Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साहना on Sat, 02/06/2021 - 05:55
दिल्ली मधील मोक्याच्या जागी खालील समाधी स्थळें आहेत. राज घाट : ५ एकर (गांधी) शांतीवन : ५२ एकर (नेहरू) विजय घाट : ४० एकर (शास्त्री) शक्तिस्थळ : ४५ एकर ( इंदिरा) समता स्थळ : १२ एकर किसान घाट : १९ वीर भूमी: १५ एकता स्थळ : २२ एकूण जागा : २१० एकर. दिल्लीतील सर्वांत प्राईम प्रॉपर्टी म्हणजे सर्कल A चा दर आहे ७ लाख रुपये प्रति चौरस मीटर पण आपण इथे २ लक्ष रुपये किंमत जर धरली (माझे गणित रेट च्या बाबतीत चुकलेले असू शकते, मिपा वरील लेंड शार्क नि मत व्यक्त करावे) तरी होतात १७ हजार कोटी रुपये. (गांधीजींच्या समाधीवर टॉवर बांधला तर काही व्यक्ती मोठा प्रीमियम देतील पण तो भाग वेगळा) हाती मरा तो सव्वा लाख का म्हटले जाते पण झेल सिंग सारखे काहीही कर्तृत्व नसलेले नेते दिल्लीत मेल्यानंतर सुद्धा गरीब भारतीय जनतेची जागा बळकावून बसले आहेत. १७ हजार कोटी रुपयांत बरेच काही केले जाऊ शकते. हा जनतेचा पैसा आहे आणि तो विनाकारण कुणाच्या थडग्यावर गुंतून पडावा हे दुर्दैव आहे. हि सर्व थडगी त्या त्या नेत्याच्या जन्मस्थानी किंवा भारतातील सर्वांत अविकसित अश्या गावांत न्यावीत आणि दर वर्षी फुले वगैरे नाचण्याचे नाटक कर्णयसाठी मंडळी जेंव्हा तिथे जातील तेंव्हा एका निमित्ताने त्या भागांत रस्ते वगैरे बांधले जातील. देशांतील सर्वांत अविकसित गांवांची नावे पाहिजेत तर गांधी परिवाराने कुठून निवडणूक लढवली आहे ते पाहावे. बेल्लारी, अमेठी, रायबरेली, वायनाड इत्यादी. अर्थांत हि स्टेप १ आहे. हे झाल्यानंतर राष्ट्रपती भवन सुद्धा रिसॉर्ट मध्ये हलविण्यात येऊन राष्ट्रपतींनी उगाच राजवाड्यांत न राहता सामान्य सरकारी घरांत जावे. साधी राहणी उच्च विचारसरणी हि बापूंची शिकवण अमलांत आणायची हीच वेळ आहे. त्यानंतर समस्त IAS आणि त्यांच्या पिळवळीला सुद्धा त्यांच्या बंगल्यांतून बाहेर काढून मोठ्या हाय राईज टॉवर मध्ये जागा दिली पाहिजे आणि त्याचे भाडे त्यांच्या पगारातून कट केले पाहिजे. ह्या सर्व बदलातून किमान २-४ लक्ष कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. एकदा दिल्लीत हे साध्य केले कि प्रत्येक राज्यांत सुद्धा हाच मॉडेल राबवावा आणि सुरुवात थडगी आणि राजभवन ह्यावरून करावीत. चर्चा होऊ द्या.
  • Log in or register to post comments
  • 41487 views

प्रतिक्रिया

Submitted by कपिलमुनी on Mon, 02/08/2021 - 21:55

In reply to तुमच्या ह्या प्रतिसादावरून, एक म्हण आठवली .... by मुक्त विहारि

Permalink

बटाट्या पासून सोने काढण्याचे मशीन ?

