.

In reply to by प्रचेतस

सरकार विरोधात चाललेल्या आन्दोलनाच्या बातम्या न दाखविणे, डिझेल-पेट्रोल आणि इतर वस्तुंच्या महागाबद्दल कुठेही चर्चा न करणे, ते न दाखविणे, त्या बद्दल न बोलणे... नको त्या विषयांवर सरकारप्रणित दळण दळणे हे सर्व लोकशाहीला मारक आहे. >>>>सर्वसामान्य भारतीयांमध्ये मी पण आहे, आपली गळचेपी कुठे झालेली दिसली नै भो. आपण उच्चभ्रू श्रीमंत लोकांना ना महागाइचा फटका बसतो, ना आपणास सामान्य लोकांबद्दल होणा-या गरीब, मध्यमवर्गीय, शोषित पीड़ित लोकांच्या शोषणाबद्दल आपणास सहानुभूती असते, हा एक जयजयकारा वर्ग आहे. त्यामुळे आपले प्रश्नच वेगळे आहेत, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीमंत शेतकर्‍यांचे, अडत्यांचे, दलालांचे आंदोलन हे भो. आलीशान तंबू, तंबूत एसी, कूलर, लंगर चैन हे भो
यांवर आपण जाणूनबुजून दुर्लक्ष केलेले दिसते :)
आपण उच्चभ्रू श्रीमंत लोकांना ना महागाइचा फटका बसतो, ना आपणास सामान्य लोकांबद्दल होणा-या गरीब, मध्यमवर्गीय, शोषित पीड़ित लोकांच्या शोषणाबद्दल आपणास सहानुभूती असते,
मी एक दरवर्षी कर भरणारा सामान्य मध्यमवर्गीय नागरीक आहे.

In reply to by प्रचेतस

>>>>मी एक दरवर्षी कर भरणारा सामान्य मध्यमवर्गीय नागरीक आहे. छान अभिनंदन. एखाद्या मिपा कट्याला आपले प्रामाणिक करदाते म्हणून शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल.(ह.घ्या) ;) -दिलीप बिरूटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेट्रोल डिझेल आज सगळीकडे आणि सगळ्या न्यूज चॅनेल मध्ये दाखवतात.. त्यामुळे आपली माहिती सुधारा../ अपडेट करा. आता ती सो कॉल्ड शेतकऱ्यांची फाईव्ह स्टार आंदोलने पण मीडिया ने दाखवायची अशी अपेक्षा असेल तर तुमच्या अपेक्षा फारच जास्त बुवा.. याआधी मीडिया ने हा विषय चावून चावून चोथा केलाय.. पण पब्लिक च्या लक्षात आलेय कि नेमके आंदोलनकर्ते कोण आहेत आणि त्यांच्या मागण्या कश्यासाठी आहेत ते.. त्यामुळे सर्वसामान्य लोकं सुद्धा आता न्यूज वर ही बातमी आल्यावर चॅनेल चेंज करतात.. त्यामुळे सरसकट मीडिया ला गोदी मीडिया म्हणून त्यांचा अपमान करू नका. नाही म्हणायला तुमचे NDTV अजूनही त्या टिनपाट आंदोलनास प्रसिद्धी द्यायचे काम करतेय... तेच बघा मग.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

> आंदोलन स्थळाचा नजारा...महिला शक्तिचा जागर. लिंक बातम्यांना बंदी आहे ? हार चॅनेल काय अगदी मुरिके मध्ये सुद्धा "किसान आंदोलन" म्हणून ह्या दलालांची थेरे दाखवली जात आहेत.

