Skip to main content

अमेरिकेतील चमत्कार

लेखक यन्ना _रास्कला यांनी शनिवार, 11/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1212
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अहो ईकडे मुंबईत खेळायला मैदानेच शिल्लक नाहित जी आहेत तिथे वर्षभर काहि ना काही प्रोग्राम चालु अस्तात ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

दोरीवरल्या उड्या माराय जास्त जागा लागत नाय. आणि गावाकडेला तर बख्खळ जागा असते पघा.

फक्त क्रिकेटचा खेळ असा आहे कि तो सगळीकडे खेळाय, शिकायला मिळतो. पण तो मला आवडत नाही. तो माणसाला रिकामटेकडा बनवतो. आपल्या देशात लोक काम धंदा सोडुन क्रिकेट पाहात बसतात. जाउ दे.)
आयचा घो ... दुसरं पब्लिक रिकामं बणतं म्हणून मला ती गोष्ट आवडत णाही हे म्हणणं पचायला जड जातंय .. कोणी हाजमोला द्या रे :) उद्या "बाई" मूळे लोक्स रिक्कामटेकडे होतात म्हणून "मला बाई आवडत णाही हो ... " असं म्हणताय का ? =)) टिप : प्रतिसाद झोल वाटल्यास .. यण्णा रास्कला .. डोण्ठ माईंढ ईठ !!

काय आवडायचं ते आवडु दे. मी कोन आब्जेक्शन घेनारा. मी मात्र माझ्या मुला्न्ना क्रीकेट पास्न दुर ठेवल. बुद्धीबळ शिकवलं.

बुद्धिबळा बरोबर क्रिकेट शिकवलं (शिकवलं की खेळू दिलं ? ) असतं तर शारिरीकबळ ही मिळालं असतं .. आणि बुद्धिबळ खेळलं की क्रिकेट ला बंदी ? असो .. माझ्या मते हा ज्याचा त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट असावा ... पालकांनी खेळांच्या बाबतीत तरी मुलांवर बळजबरी ण केलेलीच बरी :)

हाच सल्ला तुमी जबरदस्तीन मुलांना क्रीकेट खेळायला घालणाऱया पालकांना का नाय देत. कि बाबा रे शारिरिक खेळाबरोबर मानसिक खेळ पन चान्गले असतात. मुलान्ची आवड लक्शात घ्यावा. पन लक्शात घ्या की मी मुलांन्ला लंगडी, पकडापकडी खेळाय कधी नको म्हनले नाय.

फक्त क्रिकेटचा खेळ असा आहे कि तो सगळीकडे खेळाय, शिकायला मिळतो. पण तो मला आवडत नाही. तो माणसाला रिकामटेकडा बनवतो. आपल्या देशात लोक काम धंदा सोडुन क्रिकेट पाहात बसतात. जाउ दे.) एकदम सहमत. (अवांतरः क्रिकेट काही लोकाना नको तेव्हढा पैसा देतो)

इतर या पर्यायास मत दिले आहे. आमच्या मुला आम्ही काहीही शिकवत नाही. तोच आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, खेळ शिकवतो. चुकून आम्ही काही शिकवले तर ते कसे चुकीचे आहे हे तोच आम्हाला सांगतो (उदाहरणार्थ, मी त्याला फुगडी, झिम्मा शिकवत होते.) त्यामुळे आजकाल आम्ही पुन्हा लहान होऊन संस्कार वगैरे करून घेतोय. शेवटी आम्ही जालिंदरबाबांना शरण गेलोय. रेवती

In reply to by रेवती

चुकून आम्ही काही शिकवले तर ते कसे चुकीचे आहे हे तोच आम्हाला सांगतो शब्दच खुटले.

अमेरिकेत चमत्कार असा घडतो की आई-बाप आणि मुले सर्वच कोणत्या ना कोणत्या खेळात स्वतःला रमवून घेण्यास उत्सुक असतात. एक मूल खेळ शिकू लागले की दुसरे शिकते. दुसरे शिकले की तिसरे ही साखळीप्रक्रिया आहे. आपल्याकडे नाही का एक मूल प्रायव्हेट ट्यूशनला जाऊ लागले की दुसरे जाते तशीच. ;) वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी पाठिंबा, भांडवल, मदत, वातावरण, गरज अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात त्या अमेरिकेत सुबत्तेमुळे सहज मिळतात. तसे, खेळ खेळणे आणि त्याचा पाठपुरावा करणे ही सोपी गोष्ट नाही. आमच्या माथ्यावर असलेली जबाबदारी येथे लिहिते - १. आठवड्यातून किमान चार तास पोहोणे. यांत सुमारे तासाला १५०० यार्डापेक्षा जास्त पोहावे लागते. २. शर्यतींमध्ये सक्तीचा सहभाग ३. नियमीत व्यायाम. ४. खाण्यापिण्यावर नियंत्रण ५. पालकांना सक्तीची स्वयंसेवा. या वर्षी आम्हाला ४५ तासांची स्वयंसेवा करावी लागली. अमेरिकेत अनेक पालक हे स्वखुशीने करतात. भारतात करतील का याविषयी अनभिज्ञ आहे परंतु भारतात मुलांना खेळाडू बनवून करिअर करण्याची पद्धत अद्याप रूजू झालेली नाही. गेल्या काही वर्षांत फरक मात्र पडलेला आहे.

In reply to by प्रियाली

याबरोबरच, १. खेळाडूंना असलेल्या विशेष सवलती आणि मान २. नसलेली(?) rat race. भारतात सगळ्याच आज्यांना आपला नातू Dr. वा engineer ची पाटि लावणार अशी स्वप्नं पड्तात.

In reply to by प्रियाली

म्हणुनच ऑलिंपिकमधे हे लोक खोऱयानं / टिकावानं मेडल कमावतात. कधीपन पहा पहिला नंबर अमेरिका आनि दुस्रा चीन. छान प्रतिक्रीया दिलित तुम्ही.

तिकडे खुप मुले ओबेस दीसतात , त्याचे काय ? ही पण एक त्यांची दुसरी बाजु आहे