हे काय मॅटर आहे हो ? कसले मशीन ?
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Sun, 02/07/2021 - 13:23

In reply to सहमत by Rajesh188

Permalink

आपल्या संतुलित आणि चौफेर

आपल्या संतुलित आणि चौफेर ज्ञानासाठी आपण काय वाचता हे आम्हाला सांगितले तर आमच्या सारख्या अज्ञ लोकांना मार्गदर्शन मिळेल. कारण आपली विचारक्षमता आणि तर्कक्षमता हि अमानवीय आहे असेच वाटत आले आहे. शक्तिमान प्रमाणे कुंडलिनी वगैरे जागृत केली आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/07/2021 - 14:11

In reply to आपल्या संतुलित आणि चौफेर by साहना

Permalink

हो ना ....

सहमत आहे ...
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on Mon, 02/08/2021 - 10:42

In reply to सहमत by Rajesh188

Permalink

ठ्ठो... २०२१ मधला सर्वात विनोदी प्रतिसाद!

ठ्ठो... २०२१ मधला सर्वात विनोदी प्रतिसाद! अर्थातच तो तुम्ही दिलाय म्हणुन विनोदी वाटला! अशीच आम्हा पामरांची करमणुक करत रहा प्रभु!!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 02/08/2021 - 12:14

In reply to ठ्ठो... २०२१ मधला सर्वात विनोदी प्रतिसाद! by अथांग आकाश

Permalink

अजून येतील....

करोना समोरून हल्ला करतो, असे अगाध ज्ञान ग्रहण करणारे कार्यकर्ते, अजून मौलिक ज्ञान देतील... आधी, तुम्ही लेखांची जबाबदारी घ्या, मी प्रतिसादांची खबरदारी घेतो, असे चालले होते .... आता गाडी, माझे प्रतिसाद, तुमची करमणूक .... अशा प्रगतीपथावर आली आहे ...
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 02/09/2021 - 13:22

In reply to कोणे एके काळी... by मुक्त विहारि

Permalink

हे आजकाल होत नाही?

हे आजकाल होत नाही का? फक्त नेहरुंच्या जागी दुसरे योग्य नाव टाकले की झाले. कसं आहे ना, कि 'अवतारा'ला भुलणे, ही आपल्या समाजाची आवड आहे. त्यामुळे नवे नवे अवतार आणि नवे नवे भुलणारे तयार होतच असतात. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 02/07/2021 - 13:48

Permalink

रोखठोक प्रश्न विचारले की

बहुतेक आयडी कोमात जातात असा माझा मिपावरचा अनुभव आहे. पण गेंड्याची कातडी काय असते हे मी हल्ली जोरदार अनुभवतो आहे
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/07/2021 - 14:09

In reply to रोखठोक प्रश्न विचारले की by भंकस बाबा

Permalink

इतका

पेशन्स हवा
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 02/07/2021 - 23:57

In reply to रोखठोक प्रश्न विचारले की by भंकस बाबा

Permalink

समोरचा निर्लज्ज असला

समोरचा निर्लज्ज आणि अती शहाणा असला की की आपल्याला सुद्धा निर्लज्ज होणे गरजेचे पडते. तरी सुद्धा शक्यतो भाषा सभ्य च वापरायची असा माझा प्रयत्न असतो. इथे अती निर्लज्ज पण आयडी आहेत गेंड्या ला पण लाजवतील असे. मी त्यांच्या पुढे काहीच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 02/08/2021 - 07:54

In reply to समोरचा निर्लज्ज असला by Rajesh188

Permalink

इथे अतीनिर्लज्ज पण आयडी आहेत गेंड्याला पण लाजवतील असे,

आम्ही त्यांना, अवतारी बाबा समजतो
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Mon, 02/08/2021 - 08:04

In reply to समोरचा निर्लज्ज असला by Rajesh188

Permalink

काही निर्लज्ज आयडिंकडे

काही निर्लज्ज आयडिंकडे गेंड्याची आणि सरड्याची कातडी मिक्स होऊन अली आहे, त्यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे मुख्यमंत्री साहेब?
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Mon, 02/08/2021 - 08:32