सध्या कोणत्याही वाहिन्यांवर आंदोलनविषयी बातम्या दाखवल्या जात नाहीत. सरकार विरोधात जिथे कुठे काही चाललेले असेल त्याबाद्लची माहिती, चित्रण, दाखवायचे नाही. असे केंद्र सरकारचे धोरण आता हळूहळू भारतियांच्या लक्षात येत आहे. एका मोठ्या लोकशाहीच्या देशात होणारी भारतीयांची होणारी गळचेपी महाभयंकर आहे, पुढे काय काय होईल याची कल्पना आज तरी अशक्य आहे. महाराष्ट्रात अंदाजपत्रक, मनसुख हिरेन अशी चविष्ट प्रकरणे सुरू असताना परराज्यातील दलालांचे विझत आलेले बेचव आंदोलन वाहिन्यांंनी का दाखवावे? दाखविल्यास प्रेक्षक वर्ग किती मिळणार? हे आंदोलन एका विशिष्ट राज्यातील मुठभर दलालांचे आहे हे केव्हाच सिद्ध झाल्याने त्याविषयी ऐकण्यात, पाहण्यात कोणालाही रस नाही ही वस्तुस्थिती आहे. बाकी सरकारविरोधी काहीही दाखविण्यास बंदी घालून भारतीयांची गळचेपी होत असेल तर मराठी व इतरभाषिक अनेक वाहिन्यांवरून मोदींंना व केंद्र सरकारला झोडपणे कसे सुरू आहे? का अशी बंदी, गळचेपी वगैरे तुमच्या मनाचे काल्पनिक खेळ आहेत? आपल्याकडून खुलासा होणार नाही याची खात्री आहेच.

In reply to by श्रीगुरुजी

गळचेपी होतच असेल तर नित्यनियमाने केंद्राच्या नावाने शिमगा करणारे मुखपत्र अजुन कसे काय चालु आहे हा ही प्रश्न पडला पाहिजे नाही का? . . . . . पण मनाचे खेळ करण्यातच सर्व वेळ जात असेल तर असे प्रश्न कसे पडतील?

भक्त बरेच स्वामी निष्ठ आहेत आणि इथे त्यांची संख्या पण बर्या पैकी आहे.आयुष्यात कधीच शेती न केलेले शेती कायद्या विषयी बोलतात हे बघून मोठी गंमत वाटते.

In reply to by Rajesh188

इथे बोलणाऱ्यांपैकी मी आणि मुवि शेतकरी आहोत. तुमचा काय अनुभव शेतीचा, कारखान्याला ऊस घातल्यानंतर तुम्ही वर्षभर सरकारच्या नावाने शिमगा करणार्याव्यतिरिक्त काय करता? तुम्ही तुमचा माल कधी स्वतः बाजारपेठेत विकला आहे का? आम्ही हे सगळे केलेले आहे, म्हणून बोलतो.

In reply to by Rajesh188

भक्त हे नेहमी स्वेच्छेने स्वामिनिष्ठा करतात, याउलट, गुलामगिरी ही नेहमीच अनिच्छेने, कुठल्यातरी मजबुरीपायी केली जाते. *********** आयुष्यभर शेती केलेलेही (किंवा केली आहे भासवणारे) स्वतःचा ज्वर शमवण्यासाठी शेती कायद्याला विरोध करतात हे जास्त गंमतीदार आहे.

चीनमध्ये विमानात वैमानिक आणि फ्लाईट अटेंडंट यांच्यात मारामारी झाल्याची घटना पुढे आली आहे. आता या घटनेचा संबंध पण मोदींशी लावणार का? https://maharashtratimes.com/international/international-news/china-don…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यांच्यातलं कोणीच “मोदी मोदी” ओरडत नव्ह्तं त्यामुळे त्याचा संबंध मोदींशी लावायचा संबंध येत नाही. पॅरिस ते दिल्ली विमानातला भारतीय वेडा मात्र मोदी मोदी ओरडत होता हे बर्‍याच लोकांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाहीय. चालायचंच.

In reply to by नगरीनिरंजन

इथले काही रिकाम्या डोक्याचे वेडे त्या माणसाचा बादरायण संबंध बळेच मोदींशी जोडून चिंतातुर झाले आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

२०१९ ला मोदी आणि भाजपा चे ३०५ खासदार निवडून आले म्हणजेच करोडो लोक मोदी आणि भाजपा च्या बाजूने आहेत. आत्ताच झालेल्या बिहार च्या निवडणुकीमध्ये ही भाजपा ने काटावर का होईना बहुमत मिळवले. हे सर्व लोक मूर्ख, त्यांच्या मताला काहीच किंमत नाही आणि विमानामध्ये कोणीतरी मोदि मोदी ओरडून गोंधळ घातला तर तो मात्र मोदींचा दोष?

