सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वाचने
175529
प्रतिक्रिया
559
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
In reply to भारतीयांचा अपमान by वामन देशमुख
एक माणुस नाही तो दिप सिद्धु
In reply to बरेच लोक म्हणतात की by नगरीनिरंजन
मग तुमच्या मते दुसरा पर्याय सांगा
In reply to एक माणुस नाही तो दिप सिद्धु by गणेशा
आताच्या घडीला मोदी पेक्षा मला
In reply to मग तुमच्या मते दुसरा पर्याय सांगा by मुक्त विहारि
म्हणजे
In reply to आताच्या घडीला मोदी पेक्षा मला by गणेशा
पेट्रोल दर कुठे चाललेत..३५ ला
In reply to आताच्या घडीला मोदी पेक्षा मला by गणेशा
सहमत आहे
In reply to पेट्रोल दर कुठे चाललेत..३५ ला by सुक्या
+१
In reply to आताच्या घडीला मोदी पेक्षा मला by गणेशा
आताच्या घडीला मोदी पेक्षा मला
In reply to आताच्या घडीला मोदी पेक्षा मला by गणेशा
आताच्या घडीला मोदी पेक्षा मला इतर कोणताही नेता चांगला काम करेल असे वाटते...पण असे बहुसंख्य मतदारांना वाटते का?जो माणुस बस हुई महंगाई कि मार अब कि बार मोदी सरकार असे म्हणत सत्तेत येतो, तो त्याचा हा नाराच विसरतो..हा नारा ते विसरले?ज्याला परदेशात जाऊन ट्रम्प सरकार म्हणायचा अहम असतो त्याला भारताचा विचार करता येऊ शकतो असे वाटत नाही..आपल्या सव्वा तासांंच्या भाषणात मोदींनी अनेक मुद्दे मांडले होते. त्यात ट्रंपचा उल्लेख फक्त एकदाच होता. ट्रंपचा फक्त एकदा उल्लेख करणे म्हणजे अहम्? ट्रंपचा फक्त एकदा उल्लेख करणे म्हणजे भारताचा विचार न करणे?पेट्रोल दर कुठे चाललेत..३५ ला आणणार होते ना?असे आश्वासन कोणी दिले होते? २०१३ मध्ये पुण्यात पेट्रोल प्रति लिटर ८४ रूपये झाले होते. २०१४-१९ या काळात हा दर ६४ पर्यंत कमी झाला होता. सध्या ९१ आहे.अर्णब च्या whats app मेसेजचे काय? असो असे बरेच मुद्दे आहे..आक्षेप घेण्यासारखे काय आहे त्या मेसेजेसमध्ये?दूसरा पर्याय नाही ही भंकस गिरी आहे...सध्या पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे.मी काय म्हणतो ...
In reply to आताच्या घडीला मोदी पेक्षा मला by श्रीगुरुजी
मोदी यांचे शिक्षण ...
In reply to एक माणुस नाही तो दिप सिद्धु by गणेशा
आता तुम्हाला मोदी स्वतः
In reply to मोदी यांचे शिक्षण ... by मुक्त विहारि
चहा विकणारा, पंतप्रधान होऊ शकतो, हीच भाजपची ताकद आहे
In reply to आता तुम्हाला मोदी स्वतः by गणेशा
Link घ्या.. म्हणालेत साहेब
In reply to आता तुम्हाला मोदी स्वतः by गणेशा
मग तुम्ही पर्याय सुचवा
In reply to Link घ्या.. म्हणालेत साहेब by गणेशा
हे सुद्धा It cell ने पसरवलेले
In reply to मग तुम्ही पर्याय सुचवा by मुक्त विहारि
मग ते विश्र्वेश्र्वरैय्या चा व्हिडियो पण खोटा आहे का?