In reply to समोरचा निर्लज्ज असला by Rajesh188

Permalink

आजवर मिपावर

ज्या चर्चा चालतात त्या अभ्यासू वृत्तीने चालतात. जर एखादा म्हणत असेल की शेतकऱ्याचं आंदोलन हे निव्वळ भंपक जाहिरातबाजी आहे तर त्यासाठी तो माणूस प्रसारमाध्यमातले पुरावे , आंतरजालावरील लिंक , इतिहासातील नोंदी अशा गोष्टी सादर करते. पण गेंड्याच्या कातडीचे लोक आपल्याला सोयीस्कर असे पुरावे जसे पप्पूचे दावे, एनडिटीव्हीच्या बातम्या, रबिशकुमारच्या धांदात खोट्या वावड्या असे प्रस्तुत करतात. या बाबतीत अनेकदा तोंडघशी पडली आहेत हे धुरंदर! तरीही भाजपाद्वेष, मोदींफोबिया, चाटुगिरी या गोष्टीचे पालन करण्यासाठी आपला हेका सोडत नाहीत. मुद्देसूदपणे यांचे दावे खोडले तर गायब होतात व थोड्या कालानंतर दुसऱ्या धाग्यावर जाऊन गरळ ओकत बसतात. आतापर्यंतचा अनुभव हो!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 02/08/2021 - 08:36

In reply to आजवर मिपावर by भंकस बाबा

Permalink

दासबोध वाचला नाही तर, असे प्रतिसाद येणारच

अभ्यासोनी प्रकटावे, हे अवतारी बाबांना, समजत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by योगेश कोलेश्वर on Mon, 02/08/2021 - 12:03

Permalink

सहमत आहे...

सहमत आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by योगेश कोलेश्वर on Mon, 02/08/2021 - 12:08

Permalink

सहमत आहे... सहना जी च्या

सहमत आहे... सहना जी च्या मताशी
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 02/08/2021 - 13:32

Permalink

बाब्बो १७ हज्जार कोटी...

बाब्बो १७ हज्जार कोटी....उधळपट्टी आहे ही....पण एका बाजूने १७ हजार कोटींची उधळपट्टी केली तर दुसर्या बाजूला ३ हजार कोटींची उधळपट्टी करायचा हक्क मिळतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 02/08/2021 - 17:26

Permalink

कृती ?

@धागा लेखक -- हे तुमचे जे अतिशय उदात्त विचार आहेत, ते खूप चांगले आहेत. यावर तुम्ही काही कृती करणार आहात का ? जसे की पी आय एल ? गेला बाजार ऑनलाइन पेटीशन ?
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Mon, 02/08/2021 - 19:30

In reply to कृती ? by कपिलमुनी

Permalink

https://www.dhanvapasi.com/

https://www.dhanvapasi.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शा वि कु on Mon, 02/08/2021 - 19:40

Permalink

पटले.

अनेक लोकांना घरं नसतात, तर अश्या जागा वाया घालवणे म्हणजे न परवडणारी चैनच. हा आक्षेप केवळ ह्या जागा जनतेच्या पैशातून आल्या आहेत म्हणून आहे का ? उदा. गोल्फ कोर्सेस वर तुमचं काय मत ? जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Mon, 02/08/2021 - 19:53

In reply to पटले. by शा वि कु

Permalink

> हा आक्षेप केवळ ह्या जागा

> हा आक्षेप केवळ ह्या जागा जनतेच्या पैशातून आल्या आहेत म्हणून आहे का ? हो. सरकारी अधिपत्या खाली असलेली जमीन हि सर्व जनतेची आहे. ती आपल्या बापाची जहागीर आहे ह्या पद्धतीने राजकारणी आणि बाबू मंडळी वापरत आहेत. ह्याला आक्षेप आहे. खाजगी संस्थांनी आपल्या पैश्यांनी जमीन घेऊन गोल्फ कोर्स बांधले काय किंवा म्हशींचा तबेला बांधला काय, तिथे मला काहीही आक्षेप नाही. ज्याच्याकडून जागा घेतली त्याला मोबदला मिळाला कि झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Mon, 02/08/2021 - 20:04

In reply to > हा आक्षेप केवळ ह्या जागा by साहना

Permalink

फक्त एक अपवाद आहे. विविध

फक्त एक अपवाद आहे. विविध देवस्थानाच्या जमिनी सरकारने निर्लज्ज पणे चोरून आपल्या केल्या आहेत. ह्या जमिनीदेवस्थानांना परत मिळाल्या पाहिजेत आणि सर्व जनतेचा त्यावर हक्क नाही. त्याशिवाय ज्या कालावधींत सरकारने ह्या जमिनी आपल्या केल्या होत्या त्या कालावधीचे योग्य ते भाडे आणि त्यावर व्याजसुद्धा सरकारने देवस्थानांना परत दिले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by शा वि कु on Mon, 02/08/2021 - 21:14

In reply to फक्त एक अपवाद आहे. विविध by साहना

Permalink

देवस्थान ?