In reply to by रात्रीचे चांदणे

तर लक्षात येईल कोणत्या ही अडाणी माणसाच्या. की bjp ला अर्ध्या पेक्षा जास्त राज्यांनी नाकारले आहे. फक्त जास्त लोकसंख्या असलेल्या पण देशातील सर्वात मागास राज्यांनी राम मंदिर,हिंदू वादी असल्या किरकोळ भावनिक प्रश्नावर ह्यांना त्याच राज्यात जास्त मत दिली म्हणून बहुमत आहे. पण अर्ध्या राज्यांनी (जी प्रगत ,शिक्षित राज्य आहेत) bjp ला नाकारले आहे.

In reply to by Rajesh188

अजून थोडं डोकं असेल तर राज्यांनी नाकारण्याचा नियम सगळ्याच पक्षांना लावायचा असतो हेही कळेल आणि मग कळेल कुणाला किती राज्यांनी जवळ केलंय आणि किती राज्यांनी हाकललं आहे. पण ते असोच.

In reply to by नगरीनिरंजन

अहो साहेब, तो नुसतं मोदी झिंदाबाद असं म्हणून भाजप चा कुठला मुद्दा बोंबलत असता तर गोष्ट निराळी होती. तो मोदी मेरा भाई, जीझस जीझस असं काहीसं ओरडत होता. अजूनही 10 गोष्टी तो बोंबलत होता. सामान्य माणसाच्या डोक्यात हे शिरूनही त्याचा मोदी आणि त्यांच्या समर्थकांचा बादरायण संबंध जोडणे याला फक्त आणि फक्त मोदीद्वेषज्वर कारणीभूत आहे असे मला वाटते.

In reply to by बिटाकाका

सामान्य माणसाच्या डोक्यात हे शिरूनही त्याचा मोदी आणि त्यांच्या समर्थकांचा बादरायण संबंध जोडणे याला फक्त आणि फक्त मोदीद्वेषज्वर कारणीभूत आहे असे मला वाटते. + १

मनसुख हिरेन ह्यांच्या हत्येचा हळुहळु उलगडा होत चाललाय. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच राहते तसे शिवसेना नेत्यांना कोणतीही सत्तेची पदे दिली तर मुळचा खंडणी मागण्याचा स्वभाव जात नाही. सचिन वाझे हे मनसुख हिरेन ह्यांना काही महिन्यांपासुन ओळखत होते. हिरेन ह्यांच्या पत्नीने म्हंटल्यानुसार, वाझे हे हिरेन ह्यांना "स्व्तःतेथे ला अटक करुन घे.. ३/४ दिवसात तुला जामीनावर बाहेर काढतो" असे सांगत होते. हिरेन ह्यांची गाडी वाझे गेले ३/४ महिने चालवत होते. हिरेन ह्यांचे शेवटचे लोकेशन त्यांच्या घरापासुन ४० कि.मी.दूर होते. म्हणजे त्यांना गाडीतून तेथे नेण्यात आले व मारून मृतदेह खाडीत फेकण्यात आला. धनंजय गावडे हा सेना नेता व सचिन वाझे ह्या दोघानी मिळून मनसुख हिरेन ह्यांना मारल्याचे स्पष्ट होताना दिसतय.. हा धनंजय गावडे कोण?वसई-विरार भागतला सेनेचा खंडणीखोर माणूस. बलात्काराचा व खंडणी उकळण्याचा आरोप असलेला. https://www.timesnownews.com/india/article/shiv-sena-corporator-dhananj… आमच्या दिल्लितल्या सोनियाबाई "कशाला केली ही महाआघाडी' म्हणत कपाळाला हात लावत असतील.

