डुआयडी घ्यायचा विचार करत आहे. टोपणनांव काय घेऊ?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
8 Feb 2021 - 10:40 am
गाभा: 

नमस्कार,

गेली काही वर्षे, मिपाकर आहे.मिपावर वाचायला भरपूर आहे.भटकणे,चरणे आणि नाटक सिनेमे यांचे परिक्षण वाचता वाचता, मिपा ही माझी पहिली पसंती असते.

सुरूवातीला चर्चेत भाग घेतांना, सहनशीलता कमी होती पण नंतर वाढत गेली, ह्याचे एकमेव कारण म्हणजे, डुआयडी उर्फ अवतारी बाबा...

ज्या वेगाने हे डुआयडी नाहीसे होतात, तितक्याचे वेगाने हे परत येतात. अशा, अवतारी मंडळींच्या विचारांना, दुर्लक्षित करायचा, कितीही प्रयत्न केला तरी, अशा अवतारी बाबांच्या विचारांना, कधी ना कधी, प्रत्युत्तर हे द्यावेच लागते.

अवतारी बाबा, कधीकधी वैयक्तिक पातळीवर उतरतात, अशा वेळी, त्यांना पण त्याच भाषेत उत्तर देण्याची इच्छा होते.असे उत्तर देतांना, तोल जातोच.

त्यामुळे, अजून एखादा डुआयडी हाताशी असावा, असे वाटायला लागले आहे. पण नक्की कुठले, टोपणनाव घ्यावे? हे समजत नाही....

कठीण समय येता, मिपाकर मदत करतात, हा स्वानुभव आहे, त्यामुळे, नवीन अवतार घ्यायचा असेल तर, टोपणनाव कुठले घेऊ?

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

8 Feb 2021 - 11:47 am | आनन्दा

चपलाहार असे नाव घ्या..

शजण्यांच्या गळयात सोन्याचा, नाठाळांच्या गळ्यात खेटरांचा :ड

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 12:03 pm | मुक्त विहारि

आवडले

सौंदाळा's picture

8 Feb 2021 - 12:22 pm | सौंदाळा

आपल्या मिपावर पुर्वी एक ग्रेटथिंकर म्हणुन असामी होते (सचिन, उद्दाम, पोटे वगैरेंचे भाईबंद) यांच्याशी जर नडायचे असेल तर तुम्ही 'थेटथुंकर' असा आयडी घ्या असे सुचवतो.
नाहीतर आपल्या लाडक्या आणि प्रातःस्मरणीय 'माईसाहेब कुरसुंदीकर' यासारखा 'अप्पासाहेब फुरसुंगीकर' असा आयडी पण घेऊ शकता.

गवि's picture

8 Feb 2021 - 12:32 pm | गवि

धन्य आहात हो मुवि..

जाहीर धागा काढून क्राउडसोर्सिंग करुन "डुप्लीकेट" आयडी घेणारे पहिले मिपाकर तुम्हीच असाल.. __/\__

बाकी यंदा आंबे वगैरे काय म्हणतात? मोहोर आहे का?

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 2:58 pm | मुक्त विहारि

मी हळद लागवड केली आहे आणि तेच माझे मुख्य पीक आहे ...नैसर्गिक हळद हवी असेल तर सांगा, 375₹ किलो... 10 किलो पेक्षा जास्त हवी असेल तर, 350₹ किलो...मागच्या वर्षीचे सगळे खरेदीदार, खूष आहेत.Repeat Orders आहेत...

पुढील वर्षा पासून, आयुर्वेदिक कंपनी बरोबर कंत्राट करून, शतावरी, अश्र्वगंधा, सर्पगंधा, आले, गवतीचहा, अशी लागवड करण्याचा विचार आहे..सध्या प्राथमिक बोलणी सुरू आहेत.

भाजपने आमच्या सारख्या अल्पभुधारक शेतकरी वर्गाला चांगलीच मदत केली आहे.

उत्तम आंबे हवे असतील तर, एक धागा काढला आहे ....