सर्व जनतेचा हक्क- कशाने प्रस्थापित होतो ? राजघाट आणि उदा, पंढरपूरचे देऊळ, यात एकावर जनतेचा हक्क तर एकावर "देवस्थान" या बॉडीचा हक्क कसाकाय ? पुढे, हि देवस्थान बॉडी कोण नियंत्रित करते ? उदा, सरकार निवडणुकीने निवडले जाते, कंपनीचे बोर्ड कम्पोसिशन मालक ठरवतात. तर देवस्थानात स्टेकहोल्डर्स कडून काय नियंत्रण होते ? उदा, देवस्थानाच्या पुढे जाऊन गड किल्ले ताजमहल वैगेरे पण खाजगी मालमत्ता का ? असायला हवे, त्या लॉजीकने. देवस्थाने बांधताना नागरिकांच्या पैश्यातूनच बांधली नसतात काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Mon, 02/08/2021 - 23:05

In reply to देवस्थान ? by शा वि कु

Permalink

चांगला प्रश्न आहे पण

चांगला प्रश्न आहे पण वेळेअभावी सध्या सोडून द्यावा लागत आहे. साईदीपक ह्यांची व्याख्याने ऐकावीत आपल्या बहुतेक प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 02/08/2021 - 19:59

Permalink

सरकारी अधिपत्या खाली असलेली जमीन हि सर्व जनतेची आहे.

ती आपल्या बापाची जहागीर आहे ह्या पद्धतीने राजकारणी आणि बाबू मंडळी वापरत आहेत. ह्याला आक्षेप आहे. सहमत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 02/08/2021 - 20:22

Permalink

सार्वजनिक मोकळ्या जागा

ह्या सर्व सर्व जनते साठी खुल्या असतील तर कोणाला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मुंबई मध्ये ओवल मैदान किंवा क्रॉस मैदान,हँगिंग गार्डन,गिरगाव चौपाटी ,प्रिय दर्शनी पार्क,संजय गांधी नॅशनल पार्क ह्या सरकारी जागा आहेत पण त्या सामान्य लोकांसाठी खुल्या आहेत ते उत्तम च आहे. नाही तर सामान्य लोकांना एवढ्या मोठ्या जागा खरेदी करणे शक्य नाही. सार्वजनिक जागा ह्या सार्वजनिक च असाव्यात खासगी लोकांना त्या विकायची गरज नाही. Rashtrpati भवन किंवा संसद,पंतप्रधानांचे निवास स्थान हे दिव्य भव्य च असावे विविध देशाचे प्रतिनिधी जेव्हा येतात तेव्हा त्याची छाप पडते. मला आठवतं एसटी ही गावं खेड्यात जायची अगदी 2 प्रवासी असेल तरी . ज्या गावात काहीच सोय नाही त्या लोकांना एसटी खूप उपयोगी पडायची. खासगी वाहतूकदार अशा तोट्याच्या रूट वर सेवा देणार नाही. रेल्वे 700 रुपयात 1800 km च pravas घडवून आणते तीच खासगी झाली तर किमान भाडे 2000 रुपयाच्या वर असेल . सर्वच सरकारी उपक्रम वाईट,असे नाही म्हणता येणार.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 02/08/2021 - 22:04

In reply to सार्वजनिक मोकळ्या जागा by Rajesh188

Permalink

योग्य मुद्दे पण जागा चुकीची ...

