विस्मरणात गेलेला कारागीर - लोहार
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मीत्रानों एकदा राजस्थान मधे ट्रेनिंग मधे असताना सीमावर्ती भागात गाडी घेऊन दुसर्या डिटँचमेन्टला भेट द्यायला चाललो होतो. गाडी मीच चालवत असताना अचानक जोरात खडखडाट झाला व गाडीचा दरवाजा दुर फेकला गेला. तसाच दरवाजा गाडीत टाकला आणी पुढे निघालो. थोड्याच अंतरावर एक छोटीशी वस्ती दिसली, म्हटलं बघाव काही मदत मीळतीय का?
दोन तीन बैलगाड्या, मोकळे आजुबाजुला नसलेले गवत चरत आसलेले बैल, चार सहा वेगवेगळ्या वयाची पोर. रस्त्याचे कडेला काही पुरूष लोखंडी शेतीची आवजार बनवत होते तर बायका तात्पुरती बनवलेल्या चुलीवर जेवण बनवत होत्या. दुर दूर वाळूच्या टेकड्या आणी नागमोडी वळणे घेत दिसेनासा काळा कुळकूळीत पसरलेला रस्ता.
गाडी थांबवली तर एक राकट, बलदंड पुरूष गाडीजवळ आला म्हणाला "खम्मा घणीं सा हुकूम ( जसं आपल राम राम) .आम्ही पण "घणीं खम्मा ",म्हणत खाली उतरलो. जवळच पडलेले मोढे (छोटे स्टूल) त्याने सरकवले आणी राजस्थानी मधे विचारले ,"काईं सेवा करू सा?"दरवाजा दाखवून विचारले जरा तात्पुरती जोडायची व्यवस्था करतो का?
तो आपला कामाला लागला. जवळच मोठ्या गालमीशा, मळकट धोतर आणी बाराबंदी, पगडी घालून बिडी ओढत म्हातारा बसला होता. विचारले पाणी मिळेल काय, त्यानं विचारले , "थारी जात कौन, म्हारी गडीया लोहार". मी तुटक्या फुटक्या राजस्थानी भाषेत म्हणालो,"बाब्बा म्हारी जात फौजी, जात वात मान्ये कोनी, तू पानी पिला,म्हने सब चोख्खा लागे". बाबा खुश झाला आणि गप्पा सुरू झाल्या.
दोस्तानों गडीया लोहार, ही भटकी जमात, यांचा संसार गाडीवर म्हणून गडीया लोहार. हे मुळचे मेवाड, महाराणा प्रताप यांच्या सैन्यातील. तलवारी, भाले आणी इतर शस्त्र अस्त्र बनवणारे ,घिसाडी म्हणजे तलवार, भाले घासून धार लावणारे.मेवाडशी यांचे इमान. परमं प्रतापी महाराणानां मोगलांच्या कडून पराभव पत्करावा लागल्यानंतर या गडीया लोहार जातीने शपथ घेतली, मेवाड, चित्तोड मोगलांन कडून हिसकावून घेऊ मगच तीथे घर बांधू. आजही हे लोक भटकत आहेत. प्रत्येक जातीचा, धर्माचा, प्रांताचा एखादा आसा मानबिंदू, गौरवास्पद इतीहास आसतो.
महाराष्ट्रात यांना घिसाडी म्हणतात.
लोहार समाजात लोहार, गाडी लोहार, पांचाळ, नालबंदी, घिसाडी ह्या पोटजाती आहेत. कोकणात मानवाचार्य लोहार, विदर्भात मनुपांचाळ, मराठवाड्यात मनुलोहार आशा पोट जाती, शाखा आहेत .
तर हा लोहार शेतकर्यांचा मीत्र. पावसाळा सुरू व्हायच्या आधी,विळे, टिकाव, कोयते ,खुरपी,फावडी,कुल्हाडी,
प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल,बैलगाडीच्या चाकाना लोखंडी धाव,पाण्याच्या मोटी, नांगराचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी या पारंपरिक औजारांची दुरूस्तीची लगबग सुरु व्हायची. बांधकामाची घमेली थापी, घरगुती कढया , चिमटे झारे वगैरे वापराच्या लोखंडी वस्तू ह्या पण पुर्वी लोहार बनवायचा.
आपल्या गावात मशिदी समोरच एक लोहाराचं "पाल" ,तात्पुरतं घर होतं. पुढे ताडपत्रीच पाल. मोठा भाता,पुढं भट्टी, रसरशीत निखारे आणि भट्टीला हवा देण्यासाठी भात्याला जोडलेली बांबू आणि साखळी.भट्टीच्या बाजुला ऐरण,मोठे लांब चिमटे, हातोडा ,घण,कानस आणि छिन्नी या सारखी अवजारं . भट्टीच्या तडतड उडणाऱ्या ठिणग्या, या सगळ्या पसार्यात घामाघूम झालेला लोहार जणू काळ्या कातळातली हालती डुलती मुर्ती. गरम केलेला लोखंडाचा तुकडा आणी त्याच्यावर एका पाठोपाठ एक घणाघाती यंत्रवत ठोके मारणारी, घामात निथळणारी लोहारीण, हे दृष्य दिनानाथ दलाल, नंदलाल बोस किवा राजा रवी वर्मा यांच्या पेंटींग सारखीच सशक्त जिवंत कलाकृती.
म्हणतात ना" सौ सुनकर की एक लोहार की ".
लोहार जसा शेतकर्यांचा मित्र तसाच आम्हा मुलांना पण तेवढाच जवळचा. मे महिन्याच्या सुट्टीत बाकी खेळात बरोबर भोवरा ( Top) हा एक प्रिय खेळ . लाकडाचा भोवरा आणी " जाळी" , खाडंग्यांच्या दुकानात घ्यायचा. लोहारा कडे जाऊन "खप्पड आरी ", बसवुन घ्यायची. या खेळाची एक विशेष शब्दावली, खप्पड आरी, जाळी, वरचा हात ,धप्पल. आरी मधे दोन प्रकार एक टोकदार आणी दुसरी खप्पड .सविस्तरपणे पुन्हा कधीतरी.
सध्या प्लास्टीकमध्ये हे उपलब्ध आहेत.तसेच ते 'फायबर' चे देखील असतात. भोवरा मैदानी, मर्दाना खेळ त्याची मजा आजच्या पिढीला काय कळणार.
आता नव्या पिढीतील लोक शहरात स्थलांतरित झाले. शहरातील ही पिढी फँब्रिकेशन, हार्डवेअर, फर्निचर, गँरेज व्यवसाय करतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हे पण आपली प्रगती करताना दिसतात .
।।कालाय तस्मै नमः।।
लेख स्वानुभव, आठवणी व वाचलेल्या माहिती वर आधारित आहे. सर्व सकंलक या लेखाचे सहभागी आहेत.
प्रतिक्रिया
जबरदस्त लेख ... आवडला
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
दिग्दर्शक संजयलीलाभंसाळी -
लेख आवडला - राजस्थान आणि गाव
छान लेख! आवडला
लेख आवडाला!
जुजबी लोहार काम, स्वतः केले असल्याने
या मालिकेतले दोन्ही लेख आवडले.
छान लेख
सर्वांचे मनापासून धन्यवाद
लेख तर आवडलाच पण सुरुवात
छान लेख
हा आमचा इतिहास. आमचे भाट आणि
मस्तच
जानुजी कांई हाल थारो
हडौतीवर मराठीचा प्रभाव आहे
असहमत
भोवरे बनवायची कला आम्ही आत्मसात केली होते
धन्यवाद
शॅार्ट बट स्वीट!
मस्त !
लेख आवडला