✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

थोतांड..थोतांड..थोतांड..

ग
गवि यांनी
गुरुवार, 03/04/2021 - 12:25  ·  लेख
लेख
थोतांड थोतांड थोतांड.. जे जे पहावे ते थोतांड.. नाझींचे थैमान? थोतांड न्यूटन महान? थोतांड धरतीची गोलाई? थोतांड नभाची निळाई? थोतांड चंद्रावर स्वारी? थोतांड मंगळाची वारी? थोतांड कार्बन उत्सर्ग? थोतांड कोरोना संसर्ग? थोतांड बोसांचे मरण? थोतांड नर्मदा धरण? थोतांड ग्लोबल वार्मिंग? थोतांड त्सुनामी वार्निंग? थोतांड वृक्षांची निकड? थोतांड इव्हीएम निवड? थोतांड विमान नाहीसे? थोतांड आरोप बाईचे? थोतांड नऊ अकरा? थोतांड पृथ्वीच्या चकरा? थोतांड लसीला होकार? थोतांड चिन्यांची माघार? थोतांड हे विश्वचि सारे थोतांड प्रस्थापितांचे कुभांड पर्दाफाशार्थ ऊठ नवपार्था खोदुनि शोधुनि सुप्तलुप्त प्रबंध जगापुढे मांड..जगापुढे मांड..!! .... हलके घेतल्यास आजन्म आभारी..!! ;-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
26544 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

शब्दां पलीकडची भावना एकदम

गणेशा
गुरुवार, 03/04/2021 - 12:30 नवीन
शब्दां पलीकडची भावना एकदम समजतेय.. प्रस्थापितांचे कुभांड पर्दाफाशार्थ ऊठ नवपार्था खोदुनि शोधुनि सुप्तलुप्त प्रबंध जगापुढे मांड..जगापुढे मांड..!! __^__
  • Log in or register to post comments

वा, मस्त !

हेमंतकुमार
गुरुवार, 03/04/2021 - 12:33 नवीन
  • Log in or register to post comments

वा, मस्त !

हेमंतकुमार
गुरुवार, 03/04/2021 - 12:33 नवीन
एकदम पटले
  • Log in or register to post comments

वा, मस्त !

हेमंतकुमार
गुरुवार, 03/04/2021 - 12:33 नवीन
एकदम पटले
  • Log in or register to post comments

आवडली.. मस्त आहे.

आनन्दा
गुरुवार, 03/04/2021 - 12:49 नवीन
आवडली.. मस्त आहे.
  • Log in or register to post comments

व्वा, भारी + १

चौथा कोनाडा
गुरुवार, 03/04/2021 - 12:57 नवीन
व्वा, भारी + १ माझे अस्तित्व ? थोतांड माझा मिपायडी ? थोतांड माझा कोनाडा ? थोतांड लाइक्स, कमेंटस ? थोतांड
  • Log in or register to post comments

भारी

प्रचेतस
गुरुवार, 03/04/2021 - 13:30 नवीन
लै दिवसांनी गविशेठ लिहिते झालेत, मस्त. सातत्य ठेवा भो आता :)
  • Log in or register to post comments

ये लिहिना भी कोई लिहिना है

गवि
गुरुवार, 03/04/2021 - 13:40 नवीन
ये लिहिना भी कोई लिहिना है प्रचु? हेही आपलं थोतांडच.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
गुरुवार, 03/04/2021 - 14:02 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नुस्तं प्रचु???

टवाळ कार्टा
गुरुवार, 03/04/2021 - 16:29 नवीन
नुस्तं प्रचु???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

असेच म्हणतो....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/04/2021 - 15:27 नवीन
>>>>लै दिवसांनी गविशेठ लिहिते झालेत, मस्त. सातत्य ठेवा भो आता :) असेच म्हणतो. लिहिते राहा गविसेठ. _/\_ -दिलीप बिरुटे (गविसेठच्या लेखन फॅन) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(गविसेठच्या लेखन फॅन) :)

प्रचेतस
गुरुवार, 03/04/2021 - 15:33 नवीन
(गविसेठच्या लेखन फॅन) :)
गविशेठच्या समोर किंवा डोक्यावर फॅनसारखे गरागरा फिरणारे सर डोळ्यांसमोर आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 03/04/2021 - 13:36 नवीन
थोतांड आवडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

lol... भारीच एकदम!