गोष्ट फक्त, सरकारी मोकळ्या जागांची चालली आहे... बाय द वे, एस.टी.चा मुद्दा बरोबर आहे... त्या मुद्द्यासाठी, वेळ असेल तर, वेगळा धागा काढलात तर उत्तम ...
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Tue, 02/09/2021 - 02:17

In reply to सार्वजनिक मोकळ्या जागा by Rajesh188

Permalink

> खासगी वाहतूकदार अशा

> खासगी वाहतूकदार अशा तोट्याच्या रूट वर सेवा देणार नाही. देऊ सुद्धा नये ! विनाकारण पैश्यांचा अपव्यय. टीप : खूप रूटवर खाजगी बसेस ची सेवा नव्हती कारण सरकारने त्यावर बंदी घातली होती. गोव्यांत सर्वत्र अगदी खोलवर जंगलांत सुद्धा खाजगी सेवा आहे. कर्नाटकांत बहुतेक ठिकाणी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 02/09/2021 - 13:47

In reply to > खासगी वाहतूकदार अशा by साहना

Permalink

सामाजिक जाणीव

सामाजिक जाणीव असणे हे खरोखर एवढे वाईट आहे का? समाजातील दुर्बल लोकांना बेसिक सेवा पुरवणे ही समाजाची आणि सरकार ची जबाबदारी नाही का? मग ह्या समाजातील दुर्बल घटकांना सुविधा पुरुवू शकत नसेल तर कशाला हवी आहे सुबत्ता आणि कशाला हवं आहे सरकार आणि कायदे kanun. सर्व सर्व सरकारी यंत्रणा नष्ट करा आणि ज्यांना जसे जगायचे आहे तसे जगू ध्या. फुकट पोलिस, आर्मी,पाणी योजना,रस्ते प्रशासन ह्या वर कशाला समाजाचा पैसा खर्च करायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/09/2021 - 13:51

In reply to सामाजिक जाणीव by Rajesh188

Permalink

.

जे लोक आज समाजवादाच्या नावाने बोंबलत आहेत , त्यांच्या आजा बाबांना नेहरूंने फुकट बीसीजी , इबीसी सवलत , विद्यार्थी बस पास वगैरे दिले नसते तर हेही वडनगरला चहा विकत बसले असते
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/09/2021 - 13:55

In reply to सामाजिक जाणीव by Rajesh188

Permalink

छान

आणि ज्या लोकांना गरिबाला फुकट बस देऊ नये असे वाटते त्यांना कोविड डोस अन दुबईतुन यायला वनदे भारत मिशन सवलतीत हवे असते
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 02/09/2021 - 14:34

In reply to छान by काळे मांजर

Permalink

आणि ह्यांना 24 तास पाणी घरात हवे असते

ते पुरवण्यासाठी सरकार जवळ जवळ फुकट गरिबांच्या जमिनी घेवून धरण बांधत आणि अगदी नगण्य पैसे घेवून ह्या लोकांना 24 तास पाणी पुरविले जाते.पण असे स्वस्तात आम्हाला पाणी नको असे एक पण म्हणत नाही. ती सरकार ची जबाबदारी च आहे असे तूनतूने वाजवत बसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Tue, 02/09/2021 - 01:27

Permalink

झोपु

१) योजनेअंतर्गत फुकट्यांना पक्की घरे मिळतात ते कसे थांबवावे? त्यामुळेही काही प्रमाणात धनवापसी होईल. २) या देशात भ्रष्ट राजकारण्यांची संख्या भरपूर आहे.त्यांची संपत्ती सरकारजमा केल्यास कित्येक अब्ज रुपयांची धनवापसी होईल. ३) आरक्षणाची तरतूद ही टॅक्सपेयरच्या जनतेचा पैसा तसेच विविध शासकीय योजनांमधला पैसा वळवून केली जाते.जी मुले आरक्षण घेऊन केटी किंवा वायडी होतात किंवा शेकडा ६५% टक्केपेक्षा कमी गुणांनी पास होतात त्यांना छदामही परत देऊ नये.ओपनवाल्यांसारखीच यांची पूर्ण फि घेतली जावी.फक्त मन लावून अभ्यास करणे हेसुद्धा शक्य नसेल तर शासनाने यांची फी का म्हणून माफ करावी? ही असली केट्या/वायडी किंवा अत्यल्प मार्कांनी पास झालेली मुले फुकट शिकवून देशाला फायदा तो काय? कशाकरता यांचा खर्च देशाने उचलावा?
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/09/2021 - 13:32

In reply to झोपु by उपयोजक

Permalink

.

