Skip to main content

सावळा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 30/03/2009 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याची तनु सावळी सावळीच सावली का न मी झाले सावळी ? राधा खंतावली सावळ्याच्या मुरलीसवे सुर ही सावळे 'काय माझे झाले असे हे' राधेला ना कळे गंधावली गवळण वेडी रास सावळा खेळी सावळ्याची प्रीत मनी अन सावळा जळी स्थळी पैलतीरी सावली सावळी राधिके साद घाली गेली वेडावुनी गोपिका बासरी धुंदावली प्रीत सावळी, भाव सावळा श्याम तो सावळा सुखाची चाहुल सावळी जग राधे सावळा विशाल.
लेखनविषय:

वाचने 1325
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

तुमच्या इतर कवितांसारखी वाचल्या वाचल्या.. "व्वा!!" असं म्हणावं अशी वाटलं नाही ही कविता. ठीक आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रीत सावळी, भाव सावळा श्याम तो सावळा सुखाची चाहुल सावळी जग राधे सावळा वरील ओळी खूप सूंदर....!