टर्मीनेटर
गुरुवार, 03/04/2021 - 13:44 नवीन
lol... भारीच एकदम! 😂
  • Log in or register to post comments

मस्त.. झकास... चााबुक!!

खेडूत
गुरुवार, 03/04/2021 - 13:45 नवीन
मस्त.. झकास... चााबुक!!
  • Log in or register to post comments

भारी आहे

मुक्त विहारि
गुरुवार, 03/04/2021 - 13:48 नवीन
भारी आहे
  • Log in or register to post comments

प्रतिसाद पाडु धागा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/04/2021 - 15:23 नवीन
काय हे धागे ? थोतांड मिसळपाव ? थोतांड अच्छे दिन ? थोतांड वाढवलेली दाढी ? थोतांड आम्ही करून दाखवलं ? थोतांड अध्यक्ष महोदय ? थोतांड हमारो बोंगाल ? थोतांड दोन लशीचे डोस ? थोतांड थाळी-दिवाबत्ती ? थोतांड ......... ......... ......... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अरे देवा.. का आले हे? आय मीन

गवि
गुरुवार, 03/04/2021 - 15:27 नवीन
अरे देवा.. का आले हे? आय मीन.. आले का हे?! या. बसा. सरकून घेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/04/2021 - 15:30 नवीन
>>>>> अरे देवा.. का आले हे? =)) =)) =)) मेलो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ते पुन्हा येतील... ते पुन्हा

प्रचेतस
गुरुवार, 03/04/2021 - 15:35 नवीन
ते पुन्हा येतील... ते पुन्हा येतील...ते पुन्हा येतील.... -प्रचेतस खडसवणीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे काय? उजवीकडे सरका..त्यांना

खेडूत
गुरुवार, 03/04/2021 - 15:34 नवीन
हे काय? उजवीकडे सरका..त्यांना डावीकडे आवडते! (ह. घ्या प्रा डॉ सर...नाहीतर ती थाळी फेकून मार्ताल...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ठ्ठो..!!

गवि
गुरुवार, 03/04/2021 - 15:39 नवीन
ठ्ठो..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/06/2021 - 14:35 नवीन
उजवीकडे सरका..त्यांना डावीकडे आवडते!
हा हा . चांगला होता आवडला. पण तसं कै नै ये, या सर्व आभासी कल्पना. बाकी... डावे-उजवे ? थोतांड कमळ-मोगरा ? थोतांड मित्र-मैत्रीण ? थोतांड भाइयो-बहनो ? थोतांड ...... ...... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

खिक्क

अथांग आकाश
गुरुवार, 03/04/2021 - 15:47 नवीन
खिक्क Image removed.
  • Log in or register to post comments

ख्या ख्या ख्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 03/04/2021 - 16:29 नवीन
ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments

थोतांडवादी

तुषार काळभोर
गुरुवार, 03/04/2021 - 17:13 नवीन
थोतांडवादी कवि गविंची थोतांडवादी कविता. ;) शेकडो हजारो लाखो करोडो थोतांड समर्थक असताना मी एकटा तेवढा सत्य जाणणारा... - (नाव बदलून घेतलेला) पै तुषार काळभोर
  • Log in or register to post comments

हिहीही

शा वि कु
गुरुवार, 03/04/2021 - 18:19 नवीन
तुम्ही थोतांड आहात, ही सगळी दुनिया थोतांड आहे ! (I’m out of order? You’re out of order! This whole courtroom’s out of order!” च्या चालीत.) - (कन्सपायरसी थियरिस्ट) शाविकु
  • Log in or register to post comments

प्रस्थापितांचे कुभांड

शा वि कु
गुरुवार, 03/04/2021 - 18:33 नवीन
प्रस्थापितांचे कुभांड पर्दाफाशार्थ ऊठ नवपार्था
ह्या ! तुम्हाला काय माहीत ! इथे प्रस्थापितांना हाकलून बोल्शेविक लोकं देशच्या देश बळकावत आहेत, आणि तुम्ही प्रस्थापितांच्या कुभांडाबद्दल बोलताय ! - (प्रस्थापित कुभांडवादी) शाविकु
  • Log in or register to post comments

कविता आवडली

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 03/04/2021 - 19:27 नवीन
बरीच वाढवता आली असती, पोटेन्शियल आहे पूजाची उडी, थोतांड राठोड्ची पुडी थोतांड सुशांतसिंग राजपुत थोतांड, बिहारचे श्रीयुत थोतांड जळगाव विवस्त्र थोतांड भाजपाचे अस्त्र थोतांड कोणीच नाही उठत पेटुन राजद्रोहाला घाबरुन :(
  • Log in or register to post comments