खात्रीशीर आंबे मिळतील आणि

वा. आयुर्वेदिक वनस्पती. उत्तम जरा वेगळी वाट निवडलीत. काही लागल्यास व्यनि करुच.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 3:15 pm | मुक्त विहारि

आयुर्वेद वनस्पती, हळद, मिरची ही उत्तम आंतरपिके आहेत ...

शेती मध्ये, खूप काही करण्यासारखे आहे... मी फार उशीरा सुरवात केली, लक्ष्मीबाई उशीरा आल्या ...

प्रयोग यशस्वी झाला तर, कट्टा शेतावर करू ...

वाद आणि मतभेद तर, होत राहणारच, पण मनभेद नकोतच

अवश्य करु कट्टा. मनभेद कुठले? बाकी वाद बीद सर्व मारा फाट्यावर.

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2021 - 4:14 pm | टवाळ कार्टा

भारी.....एक कट्टा बनता है

अनन्त अवधुत's picture

9 Feb 2021 - 12:52 am | अनन्त अवधुत

अभिनंदन! मनासारखे काम करताय.

Rajesh188's picture

8 Feb 2021 - 6:20 pm | Rajesh188

तुम्ही निवृत्त कर्मचारी आहात का?
म्हणजे नोकरी मधून निवृत्त होवून शेत मध्ये उतरलेली लोक सुद्धा नव नवीन प्रयोग करत असतात
फक्त शेती वर अवलंबून नसल्या मुळे दडपण येत नाही त्या मुळे शेती पण उत्तम होते.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 6:39 pm | मुक्त विहारि

शेती हा माझा जन्मजात पिंड आहे ...

वडीलोपार्जित शेती नसल्याने, शेती काॅलेज मध्ये, इच्छा असूनही शिक्षण घेता आले नाही... फक्त शेतकरी वडीलांचा किंवा शेतकरी आईचाच मुलगा/मुलगी, शेतकी काॅलेज मध्ये प्रवेश घेऊ शकतो, ही ऐकीव माहिती होती ... शिवाय, आमच्या घरातून विरोध पण झाला असताच ...

पण, पुढे नौकरी करत असतांना समजले की, योग्य पद्धतीने शेती केली तरच, शेती फायद्यात येऊ शकते...

त्यामुळे लक्ष्मीबाईंची पुजा करायला, आखाती देशांत गुलामगिरी केली...हो, नौकरी करणे, ह्याला मी, गुलामगिरीच समजतो ...

कौटुंबिक जबाबदारी पार पाडल्या नंतर, शेती हा पुर्णवेळ व्यवसाय निवडला आहे ...

सुदैवाने, मला 2 देणग्या जन्मतःच मिळाल्या

1, जमिनीचे परिक्षण, जमिन माझ्या बरोबर बोलते ... तिथे नक्की कुठले पीक येईल? हे जमीन सांगते ... एक उदाहरण देतो, ज्या जमिनीत मिरच्या येण्याची शक्यता न्हवती, लोकं मोठ्या प्रमाणात मिरच्या काढत न्हवते, तिथे मी मिरच्या पिकवून दाखवल्या ... काही मिपाकर, येऊन गेले होते...

2. चौकसपणा .... शेतकरी लोकांना, मी भंडावून सोडतो ... शेती ही कुणालाच सर्वज्ञ करत नाही, परिपूर्ण तरीही अपुर्ण ...

काही गोष्टी सुदैवाने मिळाल्या, बायकोची साथ, मुलांचे स्वावलंबन,

त्यामुळे, तुम्ही म्हणता तसेच आहे, आर्थिक ताण नसल्याने, वाट बघू शकतो...

शेती बद्दल काहीही विचारा, काहीतरी नक्कीच मदत करीन, शिवाय आमचा एक चांगला गृप आहे, तिथे पण माहिती मिळेल

नक्कीच शेती विषयी काही शंका असल्यास विचारीन
बाकी इथे मतभेद चालायचेच ते फक्त कमेंट पुरतेच

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 6:52 pm | मुक्त विहारि

अशा गोष्टी मनावर घेत नाही,

त्याला तितका वेळ नसतो...

काळे मांजर's picture

8 Feb 2021 - 7:59 pm | काळे मांजर

मग आम्ही म्हणजे शेतातले तण समजा
नैतर पिकावर बसणारे पक्षी
नैतर म्हशींवरचे किडे

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 8:02 pm | मुक्त विहारि

तुमचे भाग्य थोर आहे ...

तुम्ही म्हणजे, साक्षांत भगवंताच्या आशीर्वादाला योग्य आहात ....

आमच्याकडे शेती आहे पण ती हिश्श्याने करायला दिली आहे,मला शेतीमध्ये आवड आहे.मी पण गवती चहा चा प्रयोग करणार आहे.वर उल्लेख केलेल्या ग्रुप चा धागा देऊ शकाल का?
धन्यवाद

आमच्याकडे शेती आहे पण ती हिश्श्याने करायला दिली आहे,मला शेतीमध्ये आवड आहे.मी पण गवती चहा चा प्रयोग करणार आहे.वर उल्लेख केलेल्या ग्रुप चा धागा देऊ शकाल का?
धन्यवाद

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 10:16 pm | मुक्त विहारि

म्हणजे, प्रत्येक जण, एकमेकांना वैयक्तिक ओळखतो..

मी तुम्हाला प्रत्यक्ष ओळखत नसल्याने, गृपमध्ये घेऊ शकत नाही...

पण माहिती देऊ शकतो...

दापोली कृषी विद्यापीठात गेलात तर, सविस्तर माहिती मिळेल...

गवती चहा हे मुख्य पीक म्हणून घेऊ नका ... दर कमीच मिळेल .. त्यामुळे, एखाद्या कंपनी बरोबर कंत्राट करून घ्या .. दर खूप मिळणार नाही, पण माल पडून राहणार नाही ...

सध्या बरेच जण, ह्या पीकाच्या मागे आहेत, त्यामुळे, सरसकट लागवड करू नका.. हाताशी अजून 3-4 पीके असू द्या ... विशेषतः आले आणि हळद आणि ताग ...

चौथा कोनाडा's picture

9 Feb 2021 - 12:51 pm | चौथा कोनाडा

प्रथम जी,
तुम्हाला गवती चहा लागवडीत १००% यश मिळणार !
तुम आगे बढो, मिपाकर आपके साथ हैं !

मग "मिपा गवती चहा कट्टा" करुयात !

पण, व्यापारी भाव पाडतात ...

म्हणून तर हे सरकार हळूहळू, हमी भाव नश्र्चित करत आहे ... सरकारने ठरवलेला हमीभाव, दलालांना मान्य होणार नाही ... अशी सगळी गंमत आहे ...

इतर, कुठल्याही आंदोलनात इतका पैसा ओतलेला नाही ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2021 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डू आयडी कोणताहीही घ्या. पण चांगले लेखन प्रतिसाद लिहा. बक-याच्या लेंडया सारखे लेखन प्रतिसाद टाकू नका. पुढील वाटचालीस शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 2:47 pm | मुक्त विहारि

खाण तशी माती आणि जसा युक्तीवाद तसाच प्रतिसाद

चौकटराजा's picture

8 Feb 2021 - 12:57 pm | चौकटराजा

चर्चेतून तत्वबोध होत नसेल तर मिपाला रामराम करा ! वैयक्तिक टीका केल्याने काही साध्य होणार नाही ! काही आय डी आपण या विषयात तज्ज्ञ असल्याचे थाटात लिहित असतात . काही आलेल्या अनुभवावरून लिहीत असतात ! कोणताही अनुभव हा त्रिकालाबाधित नियम बनवू शकत नाही वा कोणताही डेटा ! सर्व शेवटी काळाच्या कसोटीवर टिकले तरच मान्य होते . व असा काळ किती जायला पाहिजे हे नक्की सांगणे अवघड आहे शेअर बाजाराच्या सर्वात खालची पातळी कोणती हे शोधण्यासारखे . मला तज्ज्ञ ही संज्ञाच भंपक वाटते . प्रत्येक माणूस हा एका इझम खाली वावरत असतोच ! त्यामुळे एकाअंगी लिखाण हे मानवी समाजाला काही नवे नाही ! हा रोग अगदी गाजलेल्या लेखकात ,पत्रकारात व तथाकथित विचारवंत यामध्येही माजलेला आहे ! जगात इझमी च्या प्रभावाखाली न वावरणारा एकच " तो" आहे तो म्हणजे निसर्ग ! त्यात रमा ! तिथे डू आयडी घ्यावा लागत नाही ! इथे लिहायचे व पुढे जायचे इतकेच आपल्या हाती असते !

उपयोजक's picture

8 Feb 2021 - 12:57 pm | उपयोजक

घ्या.हे तेज़ाब सिनेमातल्या एका दादा/भाई चं नाव आहे.

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2021 - 1:23 pm | टवाळ कार्टा

"मी पयला" हा आयडी घ्या =))

श्रीगुरुजी's picture

8 Feb 2021 - 2:05 pm | श्रीगुरुजी

गजानन कागलकर हे सदस्यनाम घ्या. हा डुआयडी आहे हे नाव वाचताक्षणी सर्वांना समजेल.

मास्टरमाईन्ड's picture

8 Feb 2021 - 3:21 pm | मास्टरमाईन्ड

असला काहीही उद्योग करायची काहीही गरज नाही.

अवतारी बाबा, कधीकधी वैयक्तिक पातळीवर उतरतात, अशा वेळी, त्यांना पण त्याच भाषेत उत्तर देण्याची इच्छा होते.असे उत्तर देतांना, तोल जातोच.

त्यामुळं असल्या लोकांच्या प्रतिक्रियांना सरळ सरळ अनुल्लेखानं मारणं उत्तम.
तोल घालवून उगाचच स्वतःचा रक्तदाब कशाला वाढवून घ्यायचा?

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 4:19 pm | मुक्त विहारि

आपण कितीही प्रयत्न केला तरी, चांगल्या रितीने चाललेल्या चर्चेत, मीठ कालवायला येतातच...

डोकं शांत ठेवणे, हा एक चांगला मार्ग वाटत आहे ....

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Feb 2021 - 4:58 pm | चंद्रसूर्यकुमार

पांढरे मांजर

सॅगी's picture

8 Feb 2021 - 5:13 pm | सॅगी

किंवा माळे कांजर

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2021 - 4:59 pm | चौथा कोनाडा

आत्मनिर्भर_४२० हे ड्युआयडी नाम कसं वाटतंय ?

वामन देशमुख's picture

8 Feb 2021 - 6:10 pm | वामन देशमुख

डुआयडी टोपणनाव घ्या.

स्वलिखित's picture

8 Feb 2021 - 9:34 pm | स्वलिखित

नावांची अणि टोपण नावांची यादिच इथे लिक केल्या जातेय , आवरा !!!

डॅनी ओशन's picture

8 Feb 2021 - 9:36 pm | डॅनी ओशन

१. सिरीयल धागाकार
२. सात्विक संताप
३. आय लाईक टू 'मुवि'ट 'मुवि'ट
४. जिलुबी
५. √१८८
६. Hemant33 (साक्षात १८८ प्रभूंचा मिपावर न आलेला अवतार आहे हा. हायेष्ट रेकमणदेशन.)

थ्यांक मी लेटर.

~ डॅन.

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2021 - 9:50 pm | टवाळ कार्टा

तिसरा पर्याय =))

अनन्त अवधुत's picture

9 Feb 2021 - 12:48 am | अनन्त अवधुत

लॉगिन करताना त्रास होईल फार, ही एक अडचण.

पप्पू, बाळू, चमन, रित्त्विक, शारूक, सल्लू, गांधी नं १ वगैरे वगैरे

कपिलमुनी's picture

9 Feb 2021 - 10:59 pm | कपिलमुनी

रिकामटेकडा असा आयडी घ्या