फडणवीस परत तोंडावर पडून दात पाडून घेणार आहे.जसे सुशांत,अर्णव ह्यांच्या केस मध्ये ह्यांची पूर्ण इज्जत गेली अजुन सीबीआय काहीच सिद्ध करू शकली नाही. आता ह्या mansukh प्रकरणात अती शहनापणा bjp ला चांगलाच महागात पडणार पुढे. सिर्फ देखते रहो

In reply to by Rajesh188

संभाजी मालिकेत जसे दाखवले होते अण्णाजी पंत हा कारस्थान करून राजे कसे अडचणीत येतील ह्या साठी नेहमी प्रयत्न करत असतो. तशी same वृत्ती फडणवीस ह्यांची अनेक प्रकरणात दिसून येत आहे.राज्याच्या हितासाठी प्रयत्न करायचे सोडून फक्त सेना कशी अडचणीत येईल ह्या मध्येच फडणवीस ह्यांची सर्व बुध्दी लागलेली असते. लोक आता कंटाळली आहेत ह्यांच्या असल्या राजकारणाला. महाराष्ट्रात असले प्रकार ह्या अगोदर कधीच झाले नाहीत. जे राज्याच्या हिताचे तेच राजकारण इथे चालायचे.

In reply to by Rajesh188

साधूंच्या हत्याकांडाचे आणि फडणवीस यांचा काही संबंध आहे का? सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, त्याचा आणि फडणवीस यांचा काही संबंध आहे का? हरामखोर हा शब्द उच्चारला त्याचा आणि फडणवीस यांचा काही संबंध आहे का? एका हिंदू माणसाला घरी बोलावून मारहाण केली, त्या घटनेचा आणि फडणवीस यांचा काही संबंध आहे का? करोनाचा वाढता प्रादुर्भाव पण, फडणवीस यांच्या मुळेच होत आहे का? बाकी चालू द्या....

आता लिंक लागते आहे. अंबानी च्या बंगल्याबाहेर स्फोटके वाझे आणि गावडे यांनीच ठेवली असणार. बहुधा खंडणी उकळण्यासाठी. दोघेही सध्या शिवसेनेत आहेत. दोघांवर हिरेन यांनीच दोन वर्षांपूर्वी 40 लाखाच्या खंडणीचा आरोप केला होता. चिवसेना मात्र अजूनही वाझेना अटक करायला परमिशन देत नाहीये.

In reply to by पिनाक

वाझेला वाचविण्याची पूर्ण तयारी दिसते. एकंदरीत या प्रकरणातूनही काही सत्य बाहेर येईल असे दिसत नाही.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी राजीनामा दिला आहे. २०१७ मध्ये भाजपने राज्यातील ७० पैकी ५७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात तब्बल ६१.७% मते घेऊन राज्यातील पाचही लोकसभा जागा पक्षाने जिंकल्या होत्या. पण त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरोधात पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी होती त्यामुळे अलीकडेच पक्षाने रमणसिंग आणि दुष्यंतकुमार गौतम या दोन नेत्यांना राज्यात पाठवून आमदारांची मते जाणून घेतली. त्यानंतर पक्षाने त्रिवेंद्रसिंग रावत यांना राजीनामा द्यायला सांगितले. उत्तराखंडमध्ये कोणत्याही पक्षाने दुसरी टर्म मिळवलेली नाही. तिथे २०२२ मध्ये विधानसभा निवडणुक आहे. सध्या काँग्रेसची पडझड होत असताना उत्तराखंडमध्ये विजय मिळून काँग्रेसला उर्जीतावस्था मिळायला हातभार लागू शकतो. तसे व्हायला नको आणि उत्तराखंड हे राज्य राखावे या उद्देशाने पक्षाने हा निर्णय घेतलेला दिसतो. आता पुढचा मुख्यमंत्री कोण होतो हे बघायचे.

दिल्ली आणि जवळच्या भागातील तथाकथित शेतकरी आंदोलनावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा करण्यात आली आहे. बर्‍याचदा ब्रिटनमधले खासदार आपल्या मतदारसंघात मतदारांमध्ये कोणाची संख्या बर्‍यापैकी आहे त्याप्रमाणे अशी भूमिका घेत असतात. तरीही काहीही झाले तरी असले खासदार चुकूनमाकून भारतात येत असतील तर त्यांना सुरवातीला यायला विरोध न करता विमानतळावरून हाकलून द्यावे. जर श्रीलंकेचे सरकार मानवाधिकाराचे डोस पाजायला येणार्‍या स्वीडनच्या परराष्ट्रमंत्र्याला असे विमानतळावरून हाकलून देऊ शकत असेल तर आपण त्या खासदारांबरोबर कडक वर्तन ठेवायला काहीच हरकत नसावी. तसेच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार्‍या भारतातील स्वयंसेवी संस्थांवर कारवाई करण्यात यावी असे वाटते. हे गोरे लोक अजूनही आपल्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही अशा मानसिकतेत असतीलही पण तशी परिस्थिती नाही. त्यांना नाक घासत शरण यायला लावायला हवे.

सरकार नी तुम्ही म्हणता तसे वागून दाखवावे अभिमान वाटेल त्यांचा. बघुया जमते आहे का हे काम आताच्या सरकार ला. भारताच्या अनेक गुन्हेगारांना सुद्धा ब्रिटन नी आश्रय दिला आहे. मल्ल्या ,निरव मोदी हे भारताचे मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार ब्रिटन मध्ये आरामात राहत आहेत आणि भारत सरकार काहीच करू शकले नाही. काय मजबुरी आहे त्यांची हे समजत नाही.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/west-bengal-chief-minister-ma… आधी कुणी, "जय श्रीराम" म्हटले की चिडत होती...भाजप मुळे एक चांगले झाले की, नेत्यांना आता, ते हिंदू आहेत, हे सांगावे लागत आहे....

श्री मोदी जी ना अमेरिकेने विसा देण्यास साफ नकार दिला होता किती तरी वेळा. त्या अपमान चा बदला पण सरकार नी घेतला पाहिजे. अमेरिकेच्या कोणत्याच मंत्र्याला किंवा अध्यक्षांना भारताने प्रवेश नाकारा ला पाहिजे. स्वाभिमान काय असतो की नाही.हे अवघड वाटत असेल तर एकाध्य लहान अमेरिकन सरकारी अधिकाऱ्याला तरी प्रवेश नाकारून बदला घ्यावा. तेवढेच समाधान भारत वासियांना मिळेल.

In reply to by मुक्त विहारि

तर जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांना कपडे काढून एअरपोर्ट वर अमेरिकेत चेक केले होते. मोदी ना अनेक वेळा अपमानित करून विसा नाकारला होता. अगदी praful patel, अब्दुल कलाम,मीरा शंकर आणि किती तरी लोकांना अमेरिकेत अपमान स्पद वागणूक दिली. तरी ते आमचा सन्मान च करतात असे वाटत असेल तर निर्लज्ज पणाच कळस झाला. काँग्रेस तर नालायक आहेच. पण आताचे bjp सरकार देश प्रेमी,आहे. समर्थ आहे. त्यांनी अमेरिकन संरक्षण मंत्री असलेल्या व्यक्तीला फक्त भारतात एअरपोर्ट चोकशी साठी दोन च प्रश्न विचारून दाखवावेत. तरच हे स्वाभिमानी ,देश प्रेमी,समर्थ सरकार आहे ह्याचा पुरावा मिळेल. की समर्थ लोकांपुढे लोटांगण आणि आणि गरीब वर दादागिरी हेच सूत्र आहे.

In reply to by Rajesh188

त्यांनी अमेरिकन संरक्षण मंत्री असलेल्या व्यक्तीला फक्त भारतात एअरपोर्ट चोकशी साठी दोन च प्रश्न विचारून दाखवावेत.
हे एकदा आपण करावेच

In reply to by Rajesh188

श्री मोदी जी ना अमेरिकेने विसा देण्यास साफ नकार दिला होता किती तरी वेळा.
याला मोदी किंवा अमेरिका नव्हे तर त्यावेळेचे खांग्रेस सरकार जबाबदार होते..!! स्मरणशक्ती वाढवा..

In reply to by श्रीगुरुजी

एक बाळबोध शंका. स्वतःचेच कपडे काढणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? माई चाहे ये करू माई चाहे वो करू मेरी मरझी.