भर घालत राहु...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/04/2021 - 20:14 नवीन
>>>> बरीच वाढवता आली असती, पोटेन्शियल आहे धागा लाइफटाइम तेवत राहणार आहे . सगळे रेकॉर्ड ब्रेक होतील. खरं तर हा शिमगाच आहे व्यवस्थेवरचा. देशप्रेमाचं अफू ? थोतांड घराणेशाहीची गोळी ? थोतांड साठ वर्षाचं (दुस-याचं) ते कार्ट ? थोतांड पंधरा वर्षाचं (आपला) बाब्या? थोतांड वाढती महागाई ? थोतांड मस्तानी लस्सी ? थोतांड विकासाची गोळी ? थोतांड ............ ........... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

एक गोष्ट मात्र खरीये ....

गामा पैलवान
गुरुवार, 03/04/2021 - 21:08 नवीन
गवि, सर्वत्र थोतांड माजलंय हे तुमचं निरीक्षण अचूक आहे. कलियुगाचा प्रभाव, दुसरं काय. मात्र एक गोष्ट अगदी शंभर टक्के सत्य आहे. ती म्हणजे जगभर पसरलेलं ब्रिटीश साम्राज्य. ते १९४५ साली दुसरं महायुद्ध संपतांना मोडीत निघालेलं असं मानतात. पण आज ७५ वर्षांनी करोनाच्या नावाखाली 'त्यांना' सगळं जग वेठीला धरणं शक्य झालंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

'त्यांना'

चौकस२१२
Fri, 03/05/2021 - 03:26 नवीन
पण आज ७५ वर्षांनी करोनाच्या नावाखाली 'त्यांना' सगळं जग वेठीला धरणं शक्य झालंय.??? त्यांना म्हणजे नाकी कोणाला? ब्रिटिशांना? म्हणजे करोना हा काय ब्रिटिशांनी वापरून जंगल वेथस धरलाय असं म्हणताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

'त्यांना'

चौकस२१२
Fri, 03/05/2021 - 04:03 नवीन
पण आज ७५ वर्षांनी करोनाच्या नावाखाली 'त्यांना' सगळं जग वेठीला धरणं शक्य झालंय.??? "त्यांना" म्हणजे नक्की कोणाला? ब्रिटिशांना? म्हणजे करोना हा काय ब्रिटिशांनी वापरून जगाला वेठीस धरलाय असं म्हणताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

सगळे थोतांड थोतांड

कर्नलतपस्वी
गुरुवार, 03/04/2021 - 21:26 नवीन
  • Log in or register to post comments

थोतांड

Rajesh188
गुरुवार, 03/04/2021 - 21:31 नवीन
हिंदू धोक्यात थोतांड स्वदेशी वापर थोतांड अतिरेकी हल्ले थोतांड चीन च्या मालावर बहिष्कार थोतांड.
  • Log in or register to post comments

अजुन भर घालतो

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 03/05/2021 - 11:03 नवीन
कंगनाची माडी थोतांड बी एम सीच्या धाडी थोतांड दिशाचे टूलकिट थोतांड बाल्टिस्तान गिलगिट थोतांड राकेश टिकैत थोतांड दलालांची विकेट थोतांड मारणेची मिरवणुक थोतांड पोलिसांची दमणुक थोतांड
  • Log in or register to post comments

मी पण...मी पण भर घालतो

सॅगी
Fri, 03/05/2021 - 12:11 नवीन
बेकायदा बांधकामे थोतांड रस्त्यावरचे खड्डे थोतांड वाढीव विजबिले थोतांड एकरी मदत थोतांड कायद्याचे राज्य थोतांड स्वाभाविक प्रतिक्रिया थोतांड साधुंच्या हत्या थोतांड बंगल्यावर मारहाण थोतांड पावसात भिजणे थोतांड शेतकर्‍यांचे भले थोतांड पोहरादेवीची गर्दी थोतांड
  • Log in or register to post comments

थोतांडवर थोतांडाचा धागा काढला

मदनबाण
Fri, 03/05/2021 - 16:49 नवीन
थोतांडवर थोतांडाचा धागा काढला जावा हेच थोतांड आहे ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatar
  • Log in or register to post comments