पासिंग ची अट 50 ची आहे , ती सर्वांना कॉमन आहे ज्यांना अति मार्क मिळतात ते बाहेर जाऊन पैसे मिळवत बसतात , बसुदेत बापडे पण इथे नोकरी करणारे सामान्य लोक सामान्य लोकांच्यासाठी पूल बांधतात व इथली कामे करतात टॉपर आहे म्हणून तो माझ्यासाठी काम करेल असे काही नाही
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Tue, 02/09/2021 - 15:44

In reply to . by काळे मांजर

Permalink

टॉपर का करेल तुमच्यासाठी काम?

तुम्ही काही देणार नसाल आणि उलट पूर्ण फी भरुन घेणार असाल , दुर्गम भागातल्या कॉलेजात खस्ता खात शिकायला लावणार असाल तर तो तुमचा फायदा का बघेल? तुम्ही त्याचा काय फायदा करुन देता?
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/09/2021 - 15:56

In reply to टॉपर का करेल तुमच्यासाठी काम? by उपयोजक

Permalink

मी कुठे म्हटले त्याने आम्हालाच सेवा द्यावी ?

त्याने त्याचा माल कुठेही विकावा, माझा मुद्दा इतकाच आहे की कमी मार्क पडलेले , उशिरा पास झालेले ह्यांच्याबद्दल आकस नको तेही आम्हाला उपयोगी आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/09/2021 - 15:56

In reply to टॉपर का करेल तुमच्यासाठी काम? by उपयोजक

Permalink

मी कुठे म्हटले त्याने आम्हालाच सेवा द्यावी ?

त्याने त्याचा माल कुठेही विकावा, माझा मुद्दा इतकाच आहे की कमी मार्क पडलेले , उशिरा पास झालेले ह्यांच्याबद्दल आकस नको तेही आम्हाला उपयोगी आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Tue, 02/09/2021 - 17:35

In reply to मी कुठे म्हटले त्याने आम्हालाच सेवा द्यावी ? by काळे मांजर

Permalink

.

मला भाजी विकणारा , माझ्यासाठी रिक्षा बस लोकल ट्रेन मेट्रो चालवणारा , सिनेमा दाखवणारा, पॉपकॉर्न विकणारा, किराणा दुकान व फार्मसी चालवणारा, आधार कार्ड काढून देणारा , चहा विकणारा , सिक्युरिटी , ब्यांकेचा कशीयर ह्यात कोण युनिव्हर्सिटी टॉपर आहे ? ह्यात नापास होऊन मग नंतर पास होऊन डिग्री असलेलेही असतील मला हे लोक महत्वाचे की पहिल्या अटेम्प्टला पास होऊन गोल्ड मेडल मिळवलेले आणि अमेरिकेत जाऊन बसलेले ? राजहंस , चक्रवाक पक्षी असतील राजबिंडे , पण म्हणून आमची इको सिस्टीम कावळे , चिमण्या अन कबुतर घेऊनच पूर्ण होणार ना ? राजहंस मरेनात तिकडे
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 02/09/2021 - 17:39

In reply to . by काळे मांजर

Permalink

स्वतः जाऊ न शकल्याचे

तोकडे समर्थन ....
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Mon, 02/15/2021 - 08:41

In reply to मी कुठे म्हटले त्याने आम्हालाच सेवा द्यावी ? by काळे मांजर

Permalink

डोंबलाचा आकस

या अशा शाळा/कॉलेजात छपरी मार्क्स घेऊन पास होणाेर्‍यांना फि माफी बंद करुन पूर्ण फी वसूल करावी हा मुद्दा आहे.चांगले मार्क्स मिळवायचे नसतील तर सरकारने या आळशी लोकांचा खर्च का करायचा? पैसे काय झाडाला लागतात काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 02/15/2021 - 10:13

In reply to डोंबलाचा आकस by उपयोजक

Permalink

पैसे नाही, पण ....