In reply to हे सुद्धा It cell ने पसरवलेले by गणेशा
तुम्ही तो बटाट्याचा vedio
In reply to मग ते विश्र्वेश्र्वरैय्या चा व्हिडियो पण खोटा आहे का? by मुक्त विहारि
मोदींच्या
In reply to तुम्ही तो बटाट्याचा vedio by गणेशा
You tube वर आहे
In reply to तुम्ही तो बटाट्याचा vedio by गणेशा
मनमोहन सिंग
In reply to तुम्ही तो बटाट्याचा vedio by गणेशा
सर्व विद्यापीठात बहिस्थ
In reply to Link घ्या.. म्हणालेत साहेब by गणेशा
सहमत आहे
In reply to सर्व विद्यापीठात बहिस्थ by श्रीगुरुजी
मोदींच्या कला शाखा पदवीचे
In reply to Link घ्या.. म्हणालेत साहेब by गणेशा
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to मोदींच्या कला शाखा पदवीचे by श्रीगुरुजी
डिग्री नसलेल्या श्री श्री मोदी
In reply to एक माणुस नाही तो दिप सिद्धु by गणेशा
वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.
In reply to एक माणुस नाही तो दिप सिद्धु by गणेशा
what to say about him
In reply to एक माणुस नाही तो दिप सिद्धु by गणेशा
हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही हे
दिल्ली येथील राज्य सरकारची पण जबाबदारी आहे
In reply to हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही हे by रात्रीचे चांदणे
Deep sidhu हे नाव पण सांगितले
In reply to दिल्ली येथील राज्य सरकारची पण जबाबदारी आहे by मुक्त विहारि
एकटा माणूस संपूर्ण शहरात
In reply to Deep sidhu हे नाव पण सांगितले by गणेशा
आंदोलन शेतकऱ्यांचे नसून दलाल
In reply to हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही हे by रात्रीचे चांदणे
मुद्दे पटले
In reply to आंदोलन शेतकऱ्यांचे नसून दलाल by बाप्पू
हिंदू-मुस्म्लिम करुन झालं आता
In reply to आंदोलन शेतकऱ्यांचे नसून दलाल by बाप्पू
आता नवीन वकील आलेत.. तसे
In reply to हिंदू-मुस्म्लिम करुन झालं आता by नगरीनिरंजन
सहमत आहे....
In reply to आता नवीन वकील आलेत.. तसे by बाप्पू
हिंदू शीख आम्ही करत नाही.
In reply to आता नवीन वकील आलेत.. तसे by बाप्पू
सहमत आहे...
In reply to हिंदू शीख आम्ही करत नाही. by चौकस२१२
भारतीय सैन्यात भारतासाठी किती
In reply to हिंदू-मुस्म्लिम करुन झालं आता by नगरीनिरंजन
भारतीय सैन्यात भारतासाठी किती शीखांनी आत्मबलिदान केले आहे ह्याची कल्पना सर्वांनाच असेल.-- ती कल्पना सर्वांनाच आहे. म्हणून काय दंगे करण्याची स्पेशल परमिशन त्यांना मिळायला हवी की काय !सहमत आहे
In reply to भारतीय सैन्यात भारतासाठी किती by प्रसाद_१९८२
+१
In reply to हिंदू-मुस्म्लिम करुन झालं आता by नगरीनिरंजन
ध्वज, खलिस्तान समर्थक
In reply to आंदोलन शेतकऱ्यांचे नसून दलाल by बाप्पू
दलाल विरूद्ध सामान्य शेतकरी, अशी खिचडी आहे
In reply to ध्वज, खलिस्तान समर्थक by चौकस२१२
मोदी ना पर्याय नाही
हो ना ....
In reply to मोदी ना पर्याय नाही by Rajesh188
इतिहास साक्षी आहे
In reply to हो ना .... by मुक्त विहारि
188
In reply to इतिहास साक्षी आहे by Rajesh188
सहमत आहे
In reply to 188 by बाप्पू
मोदींनी IMF ला पण मॅनेज