हितोपदेश

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
4 Mar 2021 - 10:47 pm

लिस्टिलेली थोतांडे । पचवुनी छद्मशास्त्रांचे घोडे
पहा दौडती चोहीकडे । सोमिवरी बिंधास

नवशास्त्रांचे अवडंबर । माजवू नका इत:पर
सर्वज्ञ अमुचे पूर्वज थोर । विसरू नका पळभरी

जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने
ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज

सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका
सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच

छद्मशास्त्रांच्या रेट्यात । शास्त्रकाट्याची काय मात
मूग गिळोनी तस्मात । बसोनी ऐसावे

----------------------------

जड घेतल्यास लय भारी ;-)

मौजमजाविचारप्रतिसादसल्ला

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2021 - 11:06 pm | श्रीरंग_जोशी

हितोपदेश पटला. जड घेतोय :-).

मुक्त विहारि's picture

4 Mar 2021 - 11:09 pm | मुक्त विहारि

आवडले

Rajesh188's picture

4 Mar 2021 - 11:21 pm | Rajesh188

कशाचा कशा शी संबंध नाही

सॅगी's picture

5 Mar 2021 - 10:11 am | सॅगी

खाली ठेवा मग... :)

साहना's picture

5 Mar 2021 - 2:22 am | साहना

आवडले !

एक जुनी पर्शियन कथा आहे. एका राजाच्या सैनिकांना दररोज ठराविक शिधा मिळत असे. एक दिवस मोहिमेवर असताना दोन सैनिकांचे भांडण झाले. एका सैनिकाच्या मते दुसर्याने गुपचूप त्याचा शिधा खाल्ला होता. प्रकरण राजाकडे गेले. राजाने आरोप करणाऱ्या सैनिकाला एक सोपा पर्याय दिला. "मी तुझा आरोप मान्य करून ह्या सैनिकाला ठार मारतो आणि त्याच्या पोटांत दुप्पट शिधा आहे कि नाही हे पाहतो. पण समजा तुझा आरोप खोटा होता तर मात्र तुला मनुष्यवधा साठी जबादार धरून तुला सुद्धा त्याच प्रकारे ठार मारेन". मग सैनिकाने घाबरून आरोप मागे घेतला. (तात्पर्य : आपल्या वक्तवयावर आपले भवितव्य अवलंबून नसते तेंव्हा माणूस तारतम्य सोडून वक्तव्ये करतो. जर सैनिकाने पहिल्या सैनिकाला खरोखर शिधा खाताना पाहिले असते तर त्याने राजाचे मागणे मान्य केले असते.)

थोतांड आहे कि नाही हे शोधण्याची माझी पद्धत फार सोपी आहे. हि अर्वाचीन अध्यात्मिक ज्ञान पासून अत्याधुनिक संशोधनाला सर्वत्र लागू पडते.

१. जो माणूस छातीठोक पाणे काही तरी सांगतो आहे त्याचे पोटपाणी तो सल्ला बरोबर असावा ह्यावर अवलंबून आहे का ?

आपला लोकल कार मेकॅनिक ह्या दृष्टिकोनातून नीती आयोगाच्या CEO पेक्षा कधीही श्रेष्ठ. कारण काय, नीती आयोग काहीही बरळत राहिला तरी त्यांची सरकारी खातिरदारी कमी होत नाही. उलट कार मॅकेनिक ने आपली गाडी मोडली तर तो मार खाईल.

२. सल्ला अमुकच असावा ह्यावर माणसाचे पोटपाणी अवलंबून आहे का ?

"तुम्हाला काहीही रोग नाही" हा डॉक्टरांचा सल्ला अनेक वेळा विश्वास ठेवण्यालायक असतो कारण ह्या सल्ल्याने डॉक्टर उलट आपला धंदा घालवून बसतोच तर ह्या सल्ल्यावर आपले रेप्युटेशन स्टेक करत आहे.

"तुम्हाला आणखीन टेस्ट्स करून घ्य्याची गरज आहे" हा सल्ला थोडा संशयास्पद आहे त्यामुळे अश्या सल्लावर दुसरे सल्ले सुद्धा घ्यावेत.

ज्या व्यक्ती समुद्राची पातळी वाढणार म्हणून आरडा ओरडा करतात पण स्वतः सी फ्रंट बंगाल्यांत राहतात त्यांच्या बोलण्याकडे ध्यान देऊ नये.

- लस

लस कुचकामी ठरली तर किमान विदेशांत लस निर्माण करणारी कंपनी बुडीत जाऊ शकते त्यामुळे त्यांच्या मार्केटिंग वर माझा जास्त विश्वास आहे

उलट सरकारी बाबू लोकांवर अजिबात विश्वास नाही. ह्यांनी तुमाला औषध म्हणून विष पाजले तरी ह्यांची नोकरी जात नाही त्यामुळे ह्यांच्यावर काहीही विश्वास मी ठेवत नाही.

- समुद्राची पातळी

आमचे एक मित्र मुंबईतील एका संस्थेत संशोधक म्हणून आहेत. त्यांना मुंबईन नगरपालिकेचा एक छोटा प्रोजेक्त मिळाला. येत्या २० वर्षांत मुबंईला तापमान बदलाने काही धोके आहेत ह्याचा अभ्यास. एकूण १५ लाख रूपये ग्रांट.

मग ह्याने मागे पुढे विचार न करता. येत्या २० वर्षांत मुबईला प्रचंड धोका आहे असा रिपोर्ट निर्माण केला. कारण काय ? तर काहीच धोका नाही असा रिपोर्ट दिला तर नगरपालिका धन्यवाद म्हणून ग्रांट बंद करेल. पण धोका आहे आणि मोठा धोका आहे असे सांगितले तर जास्त ग्रांट मागता येईल. सध्या ह्यांचा मोठा प्रोजेक्त चालू आहे.

शेवटी काय तर प्रत्येक व्यक्ती आपला फायदा बघते. हा फायदा एकदा आपण अभ्यासाला तर कुठले क्लेम जास्त परिणामकारक आहे ह्यावर आपण जुगार खेळू शकतो.

गणेशा's picture

5 Mar 2021 - 8:10 am | गणेशा

जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने
ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज

सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका
सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच

चूक :-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Mar 2021 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार

शिघ्र क्विता लैच आवडली हेवेसांनलगे

पैजारबुवा,

मराठी_माणूस's picture

5 Mar 2021 - 10:15 am | मराठी_माणूस

जनातलं, मनातलं ?

टर्मीनेटर's picture

5 Mar 2021 - 10:39 am | टर्मीनेटर

मार्मिक लिहिले आहे 🙏

शब्द शब्द अवजड| समजण्या जरी अवघड || मज पामराला|||
तरी कळता मतितार्थ|घेतला असे मी 'जड'|| हितोपदेश हा|||
😀

अनन्त अवधुत's picture

5 Mar 2021 - 10:53 am | अनन्त अवधुत

हितोपदेश जोरदार आहे.

अनन्त्_यात्री's picture

6 Mar 2021 - 12:40 pm | अनन्त्_यात्री

घेणार्‍या सर्वांना धन्यवाद.