गझल, चारोळी सारखंच थोतांड हा

चौथा कोनाडा
Fri, 03/05/2021 - 17:47 नवीन
गझल, चारोळी सारखंच थोतांड हा नविन काव्यप्रकार गविंंमुळे अस्तित्वात आला हे मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल !
  • Log in or register to post comments

थोतांडवादी

आनन्दा
Fri, 03/05/2021 - 18:08 नवीन
अरे थोतांड थोतांड कसे रचले कुभांड धागा वाचता वाचता पसरले की भोकांड सारे भोकांड पंडित झाले की हो एकत्रित आणि लागले उकरू काहीतरी विपरीत करोनाच्या काळजीने जीव झाला माझा अर्धा ढवळ्या पवळ्याच्या जोडीने सुरू उलटीची स्पर्धा आले पंडित प्रकांड कधी उकरोनी कांड कुणी म्हणे नोटकांड कोणी म्हणे नॉटिकांड परी कसे विसरले बोलायला अटकांड भुलले वासनाकंड विझवले अग्निकांड जीव पुरता शिणला सारे थोतांड वाचून शुक्रवार आहे चला येऊ पेट्रोल टाकून
  • Log in or register to post comments

म्हाराज!!

तुषार काळभोर
Fri, 03/05/2021 - 19:09 नवीन
पाय पाठवून द्या! चरणदर्शन होऊद्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

पाय पाठवले तर ते पेट्रोल

गवि
Fri, 03/05/2021 - 19:59 नवीन
पाय पाठवले तर ते पेट्रोल टाकायला कसे जाणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

योग्य ते इंधन भरले की,

मुक्त विहारि
Fri, 03/05/2021 - 20:19 नवीन
आम्ही सुक्ष्मात जातो, तसे ते पाय पाठवू शकत असतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुम्ही तर मला सूक्ष्मातच

आनन्दा
Fri, 03/05/2021 - 21:50 नवीन
तुम्ही तर मला सूक्ष्मातच पाठवायला निघालात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सध्या बहुतेक जणांची पेट्रोल

आनन्दा
Fri, 03/05/2021 - 21:50 नवीन
सध्या बहुतेक जणांची पेट्रोल भरायची सोय घरातच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

घरात च

Rajesh188
Fri, 03/05/2021 - 21:54 नवीन
घरात च पेट्रोल च्या विहरि आहेत की पाइप नी पेट्रोल पुरवठा होत आहे.
  • Log in or register to post comments

तुम्ही पोगो बघा

रंगीला रतन
Fri, 03/05/2021 - 22:07 नवीन
तुम्ही पोगो बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

बरं

Rajesh188
Fri, 03/05/2021 - 22:39 नवीन
रतन खरोखर रंगीला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

थोतांडमध्ये फुल्ल स्कोप आहे ! :-)

चौथा कोनाडा
Fri, 03/26/2021 - 18:01 नवीन
मास्क वापरा ? थोतांड सॅनिटायझर लावा ? थोतांड गर्दी नका करु ? थोतांड सोशल अंतर ? थोतांड करोनाची चाचणी ? थोतांड कोरोना संसर्ग ? थोतांड करोनाची लस? थोतांड कोविड सेंटर ? थोतांड
  • Log in or register to post comments

वर तुम्ही उल्लेख केलेले

Rajesh188
Fri, 03/26/2021 - 18:33 नवीन
हात धुणे मास्क वापरणे.. अंतर ठेवणे. Sanitizer करणे. ह्या मध्ये हात धूने हा प्रकार लोक खूप वर्षा पासून पाळत आहेत.बाहेरून आले की हातपाय धुण्याची आपली पद्धत आहे. मास्क वापरणे हा प्रकार नवीन आहे पण पुणे शहरात अर्धी लोकसंख्या पूर्वी पासून तोंड पूर्ण झाकून घेते .त्या पुढे मास्क काहीच नाहीत. अंतर ठेवणे .पण किती अंतर ठेवणे ? पंधरा फूट तरी अंतर ठेवले पाहिजे संशोधक सांगतात त्या नुसार. हे शक्यच नाही. लोकांच्या रूम पण १५ फूट पेक्षा लहान असतात.आणि बाहेर बस,ट्रेन,फूट पथ.अशा ठिकाणी पाय ठेवायला जागा मिळाली तरी खूप झाले अशी अवस्था आहे. पूर्ण लॉक डाऊन गेल्या वर्षी काही महिने होते तरी covid बाधित लोकांची संख्या प्रचंड वाढत च होती. काही तरी नक्की चुकतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा