संकल्प
लेखनविषय:
समेटून सारे थागे
सुर्य अस्ताला निघाला
पुन्हा येण्याचा त्याने
संकल्प सोडला
झाली निवृत्ती
वेळ निवांत मीळाला
काय भोगल सोडल
याचा हिशेब कळाला
उरल सुरलं पुर्ण करावं म्हणतो
जायच्या आधी काही लिहावं म्हणतो
काय अन कीती लिहावं
याला काही अंत नाही
आवडेल कुणाला, कुणाला रुचेल
कुणी वाचेल कुणाला पटेल
याचा खेद किंवा खंत नाही
इथल सगळं इथेच सोडून
पुढल्या मुक्कामी निघावं
पाऊलखुणा मीटण्या आधी
म्हटलं जरा थोडंस लिहाव
मागे वळून पहाता
पाश जणू कोळ्याचे जाळे
कुठुन करू गोळा सुचेनासे झालेhi
न तोडता धागे आवराव वाटलं
जायच्या आधी लिहून ठे़वाव वाटलं
आले पीक दाण्यावर खळ्यात आडवे पडले
ज्याच्ये त्याला देवून पुढे जायाचे ठरले
काय भोगलं ,काय पाहीलं
जरा जाण्या आधी लिहाव वाटले
येऊ म्हणता येत नाही
जाऊ म्हणता जात नाही
तरी लिहावं म्हणतो
संकल्प सोडावा म्हणतो
२९-१०-२०२०
वाचने
2931
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
लिहीत राहा.
चांगली आहे कविता
सुंदर
In reply to सुंदर by Yogesh Sawant
नाय नाय
छान आहे
प्रतिसाद