मते लागतात
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 02/15/2021 - 12:16

In reply to डोंबलाचा आकस by उपयोजक

Permalink

पहिली गुणवत्ता म्हणजे काय ह्याची व्याख्या ठरवा

99% मार्क घेवून 5 लाख कमावणारा गुणवत्ता धारक आहे की 5 वी पास होवून करोडो रुपयाचा व्यवसाय उभा करणारा गुणवत्ता धारक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by काळे मांजर on Mon, 02/15/2021 - 17:19

In reply to डोंबलाचा आकस by उपयोजक

Permalink

50 % घेऊन पास होतात

50 % घेऊन पास होतात
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Tue, 02/09/2021 - 01:34

Permalink

महत्वाचे राहीलेच

या देशातल्या अनुदानित शिक्षकांना अक्षरश: लठ्ठ म्हणावेत असे पगार आहेत.यातले बहुतांश शिक्षक हे त्या पगाराच्या तुलनेत आऊटपुट देत नाहीत.काहीजणांना तर यांच्याच विषयातलं पुरेसं ज्ञान नसतं.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विज्ञानातलं एकही नोबेल मिळालेलं नाही. ही आपल्या हिणकस शिक्षणव्यवस्थेची फळे.मग का या शिक्षकांना लठ्ठ पगार द्यावेत?
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Tue, 02/09/2021 - 12:39

In reply to महत्वाचे राहीलेच by उपयोजक

Permalink

शिक्षण खात्यांत अक्षरशः

शिक्षण खात्यांत अक्षरशः पैश्यांची नासाडी होत आहे. गोव्यांत दरविद्यार्थ्यामागे सरकार दार वर्षी ४०,००० रुपये खर्च करते. खाजगी शाळा २०,००० रुपयांत जास्त चांगला रिसाल्ट आणून दाखवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 02/09/2021 - 13:23

In reply to शिक्षण खात्यांत अक्षरशः by साहना

Permalink

पैशाची नासाडी होते आणि शिक्षणाची पण....

जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Tue, 02/09/2021 - 01:36

Permalink

या अर्धवट ज्ञानी

आणि चांगले आऊटपुट न देणार्‍या शिक्षकांची यादी बनवून त्यांचे पगार एक चतुर्थांश करावेत.कितीतरी धनवापसी होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 02/09/2021 - 07:37

Permalink

भावना आणि त्यामागची तडफड

साहाना जी आपल्या भावना आणि त्यामागची तडफड ( विचारांची) कळली .. १००% मान्य असे नाही म्हणणार पण मूळ मुद्दा जर " हा असगळा अतिरेक होतोय" हे म्हणणे असले तर अगदी मान्य परंतु आपण दुसऱ्या टोकाला ( विचाराने ) जात नाही ना असे हि वाटते आपला एकूण लेख वाचून .. उदाहरण... द्यायचे तर श्रीमान केजरिवला यांनी सुरवातीला काहीतरी मी सरकारी गाडी / मोठे घर वापरणार नाही असा पवित्रा घेतलं होता असे आठवते ...तसे आहे .. त्यांना लोक सांगत होती कि अरे बाबा ती गाडी आणि ते घर हे त्या पदासाठी आहे ... त्या मागे सुरक्षा, आणि इतर हि करणे असतात.. अर्थात ज्ञानींझैलसिंगजींचे यांचे स्मारक २० एकर मध्ये आहे हे ऐकून "चम्मत ग" वाटली ... ज्या समाजाला व्यकितपूजा एवढी मान्य आहे त्या देशाने २०१ एकर चा असा वापर करणे यात आश्रय कसले म्हणा !
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 02/09/2021 - 08:18

In reply to भावना आणि त्यामागची तडफड by चौकस२१२

Permalink

ह्या सगळ्या गोष्टी ...

व्यक्तिपुजेच्याच आहेत ...
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Tue, 02/09/2021 - 12:42

In reply to भावना आणि त्यामागची तडफड by चौकस२१२

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Tue, 02/09/2021 - 22:56

Permalink

धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे

धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे आणि फिरून फिरून बहुतेक लोक त्याच त्याच मुद्द्यावर येत आहेत त्यामुळे ह्या चर्चेतून मी निवृत्ती घेते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com